[शशक' २०२०] - वाटेकरी

पलाश's picture
पलाश in स्पर्धा
21 Apr 2020 - 5:34 pm

वाटेकरी

कन्यारत्न छोट्या गटात गेलं. तिच्या दादाला रोज शाळेत जाताना पहात होती त्यामुळे रडारड न करता निर्विघ्नपणे शाळेत जाऊ लागली.
मी संध्याकाळी कामावरून घरी आले की दोन्ही मुलं दिवसभराचं साचलेलं बोलू लागायची.
एक दिवस कन्या त्यादिवशी शिकलेलं म्हणून दाखवत होती,
"ऊssभा १, आडssवे २,..."
शाळेतल्या बाईंनी अंक तोंडी म्हणायला शिकवायला सुरवात केलेली होती. लक्ष देऊन ऐकायला लागले. आठापर्यंत नीट चाललं होतं.
पण..
"संध्येssची पssळी मssऊ" ऐकल्यावर "अगं काहीपण काय म्हणतेस. नऊ आहे ते!!" असं म्हणाले. त्यावर "आमच्या बाईंनी अस्संच सांगितलंय!!!" उत्तर अगदीच जोरात मिळालं.
जोरावरूनच कळलं. हिच्या मनातली आईनं व्यापलेली भलीमोठी जागा वाटून घेण्याची सुरवात आता शाळेतल्या बाईंपासूनच करायला लागणार आहे.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

शेखर's picture

21 Apr 2020 - 6:38 pm | शेखर

+१

वीणा३'s picture

21 Apr 2020 - 9:17 pm | वीणा३

:)

मोहन's picture

22 Apr 2020 - 1:34 pm | मोहन

+१
सुंदर

शलभ's picture

27 Apr 2020 - 3:38 pm | शलभ

+1

सुमो's picture

29 Apr 2020 - 5:57 am | सुमो

+1

निशाचर's picture

29 Apr 2020 - 11:40 pm | निशाचर

+१