[शशक' २०२०] - अग्निदिव्य

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in स्पर्धा
23 Apr 2020 - 10:45 am

अग्निदिव्य

आज परत एकदा तो दारू पिऊन आला आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या वयात येणाऱ्या मुलासमोर तिची साडी फेडायला लागला.

"सोड मला. काय करतोस? मुलगा मोठा झालाय माझा."

"ऐ बये... नाटकं नको करुस. रावणाच्या लंकेत राहून पातिव्रत्याचा आव आणायला तू काही खरी सीता नव्हेस. सोड म्हणतो ना साडी..."

स्वतःला सोडवून घेत ती स्वयंपाकघराकडे पळाली आणि तिने आतली कडी लावून घेतली. त्याने शिव्या देत स्वयंपाकघराच्या दारावर धडका मारायला सुरुवात केली. त्याकडे दुर्लक्ष करून अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या पदराच्या दिशेने पेटती काडी नेताना जान्हवीच्या मनात एकच विचार होता...

सितेने अग्निदिव्य स्वीकारले ते रामाची जनमानसातील लाज राखायला... माझं अग्निदिव्य मोठ्या होणाऱ्या मुलासमोर स्वतःची लाज राखायला!!

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

23 Apr 2020 - 1:02 pm | चौथा कोनाडा

+१

शेवटचे वाक्य खुपच दाहक !
बिचारीला अग्निदिव्याशिवाय पर्याय राहिला नाही !

ज्योति अळवणी's picture

23 Apr 2020 - 2:12 pm | ज्योति अळवणी

छान

ऋतु हिरवा's picture

23 Apr 2020 - 2:13 pm | ऋतु हिरवा

इतरही मार्ग असू शकतात

जव्हेरगंज's picture

23 Apr 2020 - 3:19 pm | जव्हेरगंज

आवडली नाही. &#128078

मन्या ऽ's picture

23 Apr 2020 - 4:33 pm | मन्या ऽ

बाप्रे!

संजय क्षीरसागर's picture

23 Apr 2020 - 4:37 pm | संजय क्षीरसागर

मुलाला घेऊन माहेरी जाणं परवडलं असतं !

तुषार काळभोर's picture

23 Apr 2020 - 11:06 pm | तुषार काळभोर

समाजाच्या तळात अशा लाखो स्त्रिया असे अन्याय सहन करत का जगात असतील? अन् असह्य झाल्यावर आत्महत्या का करत असतील?

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर चार शब्दांची पिंक टाकण्या एवढं सोपं नसतं ना...

माहेरी गेल्यावर ही असलीच अग्निपरिक्षा असेल असे त्या कथेतील नायिकेला वाटत असेल तर ?

गणेशा's picture

24 Apr 2020 - 4:46 pm | गणेशा

कथा उत्तम,

माझं अग्निदिव्य मोठ्या होणाऱ्या मुलासमोर स्वतःची लाज राखायला!! ह्या वाक्याला +१००
जबरदस्त

बऱ्याच कथा पुन्हा वाचल्या.. हि पण..
शेवट निगेटिव्ह असला तरी परिणाम कारक आहे..
पुन्हा रिप्लाय देण्याचे कारण कि माझ्या मते ह्या कथेला चांगले 30 तरी +1 पाहिजे होते.
असो माझ्यासाठी हीच विजेती कथा आहे..

बऱ्याच कथे मध्ये पाहिले निगेटिव्ह शेवट असल्यास लोकांना आवडत नाही.. असो धक्कातंत्र देताना काही वेळेस निगेटिव्ह शेवट कथाकार लिहू शकतो.. त्याचे तसेच मत ठाम असते असे काही नसेल.

कथा वेगळी आणि कथाकाराची वयक्तिक मते वेगळी

असो
+1 पुन्हा

चहाबाज's picture

25 Apr 2020 - 10:25 pm | चहाबाज

ह्रुदयाला भेदणारी आहे. छान.

सुखी's picture

28 Apr 2020 - 11:18 pm | सुखी

+1