[शशक' २०२०] - प्रश्न

भीमराव's picture
भीमराव in स्पर्धा
21 Apr 2020 - 8:50 pm

प्रश्न

सावजावर रोखलेली खोल नजर, परशुवर तेवढीच घट्ट पकड. शिकार टप्प्यात येण्याची वाट बघत पवित्रा घेतलेला व्याघ्रच जणू. पण आत कुठेतरी घरी उपाशी बायको पोरांची चुकार आठवण. याला मारून किमान दोन‌ वेळच्या जेवणाची चिंता मिटावी.
.
.
.
तो म्हणाला, तप कर. तुझं कल्याण होईल. अपेक्षा नव्हतीच कशाची, पण स्थिरभावानं केलं.
.
.
वाघ आणि हरिण यांची मैत्री? मांगल्य भारलयय हवेत जणु. पुण्य प्रभाव. हा तोच असावा.
.
.

मानेच्या‌ काट्यामधुन तुटलेलं मुंडकं, ओघळत गोठलेलं लालतांबडं रक्त. निष्प्राण निपचीत पडलेला कृष देह. आता राज्यात कुणीही पापी नाही.
.
.

आयुष्य कृतकृत्य झालं असंच वाटलं मरताना.
.
.
माझ्या आणि तुझ्या शुद्रात फरक रे काय?
स्वर्गाच्या दारात उभा शम्बुक वाल्या कोळ्याला विचारत होता.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

मतितार्थ कळतोय पण पंचलाईन गंडल्यासारखी वाटतेय.