दिलिप चित्रे साहेबान्शि असहमत - पहा आजचा मटा - रविवार दिनान्क ९ नोवेम्बर २००८

चिन्कु's picture
चिन्कु in काथ्याकूट
9 Nov 2008 - 8:33 pm
गाभा: 

दिलीप पुरुषोत्तम चित्रे साहेब,
आपल्या सारख्या थोर माणसाकडून इतकी मोठि चुक अपेक्षित नव्हती. हा देश "हिंदुस्थान" नसून "भारत" आहे. आपण "हिंदुस्थानी" शब्दाएवजी "भारतीय" शब्द वापरणे अधिक संयुक्तिक ठरले असते. असो.
आपल्या सारखी माणसे अधिक आहेत महाराष्ट्रात आणि ती मराठीच आहेत याची आम्हाला देखील लाज वाटते. राज्यघटना वगैरे बोलायला ठीक आहेत हो पण नुसत्या बाता मारुन पोट भरत नाही. जर राज ठाकरे चुकीच्या मार्गाने जात आहेत ना. तर आपण योग्य मार्ग सुचवा. आपले हात तोंड कोणी धरले आहे. लोक आपले आभारच मानतील. आपल्या माहिती साठी सांगतो जो माणूस आपले घरदार सोडून दुसर्‍या ठिकाणी जातो तो पैसे कमवायला. त्याचे घरदार तेथे नसते त्यामुळे तो माणूस काहीही काम करायला आणि कितीही वेळ काम करायला तयार असतो. कारण त्याचे उद्दिष्ट पैसे कमावणे हे असते. अशी कितीतरी मराठी माणसे माझ्या माहितीत आहेत जी दुबई, आखातात काम करतात. अगदी दिवसाचे १६-१६ तास देखील कामे करतात. त्यामुळे मराठी माणसे आळशी आहेत वगैरे बोलणे चुकीचे आहे. एक वस्तुश्तिति लक्षात घ्या जयाचे घरदार एथे आहे त्याला घरची देखील कामे असतात त्यामुळे तो दिवसाचे कितीही तास कितीही कमी मजुरीवर तो राबू शकत नाही. ह्या वस्तुस्थिती कडे हेतुपुर्वक दुर्लक्ष करून आपली विद्वता दाखवू नका. मालक लोक आपले पैसे वाचवण्यासाठी परप्रांतीय मजदूर घेतात. कारण ते कमी पगारावर काम करतात ह्याचे मुख्य कारण ह्याना तेवढे देखील पैसे त्यांच्या राज्यात मिळत नाहीत. त्यांच्या दृष्टीने हा पगार खूपच असतो. परंतु एथे घरदार असणारा माणूस तेवढ्या कमी पैशात कसे काम करेल ह्याचा ही विचार करा. आपले डोके जरा चालवा आणि ह्यावर मार्ग सुचवा.
आता राज ठाकरे ह्यांच्याबद्दल, जो माणूस काम करतो ना त्याच्याकडुनच चुका होतात. मान्य आहे राज ठाकरे चुकले असतील पण ह्याचाच दुसरा अर्थ असा की ते काहीतरी काम करत आहेत. भले त्यांच्याकडून चुका झाल्याआसातील पण चुकांतुनच माणूस शिकतो, तसे ते ही शिकतील आणि योग्य मार्ग निवाडतील. पण आपल्या सारख्या विद्वानानी देखील योग्य मार्ग सुचवावा ना.. आणि एवढे तरी मान्य करा की राज ठाकरे ने इच्छा तर दाखवालीय स्थानिक लोकांसाठी काही करायची. त्याच्या मार्गात फुले टाकु शकत नसाल तर निदान काटे तरी पसरू नका...

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Nov 2008 - 8:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्याच्या मार्गात फुले टाकु शकत नसाल तर निदान काटे तरी पसरू नका...
अगदी सहमत. म्हणूनच म्हणते हाच न्याय महाराष्ट्राबाहेर भीतीखाली रहाणार्‍या मराठी लोकांनाही लावा, ज्यांना कर्नाल, जमशेदपूरसारख्या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे. कारण एकच ते मराठी आहेत!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3692245.cms
हे संरक्षण घेण्याची/मागण्याची वेळ या लोकांवर कोणी आणली?

वेताळ's picture

9 Nov 2008 - 9:29 pm | वेताळ

म्हणजे राज ठाकरेमुळे त्याना त्रास होतो म्हणुन इथे मराठी माणसावर अन्याय झाला तरी चालेल पण सुरु असलेले आंदोलन मागे घ्यावे असे तुला सुचवायचे आहे काय?
परवा प्रताप आसबे नामक एका प्रसिध्द पत्रकाराचा ह्या वरचा लेख मी वाचला.त्यात त्यांचे ही असे मत होते की राज ठाकरे च्या आंदोलनामुळे त्याना दिल्लीत तोंड दाखवायला लाज वाटते. त्याना त्याचा विद्वान उत्तरेकडील पत्रकार ही असे म्हणाला जर उत्तर भारतियानी महाराष्ट्रातील उत्पादनावर बंदी घातली तर इथले सगळे उद्योग उत्तरेकडे न्यावे लागतील. मुंबईची सगळी औद्योगिक कार्यालये महाराष्ट्राबाहेर हलवावी लागतील. पण हे होणे शक्य आहे काय?उत्तरभारतिय म्हणजे फक्त युपी आणि बिहार ही दोन राज्येच आहेत काय? पंजाब ,काश्मिर,गुजरात,राजस्थान,प.बंगाल,आसाम,मिझोराम,मणिपुर,दिल्ली,इत्यादी उत्तरेकडील राज्यातदेखिल बिहारीना विरोध होत आहे.मागच्या वर्षी आसाम मध्ये बिहारींची हत्या झाली होती म्हणुन बिहार मध्ये रेल्वे वर हल्ला करुन आसामी लोकाची हत्या केली होती पंरतु आज ही आसाम मध्ये बिहारीना विरोध होत आहे.बिहारीनी म्हणुन का आसाम मधला चहा पिणे बंद केले का? आजकाल हिंदी मेडीया वाले महाराष्ट्राच्या नावे बोंब मारत आहेत त्याला किती मराठी पत्रकारानी विरोध केला आहे. इथे ज्याला त्याला विचारवंत म्हणवुन घ्यायची ओढ लागली आहे.त्यात आपण किती मराठी वर अन्याय करत आहे ह्याची हे लोक डोळझाक करत आहेत.
करनाल किंवा झारखंड मधिल एक दोन गोष्टीमुळे राज ठाकरे ह्याचा आंदोलना वर चिखलफेख करणे थांबवा. कारण असल्या विचारवंत मराठी लोकांची महाराष्ट्राला गरज नाही आहे.तुम्हाला जगण्यासाठी महाराष्ट्राची गरज आहे ,महाराष्ट्राला तुमची नाही.
वेताळ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Nov 2008 - 9:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

करनाल किंवा झारखंड मधिल एक दोन गोष्टीमुळे राज ठाकरे ह्याचा आंदोलना वर चिखलफेख करणे थांबवा.
चौरीचोरा या ठिकाणी पोलिस स्टेशन जाळलं (ही एकमेव घटना) म्हणून 'चले जाव'चं आंदोलन थांबवलं गेलं होतं. यापुढे मी काय बोलू?
पुण्यात मराठी माणसांनी भरलेल्या करातून विकत घेतलेल्या बसेस का जाळल्या गेल्या?

