[शशक' २०२०] - स्फुल्लिंग!

राघव's picture
राघव in स्पर्धा
14 Apr 2020 - 8:48 pm

स्फुल्लिंग!

"या दोन्ही तलवारींशी फार पूर्वीच लग्न झालंय माझं. आपल्याच हृदयाचं आपल्याला ओझं होतंय कधी?"

"वार अडवणं हे पाठीवरच्या ढालीचं काम. तलवारीला फक्त वार करणं माहित असावं."

"वार केल्यावर काय झालं हे युद्धात बघायला वेळ कुणाला? पण चुकूनही चालत नाही. वारासोबत जीव वसूल व्हायलाच हवा. उगाच हात चालवण्यात काय हशील?"

"ताकद, नजर, चपळता, अचूकता आणि... शत्रूच्या मनावर आघात करणारा वेग! त्याच्या कानांत वेगाचा आवाज गरजायला हवा!"

"एकदा स्वराज्यासाठी लढायचं ठरलं की मग समोर कोण आणि किती, यानं काय फरक पडतो?"

--

किल्लेदारांच्या देहाकडे बघत स्फुंदत मुजरा करणार्‍या प्रत्येकाच्या मनांत, त्यांचे शब्द स्फुल्लिंग चेतवत होते...!
मनांत त्यांचं अंगारलेलं नाव घुमत होतं.. मुरारबाजी!

==================

टीप:
- पुरंदराच्या लढाईवर आधारित. मुरारबाजींची पुण्यतिथी पुढच्या महिन्यात येतेय. त्या अनुषंगानं लिहिण्याचा प्रयत्न.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

मोहन's picture

14 Apr 2020 - 9:26 pm | मोहन

+१

जेम्स वांड's picture

14 Apr 2020 - 9:32 pm | जेम्स वांड

अंगात वारं फुरफुरलं राव एकदम पुरंदरचं

जव्हेरगंज's picture

15 Apr 2020 - 11:13 am | जव्हेरगंज

+१

वा! कडक!!

गोंधळी's picture

15 Apr 2020 - 3:40 pm | गोंधळी

+१

रीडर's picture

17 Apr 2020 - 12:49 am | रीडर

+1

प्रमोद देर्देकर's picture

17 Apr 2020 - 8:19 am | प्रमोद देर्देकर

+१

विश्वजित रामदास जाधव's picture

18 Apr 2020 - 3:42 pm | विश्वजित रामदास जाधव

+१

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Apr 2020 - 6:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली,
पैजारबुवा,

मनस्विता's picture

27 Apr 2020 - 11:17 am | मनस्विता

+१