[शशक' १९] - निरोप

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
14 Feb 2019 - 3:44 pm

हातातली तीन नाणी सावरत तिने होस्टेलच्या सार्वजनिक फोनवरून एक नंबर फिरवला. चक्क रॉंङ्ग नंबर! दोनदा!! आपल्या खंद्या स्मरणशक्तीने दगा दिल्याचे दुःख पचवून १९८ फिरवला. नाव पत्ता सांगून नंबर मिळवला. नाणं परत आलं. मैत्रिणीच्या शेजारच्यांनी तत्परतेने तिच्या घराची बेल वाजवली. फोन घेतला तिच्या नवऱ्याने. सांगितला निरोप - तिच्या गाइडनी आज दुपारी साडेबारा वाजता बोलावलंय. तीनही नाणी गेली.
दुपारी मेसमधे जेवून मग ती विभागात डोकावली.
"सर, आली होती का माधवी?"
" हो. आज तसं ठरलं नव्हतं, पण बरं झालं. मी मागवलेलं पुस्तक सकाळीच आलं ते देता आलं तिला."
" अरे वा, छान छान."
सरांच्या खोलीतून बाहेर पडताना स्वतःच एप्रिल फूल झाल्याचं दुःख दाटून आलं.

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

14 Feb 2019 - 3:57 pm | विजुभाऊ

-१ काय म्हणायचंय ते काही समजले नाही.

चिनार's picture

14 Feb 2019 - 3:59 pm | चिनार

नेमकं काय घडलंय तिथं?

जव्हेरगंज's picture

14 Feb 2019 - 4:05 pm | जव्हेरगंज

काहीतरी रोचक आहे पण काय आहे तेच समजलं नाही.

विनिता००२'s picture

14 Feb 2019 - 4:26 pm | विनिता००२

कलला नाय :(

प्रोजेक्ट किंवा थिसिससाठी गाईडकडे घालावे लागणारे खेटे!

आवडली. +१

माधविच्या मैत्रिणिने माधविला फोन जो तिच्या नवर्याने उचलला. माधविच्या मैत्रिणिला माधवीला फसवायचे असते पण तिचाच पोपट होतो.

विनिता००२'s picture

14 Feb 2019 - 4:54 pm | विनिता००२

पण निरोपानुसार ती येवून तर गेली ?? मग ??

फेरी वाया गेली नाही. उलटं अनपेक्षीतपणे फायदाच झाला. पुस्तक मिळालं सरांकडून.

विनिता००२'s picture

15 Feb 2019 - 10:49 am | विनिता००२

अच्छा :)

असा सगळा प्रकार झाला तर, जो शतशब्दात मांडला आहे....आम्ही बापडे कथा शोधत फिरत होतो..

लोथार मथायस's picture

14 Feb 2019 - 5:02 pm | लोथार मथायस

April Fool :)

बोरु's picture

14 Feb 2019 - 7:50 pm | बोरु

+१

नावातकायआहे's picture

15 Feb 2019 - 12:35 pm | नावातकायआहे

-१
बुध्यांक वाढवला पाहिजे... नाही झेपत

ज्योति अळवणी's picture

16 Feb 2019 - 11:11 pm | ज्योति अळवणी

खूपच सोपी वाटली समजायला

मयुरी चवाथे-शिंदे's picture

21 Feb 2019 - 3:53 pm | मयुरी चवाथे-शिंदे

कायच्या काय ... कळली नाही .

उपाशी बोका's picture

23 Feb 2019 - 6:56 am | उपाशी बोका

-१