पोहे कि शिरा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
18 Jul 2019 - 7:47 am

---------------

ती आता ६०+ आहे....

लग्ना नंतर काहि दिवसात लक्षात आले की हिच्यात एक १३-१४ वर्षाची परकरी पोरगी लपली आहे जी अत्यंत नाटकी व प्रचंड हट्टी आहे..

तिला कितिही समजावुन सांगीतले तरी ती गोष्टी तीला हव्या तश्याच करते..

मी रांगडा कारखान्यातला माणुस असल्याने फाडफाड बोलायचो जे पटत नाहि ते....

मात्र ति सारे शांतपणे ऐकायची..परीणामस्वरुप....

'हा म्हणजे तिला फाडफाड वाट्ट्ट्ट्ट्टॆल तसे बोलतो.बोलायचा पोच नाहि त्याला...ती बिचारी गरीब नीमुटपणे ऐकुन घेते" अशी संबंधितात आपली प्रतिमा निर्माण करण्यात मात्र यशस्वी झाली....

बर त्या नाटकी हट्टी मुलिला खुष ठेवण्या साठी गाडगीळांचे दागीने...ऊंची ची साड्या ड्रेस..सिनेमे.सहली आदी वस्तुंचे नैवेद्य पण दाखवले..ती नैवेद्य गट्टम करायची..१-२ दिवसात पहिले पाढे......

हल्ली तिला माझी दया येते..ती मला मत विचारते...

परवाचीच गोष्ट आहे..३.३०-४ चा सुमार असेल..मी बातम्या बघत होतो...

तीने विचारले...ती..तुला काय खायला करु? शिरा करु की पोहे..

मी..शीरा कर..

ती..शीरा कशाला? आधिच साखर कंट्रोल च्या गोळ्या खाता शीरा खाल्ला की साखर वाढेल पोहेच करते...

मी ...ठिक आहे..

समजा पोहे सांगीतले तरी सीन निराळा झाला नसता..

.ती..तुला काय खायला करु? शिरा करु की पोहे..

मी ...पोहे कर..

ती ...सारखे काय पोहे..त्या पेक्षा शीरा करते...

मी..अग पण शुगर...

ती..एव्हढ्याच तेव्हढ करण्याची तुमची जुनी सवय आहे..घास भर शीरा खाल्याने साखर काहि आभाळाला पोहोचत नाहि...

मी...ठीक आहे...तुला योग्य वाटते ते कर....

ती ..तस नाहि..मग भुणभुण करता मला विचारत नाहि..स्वताला हव तेच करते....

थो्डक्या त काय? मत विचारले म्हणजे त्या प्रमाणे घडेल असे नाहि...

स्त्री हट्ट..बाल हट्ट..राज हट्ट..कुणाचे चालले आहे?

आपल्या घरात आहे का अशी परकरी हट्टी मुलगी????

नाट्य

प्रतिक्रिया

mrcoolguynice's picture

18 Jul 2019 - 11:18 am | mrcoolguynice

एक़ीच उपाय : बोलनेका
“राणी, अग किती कष्ट घेतेस संसारासाठी....
तु प्रेमाने जे देशिल ते ख़ाईन...”

शनिवार झिंदाबाद....

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jul 2019 - 11:20 am | ज्ञानोबाचे पैजार

पहेले मै पानीमे शिरा और फिर पोहा
पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2019 - 11:27 am | डॉ सुहास म्हात्रे

तुम भी बडे वो हो, पैजारुद्दीन. =)) =)) =))

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jul 2019 - 11:42 am | ज्ञानोबाचे पैजार

अकुकथा पढ पढ के सताया,
(फिरभी) कल अकुकाका का एक धागा (बेरहेमीसे) उडाया
एक्का काका तू बड़ा वो है,
जालिमा तू बड़ा वो है

(अकुकाकांचा धागा उडाल्या मुळे दु:खी झालेला) पैजारबुवा,

mrcoolguynice's picture

18 Jul 2019 - 11:23 am | mrcoolguynice

एक़ीच उपाय : बोलनेका
“राणी, अग किती कष्ट घेतेस संसारासाठी....
तु प्रेमाने जे देशिल ते ख़ाईन...
बाय द वे, शीरा इतक़ा तु सुरेख बनवते न ,
माझ्या आइला सांगुन थकलो....
की बघ ... लग्नानंतरच इतक़ा नितांत सुंदर शीरा चाखायला मीलाला”

पोहयाचा मूड असेल तर वरिल वाक़यात शिरया एवजी पोहे रिप्लेसुन, बोला...

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jul 2019 - 11:33 am | ज्ञानोबाचे पैजार

आणि आणखी वेगळाच मुड असेल तर
राणी ऐवजी नीना, मीना, अंजू,मंजू किंवा मधू या पैकी जी समोर असेल तीचे नाव रीप्लेसून बोला
पैजारबुवा,

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

18 Jul 2019 - 12:48 pm | प्रलयनाथ गेंडास...

बघा ... अकुनी (पोहे/शिऱ्यावर )सात्विक धागे काढले तरी ...
तुमच्या सारखे दुत्त दुत्त मिपाकर ...
धाग्याचा प्रवाह ... "आणखीन वेगळ्याच मूड" कडे घेऊन जाता ...

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jul 2019 - 2:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

बार मधे बसून जर कोणी दुध पीत असेल तर सगळा बार त्या दुधपित्यावर संशय घेतो.
पैजारबुवा,

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

18 Jul 2019 - 2:23 pm | प्रलयनाथ गेंडास...

जंगल में मोर नाचा किसी ने न देखा
अकुजी जो थोड़ीसी पी के ज़रा झूमें हाय रे सबने देखा
जंगल में मोर नाचा …

फुटूवाला's picture

18 Jul 2019 - 11:37 am | फुटूवाला

अकुकाकांनी पूर्णविराम द्यायला सुरुवात केली.

चौथा कोनाडा's picture

18 Jul 2019 - 4:02 pm | चौथा कोनाडा

चला, मॅच्यूरिटी आली म्हणायची .... ! :-))

आनन्दा's picture

18 Jul 2019 - 7:44 pm | आनन्दा

थोडी मॅ च्यु रिटी जास्त झाल्याने एकाच्या ऐवजी चार चार पूर्णविराम टाकतायत ते...

मुक्त विहारि's picture

18 Jul 2019 - 11:01 pm | मुक्त विहारि

धन्यवाद. ....

वचने किं दरिद्रता. ...

कौतुक आहे बाबा तुम्हा दोघांचे. ....

हस्तर's picture

19 Jul 2019 - 12:18 pm | हस्तर

ती आता ६०+ आहे....

ह्या वाक्यच काही खास संदर्भ आहे का ?

अभ्या..'s picture

19 Jul 2019 - 12:22 pm | अभ्या..

किलो की वर्षे किंवा अजुन काही परिमाण आहे का ते विचारुन घ्या.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Jul 2019 - 12:36 pm | ज्ञानोबाचे पैजार

सेंटीमिटर असावे का?
पैजारबुवा,