सायंकाळी तुताऱ्या वाजतील

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in राजकारण
28 Nov 2019 - 9:06 am

सायंकाळी तुताऱ्या वाजतील, तोफा हि परवानगी असती तर उडवल्या असत्या, जोर जोरात उर बडवून मोठ्याल्या गर्जना करण्यात येतील कि पहा बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली वैगरे वगैरे..
काही लोक "राजकारणात सर्व माफ असतं" अश्या वल्गना करतील
कोणी "बघा महाराष्ट्राने कसा दिल्लीश्वरांना नमवलं" असे छातीठोक पणे सांगतील
कोणाला ते मध्यरात्री कसे वागले ते सर्व विसरून माफ केलं जाईल आणि नुसताच माफ नाही तर बक्षिशी पण दिली जाईल
सर्व काही आलबेल होईल आणि आपण रात्रीची मालिका बघत हसू आणि आसू गाळू (आणि काही लोक निमूटपणे मनातल्या मनात उद्वेगाचे हसतील आणि रडतील )
पण स्वतःच्या मनाला कुठेतरी आत खोलवर हे सगळं बरोबर आहे का हे विचारायची हिम्मत कोणी या पैकी करेल काय?

- बाळासाहेबांना आपल्यापक्षाचा मुख्यमंत्री सत्तेत हवा होता तो एकतर स्वबळावर नाही तर अनेक वर्ष काही तरी सामान विचारसरणी असलेल्या पक्ष बरोबर हे सोयीस्कर रित्या विसरले जाईल ( मनोहर जोशी झालेच होते कि)
- भाजप म्हणजे जर राज्यविरोधीचे दिलीश्वर तर मग काँग्रेस ( देशभरच्या) ते नाही होत दिलीश्वर? त्याचे काय? त्यांच्या चरणी झुकलेला चालतं! हे कसे असे? कोणी विचारेल काय?
- ३ दिवसात सरड्यासाखे रंग पालटणाऱ्याला जगात इतर लोकशाहीत त्याची राजकीय कारकीर्द तरी निवृत्त करावी लागली असती किंवा कदाचित शेवटची कॅडबरी खाऊन गजाआड तरी जावं लागला असतं, याचा कोणी विचार तरी करेल काय?

१) एक मराठी म्हणून (आणि काही वर्ष तरी मुंबईत राहिल्यामुळे) राज्याचं राजधानीत मराठी माणसाला / भाषेला कशी दुय्यम वागणूक मिळत होती/ असे आणि त्यावर खंबीर उभी राहणारी संघटना म्हणून सेनेबद्दल आदरच होता ...त्यावेळी सेनेचं लक्ष मुख्य ते मुंबई / ठाणे एवढेच होते, बाळासाहबांबरोबर एक उत्तम खेळाडूंचा संच होता
पुढे राष्ट्र्या राजकारणात शिरवयाचा म्हणा किंवा त्याला साथ द्यायची म्हणून म्हणा सेनेने ( बाळासाहेबांनी) आक्रमक हिंदुत्व अंगिकारला तेव्हा कुतूहल वाढलं आणि थोडा आनंद हि झाला..अर्थात प्रश्न हा हि पडला कि जर हिंदुत्व पाहिलं तर मग भाषेवरून आपल्या निष्टेची वाटणी कशी करायची? कोणता झेंडा हातात धरू देवा? अशी परिस्थिती ..
पुढे सेना हि एक कुटुंबाचाच खाजगी उद्योग इतक्या किळसवाण्या पद्धतीने झाला कि उबग आली,
अगदी कुटुंबाचा उद्योग म्हणलं तरी योग्य उमेदवार राज ठाकरे सी इ ओ पदासाठी तरी घेतील असे वाटले होते...अर्हताःत पुढे त्यांनी हि सरड्यासारखे रंग बदलले आणि स्वतःत कुवत असून मागे पडले
गेल्या महिन्यभारतील घटनेनन्तर मात्र सेवेबद्दल चा उरला सुरला मान हि संपला

२) निमशहरी भागात राहिल्या मुळे काँग्रेस विचारसनी ची आणि बहुजन समाजची थोडी तरी ओळख झाली आणि त्यातून काँग्रेसी विचारसरणी ला आणि त्यांच्या ग्रासरूट पकडील का किंमत का आहे ते कळले.. पण देशाच्या फायद्यासाठी अतिशय महत्वाच्या गोष्टींवर जेवहा त्यांनी एवढी वर्ष बोटचेपे पण केलं आणि संघाला एकीकडे धर्मवादी अशी नाव ठेवत स्वतः धर्माचे राजकारण व्यस्थित खेळले निर्लज्ज पणे, या नुसताच उबग नाही तर घृणा वाटते त्यांच्या संबंधी .. आणि त्यात पराकोटीची घराणेशाची

३) भाजप .... टोकाचं भांडवलषयी आहारी ना जात विकास कसा साधणार हे?
४) समाजवादी ( शॅम्पेन पीत गप्पामारणारे ) यांचं शॅम्पेन चा पुरवठा पूर्ण बंद कसा करता येईल याच्या शोधात
५) समाजवादी ( खरे) भारतासारखाय विकसत असलेल्या आणि लोकसंख्येचा एवढा भर असलेल्या भूमीला तुमचं विचारसरणीतील काही गोष्टी आवश्यक आहेत पण ते करताना देशाला धक्का देऊ नका हा शहाणपणा कधी येणार तुम्हाला कॉम्रेड ! चार दिवस संघात जा आणि मग परत या

प्रतिक्रिया

हाहाहाहाहिहिहिपिपिपिपि तुतारी.

मुक्त विहारि's picture

28 Nov 2019 - 10:29 pm | मुक्त विहारि

मला अजूनही एक रूपयात मिळणारी झुणका भाकर आठवत आहे. पुर्वी खूप ठिकाणी मिळत होती. अगदी लोटे-परशुराम इथे पण. ..