मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शशक' १९] - कदाचित

साहित्य संपादक · · स्पर्धा
नुकतेच इंजिनीअरींगच्या शेवटच्या वर्षाला आलेले दोन मित्र . कॉलेजमधल्या टिचींग , नॉनटिचींग स्टाफचे आवडते . एकमेकांचे रुमपार्टनर . आज उत्साहाने गप्पा मारत होते . करीअरची स्वप्ने रंगवत होते . एका मित्राने सुचवले . " मित्रा , मी ठरवलं आहे . यावर्षी प्रोजेक्टसाठी प्रिन्सीपॉल हजारशब्दे हेच आपले गाईड असणार . त्यांच्या ज्ञानाचा , अनुभवाचा आपल्याला चांगला उपयोग होईल . " रुमपार्टनर चपापुन सावधपणे म्हणाला . " जॉय दोस्ता , हजारशब्दे सर तापट आहेत . आयत्यावेळी तोंडघशी पाडतात . शहाणा असशील तर थोडा विचार कर . " " ठिक आहे यार . " जॉय म्हणाला . एक वर्षानंतर , पहिल्या पाचांत आल्याबद्दल कॉलेजतर्फे जॉय आणी त्याच्या मित्राचा सत्कार होत होता . दोघांच्याही पालकांना हा समारंभ पाहुन भरुन येत होते . कॉलेजमधे नव्यानेच आलेले ३ जुनीअर्स हा सोहळा कौतुकाने बघत होते .

वाचने 3863 वाचनखूण प्रतिक्रिया 8

किसन शिंदे Sun, 02/03/2019 - 08:06
वायरसच्या सणकीपणा कंटाळून आत्महत्या करणारा जाॅय लोबो आठवला थ्रि इडियट मधला.