कारण असल्या विचारवंत मराठी लोकांची महाराष्ट्राला गरज नाही आहे.तुम्हाला जगण्यासाठी महाराष्ट्राची गरज आहे ,महाराष्ट्राला तुमची नाही.
मी ना विचारवंत आहे ना माझ्यावाचून कोणाचं अडतंय? पण आज झारखंडमधून येणारा कोळसा महाराष्ट्राला नको आहे का? आज झारखंड वेगळं राज्य आहे, पण मागच्या वेळी जेव्हा राज ठाकरे समर्थकांनी भैय्यांना मारपीट केली होती तेव्हाचं काय?
मिपावर मी माझी मतं या विषयावर व्यक्त केलीही होती, (पुनरावृत्ती फार होऊ नये म्हणून थोडक्यातच), ही जर विषवल्ली असेल तर तिची नुस्ती पानं खुडून, जाळून काय मिळणार आहे? विषारी धूर आपल्याच नाकात जाणार आहे. मुळांचंच काही करता आलं तर बघावं!

मन's picture

23 Nov 2008 - 11:10 am | मन

चौरि चौरा घडालं ते १९२०-२१ च्या आसपास असहकार आंदोलनादरम्यन.
चले जाव चळवळ त्यांनंतर जवळ्जवळ २०-२२ वर्षांनी म्हणजे १९४२ च्या आसपासची.
बाकी चालु द्या.
मी तुमच्याशी आणि तुमच्या विरोधकांशीही पूर्णतः सहमत आहे!
आपलाच,
मनोबा

वेताळ's picture

9 Nov 2008 - 9:55 pm | वेताळ

चौरीचोरा या ठिकाणी पोलिस स्टेशन जाळलं (ही एकमेव घटना) म्हणून 'चले जाव'चं आंदोलन थांबवलं गेलं होतं. यापुढे मी काय बोलू?

ह्या ठिकाणी २२ शिपायाना जाळुन मारले होते. मला वाटते राज ठाकरे ह्याच्या आंदोलनात कुणाची हत्या करावी हा हेतु होता किंवा आहे.बसेस जाळल्या हे जरी खरे असले तरी राजठाकरेना अटक करण्या आधी त्याचे सर्व कार्यकर्ते तुरुंगात होते. हे काम समाज कंटकाचे देखिल असु शकते.
विचारवंत हे मी आसबे साहेबाना उद्देशुन म्हटले होते. :P
वेताळ

अभिरत भिरभि-या's picture

10 Nov 2008 - 12:53 pm | अभिरत भिरभि-या

फुले आंबेडकर आगरकरांच्या वारसा सांगणा-या महाराष्ट्रात लायकीचे किती विचारवंत उरलेले आहेत हे वेगळे सांगायला नको. पण ह्या तथाकथित विचारवंत जितके उथळ तितकीच राज ठाकरेंची कृती उथळ आहे.

बिहार्‍यांना मारुन मुंबईची समस्या कशी सुटणार आहे ते मला कधीच कळले नाही. आणि कर्नातक वा तमिळनाडूची उदाहरणे देणार्‍यांनी "सुमडीत" किती काही गोष्टी केल्या जातात ते ही शिकावे.

कॅमेर्‍यासमोर काही उत्तर भारतीयांना मारणे याने किती मराठी जनांचे भले होते बा ?

केवळ बिहारी मुलांना मारण्याने मराठी जनांना नोकर्‍या मिळणार आहेत का ? कोर्टातून स्टे ऑर्डर न आणण्यासारखे प्रभावी व हमखास उपयोगी उपाय टाळून बिहारी मुलांना मारहाण करण्यात मराठी जनांची नसली तरी मनसे व राष्ट्रवादीचा राजकीय फायदा आहे हे उघड आहे.

कोणताही मसिहा न घेता इतर लोकांनी मुंबईचा ताबा मिळवला. यातून आपण काय शिकलो आहोत ? शून्य

राज समर्थक वरील प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळाटाळ का करतात ? ?

राजचा निषेध करण्यात आघाडी वर असलेले आपल्याकडचे विचारवंत "मुंबई आणखी भार सहन करु शकत नाही. उत्तरेकडिल राज्यांना स्वत:स विकसित करावेच लागेल " असे ठणकावून सांगू शकत नाही हे त्यांची वैचारिक दिवाळखोरीच दर्शवते.

दोघांना कृष्णा गोदावरीत अर्पण करून साध्यासुध्या मराठी लोकांना एक प्रश्न...

इतरांना मारणे हा नकारात्मक उपाय आहे.
एकजूटितून प्रगती साधणे हा सकारात्मक उपाय.

दुसरा उपाय उपयोगी आहे हे न समजण्या इतपत आपण मूर्ख आहोत काय ??

बहुत काय लिहिणे.

मिपा वर या सारखे १७६० धागे सुरु होतात. दरवेळेला तेच ते argument केले जाते; असे काही basic प्रश्न विचारल्यावर मुद्द्यालाच बगल.
अदितीप्रमाणे पुन: तेच तेच सांगण्याचा मलाही कंटाळा आला आहे.
मागील एक धागा जिथे मी विस्ताराने बोललो आहे.

http://www.misalpav.com/node/4118

रम्या's picture

10 Nov 2008 - 3:51 pm | रम्या

बिहार्‍यांना मारुन मुंबईची समस्या कशी सुटणार आहे ते मला कधीच कळले नाही.
केवळ बिहारी मुलांना मारण्याने मराठी जनांना नोकर्‍या मिळणार आहेत का ?
राज समर्थक वरील प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळाटाळ का करतात ? ?

असे घासून गुळगुळीत झालेले प्रश्न विचारणारे तुम्ही पहिलेच नाही ! आणि राज साहेबांनी याला सडेतोड उत्तर त्यांच्या कित्येक जाहीर सभांमध्ये दिलेले आहे. पण वैचारिकतेचे डोहाळे लागलेल्या आपल्या विचारवंतांना भैय्या चॅनल वरून दिल्या जाणार्‍या तद्दन भिकार, नौटंकी बातम्या पाहण्यास वेळ आहे पण राज ठाकरेंनी आपल्या घणाघाती भाषणात मांडलेल्या मुद्द्यांवर विचार करण्यास वेळ नाही!
रेल्वेच्या परिक्षा बिहारमध्ये घेतल्या जातात तिथे हे भैय्या विद्यार्थी परीक्षा देतातच पण तेच विद्यार्थी जेव्हा पुन्हा परिक्षा देण्यासाठी महाराष्ट्रात येतात. आणि या परिक्षेची जाहीरात जेव्हा कोणत्याही मराठी पेपरमध्ये येत नाही तेव्हा मात्र तळपायाची आग मस्तकात जाते. राहता राहीला प्रश्न हाणामारीचा. प्रश्न सोडवण्यासाठी ज्याला ज्या भाषेत समजते त्या भाषेत उत्तर! रेल्वे भरतीचा प्रश्न म्हणा, मराठी पाट्यांचा प्रश्न म्हणा, आज ऐरणीवर आला तो फक्त या हाणामारी मुळेच. परिक्षेला येणार्‍या विद्यार्थांना फूल, स्टे ऑर्डर, देऊन किंवा मत्र्यांना या बाबत निवेदन पाठवण्याच्या उपायासारखी गांडूगिरी करत बसलो तर राज ठाकरेंची आख्खी हयात जाईल. आणी जरी हे असं केलं तरी हे भैय्या चॅनल, स्वघोषित विचारवंत असल्या फुटकळ उद्योगांना प्रसिद्धी देणार नाहीत.
आणि निस्पॄहपणे काम करायला राज ठाकरे काही समाज सेवक किंवा साधू नाहीत. काही बदल घडवायचे असतील तर हातात सत्ता हवी, आणि त्यासाठी धूर्तपणा, बेरकी पणा हवाच. तो केला तर महाराष्ट्रातल्या विचारवंतांच्या गांडीला का आग लागते काही समजत नाही. नाही तर त्या चित्रे, निखिल वागळे सारख्या चुतमारीच्यांना इतरवेळी रस्त्यावरचं काळ कुत्रं देखील विचारत नाही. पण राज ठाकरें, बाळासाहेब ठाकरे काही तरी बोलले तर भडव्यांना जाग येते आणि मराठी माणसाच्या दोषांचा पाढा वाचायला सुरवात करतात.

