'उरी- द सर्जिकल स्ट्राईक'

Primary tabs

मंदार भालेराव's picture
मंदार भालेराव in जनातलं, मनातलं
12 Jan 2019 - 10:19 am

काल 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' पाहिला, एक चित्रपट म्हणून चांगला आहे. भारतीय सैन्यावरचा आदर यामुळे वाढत असला, तरी 'उरी' मध्ये झालेला हल्ला आपल्या इंटेलिजन्स चं अपयश होतं हे खुबीने लपवलं आहे. सर्जिकल स्ट्राईक बद्दल आज मिडियाच्या कृपेने भरपूर माहिती आहे, त्यामुळे यातल्या फॅक्टस कोणी नाकारू शकणार नाही. अभिनयाच्या बाबतीत नेहमीप्रमाणे 'विकी कौशल' ने भारी कौशल्य दाखवलं आहे. चित्रपटातपण नरेंद्र मोदी 'मित्रो' असं कधीपण म्हणतील की काय असं सारखं वाटतं राहते. उरी मधली आवडलेली गोष्ट म्हणजे यात यामी गौतम आणि विकी कौशल याचं कुठेही अफेयर वगैरे दाखवलं नाही. काही ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली खटकते खरं, पण भन्साळ्याने काशीबाई आणि मस्तानी एकत्र पिंगा घालतांना दाखवली ते बाजीरावांच्या प्रेमापोटी सहन केलं, त्यापुढे हे काहीच नाही असो. राफेल वर वाद सुरू असतांना हा चित्रपट आलाय याचा भाजपा निवडणुकीच्या तोंडावर प्रचंड फायदा होणार आहे हे निश्चित. 'उरी' हा प्रपोगंडा कॅटेगरीत मोडतो कि नाही हा वादाचा विषय होवू शकतो, या बद्दल प्रत्येकाचं मत वेगवेगळं असेल. यातले संवाद पाहता माझ्या मते हा एक उत्कृष्ट प्रचारभान असलेला चित्रपट आहे.

आता थोडासा फ्लॅशबॅक :
१९९७ साली जेव्हा बॉर्डर रिलीज झाला तेव्हा अगदी लहान होतो, त्यामुळे 'सनी देओल' चं दात ओठ खावून बोलणं खूप भारी वाटायचं, युद्ध तोंडावर आल्यावर पळून जाणाऱ्या 'मथुरादास' ला मारायला हात शिवशिवायचे. पाकिस्तानी गोळ्यांनी छातीची चाळण झाली तरी हातात माईन्स घेवून टँक कडे जाणारा 'भैरोसिंग' अजून जिवंत कसा ? हा प्रश्न कधीच पडला नाही. बॉर्डर मध्ये 'कुलदीपसिंग' जी जीप घेऊन फिरतांना दाखवला आहे तिला 'रिकॉईललेस mounted जीप' असं म्हणतात हे आता आता कळालं, नाहीतर या आधी 'तोफ वाली जीप' असंच म्हणायचो. त्यामानाने आजची पिढी बरीच हुशार म्हणावी लागेल, माझ्या सीटच्या बाजूला बसलेलं पोराच्या तोंडून 'स्नायपर' पाहिल्या पहिल्या 'ड्रॅगनाव' असा शब्द निघाला.

बऱ्याच अर्थानी 'उरी' हा बॉर्डर-२ म्हणायला हरकत नाही. फरक फक्त एकच, सिनेमा संपल्यावर बाहेर पडतांना 90's वाल पब्लिक 'भारत माता की जय' अश्या घोषणा देत बाहेर पडत होतं , तर लहान कार्टी आर्मी च्या संबंधित वेगवेगळे प्रश्न विचारून.

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

एकुलता एक डॉन's picture

13 Jan 2019 - 1:41 am | एकुलता एक डॉन

border madhe jackie vimanatun angtha dakahvto ani khali sunny deol la disto

पप्पुपेजर's picture

14 Jan 2019 - 7:40 am | पप्पुपेजर

fantastic movie must watch we are nowhere as compared to these people, everything is so well scripted and directed even after first strike his family was kept under surveillance.
Camerawork is awesome and acceptance of new people in planning and executing which leads to result.

ट्रम्प's picture

15 Jan 2019 - 9:13 pm | ट्रम्प

पक्षीय मतभेद बाजूला ठेवून पहावा असा उत्कृष्ट सिनेमा आहे , कारण काँग्रेस चे नेते सर्जिकल स्ट्राइक झालीच नाही असे म्हणतात !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2019 - 10:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

आजच बघितला. सुट्टी नसताना मल्टिप्लेक्समधील ३५०+ खुर्च्यांचे थिएटर ९५% भरलेले पहिल्यांदाच बघितले.

आवर्जून बघावा असा चित्रपट !

