[शशक' २०२०] - प्रसाद

Primary tabs

मायमराठी's picture
मायमराठी in स्पर्धा
15 Apr 2020 - 10:07 am

प्रसादआत मूर्तीचं मनासारखं दर्शन आणि बाहेर आपल्या शाबूत चपला, यापेक्षा सच्च्या भक्तांना देवळांत काय हवं असतं? दोन्ही मिळालं होतं. आता भूक आणि ऊन यांच्या निराकरणासाठी समाधानी भक्तगणांचे पाय सरसावले होते.

एक भिकारी त्यांच्या बाजूने चालत होता. मागितलं तर काहीच नव्हतं तरीही हातात फळांची पिशवी असलेल्याला दया आली. काही फळं त्याच्या हातात ठेवली गेली.

गाडीजवळ पोचल्यावर कोणाला तरी तो फळांच्या दुकानात दिसला. पुनर्विक्रीची सोपी अर्थनीती उमगून सगळयांच्या जिभांनी जागीच यथेच्छ गोळीबार झाडला.

हातात ताट घेऊन तो काचेवर टकटक करत होता.
काच किंचित खाली झाल्यावर आमच्या खवचटपणाच्या उद्रेकाला वाव न देताच म्हणाला,

" घाईत जनू? तुमास्नी फोडी करून आनल्यात. घ्या परसाद. संपवा समदं."


प्रतिक्रिया

कुमार१'s picture

15 Apr 2020 - 10:19 am | कुमार१

+१

शेखर's picture

15 Apr 2020 - 10:55 am | शेखर

+१

अनिंद्य's picture

15 Apr 2020 - 11:08 am | अनिंद्य

+ १

जव्हेरगंज's picture

15 Apr 2020 - 11:16 am | जव्हेरगंज

अनपेक्षित शेवट.. फारच मस्त!!
+१

अभिजीत अवलिया's picture

15 Apr 2020 - 11:47 am | अभिजीत अवलिया

आवडली.

साहित्य संपादक's picture

15 Apr 2020 - 11:56 am | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Apr 2020 - 4:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कथा.

(प्लस वन, नंतरच्या प्रतिसादात लिहितो. सध्या केवळ पोच)

-दिलीप बिरुटे

मृत्युन्जय's picture

15 Apr 2020 - 12:16 pm | मृत्युन्जय

+१

राघव's picture

15 Apr 2020 - 12:20 pm | राघव

वाह! मस्त. :-)

सौंदाळा's picture

15 Apr 2020 - 12:47 pm | सौंदाळा

+१
अप्रतिम शशक
पेशन्स कमी होऊन समोरच्याला चटकन आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करायची मानसिकता हल्ली फारच वाढली आहे

तुषार काळभोर's picture

19 Apr 2020 - 12:25 pm | तुषार काळभोर

.

गामा पैलवान's picture

21 Apr 2020 - 1:19 am | गामा पैलवान

सौंदाळा,

खरंय तुमचं म्हणणं. तुम्ही हे लिहिल्यावर दुसऱ्याच दिवशी तारिक १६ रोजी पालघर जिल्ह्यात गडचिंचले गावे दोन साधू व त्यांच्या गाडीचा चालक यांना संतप्त जमावाने केवळ संशयामुळे ठेचून ठार मारलं. सोबत पोलीस होते व संचारबंदी असली तरी हे तिघे अधिकृतरीत्या प्रवासात होते. बापरे!

खूपंच वास्तववादी आहे म्हणून कथेला +१. :-(

आ.न.,
-गा.पै.

मोहन's picture

15 Apr 2020 - 1:50 pm | मोहन

+१

भीमराव's picture

15 Apr 2020 - 2:06 pm | भीमराव

तेजस आठवले's picture

15 Apr 2020 - 2:18 pm | तेजस आठवले

+१. आवडली

अमरप्रेम's picture

15 Apr 2020 - 2:20 pm | अमरप्रेम

+१

नावातकायआहे's picture

15 Apr 2020 - 2:20 pm | नावातकायआहे

+१

लोथार मथायस's picture

15 Apr 2020 - 6:11 pm | लोथार मथायस

आवडली +१

चौकटराजा's picture

15 Apr 2020 - 6:39 pm | चौकटराजा

+१

गामा पैलवान's picture

15 Apr 2020 - 6:47 pm | गामा पैलवान

+१
-गा.पै.

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

15 Apr 2020 - 9:46 pm | सौ मृदुला धनंजय...

+1 . मस्तच.

गुल्लू दादा's picture

16 Apr 2020 - 12:05 am | गुल्लू दादा

+1

मीअपर्णा's picture

16 Apr 2020 - 1:38 am | मीअपर्णा

पण पूर्ण कळली नाही. म्हणजे भिकारी चालत का होता मग त्यानेच यांना प्रसाद का दिला अस्ले टुकार प्रश्न.
शिवाय सध्याच्या काळात त्याने हात आणि फळं ठेवली का ही मर्मबंधातली ठेवही ;) असो.