राज ठाकरेंच्या या कॄती मध्ये राजकिय स्वार्थ असला तरी त्यांच्या आक्रमक पवित्र्यामूळे संपूर्ण महाराष्ट्र मराठीच्या मुद्याबद्दल किती संवेदनशील आहे हा समज भारतभर पसरला हे मान्य करावच लागेल.
बाकी प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो. हेतू साध्य करण्यासाठीचा राज ठाकरेंचा मार्ग हा आक्रमक आहे. काहींना हा आक्रमक स्वभाव मानवतो तर काहींना नाही. बाकी राज ठाकरेंनी ह्यांव करायला पाहिजे त्यांव करायला पाहिजे हे असले फुकटचे सल्ले देत उंटावरून शेळ्या हाकणार्‍यांनी स्वतः राजकारणात उतरून ज्या मार्गावर तुमचा विश्वास आहे तो मार्ग अवलंबून यश साध्य करावं. मग आम्ही सुद्धा राज ठाकरेंना नाकारू आणि तुमचा उदो उदो करू.

बाकी तुम्ही आय. बी. एन. लोकमत फार पाहता का हो? :)

राज साहेब ठाकरेंना आमचा जाहीर पाठिंबा!
रम्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Nov 2008 - 4:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रेल्वेच्या परिक्षा बिहारमध्ये घेतल्या जातात तिथे हे भैय्या विद्यार्थी परीक्षा देतातच पण तेच विद्यार्थी जेव्हा पुन्हा परिक्षा देण्यासाठी महाराष्ट्रात येतात. आणि या परिक्षेची जाहीरात जेव्हा कोणत्याही मराठी पेपरमध्ये येत नाही तेव्हा मात्र तळपायाची आग मस्तकात जाते.

या सगळ्या परीक्षांची जाहिरात मराठी पेप्रांत येते का नाही माहित नाही, पण एंप्लॉयमेंट न्यूजमधे नक्की येते. आणि तो सगळ्या भारतात मिळतो, इंग्लिशमधे असतो. आणि भैय्याभूमीमधे जाऊन परीक्षा देऊ नका असं कोणीही मराठी मुलांना म्हटल्याचं ऐकीवात नाही.

(टी.व्ही.पासून अलिप्त) अदिती

एक अवांतर निरीक्षणः पुण्यात मी रहाते, काम करते त्या भागात मराठी माणसांची दुकानं दिसत नाहीत, आहेत जी, ती दुपारी बंद असतात. लाला वर्माचं भाजीचं दुकान रात्री साडेदहाला उघडं पाहिलं आहे, आणि बाकीचे *कर (म्हणजे मराठी * चा अर्थ वाईल्ड कार्ड आहे) आडनावांची दुकानं साडेआठला गाशा गुंडाळतात. मराठी दुकानदार आपल्याला हवी असलेली वस्तू कशी फाल्तू आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न करतो आणि इतर कोणी, आत्ता नाही आहे उद्या दुपारनंतर नक्की मिळेल, असं वचन देऊन ते पाळतो.

(निरीक्षक) अदिती

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Nov 2008 - 4:49 pm | llपुण्याचे पेशवेll

एंप्लॉयमेंट न्यूज सारखे रोजगार समाचार पण असते फक्त हिंदीत.

पुण्याचे पेशवे

उदा. सकाळ ची पुणे , मुंबई इ इ इ ....
रेल्वे ने प्रत्येक आवृत्तीत जाहिरात देणे अपे़क्षित आहे की काय?

चित्रे साहेबांशी असहमत.

सध्याच्या परिस्थितीत 'राज' हे निमित्त ठरलेले आहेत हे खरे.
त्यामुळे याचे राजकीय फायदे-तोटे सगळे पक्ष उचलणारच.

हे फक्त महाराष्ट्रातच घडते आहे असे नाही -
- कर्नाटक सरकारने बेळगाव/निपाणी भागात असलेल्या मराठी भाषिक अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या,
- कन्नड भाषा सक्ती केली, आता दुकानाच्या पाट्या कन्नड मधे याव्यात यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु होत आहेत
- आंध्रात 'तेलंगणा' च्या मुद्द्यावर निवडणूका जिंकल्या गेल्या,
- दिल्ली सरकारने हिंदी भाषिक पट्यातून होणार्‍या स्थलांतरामुळे राज्यावर बोजा वाढत आहे ही तक्रार केली
- पंजाब, हरियाणा, आसाम राज्यात बिहारी लोकांवर हल्ले झाले
- दक्षिणेच्या राज्यातील लोक त्यांच्या भाषे बाबतीत सेंसिटीव आहेत हा आपला सगळ्यांचाच अनुभव आहे

हे दाखवण्याचा हेतू दंग्यांचे समर्थन करणे असा नाही. महाराष्ट्रातच काय भारतात कुठेही गेलात तरी स्थानिकांची मते अशा परिस्थितीत यापेक्षा वेगळी नाहीत हे यावरुन लक्षात येईल.

मला वाटते भाषा, प्रांतवादाच्या पुढे जावुन बघायला हवे. लोकांना जर स्थलांतर करायची वेळच आली नाहे तरच असे प्रश्न सुटु शकतील.

उगीचच नाराज वगैरे होण्यापेक्षा चित्रे साहेबांसारख्या 'मराठी माणसांनी' यावर मार्ग सुचवावे.

- अभिजीत

मराठी_माणूस's picture

10 Nov 2008 - 9:24 am | मराठी_माणूस

त्या विचारवंत साहेबानी आणि त्यांच्या सारख्या विचार असणार्‍यानी त्याच अंकातील भरत कुमार राउत यांचा लेख वाचावा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3689282.cms
ह्या लेखात काही महिन्या पुर्वि शीखांनी केलेल्या दंगलीचा उल्लेख आहे. त्या वेळेस ह्या लोकानी बर्‍याच ठीकाणि वहातुक अडवुन ठेवली होती, त्यामुळे काही लोकांचे अतोनात हाल झाले होते. आणि कारण होते त्यांच्यातीलच दोन पंथातील भांड्ण त्याचा ईतराशी काहीही संबंध नव्हता , ह्या लोकांची इथे मुंबईत असे करण्याची हिम्मत कशी होते ? त्यावेळेस हे विचारवंत कोठे होते

आपल्याला मात्र पंतप्रधान कार्यालया कडुन नोटिस मिळते. हा दुजा भाव का ?
मउ लागते म्हणुन ढोपरपासुन खणणे चालु आहे. उस गोड लागतो म्हणुन मुळा पासुन खाणे चालु आहे.

रामपुरी's picture

10 Nov 2008 - 10:26 am | रामपुरी

पण मला एक कळत नाही हा दिलीप चित्रे थोर केंव्हापासून झाला? त्याच्या मताला एवढी किंमत द्यायचे कारणच काय? त्याने त्याची वैचारिक दिवाळखोरी पु. ल. देशपांडेना भिकारी म्हणून केंव्हाच दाखवून दिली आहे.

