[कविता' २०२०] - वाग्मोती

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
8 May 2020 - 2:28 pm

वाग्मोतीऐकले मी तुला, काव्यगान करताना
पाहिले मुखी तुझ्या, भाषेला खेळताना ।।

नादमधुर लय अशी, वर्णनांस करवेना
स्वरसंतुर रव तुझा, माधुर्ये साहवेना ।।

जणू...
शारदेचे नूपुर ते, किणकिणले हलताना
कनक ते कर्णीचे, थरथरले डोलताना ।।
मोरपीसं मोहरली, सळसळली नाचताना
वीणेवरील कंपने, वाणीतून वाहताना ।।
स्फटिकमणी बोटांतून, सरसरले 'जप'ताना
स्वये वागेशी अवतार, वाग्यज्ञे प्रकटताना ।।

सुबक वृत्त चाफ्याचे , काव्यकुसुम रचताना
गंधित शब्द मोगऱ्याचे, नाजूक ते वदताना ।।

गहिरे अर्थ केवड्याचे, हलकेच उलगडताना
आरक्त हास्य प्राजक्ताचे, "वा! वा!"आमचे घेताना ।।

तूच 'श्री' या मैफिलीत, ऐश्वर्ये बहरताना
आम्ही झालो अंकीत, वाग्मोती वेचताना ।।


प्रतिक्रिया

गणेशा's picture

9 May 2020 - 12:49 am | गणेशा

+1

वा भारीच..

शारदेचे नूपुर ते, किणकिणले हलताना
कनक ते कर्णीचे, थरथरले डोलताना ।।
मोरपीसं मोहरली, सळसळली नाचताना
वीणेवरील कंपने, वाणीतून वाहताना ।।
स्फटिकमणी बोटांतून, सरसरले 'जप'ताना
स्वये वागेशी अवतार, वाग्यज्ञे प्रकटताना ।।

+1

प्रिती-राधा's picture

9 May 2020 - 1:34 am | प्रिती-राधा

सुबक वृत्त चाफ्याचे , काव्यकुसुम रचताना
गंधित शब्द मोगऱ्याचे, नाजूक ते वदताना ।।

+1

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 9:28 am | चांदणे संदीप

हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते... हेच म्हणायला घेणार होतो शेवटी. अशा स्थितीत नेऊन सोडणारी रचना.

+१

सं - दी - प

गोंधळी's picture

9 May 2020 - 11:19 am | गोंधळी

+१

मन्या ऽ's picture

9 May 2020 - 12:48 pm | मन्या ऽ

+१, अप्रतिम काव्यरचना

पैलवान's picture

9 May 2020 - 1:42 pm | पैलवान

एकदम खास!!

विश्वजित रामदास जाधव's picture

9 May 2020 - 4:47 pm | विश्वजित रामदास जाधव

+१

बबु's picture

10 May 2020 - 12:22 pm | बबु

स्पर्धा सम्पल्यावर केवड्याचे गहिरे अर्थ असणारी मुळ कविता ऐकायला आवडेल.

पलाश's picture

13 May 2020 - 10:31 am | पलाश

+१

बिपीन सुरेश सांगळे's picture

25 May 2020 - 1:05 pm | बिपीन सुरेश सांगळे

सुरेख रचना