[कविता' २०२०] - क्वार्टर मिळवाया डोकं..

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
7 May 2020 - 7:47 am

क्वार्टर मिळवाया डोकं..मिळेल कधी ठावंना..
पिल्या बिगर राहवंना..
बुजलीया गल्याची भोकं

नं.. खाजवाकी..
जरा खाजवाकी..
तुम्ही खाजवाकी..

क्वार्टर मिळवाया डोकं..
नं.. खाजवाकी..
क्वार्टर मिळवाया डोकं.. || १ ||

माझ्या बापाच्या.. बापाची
पिण्याची....
पिढीजात खोड..

आता लॉकडाउन मुळे..
कुठे गांवना.. सगळे
सांगत्याती दारू सोडं ..

पण पिल्या बिगर राहवंना..
दारू काही सोडवंना
बुजलीया गल्याची भोकं..

नं.. खाजवाकी..
जरा खाजवाकी..
तुम्ही खाजवाकी..

क्वार्टर मिळवाया डोकं..
नं.. खाजवाकी..
क्वार्टर मिळवाया डोकं..|| २||

टीप: शाहीर दादा कोंडके यांच्या चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावर आधारित.


प्रतिक्रिया

पैलवान's picture

7 May 2020 - 12:14 pm | पैलवान

जमलंय!
पन पुन्यात औटडेटेड आहे. इथं कॉट्टर, खंबा, सगलं मिलतंय आता ;)
मुंबईत चालंल अजुन ह्ये गाणं.

कौस्तुभ भोसले's picture

8 May 2020 - 2:09 pm | कौस्तुभ भोसले

जमलय

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 9:01 am | चांदणे संदीप

आवडले.

+ १

सं - दी - प

जव्हेरगंज's picture

9 May 2020 - 12:35 pm | जव्हेरगंज

फक्कड!!
+१