कोण आहे हा चित्रे. तो नेमके काय करतो?काही माहिती आहे का ह्याच्या बद्दल?
वेताळ

गेली अनेक साहित्य संमेलने आठवा. अनेक संमेलनाध्यक्षांनी मराठी भाषेचा कमी झालेला वापर, मराठीवरील इतर भाषांची आक्रमणे(म्हणजे स्वतःच्या भाषेतील चांगले शब्द टाकून इतर भाषातील शब्द वापरणे) अशा अनेक कारणांसाठी गळे काढलेले दिसतात. मग आता जेव्हा वेळ आली आहे तेव्हा हे साहित्यिक वर्तूळ शेपूट घालून का बसले आहे? राजचा मार्ग मान्य नसेल तर ठीक तसे सडेतोड पणे सांगा पण भूमिका पटत असेल तर त्याला तरी जाहीर पाठींबा द्या. जर मोठे पणाच्या अधिकाराने या साहीत्यीकांनी राज याना हिंसा करू नये म्हणून सांगितले तर त्याचा अव्हेर करण्याइतके ते काही अपरिपक्व नक्कीच नाहीत.
आता मुद्दा आंदोलनाच्या परिणामांचा. तर एक खूप मोठा पॉझिटीव्ह परिणाम हा आहे की आता लोक पुढे येऊन बोलत आहेत. उगाच आपले 'हींदी राष्ट्रभाषा आहे' मग त्याविरुद्ध कसे बरे बोलायचे असा 'तोंड दाबून बुक्क्याचा मार' सहन न करण्याची वृत्ती वाढली आहे. महाराष्ट्राच्या भूमीत विकास झाला आहे त्यात महाराष्ट्र कुठे आहे असा प्रश्न लोक स्वतःलाच विचारू लागले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात या सर्व विकासात महाराष्ट्राचा माणूसही विकसित होणे आवश्यक आहे ही जाण लोकांमधे वाढली आहे. त्यामुळे या आंदोलनातील हिंसेपेक्षा या आंदोलनाचा परिणाम हा मला सगळ्यात सकारात्मक वाटतो आहे.

पुण्याचे पेशवे

अतिशय योग्य आणि मुद्देसुद प्रतिसाद पेशवे.
साहित्य संमेलनात मराठीची झालेली अधोगती यावर चर्चा करण्यात धन्यता मानणार्‍या सर्व मराठी लेखकांनी व साहित्यिकांनी खर तर एकमुखाने राज च्या या आंदोलनाला पाठींबा द्यायला हवा.पण मराठी माणसाच्या स्थायी भावाप्रमाणेच कुपमंडुक वृत्तीने माणसे वागतात तेंव्हा मराठीच्या र्‍हासाला नक्की जबाबदार कोण असा विचार मनात येतो?
"अनामिका"

सुनील मोहन's picture

10 Nov 2008 - 3:39 pm | सुनील मोहन

- कन्नड भाषा सक्ती केली, आता दुकानाच्या पाट्या कन्नड मधे याव्यात यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु होत आहेत.......

कन्नड भाषेत दुकानाच्या पाट्या नसतील तर रुपये दहाहजार फक्त
इतका दन्ड लागू केला आहे.

याविरुद्ध कोणीही याचिका दाखल केलेली नाही.

अनामिका's picture

10 Nov 2008 - 4:15 pm | अनामिका

कन्नड भाषेत दुकानाच्या पाट्या नसतील तर रुपये दहाहजार फक्त
इतका दन्ड लागू केला आहे.

याविरुद्ध कोणीही याचिका दाखल केलेली नाही.

तिच तर मोठी गंमत आहे?
आसाम मणिपुर कर्नाटक्,तामिळनाडु,आंध्रप्रदेश,इथे सुद्धा हेच सगळ चाललय्.आपल्या कडे नुसतीच मारहाण होते तिथे तर पार संपवुन मोकळे होतात पण त्यांच्याविरुद्ध कुणी ब्र काढायला तयार नाही.कारण ते त्यांच्या राज्यात या सगळ्या हिंदी वृत्तवाहिन्यांचे प्रक्षेपण बंद करायला कमी करायचे नाहित्."चोर सोडुन संन्याशाला फाशी "हा न्याय फक्त महाराष्ट्रातच आहे.
अवांतर-
परवाच आमच्या ह्यांचा एक शेट्टि म्हणुन मित्र सहकुटुंब भेटावयास आला होता.ओघाओघात राजच्या आंदोलनाचा विषय निघाला आणि मी बाह्या सरसावुन च्या ऐवजी ओढणि निटनेटकी करुन चर्चेला तयार झाले.मला वाटले आता हा मित्र नेहमीप्रमाणे इतर परप्रांतियांसारखे भाषण देणार पण चक्क तो म्हणाला"भाभीजी आपका ये राज ठा़करे है ना एकदम ठिक कर रहा है,ये बिहारींयो मे बहुत चरबी है ,किसी ना किसी को तो उतारनी पडेगी.काफी नाटक बढने लगा है"माझा जिव भांड्यात पडला.कारण हे राज प्रकरण चालु झाल्यापासुन माझे वाद फारच वाढलेत इतरांशी!!!!!!!!!!!!!!
अजुन एक्.मागिल महिन्यात माझ्या समोरच्या घरात राहणारे बिहारी कुटुंब कतार येथे स्थलांतरीत झाले.तिचे घर मध्यप्रदेशमधिल मुळचे मराठी असेलेल्या एका कुटुंबाने विकत घेतले होते.जाताना जे काही फर्निचर आहे ते योग्य अवस्थेत नविन येणार्‍यांच्या हाती सोपवायचे तर या बिहारी कुटुंबातल्या बाईने जाताजाता बहुतांश वस्तु मुद्दाम तोडुन फोडुन ठेवल्यां..........पण नविन येणार्‍यांकडुन पैसे घेताना मात्र पुर्ण घेतले होते. आता बोला? हि असली विक्षिप्त आणि विध्वंसक मानसिकता कसली म्हणायची?

"अनामिका"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Nov 2008 - 4:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

... तर या बिहारी कुटुंबातल्या बाईने जाताजाता बहुतांश वस्तु मुद्दाम तोडुन फोडुन ठेवल्यां..........पण नविन येणार्‍यांकडुन पैसे घेताना मात्र पुर्ण घेतले होते. आता बोला? हि असली विक्षिप्त आणि विध्वंसक मानसिकता कसली म्हणायची?

अनामिकाताई बाकी काही असेल ते असेल, पण एका माणसाच्या वृत्तीचं उदाहरण देऊन सगळ्या समाजाबद्दल मतं बनवणं जरा जास्तच वाटतं! म्हणजे उल्टा विचार करायचा झाला तर तुम्ही राज-समर्थक आहात, तर सगळीच मराठी माणसं राजसमर्थक आहेत असं म्हणण्यासारखं झालं. किंवा दि.पु.चित्रे राजविरोधक आहेत किंवा त्यांच्या मतांचे विरोधक आहेत तर सगळीच मराठी माणसं अशी आहेत असं म्हणण्यासारखं झालं.

बाकी चालू द्या.

