[कविता' २०२०] - मनुष्यप्राणी

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
4 May 2020 - 7:47 pm

मनुष्यप्राणी“झूम”वर प्राण्यांची जमली सभा एका विकेंडला
डरकाळी फोडून सिंह तेव्हा म्हणाला वाघाला
यावर्षी नवलच वाटते आहे बुवा आपल्याला
कित्येक दिवसात पाहिले नाही त्या मनुष्यप्राण्याला
सोंड हलवत डुलत डुलत हत्ती तेव्हा चित्कारला
घरात सारे बसले आहेत घाबरून कोणा करोनाला
ज्याने जबरदस्तीने कोंडले पिंजऱ्यात आपल्याला
त्याने घराचा पिंजरा करून कोंडून घेतले स्वत:ला
मासा म्हणाला तरीच आले नाहीत फिशींगला
त्यांच्यामुळे जीव माझा नेहमीच असे टांगणीला
कांगारू म्हणाले काल मारून आलो फेरफटका शहरातला
घेऊन सोबत मित्र आणि अख्ख्या कुटुंब कबिल्याला
गाड्या नाहीत, गर्दी नाही मस्त वाटले उड्या मारायला
मगर म्हणाली खाऱ्या पाण्याचा आला होता कंटाळा
म्हणून यथेच्छ डुंबून घेतले त्यांच्या स्विमींग पूलला
गुरढोरांनी पण आनंद व्यक्त केला जरा हटके
म्हणती पाठीवर बसले नाहीयेत चाबकाचे फटके
तेव्हा पक्षी सारे लागले किलबिलायला
मोकळे सारे आकाश स्वछंदपणे विहारायला
कर्कश हॉर्न, प्रदूषण काही काहीच नाहीये नावाला
असेच सारे चालू राहो मागणे हेच देवाला
शतकवीर कासव मान हलवत कातर स्वरात बोलला
वाटले नव्हते असेही दिवस मिळतील पहायला..
झाडावर बसलेला म्हातारा माकड तेव्हा दात विचकून हसला
मित्रांनो जोपर्यंत मिळते आहे मनाजोगते वागायला
तोपर्यंत पूर्णपणे उपभोगून घ्या मिळणाऱ्या स्वातंत्र्याला
कारण काहीच दिवस उरले आहेत लॉकडाउन संपायला
हा मनुष्यप्राणी नाही असा शांत बसणाऱ्यातला
जरी समजतो उच्च आणि अतिहुशार स्वत:ला
तरी या आपत्तीनंतरही नाही तो सुधारणाऱ्यातला
लसी काढून पहिल्यांदा संपवेल तो करोनाला
जेव्हा मोकळा होईल तो परत मुक्त संचारायला
तेव्हा सुरवात होईल दुपटीने धरित्रीला नागवायला
लॉगआऊट न करताच मग सुरूवात झाली पळापळीला


प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

4 May 2020 - 9:18 pm | जव्हेरगंज

जबरी! भारी! बुंगाट काव्यकल्पना!!
+१पैलवान's picture

5 May 2020 - 8:05 am | पैलवान

सत्य वचन!

तरी या आपत्तीनंतरही नाही तो सुधारणाऱ्यातला

माणसं सुधारणार नाहीत. सिंहगड रोडला वाईन शॉप उघडल्याने गरिबांना होणारं जेवणाचे वाटप अर्धवट थांबवावं लागलं. मध्य पुण्यातून लोक सिंहगड रोड ला गेले होते रांगेत थांबायला. अंतर नाही, काळजी नाही, मास्क नाही, पर्वा नाही. हे सर्व साथीच्या मध्यावर. सगळं नॉर्मल झाल्यावर माणसं पिसटल्यासारखी हैदोस घालतील.

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 8:46 am | चांदणे संदीप

पण तो कवितेत उतरवताना कमीत शब्दांत आला तर परिणामकारक होतो. हा निबंध झाला.

सं - दी - प

प्रचेतस's picture

9 May 2020 - 2:26 pm | प्रचेतस

अगदी.