हुकलेले काही . . .

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in काथ्याकूट
13 Nov 2008 - 8:23 pm
गाभा: 

भाऊबीजेच्या दिवशी पहाटे पुण्याला यशवंतराव चव्हाण नाट्यग्रुहात सुधीर गाडगीळांनी आयोजित केलेला "आशाबाई बरोबर मनमोकळ्या गप्पां"चा कार्यक्रम झाला. आशा भोसले ह्यांनी अतिशय खुमासदार शब्दात त्यांच्या काही आठवणी सांगितल्या. तर काही प्रसंगाच्या आठवणीनी जराश्या हळव्या झाल्या होत्या. त्यांनी गायलेल्या हिंदी/मराठी गाण्यांच्या काही ओळीसुद्धा गावून दाखवल्या. बरोबरच्या गायिका/ गायक, वेगवेगळे संगीतकार ह्यांच्याबरोबर काम करताना आलेले अनुभव अगदी आनंदाने मिश्कीलपणे खुलून सांगत होत्या. कार्यक्रम अतिशय चांगला झाला, अगदी कायम आठणीत राहील असा. केवळ नशिबात होता म्हणून मिळाला, असं वाटून गेलं.

पण असे काही कार्यक्रम कि जे, सर्वप्रकारे , (म्हणजे - त्यातली आवड/ जाण असणे, आर्थिकद्रुष्टीने परवडणारे आणि सहज जाता येईल अश्या ठिकाणी झालेले , असे ) पहाणे, ऐकणे सहज शक्य होते, पण जाता / पहाता आले नाही त आणि आता होणारही नाही त म्हणून रुखरुख लागून गेली , त्यापैकी :

१. पु. लं. देशपांडे आणि सुनिताबाई ह्यांचा आरती प्रभुंच्या कविता वाचनाचा कार्यक्रम,
२. मंगेश पाडगांवकर, विन्दा करन्दीकर आणि वसंत बापट हयांचा कविता वाचनाचा कार्यक्रम,
३. १९७७ च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळची पु. लं. देशपांडेंची पुण्यात झालेली भाषणे.

काही काही गोष्टी नशिबात असाव्या लागतात हेच खरे.

असे काही सांगू शकाल , जे तुम्हाला वाटतं की "हे माझ्या नशिबात नव्हतं "?

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

14 Nov 2008 - 9:34 am | शैलेन्द्र

बाबुजींचे गीत रामायण, संदीप पाटीलची बॅटींग, माझ्या जन्मापुर्वीच संपलेली अनाघ्रात जंगलं....

अस बरच काहि...

दत्ता काळे's picture

14 Nov 2008 - 1:07 pm | दत्ता काळे

तश्या खूपच हुकलेल्या गो ष्टी असतात, मी अश्या गोष्टींबद्दल म्हणतोय कि, ज्या सर्व द्दष्टीने सहजप्राप्त होत्या, पण नाही मिळाल्या. असो.

विसोबा खेचर's picture

16 Nov 2008 - 1:06 am | विसोबा खेचर

उस्ताद अब्दुलकरीमखा, नारायणराव बालगंधर्वांचे गाणे..!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Nov 2008 - 1:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

१९९९ सालचं खग्रास सूर्यग्रहण

टारझन's picture

16 Nov 2008 - 1:20 am | टारझन

हेमा मालिनीशी विवाह !! आम्ही अंमळ लेट जन्मलो ... नाही तर " बात पक्की हो गयी थी"

-टार्मेंद्र