[कविता' २०२०] - कविता

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
7 May 2020 - 5:42 pm

कवितामी उंच उडतोय , फडफडतोय

सोबत टेबल , चखणा आणि मदिरा

पंख शेपरेट आहेत , ऍड ऑन वरदान

हातात भरलेला गिलास आणि बर्फाचा चुरा

येक भली मोठाली छत्रीपण आहे

मानेच्या बरोब्बर वर चिकटलेली

उन्हात दारू पिणं बरोबर नव्हे

सावली म्हणून हळूच वर उघडलेली

मस्त झुरक्यावर झुरके मारतोय

टेबलावर बसून चखणा हणतोय

खाली पांडू डोक्याला हात लावून बघतायत

तळीराम सर्व माझ्या मागेमागे पळतायत

मी हळूच वरून मदिरा सोडतोय

कोणाच्या किती तोंडात पडलीय ते बघतोय

बघता बघता हळूच माझेही तोंड उघडे आहे

डोळे उघडले तर आमचं सरकार

डोळे वटारून माझ्याकडे बघते आहे

टेबल चखणा आता गायब झाला आहे

त्याऐवजी हाती झाडू आला आहे


प्रतिक्रिया

मोगरा's picture

9 May 2020 - 1:40 am | मोगरा

डोळे उघडले तर आमचं सरकार

डोळे वटारून माझ्याकडे बघते आहे

टेबल चखणा आता गायब झाला आहे

त्याऐवजी हाती झाडू आला आहे

हा हा हा हा

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 9:08 am | चांदणे संदीप

मीटरबीटरच बघा तेवढं.

सं - दी - प

पैलवान's picture

9 May 2020 - 1:13 pm | पैलवान

कविता आवडली.