(मला कंटाळा आलाय आता याचा ...) अदिती

मराठी_माणूस's picture

11 Nov 2008 - 9:56 am | मराठी_माणूस

नाशिक जवळ्च्या एका छोट्या गावात एका कारखान्यात बरेच बिहारी (अंदाजे १०००) काम करतात. त्या कारखान्याच्या मालकाची काहि निरिक्षणे
१)ह्या सर्वाना पान खाउन भिंतीवर थुंकण्याची सवय असते. त्या भिंती त्यांच्या कडुनच वारंवार साफ करुन घेतल्या जातात तरी त्यांचे पान खाउन थुंकणे चालुच आहे.
२)फुरसतीच्या वेळात हे फक्त पत्ते आणि पत्तेच खेळतात.
३)बर्‍याच वर्षा पासुन इथे रहात असल्यामुळे आता आर्थीक स्थिती चांगली आहे. दुचाकी, घर ई. आहे. मुले शाळेत शीकतात पण प्रगती अत्यंत सुमार आहे.
एकंदरीत त्यांची बौध्दीक क्षमताच कमी असते

तुलना करायची झाली तर कित्येक मराठी कामगार असे आहेत की जे आपल्या मुलांच्या शीक्षणाकडे अत्यंत काटेकोर पणे लक्ष देत असतात. आपल्या सारखे त्याना कष्ट करायला लागयला नकोत असे त्याना वाटते. त्याना स्वतःला सुध्दा साहीत्य, कला ह्या मधे रुची असते.

शिशिर's picture

10 Nov 2008 - 5:09 pm | शिशिर

अशी कितीतरी मराठी माणसे माझ्या माहितीत आहेत जी दुबई, आखातात काम करतात. अगदी दिवसाचे १६-१६ तास देखील कामे करतात. त्यामुळे मराठी माणसे आळशी आहेत वगैरे बोलणे चुकीचे आहे. एक वस्तुश्तिति लक्षात घ्या जयाचे घरदार एथे आहे त्याला घरची देखील कामे असतात त्यामुळे तो दिवसाचे कितीही तास कितीही कमी मजुरीवर तो राबू शकत नाही. ह्या वस्तुस्थिती कडे हेतुपुर्वक दुर्लक्ष करून आपली विद्वता दाखवू नका.

वस्तुस्थिती अशी आहे कि मराठी माणसा ची सवय कष्टा ची कामे करायची नसून बुध्दी ची कामे करायची असते. स्वत: चा धन्दा करण्याएअवजी तो नोकरी उत्तम करु शकतो. आखातात माणसे नोकरी साठी जातात, धन्द्या साठी नव्हे. कामगार म्हणून देखील मराठी माणसा चे बाहेर जाणे नाहीच. मराठी कामगारा ची न कळवता किती ही दिवस सुट्टी घेण्याची सवय, सख्ख्या नातेवाईका पासून ते गावात कुठल्याही माणसा कडे घडलेला प्रसन्ग उदा. लग्न, जन्म, मयत, दहावे, बारावे, तेरावे व इतर्...(गाव ची जत्रा, उरुस्,वारी,गणपती) समयी घेतलेल्या सुट्ट्या, त्याचे पॅसे कमविण्याचे इतर मार्ग उदा. भिशी, फण्ड, सावकारी, जागे चे व्यहवार, शेतीचे व्यहवार... ह्या सर्व गोष्टीपायी तो नोकरी/धन्द्या ला न्याय देत नाही. ह्याचा ही विचार करायला हवा.

वारकरि रशियात's picture

10 Nov 2008 - 5:28 pm | वारकरि रशियात

मुक्तसंगः अनहंवादि
दोन निरिक्षणे - एक निष्कर्ष

प्रसंग एकः कोकणातील एक लहान गांव (तालुक्याचे)
एका मराठी माणसाचा नवीन सुरु केलेला पशुपालन व दुग्धोत्पादन व्यवसाय. चार माणसांची आवश्यकता - पशुपालनासाठी (म्हशी वगैरेंची निगा राखणे, दूध काढणे इ. ) एकही मराठी कामगार तयार होत नाही / मिळत नाही. शेवटी ओळखीने मुंबईतून (बिहारी) भय्याची नेमणूक!

प्रसंग दोनः देशावरील (घाटावरील) एक लहान गांव (तालुक्याचे) आपली अध्यात्मिक राजधानी
एक रिक्षातळ - आठदहा रिक्षा, सर्व चालक गप्पा मारताहेत. गिर्‍हाईक येते. प्रत्येकजण दुसर्‍याला सांगतो की तू जा!
(आळसाने) चकाट्या पिटणे सोडायला कोणी तयार नाही.
या गांवात (अजूनतरी) भैये रिक्षाचालक नाहीत, पण तो दिवस दूर नाही असे भय वाटते!!!

निष्कर्ष आपणच काढायचा आहे ! पण वेळ खूप कमी आहे.

मराठी माणसाची प्रगती व्हावी असे आपणा सर्वांनाच वाटते.
(प्राथमिक) लक्षवेधी उपायांनंतर अनेक पातळ्यांवर (प्रामाणि़क) प्रयत्न आवश्यक.
संतमहात्मे, साहित्यिक / विचारवंत यांनी योग्य दिशा दाखवावी.
राजकारण (रामदासांना अपेक्षित) - काही सूप्त तर काही उघड; पण प्रामाणि़क
इ.

अन्यथा ज्ञानेश्वर - तुकारामांच्या मर्‍हाटीचे अंमळ कठीणच आहे! कारण भाषेलाही वाहक लागतो.

अनामिका's picture

11 Nov 2008 - 11:38 am | अनामिका

अदिती !
तुझा मुद्दा मान्य.कुणी कुठली आणि कुठल्या पक्षाची विचारधार स्वीकारावी हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे?
पण जेंव्हा मराठी माणुस कामचुकार आहे अश्या प्रकारचा अपप्रचार हेतुपुरस्सर केला जातो तेंव्हा सरसकट सगळीच मराठी माणसे कामचुकार आहेत असेच गृहित धरले जाते.
माझ्या वडिलांवरुन मी हे नक्की सांगु शकते कि हे धादांत खोटे आहे.माझे वडिल ठाण्यातील टेक्सन कंपनीत होते.१९७९ ते१९८१ या कालावधीत त्यांना जर्मनी येथे कंपनी तर्फे तांत्रिक शक्षणासाठी पाठविण्यात आले होते . मे १९८१ जेंव्हा ते परतले तेंव्हा दुर्दैवाने टेक्सन मधे संप पुकारला गेला आणि व्यवस्थापनाने काही वर्षात या कामगारांना काढून टाकले. या सगळ्या प्रकारामुळे वडिल नैराश्याच्या गर्तेत ओढले गेले.पण त्यातुनही बाहेर पडत् त्यांनी ठाण्यात ज्या परीसरात आम्ही रहायचो तेथेच ६ गुंठे जागा खरेदी केली जर्मनीत मिळवलेल्या मिळकतीतून.वडिलोपार्जित शेती हाच व्यवसाय असल्या कारणाने त्या कडेच त्यांचा कल अधिक होता.घेतलेल्या जागेत त्यांनी फळझाडे ,फुलझाडे व भाजीपाला लावुन स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उदरर्निर्वाहाचा प्रश्न सोडवला. त्या नंतरच्या काळात त्यांनी कुक्कुटपालन तसेच दुग्धव्यवसाय देखिल केला.अगदी शहराच्या मध्यभागी असलेल्या त्यांच्या गोठयाचा त्रास तेथिल रहिवाश्यांना कधिही झाला नाही.आणि होवु देखिल दिला नाही.
बागेत पिकणार्‍या भाज्या फळे माझी आई स्वतःच्या कंपनीत नेवुन योग्य दरात विकायची. बरोबरीने काम करणार्‍या स्त्रियांचा कामावरुन जाताना भा़जी विकत घेण्याचा वेळ यामुळे वाचायचा.अश्या प्रकारे प्रतिकुल परिस्थितीत देखिल समोर आलेल्या संकटाला व आर्थिक चणचणीला सामोरे जात विपरीत परिस्थितीत देखिल आई आणि वडिलांनी नेटाने आपल्या जबाबदार्‍या पार पाडल्या.
माझे शिक्षण तसेच उच्चशिक्षण देखिल याच कमवलेल्या पैशातुन झाले.
आज एक मराठी नागरीक म्हणून मला या सगळ्या गोष्टिंचा खुप अभिमान आहे.
माझे लग्न ज्या व्यक्तीशी झाले तीने देखिल वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचा व्यवसाय व स्वतःची आयपीसील मधिल नोकरी समर्थपणे सांभाळली. बांधकामाचे सामान विकण्याचा व्यवसाय सांभाळताना झालेला त्रास मी समक्ष डोळ्यानी बघितला आहे.वेळेला ट्रक रेती भरुन दरवाज्यासमोर उभे असायचे पण चालक आला नाही तरी ट्रिप चुकायची नाही.माझे यजमान स्वतः ती खेप मारायचे व योग्य जागी सामान पोहोचवायचे.
एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली मी माझ्या आयुष्यातील दोन्ही पुरुषांना आणि त्यांच्या जोडिला घरातील इतरांना प्रामाणिकपणे कष्ट करताना बघितले आहे मी त्यामुळे अश्या प्रकारचे आरोप झाले की त्रास होतो.
सध्याची पिढि शारीरीक कष्टाच्या कामांना तयार नसते हे मान्य पण तरिही कामचुकार आहेत हे अमान्य.................
"लाथ मारेल तिथे पाणी काढेल "असे बळ असलेल्या मराठी माणसाला कामचुकार म्हणणे नतद्रष्टपणाचे लक्षण आहे"

