झुकिनी पास्ता

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
5 Apr 2020 - 7:53 am

१) झुकिनी + गाजर पास्ता (झटपट)
साहित्य:
झुकिनी ( काकडी सारखी दिसणारी , दुधी भोपळ्यासारखी चव असणारी भाजी ) कदाचित दुधी भोपळा पण वापरता येईल
लसूण- कोरडे काप , तांबडी मिरची काप, ऑलिव्ह ( काळे kallamataa किंवा हिरवे )
गाजर
ऑलिव्ह तेल आणि लोणी
सॉस: मी या वेळी तयार सॉस वापरले, पिझ्झा बेस सॉस पण वापरू शकता नाहीतर ताज्या टोमॅटोचे उकडून काळी मिरी, मीठ घालून , त्यात खायची तुळस घालावी
- झुकिनी आणि गाजर हे "स्पगेटी " पास्त्या सारखे लांबडे चिरावे किंवा दाखवल्याप्रमाणे कटर असेल तर तो ..
http://www.dshop.com.au/buy/spiral-slicer-spiralizer-vegetable-julienne-...

महत्वाचे : गव्हाच्या पास्त्या प्रमाणे हा आधी उकळून घ्याची गरज नाही

कढईत तेलावर माध्यम आचेवर ऑलिव्ह तेलात(+ थोडे लोणी) मिरची चे काप आणि लसणाचे काप परतावे ... (लसूण करपू ना देता )
नंतर वरील पास्ता आधी गाजर आणि थोड्या वेळाने झुकिनी असा परतावा ( झाकण ठेवू नये )
लगदा होऊ पर्यंत शिजणार नाही याची काळजी घायवी लागेल...थोडा कच्चा राहिला तरी चालेल
याचे वरून काढल्यावर कढईच्या स्वतःच्या उष्णतेत उरलेला शिजेल तेल जरा जास्त असावे म्हणजे छान परतल्याची चव राहील

वाढणे : सॉस मूळ पास्त्यात घातले नाहीये तर वेगळे ठेवले आहे , पसंतीचं कढईत पेस्ट काढायलावर थोडे तेलकटपणा उरला असेल त्यात हा सॉस परतून घयावा ,

२) पास्ता २ हा साधा "फ़ेटुचीनी" जातीचा पास्ता आहे , फक्त ऑलिव्ह तेल काली मिरी , मिरची आणि लसूण यावर बऱयापैकी तेल घालून परतला आहे ..

नोंद : यात कोठेही चीज घातलेले नाहीये
IMG_7499[1]
IMG_7500[1]
IMG_7498[1]
IMG_7497[1]

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

7 Apr 2020 - 6:43 pm | मदनबाण

अरे वा... मस्त ! अश्याच मस्त पाकृ देत रहा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bumbro... :- Mission Kashmir

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2020 - 7:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाकृ टाकत राहा. पाकृंची ओळख होते.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

7 Apr 2020 - 9:11 pm | प्रचेतस

हेच म्हणतो.

शशिकांत ओक's picture

8 Apr 2020 - 12:23 pm | शशिकांत ओक

आता झी वर येणार कि काय ही पाककृती!