मध्यंतरी एक गोष्ट वाचण्यात आली १९६५ भारत पाकिस्तान युद्ध. भारताला मिळालेले सर्वात मजबूत अन अत्यंत चोख निर्णय घेणारे लाल-बहादूर शास्त्री यांनी ज्याप्रकारे युद्धाच चित्रच बदलून टाकल ते देखील समाजाला कळायला हवे. नाही का ?

डँबिस००७'s picture

21 Jan 2019 - 7:33 pm | डँबिस००७

1965 साली जेंव्हा पाकिस्तानने ह्या युद्धाची तयारी सुरु केली तेंव्हा भारत हा डिफेंसिव्ह असेल असा फाजिल आत्मविश्वास पाक अध्यक्षांना होता.त्याच कारण 1962 मध्ये चीनने भारताचा पराभव केलेला व त्यानंतर नेहरुंचा मृृृत्यु झालेला आणि पंत प्रधान म्हणून लाल बहादुर शास्रींनी सुत्रे हातात घेतलेली.
अमेरिकेकडुन मिळालेल्या पँटन रणगाड्याच्या भरवश्यावर पाकीस्तानने भारतावर पंजाबमधुन हल्ला चढवला , पाकीस्तान बर्यापैकी आत घुसले होते. त्यावेळेला दुसर्याबाजुने भारतीय सैन्याने हल्ला चढवला व थेट लाहोरच्या सीमे बाहेर थांबले ! लाल बहादुर शास्रींनी दिलेल्या ह्या निर्णया मुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली ! १९६२ मध्ये हरल्यावरही भारतीय सैन्याची परीस्थिती बिकटच होती. ईतिहासाने काहीच शिकवले नाही.
१९६२ व १९६५ च्या लढाई बाबत भारतातला कॉंग्रेस धार्जिणा ईतिहास हा काहीही सांगत नाही !

माझ्या माहितीप्रमाणे पाकिस्तानी सैन्याने काश्मीरमधून आक्रमणास सुरवात केली होती.

वन's picture

21 Jan 2019 - 12:35 pm | वन

बघावासा वाटतोय.

पद्मावति's picture

21 Jan 2019 - 3:18 pm | पद्मावति

अतिशय सुंदर चित्रपट. कुठेही फाफट पसारा नाही. अचूक एडिटिंग, उत्तम अभिनय आणि दिग्दर्शन.

मदनबाण's picture

26 Jan 2019 - 12:05 am | मदनबाण

बर्‍याच जणांकडुन एकले की चित्रपट चांगला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Seeing in the dark :- ADGPI-INDIAN ARMY

खिलजि's picture

29 Jan 2019 - 7:36 pm | खिलजि

खरंच सुंदर चित्रपट आहे .. इतका सुंदर आहे कि मी माझ्या कुटुंबासमवेत बघायला गेलो आणि पुन्हा एकदा बघून आलो तेही सहकुटुंब .. आतापर्यंत प्रत्येक चित्रपटाला , माझ्या छोट्या मुलाने गोंधळ घातलेला होता तेही चित्रपट बघत बघत खायला पाहिजे म्हणून , पण या सुंदर चित्रपटाला दोन्ही वेळेस छोटा अगदी मन लावून शांतचित्ताने बघत होता .. जणू या नीटनेटक्या चित्रपटाला दिलेली मानवंदनाच होती ..

हाउस द जोश '' हाय सर '' हाउस द जोश '' हाय सर '' हे अजूनही घरात दुमदुमत असत ..

शशिकांत ओक's picture

29 Jan 2019 - 8:43 pm | शशिकांत ओक

काही वाटले ते...
'युरी' (पाकी उच्चार) चा बदला हा शेरगिल सदस्यांचा पाकिस्तानी आतंकवाद्यांविरुद्धचा कौटुंबिक विषय होता. वडील कारगिल युद्धात, साला उरी त मारला गेला होता. म्हणून हा सिनेमा घडला... पी एम, सकट बाकीचे सगळी आर्मी इन्सिडेंटल होती?

फेरफटका's picture

1 Feb 2019 - 8:13 pm | फेरफटका

उरी पाहिला. चांगला आहे. मी काही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून / वाचून ज....रा माझा अपेक्षेचा स्तर उंचावून गेलो होतो बहुदा, वयाचा परिणाम असावा किंवा चित्रपट माध्यमाची समज कमी असावी पण बॉर्डर, एल ओ सी कारगिल वगैरे युद्धपट पहाताना किंवा अजूनही 'ए वतन, ए वतन, हमको तेरी कसम' वगैरे ऐकताना जे 'वाटतं', ते नाही'वाटलं'. इतकी अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी असताना, मुळातच उरीसारख्या घटना घडायला नको होत्या असंही एकदा वाटून गेलं. पण ओव्हरऑल, चांगला सिनेमा आहे. निदान भाई पाहून जो वैताग आला होता, तसं काही झालं नाही.