घरातील वायरिंग मध्ये अर्थिंग चे महत्व

मिलिंद दि.भिड़े भिलाई's picture
मिलिंद दि.भिड़े भिलाई in तंत्रजगत
18 Jun 2019 - 8:38 pm

ह्या पोस्टचा संबंध प्रत्येका च्या जीवा शी केव्हा ही येऊ शकतो।

आजकाल वीजेचा वापर खूप वाढला आहे, कारण बाजारात येणारे प्रत्येक तीसरे उपकरण वीजेवर चालते । वीज म्हणताच मला नेहमी "इलेक्ट्रिकल सेफ्टी" आपसुकच आठवते ।

एक छोटीशी चूक वीजेच्या बाबतीत कधी ही "जीवघेणी बनू" शकते । 33 वर्षे वीज मंडलात नोकरी करून अंतहीन एक्सीडेंट पाहिलेत। प्रत्येक एक्सीडेंट ने आम्हाला बरेच काही शिकविले । वीज मंडळात इलेक्ट्रिकल एक्सीडेंट्स टाळायला बरीच व्यवस्था असते, तसे घरातल्या बाबतीत नसते । ह्या भूमिकेवर आता खालील पोस्ट वाचावी ।

प्रत्येक वीज व्यवस्थे मध्ये लीकेज करेंट पासून वाचवायला अर्थिंग ची व्यवस्था असते । प्रत्येक घरी वायरिंग मध्ये थ्री पिन लावलेली दिसते । त्यात मधोमध वरच्या बाजूला एक मोठे पिन अर्थिंग साठी असते । खाली डावी कड़े फेज आणि उजवी कड़े न्यूट्रल असायला हवे । घराची / दुकानाची /लघु उद्योगा ची वायरिंग तेव्हाच तपासली जाते ,जेव्हा एकाधी जीव हानि होते । तेव्हाच कळते कि वायरिंग मधील अर्थिंग तुटलेली किंवा अनुपलब्ध आहे । ही अर्थिंग किती महत्वाची आहे, हे ही तेव्हाच कळते ।

वर्षातुन दोनदा ही अर्थिंग तपासायची सवय ठेवा । अर्थिंग तपासायला घरीच उपकरण तयार करू शकता। एक होल्डर, एक बल्ब (कुठला ही चालतो) आणि दोन वायर्स। होल्डर ला वायर्स जोड़ा । बल्ब लावा, झाले तुमचे उपकरण तयार । आता अर्थिंग तपासायला एक वायर जाड्या पिन च्या ठिकाणी लावा, दूसरी वायर आल्टरनेट बारीक पिन्स च्या भोकात घालून बघा । एका बारीक पिन वर वायर लावली कि बल्ब प्रकाशमान होईल, एकात प्रकाशमान नाही होणार । झाली तर तुमच्या त्या बोर्ड पर्यन्त अर्थिंग वर्किंग कंडीशन मध्ये आहे । असे घराचा प्रत्येक बोर्ड तपासा ।

समजा घरात कुठेच थ्री पिन मध्ये वरील प्रमाणे बल्ब प्रकाशमान होत नाही, तर तुमच्या घरातील अर्थिंग गड़बड़ आहे । ह्या परिस्थितीत घराचे अर्थिंग जिथे ही असेल , ते तपासा, । सामान्यतया स्वतंत्र घरां मध्ये मीटर बोर्ड च्या जवळ पास च अर्थिंग केलेले असते । पुष्कळ शहाणे ह्या करिता वापरलेली अर्थिंग वायर, आँगणात किंवा भिंती च्या "प्लास्टर मध्ये दाबून टाकतात" कारण घराची सुंदरता (???) कमी होते । हा शहाणपणा मुळीच करू नयेत ।कारण ही वायर दबलेली असली तर गंजून गळते, केव्हा तुटली, कळणार ही नाही , म्हणून अर्थिंग वायर सतत मीटर बोर्ड पासून अर्थिंग पिट पर्यन्त दर्शनीय असली पाहिजे । तसेच अर्थिंग पिट मध्ये अर्थिंग साठी लावलेला पाइप ही दर्शनिय असलाच पाहिजे । अर्थ रेसिस्टेन्स कमी ठेवायला ह्या अर्थिंग पिट मध्ये ओलावा असलाच पाहिजे म्हणून रोज निदान एकदा जेवणा नंतर इथे हाथ धुवायची सवय ठेवा । ह्या निमित्याने रेगुलर अर्थिंग इंस्पेक्शन ची सवय लागेल, आणि काही गड़बड़ वाटली तर लगेच सुधरविता येईल ।

