[कविता' २०२०] - दुर्लक्षास्त्र

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
7 May 2020 - 7:32 pm

दुर्लक्षास्त्रनर्सरीत गुलाबाची, शेवंतीची
जास्वंदीची झाडे खूप पाहिली
अन त्या सोबत खूप दिवसांनी
पहायला मिळाला अडुळसाही

खवचट शेजारीण म्हणे
पाहून अडुळशाचं रोप
"अगं काय हे नवीनच कौतुक
गावात कुंपणाला अडुळसा मोप!
असलं हे कुंपणाचं साधंसं झाड,
त्याला एवढा मान दिलेला,
मी तर बाई माझ्या या जन्मात
आज पहिल्यांदाच बघितला!!"

"कुंपण बनणार्‍याचं कौतुक
याआधी कुणीच नसेल केलं,
तरी यापुढे होईल," मनातच म्हटलं
टिप्पणीकडे सपशेल दुर्लक्षच केलं.

तडा गेलेल्या जुन्या अक्वेरियममधे
न करता नाजूक झाडांसारखे नखरे
अडुळसा छान रुजला, वाढला अन्
आमंत्रणाविना गोळा झाली पाखरे

मध भरलेल्या फुलांसाठी
आले सनबर्ड म्हणजेच शिंजिर
पाने शिवून घरटे बांधण्यासाठी
शिंपी पक्षांची देखणी भिरभिर

त्यांच्या नाचण्यागाण्या
भिरभिरण्याने एक बरे झाले
शांतशांत घरादारात
नवचैतन्य वसतीला आले

सगळ्यात मज्जा तेव्हा आली
खवचट शेजारीण दारी आली
खोकल्यावरच्या औषधासाठी
अडूळशाची चार पाने मागितली

जशा लंकेत सोन्याच्या विटा तसा इथे
गावातल्या कुंपणावरचा अडुळसा
महानगरात येई उपयोगी
टेरेसगार्डनमधला अडुळसाच असा

बागेत पानांच्या भाजीपुरता लावलेला शेवगा
पाहून उघडी तोंड टिप्पणी करायला
तोंड बंद करी, सत्वर सावरी
शेजारीण आज करी केवळ कौतुकाला.


प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

8 May 2020 - 1:47 pm | संजय क्षीरसागर

शेतबहाद्दूर श्री गंगाधर मुटेंची असावी असं वाटतंं !

प्रचेतस's picture

8 May 2020 - 1:51 pm | प्रचेतस

+१
मस्त

प्रिती-राधा's picture

9 May 2020 - 1:35 am | प्रिती-राधा

+1 मस्त

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 9:14 am | चांदणे संदीप

दुर्लक्षास्त्र येऊन धडकले.

+ १

सं - दी - प

गणेशा's picture

9 May 2020 - 10:15 am | गणेशा

+1 आवडली