वर नमुद केलेला एका व्यक्तीच्या अनुभवाने मी निष्कर्षाप्रत पोहोचले असे तुला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. माझ्या गाठीला अश्या अनेक अनुभवाचे गाठोडे आहे.आणि हे स्वतः अनुभवलय म्हणुन जीव जळतो अन्यथा वृत्तवाहिन्यांवरील अतिरंजीत बातम्या अथवा वृत्तपत्रातील लेख वाचुन मी माझी मते कधीही बनवली नाहीत.
आज मराठी अस्मितेला जाग यावी म्हणुन अथवा मराठी माणसासाठी , त्याच्या न्यायहक्कासाठी राजने हे आंदोलन छेडले असेल्.त्याच्या हिंसक मार्गाचे मी देखिल समर्थन करत नाही.पण आज ही वेळ आपल्यावर का आली याचा डोळसपणे विचार करण्याची गरज प्रत्येक मराठी माणसाला आणि महाराष्ट्रात राहणार्‍या व्य़क्तीला आहे.हे आंदोलन सुज्ञपणे आणि योग्य रितिने पुढे नेणे जास्त गरजेचे आहे. उत्तरभारतीयांना मारुन काहिहि साध्य होणार नाही.प्रत्येक मराठी माणसाने आत्मपरीक्षण करायची खरी गरज आज निर्माण झाली आहे.

सत्य परिस्थिति अशी आहे कि हल्लीच्या मराठी युवकांना काही प्रकारची कामे करण्याची लाज वाटते.प्रत्येकालाच इथे पांढरपेशा बनण्याचा हव्यास जडलाय.

ठाण्यामधे ८०% ऑटोचालक उत्तरभारतीय आहेत.त्या बहुतेक रिक्शा मराठी माणसाच्या मालकीच्या आहेत पण रिक्शा चालवणे हे लाजीरवाणे वाटते म्हणुन केवळ उत्तर भारतियांना चालक म्हणुन ठेवुन पैसा कमवायचा या वृत्तीला काय म्हणायचे?आपल्या मनगटात जर जोर नसेल, शरीरीक कष्ट करण्याची तयारी नसेल तर बाहेरची माणसे येवुन तुमच्यावर कुरघोडी करणे स्वाभाविक आहे.
बाजारात जाण्याचा कंटाळा म्हणुन दारावर येणार्‍या भैय्यांकडुन मासळी विकत घ्यायची तसेच फ़ेरीवाल्यांकडुन भाजिपाला विकत घेणे अश्या प्रकारच्या गोष्टी करुन आपल्याही नकळत उत्तरभारतीयांना इथे स्थायिक आणि स्थिरस्थावर होवुन स्वतःचे बस्तान बसवण्यास हातभार लावण्याचे काम आपण मराठी लोकच करतो .
ठाण्यात पुर्वी गोखले रोड,राममारुती रोड येथे बहुतांश दुकाने मराठी माणसांची होती पण हल्ली एक पुराणिकांचे गोरसगृह ,गोखले उपहारगृह ,पोंक्षे वॉच कंपनी आणि शुभमानस उपहारगृह ,टेंपटेशन आइस्क्रिमचे दुकान यासारखी एकदोन सोडली तर मराठी माणसाचा ठसा ठाण्याच्या त्या विभागातुन लुप्त झाल्याच अढळत्.आणि ते बघुन आमच्या सारख्या मुळ ठाणेकराच्या जिवाची तगमग होते.हिच परिस्थिती जांभळी नाक्याची देखिल आहे.
सगळ्याच मराठी दुकानदारांनी आपापली दुकाने इतरांना भाडेतत्वावर उपलब्ध करुन दिली आहेत्.काहींनी मोठ्या रकमा घेऊन विकली आहेत.आता पैसा कुणाला प्यारा नाही पण अपार पैसा मिळवुन आपण करतोय काय ?अथवा मिळवतोय काय ?ह्याचा विचार करण्याची जबाबदारी कुणाची?
मी रहाते त्याविभागातील एक खुप जुने दुकान मालकाने एका उत्तरभारतियाला चालवायला दिले होते काही महिन्यांसाठी पण एका महिन्यात त्या दुकानाचा खप कमी झाला ,आणि ते दुकान स्वतःच्या घशात घालण्याचे प्रयत्न देखिल सुरु झाले. शेवटि मुळ मालकालाच परत चालवायला घेणे भाग पडल.अजुन काहि काळ थांबले असते तर ते दुकान हातचे घालवुन बसले असते.
महाराष्ट्रातुन नोकरी निमित्त परदेशी गेलेला मराठी माणुस कष्ट करत नाही का?अमेरीकेत किंवा आखती देशात कामानिमित्त गेलेली मराठी माणसे देखिल अपार कष्टच करतात पण "जसा देश तसा वेश" या उक्ती प्रमाणे तेथे राहुन देखिल त्या देशाचे सगळे कायदे पाळतातच की?
पण हे उत्तरभारतीय मुंबई आणि महाराष्ट्रात येऊन स्वतःचे बस्तान बसवतात आणि विडा उचालल्या सारखा जेथे वास्तव्य करतात तो सर्व परिसर अगदी बकाल करुन ठेवतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.यांना कितिही पायाभुत सुविधा उपलब्ध करुन दिल्या तरी ते घाणच करतात. पुन्हा मार्‍यामार्‍या आणि भांडणे यात देखिल पुढेच. यांची अरेरावी प्रत्येक गोष्टीत दिसुन येते. सध्याच्या भारताच्या राजकारणात ज्या प्रकारची गोरीगोमटी फळे नेत्यांच्या रुपात उत्तरभारताने दिली आहेत त्यावरुन प्रत्यय येतोच की? सरसकट सगळेच अवगुणी नसतिल कदाचित पण सुक्याबरोबर ओले देखिल जळतेच

