फॉरेक्स ट्रेडिंग मधील गुंतवणूक

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
10 Jan 2019 - 6:16 pm
गाभा: 

माझ्या पहाण्यातील एल ग्रुहस्थ नेहमी रीलॅक्स असतात. त्याना त्यांच्या व्यवसायाबाबत विचारले तर ते म्हणाले की मी फॉरेक्स ट्रेडिंग करतो.
त्यांच्या व्यवसायाची माहिती त्यानी अशी दिली
१) फॉरेक्स ट्रेडिंग करणार्‍या ब्रोकर कडे त्यांनी पैसे डिपॉझीट केले आहेत.
२) हे ब्रोकर पौम्ड , युरो, येन, डॉलर यांची खरेदी विक्री करतात.
३) दरातील फरकामुळे फायदा/तोटा होतो
४) तुम्ही सांगाल तसे हे ब्रोकर खरेदी विक्री करतात. ( हे साम्गण्यासाठी एक अ‍ॅप आहे. त्यामुळे त्याना सारखे लक्ष्य द्यावे लागत नाही. शिवाय अकाउंट स्टेटमेंट मिळते)
५) महिनाअखेरीस साधारणतः आठ ते दहा टक्के परतवा मिळतो.

मला शंका आहे की
ही गुंतवणूक कितपत सुरक्षीत असते?
फॉरेक्स ट्रेडिंग भारतात कायदेशीर आहे का?
यावर इनकम टॅक्स कसा दाखवता येईल?
असा आणखी कोणता व्यवसाय आहे का ( कमोडिटीज सोडून )

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

11 Jan 2019 - 12:06 am | टवाळ कार्टा

महिना 8 ते 10 टक्के म्हणजे वार्षिक 96 ते 120 टक्के परतावा...म्हणजे एका वर्षात मुद्दल दुप्पट
टाटा, बिर्ला, अंबानी सगळे वेडे आहेत...नुसता धंदा करत बसलेत ;)

पाषाणभेद's picture

11 Jan 2019 - 8:31 am | पाषाणभेद

>>> माझ्या पहाण्यातील एल ग्रुहस्थ नेहमी रीलॅक्स असतात.

रिलॅक्स असण्याची बरीच कारणे असू शकतात.

त्यांचे वय काय? लग्न झाले नसल्यास, बायको शांत, मुकी असल्यास, रग्गड श्रीमंत असल्यास, पैसा जरी असेल तरी कसा वापरावा याची समज नसल्यास, पोट साफ असल्यास आदी आदी.

सुहासवन's picture

11 Jan 2019 - 9:44 am | सुहासवन

महिना 8 ते 10 टक्के म्हणजे वार्षिक 96 ते 120 टक्के परतावा...म्हणजे एका वर्षात मुद्दल दुप्पट
टाटा, बिर्ला, अंबानी सगळे वेडे आहेत...नुसता धंदा करत बसलेत ;)

अहाे पूर्ण वार्षिक परतावा पण मासिक परताव्याच्या सरासरीतच हवा ना पटीत नव्हे.

टवाळ कार्टा's picture

11 Jan 2019 - 1:10 pm | टवाळ कार्टा

नक्की काय म्हणायचे आहे ते समजलेले नाही...एकदा परत आणखी सोप्या भाषेत लिहिता का?

कदाचित महिन्याचा परतावा आणि वर्षाचा परतावा यात गोंधळ झालेला आहे.

साधारणपणे व्याजाचा/परताव्याचा दर सांगताना नेहमी द.सा.द.शे ( दर साल दर शेकडा) मद्दे सांगतात.(उदा. ८ % पर अॅनम असा)

आता समजा एखादी बॅंक ८% व्याज ठेवीवर देते आणि आपण १०० रुपये गुंतवले
पहिल्या वर्षी मिळणार ८ रुपये
दुस-या वर्षी पहिल्या वर्षाचे ८ दुस-याचे ८ असे (८+८ ) मिळून होतात १६ रुपये

तिस-या वर्षी मिळतील ८+८+८ =२४
म्हणजेच ८ गुणिले ३ = २४

असे व्याज हे पटीतच वाढत जाते.

आता तिथे वर्ष हा शब्द काढून महिना टाका

महिन्याचा परतावा ८% , गुंतवलेली रक्कम १०० रुपये तर खालीलप्रमाणे परतावे मिळतील.

१ महिना ८ रुपये
२ माहिनाला (८+८)=८ गूणिले २ = १६

आणि १२व्या महिन्याला १२ गुणिले८= ९६
१२ महिन्यातच ९६ रुपये व्याज मिळेल.

एकूण मिळणारी रक्कम ही १००+९६ = १९६ एवढी असेल.
१९६/ १०० = १.१६ पट रक्कम तुम्हाला १२ महिन्यात मिळेल.

१० % व्याज दर असेल तर १०गूणिले १२ = १२० रुपये परतावा आणि मिळणारी रक्कम १००+ १२० = २२०

२२०/१०० = २.२ म्हणजे १२ महिन्यात रक्कम होईल २.२ पट.