+१ :)

मीअपर्णा's picture

16 Apr 2020 - 1:39 am | मीअपर्णा

वरती हात आणि फळं धुवून ठेवली का?

अवांतर - एकदा टाकला प्रतिसाद की काळ्या दगडावरची रेघ का?

स्मिताके's picture

16 Apr 2020 - 8:07 pm | स्मिताके

+१

असहकार's picture

16 Apr 2020 - 8:17 pm | असहकार

+1

बेंगुताई's picture

16 Apr 2020 - 10:08 pm | बेंगुताई

+१

रीडर's picture

17 Apr 2020 - 12:57 am | रीडर

+1

खूप छान

ज्योति अळवणी's picture

17 Apr 2020 - 2:46 am | ज्योति अळवणी

अप्रतिम

अभिजीत अवलिया's picture

17 Apr 2020 - 7:05 am | अभिजीत अवलिया

+१

निओ's picture

17 Apr 2020 - 1:53 pm | निओ

+१

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Apr 2020 - 9:50 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली
पैजारबुवा,

सुबोध खरे's picture

18 Apr 2020 - 11:34 am | सुबोध खरे

+१

तुषार काळभोर's picture

19 Apr 2020 - 12:26 pm | तुषार काळभोर

कथा आवडली.

Marathi_Mulgi's picture

20 Apr 2020 - 1:59 am | Marathi_Mulgi

+१

Marathi_Mulgi's picture

20 Apr 2020 - 1:59 am | Marathi_Mulgi

+१

शा वि कु's picture

20 Apr 2020 - 6:59 pm | शा वि कु

.

OBAMA80's picture

21 Apr 2020 - 7:16 am | OBAMA80

+१

श्वेता२४'s picture

24 Apr 2020 - 12:09 am | श्वेता२४

+१

प्रशांत's picture

24 Apr 2020 - 1:36 pm | प्रशांत

+१

मौनी's picture

24 Apr 2020 - 1:37 pm | मौनी

+१

कमालीच्या संतत्त्वाला पोहोचलेला माणूस हवा !

जव्हेरगंज's picture

24 Apr 2020 - 2:03 pm | जव्हेरगंज

😁
अगदी हेच डोक्यात आले होते.

संजय क्षीरसागर's picture

24 Apr 2020 - 2:27 pm | संजय क्षीरसागर

> अनपेक्षित शेवट.. फारच मस्त!!

जव्हेरगंज's picture

24 Apr 2020 - 4:44 pm | जव्हेरगंज

हो. ते माणूस ओळखायला चुकले
शिवाय त्यांनी प्रसाद खाल्ला की नाही याचा उल्लेख नाही.

संजय क्षीरसागर's picture

24 Apr 2020 - 5:09 pm | संजय क्षीरसागर

पण भिकाऱ्यानी भीक परत आणून देणं आणि तेही प्रसाद म्हणून हे काहीच्या काहीच. शिवाय असा प्रकार खाणारे कोण ?

तुमचे प्रतिसाद भारी आहेत, मजा आली..

कथेचे म्हणाल तर मला ही हेच वाटाले होते.. फक्त मनात मी एक केले वाचताना.. की तो भिकारी नव्हता, गावाकडचा साधा , सरळ माणुस होता, गाडीत बसलेल्या व्यक्तीला तो भिकारी वाटला होता.
कदाचीत कथाकाराला असेच लिहायचे असेल, पण फळांच्या पिशवी वाल्याने त्याच्या हातात फळे ठेवायची ओळ ही सगळ्यात चुकीची ओळ वाटली मला या कथेत, म्हणुन पुन्हा पुन्हा वाचली कथा, पण ह्या ओळी मुळे मी +१ नाही दिला बहुतेक

तरीही या कथेला सर्वात जास्त वोट्स आहेत असे मला वाटते,,
( मजेने : विजयी झाल्यावर कथाकाराणे मला इतरत्र शब्दांचा प्रसाद देवु नये असे मला मना पासुन वाटते :) )

संजय क्षीरसागर's picture

24 Apr 2020 - 8:12 pm | संजय क्षीरसागर

> एक भिकारी त्यांच्या बाजूने चालत होता.

आता वोटींगचं म्हणाल तर बऱ्याच लोकांना मतदानानंतर; जरा नीट विचार करायला हवा होता असं वाटतं !

नावातकायआहे's picture

25 Apr 2020 - 10:03 am | नावातकायआहे

चिरफाड न करता जे "क्लिक"झाले त्याला +१ दिला सर...

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2020 - 10:20 am | संजय क्षीरसागर

आणि थोडा विचार करून निर्णय घेणं, असा तो फरक असावा.