इथे माझा अजुन एक अनुभव नमुद करतेय..............................
२००५ साली घडलेली घटना ठाण्यामधे एका ठिकाणी माझी गाडी वळण घेत असताना मागुन एक रिक्शा माझ्या गाडीवर आदळली. रिक्शा इतक्या जोरात आदळली कि माझी गाडी रस्ता सोडुन फुटपाथवर चढण्याच्या बेतात होती. रिक्शाचे बरेच नुकसान झाले होते. रिक्शात कुणी लहान मुलवगैरे नाही ना? याची खात्री करुन घेण्यासाठी मी गाडीबाहेर आल्यावर रिक्शाच्या चालकाने शिवीगाळ सुरु केली गाडित मी आणि माझ्या दोन मैत्रिणीच होतो.या सगळ्या गदारोळात गर्दी जमली कुणीतरी trafic police ना बोलावले. (आता इथे महिलांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यावर कैक लोक पुन्हा एकदा विचार करत बसतील ;) )
त्यांनी शहानीशा केली असता आणि तिथे जमलेल्या माणसांना व प्रत्यक्षदर्शींना विचारले असता त्यांनी चुक रिक्शावाल्याची असल्याचे सांगीतले.सुदैवाने वळण घेताना सुरु केलेला गाडीचा indicator देखिल चालुच होता.तेव्हढ्यात त्या चालकाने आपले उत्तरभारतीय भाईबंद गोळा केले आणि पोलिसांवरच अरेरावी सुरु केली.शेवटी पोलिसांनी गाडी वागळेइस्टेट पोलिस ठाण्यावर नेण्यास सांगीतले. मला त्याच दिवशी रात्री परतीचा प्रवास करायचा होता.पण रिक्शावाला ऐकायला तयार नाहि.त्याची चुक तो मान्य करत नव्हता मी चांगल्या प्रकारे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण त्याचे म्हणणे होते की मी नुकसानभरपाई म्हणुन त्याला १०,००० रुपये द्यावेत. आणि माझी चुक नसताना त्याला एव्हढी रक्कम देण्याची माझी तयारी नव्हती.
मधल्या काळात माझ्या एका मैत्रिणीने तिच्या नवर्‍याला फोन करुन सगळी कथा ऐकवली. त्याचे कुणीतरी वरिष्ठ अधिकारी ओळखीचे होते त्यांना परिस्थितिची कल्पना दिली त्यांनी त्यांच्या assisstant ला पाठवले.त्याला बघुन रिक्शावाल्याने तो स्वतः कृपाशंकर सिंग यांचा नातेवाईक असल्याचे सांगुन दडपण आणायला सुरुवात केली. मला काहिच कळेना काय करावे? पण जेंव्हा त्या चालकाने त्याची पातळी सोडुन संभाषण करण्यास सुरुवात केली तेंव्हा शेवटी मी माझी ओळख वापरुन त्याला धडा शिकवण्याचे ठरवले आणि तसे केले देखिल.
त्या रिक्शावाल्याने जर चांगल्या शब्दात आणि सभ्य भाषेत माझ्याशी संवाद साधला असाता तर कदाचीत मी त्याला माझी चुक नसताना पैसे दिले (अगदी १०००० नाहि पण थोडेफार तरी)असते सुद्धा पण ज्याप्रकारे त्याने त्याची ओळख असल्याचे सांगुन पोलिसांवर दमदाटी सुरु केली तेंव्हा मात्र माझ्या डोक्यात सणक गेली.
कदाचित आम्हा बायकांना बघुन त्याला वाटले असावे की आम्ही सहजासहजी पैसे देऊ.यालाच म्हणतात "कानामागुन आली आणि तिखट झाली"

राजसमर्थकांनी केलेले हिंसक आंदोलन हे पुर्णतः चुकीचेच आहे सर्वसामान्य माणसाला वेठीस धरुन आंदोलन करणे मनाला पटत नाहि.
मराठी माणसाची कुपमंडुक वृत्तीच महाराष्ट्रात मराठी माणसाच्य र्‍हासास कारणीभुत होत आहे.
आणि सगळ्यात महत्वाचे ज्या प्रकारे या वृत्ताला मिडियाने अवास्तव प्रसिद्धी दीली त्याचे कारण भारतात निदान सध्यातरी सर्व electronic प्रसारमाध्यमे पुर्णपणे उत्तरभारतीयांच्या ताब्यात आहेत आणि त्यावर त्यांचा वरचष्मा असल्याकारणाने विपर्यस्त वृत्ते दिली गेली. ज्यामुळे वातावरण अधिकच तणावग्रस्त झाले
आणि सगळ्यात महत्वाचे एका मोठ्या वृत्तवाहिनीचा सर्वेसर्वा असलेल्या "राजदीप सरदेसाई" सारख्या मराठी माणसाला आपला मराठी बाणा आपल्या वृत्तवाहिनीद्वारे दाखवावा असे एकदाही वाटु नये"हीच महाराष्ट्राची शोकांतिका आहे.
"दिलीप चित्रे यांनी राज वर केलेली टिका ही कायस्थांचा मत्सर ,आणि अकारण स्वतःला श्रेष्ठ समजण्याचा स्थायीभाव असल्याची प्रचिती देणार आहे"

ता क-
या वाक्यासाठी मिपावरील कुठल्याही कायस्थाने अकारण मनात राग धरु नये.मी स्वतः कायस्थ असुनहि हे विधान जाणिवपुर्वक करते आहे
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

"अनामिका"

वेताळ's picture

11 Nov 2008 - 10:27 am | वेताळ

"लाथ मारेल तिथे पाणी काढेल "असे बळ असलेल्या मराठी माणसाला कामचुकार म्हणणे नतद्रष्टपणाचे लक्षण आहे"
आपल्या दगडधोंड्याच्या महाराष्ट्रात संगमरवरी गोट्याचा काही उपयोग नाही.माझे उदाहरण देतो . मी माझे व्यवसाय कार्यालय सकाळी ९ वाजता सुरु करतोव रात्री ११ वाजता बंद करतो. वर्षातुन एक दोन सुट्टी घेतो.समोरच्या गिरहाईकाचे काम वेळेत पुर्ण झाले पाहिजे ह्या कडे माझा कटाक्ष असतो. माझे भाउजी हे कपड्याच्या व्यवसायात आहेत. आता त्याची तिसरी पिढी ह्या व्यवसायात आहे. साध्या खोलीत सुरु केलेले त्याचे दुकान आज एका तीनमजली मॉल मध्ये आहे.माझे खुप महाराष्ट्रियन मित्र विविध व्यवसायात आहेत व स्वःताच्या कष्टाने त्यानी तो व्यवसाय आज मोठ्या प्रमाणात सुरु केला आहे.फक्त एका ठिकाणी थोडे कामचुकार राहतात त्यावरुन सगळी मराठी माणसे कामचुकार आहेत हे ठरवणे चुकीचे आहे.आपण आपल्या कोषातुन बाहेर या व बघा. मराठी माणसाने कष्टाने किती प्रगती केली आहे.आज महाराष्ट्रात उद्योग म्हणजे गुजर-मारवाडी न रहाता ,उद्योग म्हणजे मराठी माणुस असे समिकरण झाले आहे.प्रत्येक जिल्ह्यातील औद्योगिक महामंडळाच्या कार्यालयात जाऊन तुम्ही मराठी लोकाची उद्योगधंद्यामधिल माहिती आरामात घेऊ शकता.

कॅमेर्‍यासमोर काही उत्तर भारतीयांना मारणे याने किती मराठी जनांचे भले होते बा ?

