"व्रात्यस्तोम"

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
30 Jun 2019 - 9:32 am

पूर्वी ऋतुप्राप्ती होण्या अगोदरच मुलींची विवाह होत असत … पण ऋतुप्राप्ती झाल्यानंतर जर एखाद्या मुलिचे लग्न करायचे झाल्यास "व्रात्यस्तोम" विधी करावा लागे असा संदर्भ "उंच माझा झोका" मधे ऐकला..
ज्यांच्यावर अजिबात संस्कार झालेले नाहीत किंवा वेळेवर झाले नाहीत त्या लोकांना शुध्द करण्यासाठी व्रात्य स्तोम विधी केला जातो . ऋतू येण्यापूर्वी मुलीवर विवाह संस्कार झाला पाहिजे अशी कल्पना असण्याच्या काळात उशिरा विवाह झाल्याने म्हणजे योग्य वेळी संस्कार न झाल्यामुळे पतित व्यक्तीला यात शुध्द करून घेतले जाते .
परधर्मीय , परदेशीय व्यक्तीबरोबर राहिल्यास जेवण केल्यास सुध्दा या विधीने शुध्द होता येते .
होळकर संस्थानातील राजकुमाराने परदेशी मुलीबरोबर विवाह केला तेव्हा तिचा व्रत्य्स्तोम विधी पंढरपुरात झाला होता असे म्हणतात .एका हिंदूने तिला दत्तक मग या विधीने ती मुलगी शुध्द होऊन मग विवाह झाला . अंधार्पुरात अशा विधीने परधर्मीय व्यक्तीला शुध्द करून घेण्याची सोय अजूनही आहे .
ज्ञानकोशकार केतकरांनी सुद्धा विदेशी महिलेला व्रात्यस्तोम विधीने शुध्द करून तिच्याशी विवाह केला होता . परधर्मीय व्यक्तीबरोबर जेवणे वगैरे गोष्टीमुळे ज्यांचा धर्म भ्रष्ट झाला , जे स्वेच्छेने / बळजबरीने परधर्मात गेले व त्यांना परत हिंदू धर्मात येण्याची इच्छा होती ते या विधीने परत हिंदू होत अशी माहिती वाचनात आलि होती .
शिवाजी राजे क्षत्रिय आहेत असे सिद्ध झाल्यावर त्यांची मुंज योग्य वयात न झाल्याने त्यांचाही व्रात्य स्तोम विधी झाला होता असे ऐकून आहे .

सामवेदाच्या तांड्य ब्राह्मणामध्ये व्रात्यांना शुद्ध करून आर्य ब्राह्मणांत समाविष्ट करण्यासाठी करावयाच्या ‘व्रात्यस्तोम’ विधीचे वर्णन आहे (१७.१.४). येथे व्रात्यांचे चार प्रकार सांगितले आहेत : (१) आचारभ्रष्ट, (२) नीच कर्मे करणारे, (३) जातिबहिष्कृत आणि (४) जननेंद्रियाची शक्ती नष्ट झालेले. ह्या चार प्रकारच्या व्रात्यांसाठी चार व्रात्यस्तोमही सांगितलेले आहेत. ह्या सर्व व्रात्यस्तोमांचे विधान अग्निष्टोम यागाप्रमाणे आहे.

Like

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

30 Jun 2019 - 7:03 pm | आनन्दा

अपूर्ण वाटतोय..

बाकी एंटर च्या ऐवजी fullstop बघून आनंद झाला

जालिम लोशन's picture

30 Jun 2019 - 10:50 pm | जालिम लोशन

-१

तेव्हडी कमीच आहे.

विजुभाऊ's picture

1 Jul 2019 - 9:44 am | विजुभाऊ

या असल्या शुद्धीकरणाच्या मूर्ख संकल्पनांमुळेच आपण मागे राहिलो

पूर्वी ऋतुप्राप्ती होण्या अगोदरच मुलींची विवाह होत असत … पण ऋतुप्राप्ती झाल्यानंतर जर एखाद्या मुलिचे लग्न करायचे झाल्यास "व्रात्यस्तोम" विधी करावा लागे
..
ज्यांच्यावर अजिबात संस्कार झालेले नाहीत किंवा वेळेवर झाले नाहीत त्या लोकांना शुध्द करण्यासाठी व्रात्य स्तोम विधी केला जातो . ऋतू येण्यापूर्वी मुलीवर विवाह संस्कार झाला पाहिजे अशी कल्पना असण्याच्या काळात उशिरा विवाह झाल्याने म्हणजे योग्य वेळी संस्कार न झाल्यामुळे पतित व्यक्तीला यात शुध्द करून घेतले जाते .

कुठला काल हा ?
वैदिक ? किती हज़ार वर्ष्यपूर्वीपासून ही प्रैक्टिस चालू आहे ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jul 2019 - 11:17 am | ज्ञानोबाचे पैजार

इथे मिपावरच्या काही काका लोकांवर हा विधी करण्याची गरज आहे.

पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2019 - 1:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

तुम्ही एक कविता पाडून हा विधी सफळ संपन्न करा. ;) :)

छान माहिती दिली आहे अक्कू काका

भंकस बाबा's picture

3 Jul 2019 - 5:10 pm | भंकस बाबा

हस्तक हाणताहेत हात मिळवून !

भंकस बाबा's picture

3 Jul 2019 - 5:11 pm | भंकस बाबा

हस्तक हाणताहेत हात मिळवून !

Yogesh Sawant's picture

5 Jul 2019 - 4:44 pm | Yogesh Sawant

अहो संपला तो काळ आता.

हिंदू धर्माला "जगण्याची समृद्ध अडगळ" असं म्हणतात ते असल्या चालीरीतींमुळेच का?

काही हजार वर्षांपूर्वी धर्म हि मूळ संकल्पना काय होती ते विचारात घेऊया. मानवी जीवनात आचरण कसे असावे त्याची समाजातल्या ज्ञानी माणसांकडून मिळालेली शिकवण. हि शिकवण रोजच्या जीवनात आचरणात आणण्यासाठी सोपी जावी म्हणून काही मार्गदर्शक सूचना (guidelines) तयार झाल्या. कालांतराने त्यांचे प्रथा परंपरात रूपांतर झाले. शतकानुशतके काळ पुढे चालला. मूळ संकल्पना मागे पडत गेली आणि प्रथा परंपरा हाच धर्म असा समज झाला. पुढे जाऊन काही जणांनी प्रथा परंपरा आपल्या सोयीनुसार बदलल्या.

अजून किती वर्ष जुन्या प्रथा परंपरा कवटाळत बसणार? आणि त्यालाच धर्म असं समजणार? थांबा कुठंतरी.

अभ्या..'s picture

5 Jul 2019 - 5:33 pm | अभ्या..

व्रात्य लोकांचे फारच स्तोम माजलेय ब्वा.