[शशक' १९] - ऑर्डर

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
5 Feb 2019 - 8:28 am

टिंग! मोबाइलवरचा गेम थांबवून त्याने कंप्युटरच्या स्क्रीनकडे पाहिलं. अजून एक ऑर्डर. बाहेर महामूर पाऊस आणि त्यात या ऑर्डरी. स्क्रीनवर पोरांच्या लोकेशन्स पाहिल्या आणि त्याने एक शिवी हासडली. सगळी पोरं बाहेर अडकली होती. वेळेत ऑर्डर पूर्ण करायची तर त्यालाच जावं लागणार. बायकोच्या माहेरी सांगायला फक्त टिम लीडर...
तसं आधी बरं चाललं होतं. पण काही महिन्यांपूर्वी प्रोसेस सायकल टाइम, रिसोर्स ऑप्टिमायझेशन वगैरे भानगड सुरू झाली आणि बॉसने पोरं कमी केली. हल्ली कधीकधी त्यालापण बाहेर पडावं लागे. तो मेला सिक्स सिग्मावाला बॉसला भेटल्यापासून वाट लागली होती. तोच गेला होता आणायला. पण काय साला गाडी होती त्याची, नाहीतर आपण! तंद्रीतच त्याने रेड्याचा कान पिळला.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 Feb 2019 - 8:34 am | प्रचेतस

-१

कथा आहे असं वाटतंच नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Feb 2019 - 9:30 am | ज्ञानोबाचे पैजार

यमालाही टारगेटच्या विळख्यात अडकवले
पैजारबुवा,

किसन शिंदे's picture

5 Feb 2019 - 10:06 am | किसन शिंदे

कथा स्पष्ट होत नाही नेमकी.

श्वेता२४'s picture

5 Feb 2019 - 10:35 am | श्वेता२४

पटकन कळत नाही.

एमी's picture

5 Feb 2019 - 3:13 pm | एमी

हा हा आवडली +१.

न कळण्यासारखं काये यात? आज कितीजणांना खपवायचं याच्या यमाकडे ऑर्डरी दिल्या जातायत.

पैलवान's picture

5 Feb 2019 - 6:36 pm | पैलवान

मला वाटतं, यम बॉस आहे, बाकीचे यमदूत.
प्रथमवचनी यमदूतांचा टीएल

पद्मावति's picture

6 Feb 2019 - 1:23 am | पद्मावति

+१

मोहन's picture

6 Feb 2019 - 3:02 pm | मोहन

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Feb 2019 - 9:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

अमेयसा's picture

7 Feb 2019 - 10:15 am | अमेयसा

+१

खिलजि's picture

7 Feb 2019 - 7:40 pm | खिलजि

आधी प्रतिक्रिया वाचल्या आणि नंतर शशक .. वाचलात राव . घेऊन टाका एक नंबर

सुधीर कांदळकर's picture

7 Feb 2019 - 7:52 pm | सुधीर कांदळकर

आवडली.

नावातकायआहे's picture

7 Feb 2019 - 9:04 pm | नावातकायआहे

+१

ज्योति अळवणी's picture

10 Feb 2019 - 12:26 am | ज्योति अळवणी

प्रतिक्रियांमधून कळली कथा

दादा कोंडके's picture

11 Feb 2019 - 2:17 am | दादा कोंडके

आवडली.

डाम्बिस बोका's picture

11 Feb 2019 - 5:49 am | डाम्बिस बोका

-१

आनंद's picture

11 Feb 2019 - 12:15 pm | आनंद

आवडली!

असहकार's picture

13 Feb 2019 - 4:35 pm | असहकार

+1 मस्तच

आनन्दा's picture

14 Feb 2019 - 9:21 am | आनन्दा

+१

nanaba's picture

14 Feb 2019 - 4:24 pm | nanaba

.

ईश्वरदास's picture

16 Feb 2019 - 4:48 pm | ईश्वरदास