विचार करा, आवडले तर व्यवहारात आणा । नसेल आवडले तर विसरा , पण कधी ही जीव ह्या हलगर्जी मुळे द्यायची तयारी ठेवा ।

वाईट वाटले असेल तरी दिलगीर मुळीच नाही, कारण "जान है, तो ही जहान है" ।मरज़ी तुमची, कारण जीव आहे तुमचा ।

आपण वेळ दिला वाचायला, म्हणून धन्यवाद ।

मिलिंद भिड़े, भिलाई नगर, छत्तीसगढ़

प्रतिक्रिया

अमच्या लहानपणी आठवतय - बेस्ट ( BEST )कंपनीचा सुपरवाईजर कधीही कोणाकडे अचानक यायचा आणि वायरींग तपासून चुकीच्या गोष्टी लिहून द्यायचा। ते लगेच सात दिवसांत करा सांगायचा.

nanaba's picture

20 Jun 2019 - 1:17 am | nanaba

For sharing info

प्रसाद_१९८२'s picture

20 Jun 2019 - 12:51 pm | प्रसाद_१९८२

आमच्या गावी (ता. दापोली) १९९२-१९९३ च्या दरम्यान प्रथम लाईट आली. वीज महामंडळाची लोक घरोघरी मीटर लावण्यासोबत प्रत्येकाच्या अंगणात फुटभर खड्डा खोदून त्यात मीठ, कोळसा टाकून अर्थिंग करुन देत होते.

त्यावेळच्या लोकांनी असले काही पाहिले नसल्याने त्यांना हा प्रकार करणी वगैरे सारखा वाटला, म्हणजे त्या खड्ड्यात कोळसा मीठ टाकून या लोकांनी (वीज मंडळाच्या) करणी केली आहे व त्याची बाधा तांब्याच्या तारेतून घरात पोहचवली आहे असा समज गावकर्‍यांचा झाला व त्यांनी महामंडळाची लोक निघून गेल्यानंतर तो खड्डा परत खणून त्यातील कोळसा, मीठ व तांब्याची तार काढून फेकून दिल्या होत्या.

जॉनविक्क's picture

21 Jun 2019 - 8:42 pm | जॉनविक्क

:D :D

कंजूस's picture

21 Jun 2019 - 7:32 am | कंजूस

हाहाहा

खिलजि's picture

10 Jul 2019 - 9:07 pm | खिलजि

सुंदर माहितीपूर्ण लेख .. सहज सोपं समजेल अश्या भाषेतून मांडलं आहे .. धन्यवाद

आपण कुमार साहेबांसारखंच ( ते वैद्यकीय माहिती जी महत्वपूर्ण असते ) लिहिताय या तंत्रजगतामध्ये .. हळूहळू वाचून काढेन एकेक भाग आणि प्रतिसाद देत जाईन .. इथे या सदरात प्रथमच दाखल होत आहे आणि असा माहितीपूर्ण धागा वाचून आवड अजून वाढली आहे .. धन्यवाद

तुषार काळभोर's picture

12 Jul 2019 - 6:22 pm | तुषार काळभोर

.

Namokar's picture

10 Jul 2019 - 10:03 pm | Namokar

माहितीपूर्ण लेख

माहितीपूर्ण आणि जागं करणारा लेख.

आजच हे करून पहायला हवं.

अवांतर: बऱ्याच नव्या इमारतींचे अर्दींग नीट केलेलं नसतं असं कानी आलंय.