[कविता' २०२०] - उन्मादसोहळा

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
5 May 2020 - 9:58 am

उन्मादसोहळातुम्ही आता गप ऐकून घ्यावे
काव्यरसात थोडे डुंबून घ्यावे
माझ्या कवितेला फुटतात पालवी मनाची
त्यात थोडे तुम्ही रंगून जावे

चैत्राच्या उन्हात
घामाच्या धारात
माझी कविता
ठसते उरात

थोडे गोड मानून घ्यावे
बीज अंकुरते जाणून घ्यावे
आता कुठे ही सुरुवात झाली
जमल्यास इथेच ताणून द्यावे

निबिड अरण्यात
पठारांच्या शोधात
माझी कविता
गवताळ प्रदेशात

ही चिंब भिजली रे
गारठून सजली रे
माझी कविता
लाजून थिजली रे

गोड गोड भात
दह्यामध्ये ताक
माझी कविता
साखरेचा भात

मध्यानीच्या सुर्याने आता तापून घ्यावे
धरत्रीच्या लेकरांनी थोडे रापून घ्यावे
माझी कविता आता शस्त्र उचलत आहे
मायबाप श्रोत्यांनी डोळे झाकून घ्यावे

ही नाच नाचते रे
डेडाळ काटते रे
माझी कविता
तलवार छाटते रे

जुलमाचे शिकारी
भयभीत कट्यारी
माझी कविता
जन्माची विखारी

ही क्षुब्ध झोपडी
जणू रांड भाबडी
माझी कविता
भलतीच नागडी

आवडली तर तसे सांगून जावे
रसभंग झाला तर भांडून जावे
माझ्या कवितेला फुटतात पालवी मनाची
त्यात थोडे तुम्ही रंगून जावे


प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 May 2020 - 10:50 am | प्रचेतस

+१

क्या बात है..!!
जबरदस्त

रुपी's picture

5 May 2020 - 11:23 am | रुपी

+१

वाह! मस्तच

पैलवान's picture

5 May 2020 - 5:08 pm | पैलवान

कडक
काही ओळी पार आत घुसल्या.

गणेशा's picture

5 May 2020 - 5:29 pm | गणेशा

+1

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 May 2020 - 5:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

जव्हेरगंज's picture

7 May 2020 - 3:59 pm | जव्हेरगंज

+१
भारीचांदणे संदीप's picture

9 May 2020 - 8:50 am | चांदणे संदीप

अजून नीटनेटकी करता आली असती. पण मला आवडली.
+१

सं - दी - प

बिपीन सुरेश सांगळे's picture

25 May 2020 - 1:01 pm | बिपीन सुरेश सांगळे

सुंदर कविता
सोपे शब्द पण मनाला भिडणारे
कवितेची असंख्य रूपे पण छान उमटलेली

जव्हेरगंज's picture

26 May 2020 - 11:34 pm | जव्हेरगंज

धन्यवाद मंडळी!!!

अजूनही आम्ही (खुद्द) कवितांमध्ये कच्चेच आहोत च्यामारी :((