असे प्रश्न कसे काय विचारता राव तुम्ही? ४/५ ठिकाणी बिहारयाना मारले म्हणुन काय सर्व महाराष्ट्रात मराठी लोक काठ्याघेऊन बिहारयाना मारत सुटले आहेत की काय?इतके मुर्ख आहेत का मराठी? त्याना दुसरे काही उद्योग नाही आहेत का?तुम्हाला एक वेळ असेल म्हणुन तुम्ही टुकार हिंदी वृत्तवाहिन्या बघत असाल,त्यात एकच सीन ३६५ वेळा ,दिवसभर दाखवत असतात. ते बघुन तुमचे तसे मत बनले असावे.महाराष्ट्रात जितके हिंदी भाषिक सुरक्षित आहेत तितके ते त्याच्या राज्यात ही नसावेत ही वस्तुस्थिती आहेह्या कडे तुम्ही किती दुर्लक्ष करता.बाकी इतर तुमच्या प्रश्नाची उत्तरे रम्या,पुण्याचे पेशवे व अनामिकाने दिलीच आहेत.
वेताळ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Nov 2008 - 11:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

४/५ ठिकाणी बिहारयाना मारले म्हणुन काय सर्व महाराष्ट्रात मराठी लोक काठ्याघेऊन बिहारयाना मारत सुटले आहेत की काय?
किंवा
एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली मी माझ्या आयुष्यातील दोन्ही पुरुषांना आणि त्यांच्या जोडिला घरातील इतरांना प्रामाणिकपणे कष्ट करताना बघितले आहे मी त्यामुळे अश्या परकारचे आरोप झाले की त्रास होतो.

मला एवढंच म्हणायचं आहे की ही दोन विधानं एकत्र वाचा. चार-पाच ठिकाणी बिहार्‍यांना मारलं तर सगळे मराठी लोकं मारामार्‍या करत रस्त्यावर उतरत आहेत असा अर्थ होत नाही तसंच आपल्या आजूबाजूची चार-पाच लोकं कष्ट करून सुस्थितीत येत आहेत तर सगळे मराठी लोक अतिशय कष्ट करतात असा अर्थ कसा काय काढता येईल?
वारकर्‍याने दिलेली उदाहरणं आज पुण्यातही दिसतात. मराठी माणसाचं पुणं, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणं आणि तिथले रिक्षावाले भाडी नाकारतात, का कष्ट होतात म्हणून. आता मी पण मराठी माणसाचं एक उदाहरण देतं, फार जुनं नाही, दीड वर्षच झालं. इथे काही परदेशी मित्र आले होते एका 'स्कूल'साठी आणि आम्ही खरेदीला बाहेर पडलो होतो. परत येण्यासाठी रीक्षा पकडायला गेलो तर सगळे एकजात रिक्षावाले म्हणतात गोर्‍या लोकांकडून तिप्पट पैसे घेणार. आणि मी त्यावर बोलायला लागले तर म्हणे, "महाराजांचा इतिहास शिकून हेच का शिकलात तुम्ही? गोर्‍या लोकांकडून जास्त पैसे घेतले तर काय जातं?" हे सगळे "महाराजांचे पाईक" मराठीच होते, उच्चारांवरून पश्चिम महाराष्ट्रातले वाटत होते. आता याला काय म्हणणार आपण? दोन पावलं पुढे चालल्यावर रिक्षा मिळाली, मी तापून "हे पुण्यातले रिक्षेवाले असे आणि तसे" म्हणून इंग्लिशमधे बोलत होते. उतरल्यावर त्याला मीटरप्रमाणे झाले त्याच्यापेक्षा पाच रुपये जास्त दिले (एवढी वाकडी वाट करुन यायला लागतं म्हणून), तो नाही म्हणाला. आणि मराठीतच म्हणाला, "ताई, मी एम.ए. इंग्लिश आहे. मला बोलायची सवय नाही पण इंग्लिश समजतं, मला समजलं तुम्ही काय म्हणत होतात ते! एवढं शिकून रिक्षा चालवायची हौस मलाही नाही. पण तुम्ही म्हणत होतात तसाच महाराजांची उदाहरणं देत भोसले आडनाव सांगून माझं पोट नाही भरणार ना माझ्या कुटुंबाचं. हे मला पटतं पण बर्‍याचशा आपल्याच लोकांना हे समजत नाही. आता काय करणार यांचं? यांच्यामुळे माझ्यासारखे जे थोडे चांगले रिक्षावाले आहेत ते पण बदनाम होतात." माझ्या परदेशी मित्रांनी त्याला थांबवून माझ्याकडून त्याच्या बोलण्याचं सगळं भाषांतर ऐकलं आणि म्हणून त्याला पुन्हा एकदा पाच रुपये जास्तीचे देऊ केले, आता थांबवलं म्हणून. तो नाही म्हणाला आणि पुढे गेला.
सात-आठ रिक्षावाल्यांशी भांडण झाल्यावर एक चांगला मिळाला. आता सांगा भैय्यांनी कष्ट करुन रिक्षा चालवली आणि मी त्यांच्या कष्ट करण्याला चांगलं म्हटलं तर?
मराठी माणूस सरसकट कामचुकारच असतो, भैय्ये म्हणजे कष्टाळू गरीब गायच असतात असं मला म्हणायचं नाही आहे. पण एक-दोन माणसं पाहून संपूर्ण समाजाबद्दल मत बनवणं योग्य नाही एवढाच माझा मुद्दा होता.

अवांतरः मी पण मुळची ठाण्याचीच. तिकडे भैय्या रिक्षावाल्यांचं प्रमाण गेल्या पाचेक वर्षांत वाढलंय, आता फारच ट्रॅफिक जॅम्स होतात, त्यात जास्तीत जास्त वाहनं रिक्षा असतात आणि वाहतूकीची शिस्तीचे तीन-तेरा वाजले आहेत ही माझी निरीक्षणं!

(पायी ठाण्यात फिरणारी) अदिती

अदिती !
मला तुझा मुद्दा कळतोय पण मुळात याच बाबतीत विचार करायची गरज आज निर्माण झाली आहे असे नाहि का तुला वाटत?
मराठी माणुसच मराठीच्या आणि मराठी माणसाच्या मुळावर उठलाय.
कामधंद्याच्या बाबतीत चोखंदळ झाल्याचे परिणाम आजची पिढी भोगते आहे.पण हे कुठे तरी थांबायला हवे कि नाही?आणि मग त्यासाठी कुणी राज आवाज उठवत असेल तर त्याविरुद्ध आवाज आपण मराठी माणसानेच उठवायचा की त्याच्या आवाजात एकदिलाने आपला आवाज मिसळायचा? आपणच आपल्या लोकांचे पाय ओढतो आणि म्हणुनच आपल्याला खेकडा प्रवृत्तीचे असे संबोधले जाते.
आणि हिच वृत्ती मराठी माणसाला मारक ठरतेय्?आपल्यात एकवाक्यता नाही हेच तर सगळ्याचे मुळ कारण नाही ना?
महाराजांच्या जातीचे दाखले देत व्यर्थ दुराभिमान असणार्‍या लोकांना माझा देखिल विरोधच आहे.
मराठी अस्मितेच्या आंदोलनाच्या पार्श्वभुमी वर विचार करता हाच दुराभिमान आपल्याला आणि महाराष्ट्राला रसातळाला नेतो आहे.
याचा कुणि विचार करेल की नाही.?
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"

मराठी_माणूस's picture

11 Nov 2008 - 12:15 pm | मराठी_माणूस

बरोबर.
बिहारी नेते जसे ह्या मुद्यावर एकत्र आले तसे मराठे नेते यावे अशी अपेक्षा होती. पण त्याना राजकारण आणि सत्ते पुढे काही ही दिसत नाही.
पण सामान्य माणूस पण एकत्र येत नाहे हे आपले दुर्दैव.

अनामिका's picture

23 Nov 2008 - 1:02 pm | अनामिका

लेखाची लिंक इथे देत आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3745689.cms
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

"अनामिका"