एक उनाड भटकंती भाग ३ (शेवट)

Primary tabs

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in भटकंती
5 Feb 2020 - 6:21 pm

एक उनाड भटकंती सुरुवात

एक उनाड भटकंती भाग 2

     आता थोडा या गुफांचा इतिहास सांगते. 'कान्हेरी' या शब्दाचा उगम कृष्णगिरी (अर्थ: काळा डोंगर/पाषाण) या संस्कृत नावापासून झाला आहे. लेणी काळाकुट्ट दगड तासून बनविलेली आहेत. येथील चैत्य लेणी ही गौतमीपुत्र सातकर्णी राजाच्या काळात (इ.स. १७३ - इ.स. २११) कोरली गेली असावी असा अंदाज आहे. इथे एक भव्य सभामंडप व विहार, बुद्ध तसेच अवलोकितेश्वर यांच्या मूर्ती दिसतात. तसेच ब्राम्ही, देवनागरी व पहलवी या भाषेत कोरलेले शिलालेख देखील दिसतात. येथे एकूण 109 लेणी आहेत. त्यातील फक्त काहीच लेण्यांमध्ये कलाकुसर व मुर्तीकाम दिसून येते. बाकी लेण्यांचा वापर विहारासाठी केला जात असावा. वरील बाजूस पाण्याचा पाट आणि हौद आहे. पुरातन काळात पावसाचे पाणी विशिष्ट प्रकारे वळवून पाण्याच्या मोठ्या टाक्या भरल्या जात असत. येथे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साठवून ठेवले जाईल अशा प्रकारचे हौद बांधण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळी डोंगराळ भागावर राहत असताना केवळ पावसाचे पाणी वर्षभर पुरेल याची योजना करुन पर्वताच्या उताराचा अचुक फायदा घेऊन लेण्यांमध्ये पाण्याची सोय करणे ही दूरदृष्टी पाहून कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.

     इथे लेणी पाहायला येणार असाल तर वेळ वाचवण्याच्या दृष्टीने तेथील सुरक्षारक्षकांना पाहण्यासारख्या मुख्य लेणी कोणत्या त्यांचे क्रमांक विचारुन ठेवावेत. तेवढेच पाहण्यासारखे आहे व बाकी सर्व विहार आहेत. त्यामुळे अनावश्यक भटकंती टाळली जाते. लेणी पाहताना पायऱ्या चढत वरवर जावे लागते. बरंच चढायचं व विस्तृत परिसर पाहायचा असल्याने फिरण्याचा स्टॅमिना असलेल्यांनी इथे यावे. सर्व लेणी पाहायला 3-4 तास सहज हवेत. सोबत गाईड किंवा कुणी इतिहासतज्ञ असेल तर हा एक अनुभवसंपन्न अभ्यासदौरा ठरेल यात मला शंका वाटत नाही.

प्रवेश करतात दिसणारी लेणी

प्रवेश करतात दिसणारी लेणी

दगडी कचरापेटी
दगडी कचरापेटी

स्तुप

स्तुप

फोटो क्र.1
फोटो क्र.1

सभामंडप
सभामंडप

स्तुप आणि सभामंडप
स्तुप आणि सभामंडप

बाजुचे कोरीवकाम
बाजुचे कोरीवकाम

ध्यानमुद्रा
ध्यानमुद्रा

अवलोकितेश्वर
अवलोकितेश्वर

बाजुचे काम
बाजुचे काम

तत्कालिन माणसे
तत्कालिन माणसे

तत्कालिन माणसे 2
तत्कालिन माणसे 2

शिलालेख
शिलालेख

फोटो
फोटो

स्तंभ
स्तंभ

स्तुप
स्तुप

डोंगरावरुन खाली दिसणारे दृश्य
डोंगरावरुन खाली दिसणारे दृश्य

खालून वरचे दिसणारे विहार"
खालून वरचे दिसणारे विहार

पाण्याची टाकी
पाण्याची टाकी

पाण्याची टाकी2
पाण्याची टाकी2

पाण्याची टाकी 3
पाण्याची टाकी 3

पाण्याची टाकी 4
पाण्याची टाकी 4

पाण्याची टाकी 5
पाण्याची टाकी 5

त्याच्या भिंतीवरील मजकुर
त्याच्या भिंतीवरील मजकुर

     मुळात इथे इतकं काही पाहण्यासारखं असेल याची अजीबात कल्पना केली नव्हती. आम्ही फक्त पहिल्या टप्प्यावरच्या काही लेणा पाहिल्या. त्याही पाहायला आम्हाला जवळजवळ 3-4 तास लागले. या लेण्या पाहत असताना मला मिपावरील लेणीतज्ञ प्रचेतस यांची आठवण झाली. त्यांच्या लेखांबद्दल मी नवऱ्याला कल्पना दिली. तेव्हा त्यांच्यासोबत मिपाचा इथे कट्टा झाला तर आपण नक्की यायचं असंही आम्ही दोघांनी ठरवून टाकलं. लेण्याच्या बाजूला तयार झालेल्या नैसर्गिक तलावात तेथील माकडे पोहत होती. फारच छान वाटलं ते पाहायला. अगदी गावात शेतातल्या विहीरीवर पोहायला जायचो त्याची आठवण झाली. माकडे उंच उडी मारुन पाण्यात पडायची. ऊन असल्यामुळे त्या पाण्यात गारवा शोधत असावेत.

