[शशक' २०२०] - गृहिणी

स्मिताके's picture
स्मिताके in स्पर्धा
16 Apr 2020 - 8:28 am

गृहिणी

कशी असेल बबडी कुणास ठाऊक. दोन वर्षं झाली तिला मुंबईला जाऊन.
चांगलं स्थळ आणलं होतं वहिनींनी, पण हिच्या डोक्यात भलतंच. काय म्हणे, घर सांभाळत नाही बसणार. स्टार व्हायचं होतं ना तिला!
पाळण्यात पाय दिसत होतेच म्हणा.. नटणं, मुरडणं, नाच, नाटक.

वहिनी म्हणाल्या होत्या, "बाकी कसली अट नाही त्यांची. फक्त घर नीट सांभाळावं , इतकंच. घरात बाईमाणूस नाही ना दुसरं?”
कसलं काय? निघूनच गेली बया घरातून. मुंबईला टीव्हीवर नाहीतर सिनेमात काम करणार म्हणून.
कळवते अधूनमधून, सेल्सगर्ल आहे, नाटकात छोटं काम मिळालं म्हणून. पण पुढे काय?

"हॅलो..बोला वहिनी."
"अहो, टीव्ही लावा लवकर! तुमची बबडी नव्या सिरियलीत! कामसू सोज्वळ गृहिणीच्या भूमिकेत शोभतेय हो!"

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

16 Apr 2020 - 10:31 am | जव्हेरगंज

मस्त
+१

सौंदाळा's picture

16 Apr 2020 - 10:37 am | सौंदाळा

+१ मस्त

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2020 - 11:07 am | चौथा कोनाडा

+१
झकास !
बबडी स्क्रिनवर का होईना, सोज्वळ गृहिणी !

मोहन's picture

16 Apr 2020 - 4:07 pm | मोहन

+१

ज्योति अळवणी's picture

16 Apr 2020 - 5:15 pm | ज्योति अळवणी

झक्कास

+१

राघव's picture

18 Apr 2020 - 2:39 am | राघव

नियती.. छान मांडलंय! आवडेश!

सुबोध खरे's picture

18 Apr 2020 - 11:36 am | सुबोध खरे

+१

जव्हेरगंज's picture

18 Apr 2020 - 9:29 pm | जव्हेरगंज

+१
जमलीये!!

तुषार काळभोर's picture

19 Apr 2020 - 12:59 pm | तुषार काळभोर

सोज्वळ गृहिणी का होईना, बबडी टिव्हीवर आली!

urenamashi's picture

21 Apr 2020 - 11:22 pm | urenamashi

+1

बांवरे's picture

23 Apr 2020 - 6:14 am | बांवरे

+१

अशी नाही तर तशी !!

Nitin Palkar's picture

23 Apr 2020 - 3:04 pm | Nitin Palkar

+१

श्वेता२४'s picture

23 Apr 2020 - 11:54 pm | श्वेता२४

+१

टर्मीनेटर's picture

27 Apr 2020 - 11:11 am | टर्मीनेटर

+१
आवडली!

एमी's picture

27 Apr 2020 - 4:08 pm | एमी

मस्त आहे ही गोष्ट!!
'सोज्वळ गृहिणी' बद्दल कथा लिहणाऱ्या, त्यांच्या भूमिका वठवणाऱ्या (किंवा जालावर त्यांचा उदोउदो करणाऱ्या ;)) स्त्रिया स्वतःमात्र 'वर्कींग वूमन' असतात; किती तो दांभिकपणा! किंवा मार्केटची गरज ;)

+१

बिपीन सुरेश सांगळे's picture

27 Apr 2020 - 7:27 pm | बिपीन सुरेश सांगळे

+1

मनस्विता's picture

28 Apr 2020 - 4:16 pm | मनस्विता

+१

शब्दसखी's picture

29 Apr 2020 - 1:23 pm | शब्दसखी

+१

चित्रगुप्त's picture

29 Aug 2020 - 2:12 am | चित्रगुप्त

हुश्श्य....

दोन वर्षं झाली तिला मुंबईला जाऊन.... नटणं, मुरडणं, नाच, नाटक..... निघूनच गेली बया घरातून....

हे वाचून मला या कथेची आठवण येऊन धस्स झाले होते, पण शेवटी 'सिरीयलीत' वाचून जीव भांड्यात पडला.
छान आहे शशक.