अपराध

हा दोन दिवसांपासून ऐश्वर्यसंपन्न सोहळा पाहत होता. सरबराईने समाधानी होता. पण कोठेतरी माशी शिंकावी तशी याच्या मामेभावाची बातमी समजली. जुनी खपली निघाली.
हा त्वरेने सभेत आला.
भावी वधूचे हरण करणाऱ्या त्या काळ्या मामेभावाला पाहताच याचे मस्तक भणाणलं. बाहू फुरफुरले. आज भर सभेत त्याची लायकीच काढायची म्हणून तो गरजला.
"ना ज्ञानी, ना गुणी, ना कर्ता, ... या कूलहीन, पळपुट्या, नीच, कपटी माणसाचं काय कौतुक लावलाय ?..... अक्कल गहाण टाकली काय तुम्ही सर्वानी?" सरबत्तीच केली याने.
सारी सभा अवाक झाली. घटकाभर रान पेटले.
आणि भरला...पापाचा घडा भरला. शंभर अपराध पूर्ण. बस्स....सुईंईं...आवाज करत वायुवेगाने सुदर्शन चक्र सुटले आणि याचे मस्तक आकाशात उडाले.
टीप : महाभारतातील प्रसंगावर आधारित.

वाचने
3329
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
कसलाच संदर्भ लागला नाही!! पण
महाभारतातील कथा
रोचक!! +१ कथेसाठी!!
In reply to महाभारतातील कथा by ज्योति अळवणी
+1
जमलीय छान
+1