पोहणारी माकडे

पोहणारी माकडे 2

     आता गर्दी वाढायला लागली होती. वाईट या गोष्टीचे वाटले की, लेणी पाहायला आलेल्या बहुतांश जणांपैकी अमराठी लोकांची संख्या अधीक होती. एक 70 वर्षाचे पण काटक पारंपारीक धोतर- सदरा वेषातील बिहारी आजोबा गाठ पडले. मी पाय दुखत असल्यामुळे एका ठिकाणी बसले असता ते माझ्याजवळ असलेल्या लेणी पाहत होते. थोडी विचारपूस केली असता त्यांचा मुलगा इथे कामाला असून खास मुंबई पाहण्यासाठी रेल्वेचा प्रवास करुन ते आले होते. आणि मुंबई बघण्याच्या त्या कार्यक्रमात या लेण्यांचाही प्राधान्याने समावेश होता. गेटवे पाहण्यापूर्वी ते लेणी पाहायला आले होते. मला त्यावेळी असं वाटलं की महाराष्ट्रीयन लोक या लेण्यांबाबत जरा उदासिनच आहेत. मी पहिल्याच टप्प्यावर विश्रांती घेत असताना ते वरती चढून जवळपास सगळ्या लेणी पाहूनही आले होते. ते ऐकून मला माझीच लाज वाटली.

     पण आजचा दिवास उनाड भटकंतीचा होता. फार न दमता रमतगमत जेवढं होईल तेवढं पाहायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे मुख्य लेणी पाहून झाल्या होत्याच फक्त एक लेणी उंचावर चढून जावं लागणार असल्याने तो विषय रद्द केला व परत फिरायचं ठरवलं. सुरुवातीच्या एका लेणीच्या प्रांगणात येऊन निवांतपणे आम्ही आजुबाजुंचं निरीक्षण करत एकमेकांशी बोलत राहिलो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात इतका निवांतपणा आजच अनुभवला होता व त्याचा पुरेपुर आनंद आम्ही घेतला होता.

     आजचा दिवस सार्थकी लागल्याचे समाधान घेऊन परतीचा प्रवास सुरु झाला. एरवी कामामुळे मला किंवा नवऱ्याला ससुल्याला पाळणाघरातून आणणे जमत नसल्याने ही जबाबदारी आमच्या घरातील विश्वासू शोभाताई पार पाडतात. पण आज आम्ही दोघांनी ससुल्याला पाळणाघरातून आणायला जायचं ठरवलं. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही पाळणाघरात पोचलो. आम्हाला पाहताच ससुल्याला कोण आनंद झाला! आईईईईईईई असे म्हणून तो झेपावला. आम्ही दोघांनी दोन बाजुंनी त्याला मिठीत घेतले आणि त्याने दोन्ही हात आमच्या गळ्यात गुंफुन स्वत:च्या दोन्ही बाजुच्या गालांना घट्ट चिकटवुन घेतले. त्यावेळी काय वाटलं याचं शब्दात वर्णन करणं कठीण आहे. खरंच! यापेक्षा वेगळं....................... मला सांगा.....सुख म्हणजे.....नक्की....काय असतं?

प्रतिक्रिया

तुमच्या ससुल्याला इथे नक्की आणा, फोटो काढून त्याचे आवर्जून प्रिंट्स काढा. थोडा मोठा झाला की त्याला फोटो पाहूनआनंद होईल.
अशाच सहली काढून गंमत लिहित राहा.

माकडांच्या अंघोळीचा फोटो छान.
फोटोला क्रमांक देऊन शेवटी <br /><br /> जोडल्यास मध्ये जागा राहील. सुटे दिसतील. आता चिकटलेले दिसताहेत.

श्वेता२४'s picture

5 Feb 2020 - 7:51 pm | श्वेता२४

ससुल्याला घेऊन जाणारच आहोत. फोटो चिकटलेले दिसत आहेत शिवाय मी दिलेले नाव पण दिसत नाहीय. जरा प्रवासात आहे. घरी गेल्यावर संपादित करेन.