हे सुत्र तुम्हास आठवते का पहा
सरळव्याज = (मुद्दल गुणिले मुदत गुणीले व्याज दर)/१००

यातही आपण मुदत गुणिले व्याज दर असेच पकडले आहे. म्हणून व्याज हे अशाप्रकारे पटीत वाढत जाते.
------

बाकी टवाळ कार्टा यांनी सरळव्याज पकडून रक्कम काढली आहे. चक्रवाढ पद्धतीने काढल्यास २.५ ते ३.१३ पट होते.

वर्षातच तिप्पट ! आहे की नाहि मजा?

म्हणजे तेच उदाहरण घेऊ १०० रुपये गुंतवणूक आणि ८% महिना परतावा

पहिला महिना १००+ ८ = १०८ मिळाले

समजा ८ रुपये सहित १०० रुपये म्हणजेच १०८ रुपये दुस-या महिन्यात गुंतवले आणि मला तेवढाच परतावा मला दर महिन्याला मिळत जात आहे असे मानू.

दुस-या महिन्यात १०८ चे ८% =८.६४ रुपये मिळतील

आता झाले ११६.६४ (१०८+८.६४)

१२ महिन्यात होतात २५१.८१७ रुपये

२५१/१०० = २.५१. म्हणजेच एका वर्षात २.५ पट !!!

टिप चक्रवाढचे सुत्र = मुदद्ल़ गुणिले (१+व्याज दर)चा मुदतीएवढा घातांक
–-------

थोडक्यात बॅंकेत तुम्हाला रक्कम दुप्पट होणास १२.५ वर्ष लागतील आणि इथे चक्क फक्त १२ महिने लागतील कारण बॅंकेचा दर ८ दसादशे आहे आणि इथे ८ % महिन्यालाच आहे.

कदाचित महिन्याचा परतावा आणि वर्षाचा परतावा यात गोंधळ झालेला आहे.

साधारणपणे व्याजाचा/परताव्याचा दर सांगताना नेहमी द.सा.द.शे ( दर साल दर शेकडा) मद्दे सांगतात.(उदा. ८ % पर अॅनम असा)

आता समजा एखादी बॅंक ८% व्याज ठेवीवर देते आणि आपण १०० रुपये गुंतवले
पहिल्या वर्षी मिळणार ८ रुपये
दुस-या वर्षी पहिल्या वर्षाचे ८ दुस-याचे ८ असे (८+८ ) मिळून होतात १६ रुपये

तिस-या वर्षी मिळतील ८+८+८ =२४
म्हणजेच ८ गुणिले ३ = २४

असे व्याज हे पटीतच वाढत जाते.

आता तिथे वर्ष हा शब्द काढून महिना टाका

महिन्याचा परतावा ८% , गुंतवलेली रक्कम १०० रुपये तर खालीलप्रमाणे परतावे मिळतील.

१ महिना ८ रुपये
२ माहिनाला (८+८)=८ गूणिले २ = १६

आणि १२व्या महिन्याला १२ गुणिले८= ९६
१२ महिन्यातच ९६ रुपये व्याज मिळेल.

एकूण मिळणारी रक्कम ही १००+९६ = १९६ एवढी असेल.
१९६/ १०० = १.१६ पट रक्कम तुम्हाला १२ महिन्यात मिळेल.

१० % व्याज दर असेल तर १०गूणिले १२ = १२० रुपये परतावा आणि मिळणारी रक्कम १००+ १२० = २२०

२२०/१०० = २.२ म्हणजे १२ महिन्यात रक्कम होईल २.२ पट.

हे सुत्र तुम्हास आठवते का पहा
सरळव्याज = (मुद्दल गुणिले मुदत गुणीले व्याज दर)/१००

यातही आपण मुदत गुणिले व्याज दर असेच पकडले आहे. म्हणून व्याज हे अशाप्रकारे पटीत वाढत जाते.
------

बाकी टवाळ कार्टा यांनी सरळव्याज पकडून रक्कम काढली आहे. चक्रवाढ पद्धतीने काढल्यास २.५ ते ३.१३ पट होते.

वर्षातच तिप्पट ! आहे की नाहि मजा?

म्हणजे तेच उदाहरण घेऊ १०० रुपये गुंतवणूक आणि ८% महिना परतावा

पहिला महिना १००+ ८ = १०८ मिळाले

समजा ८ रुपये सहित १०० रुपये म्हणजेच १०८ रुपये दुस-या महिन्यात गुंतवले आणि मला तेवढाच परतावा मला दर महिन्याला मिळत जात आहे असे मानू.

दुस-या महिन्यात १०८ चे ८% =८.६४ रुपये मिळतील

आता झाले ११६.६४ (१०८+८.६४)

१२ महिन्यात होतात २५१.८१७ रुपये

२५१/१०० = २.५१. म्हणजेच एका वर्षात २.५ पट !!!

टिप चक्रवाढचे सुत्र = मुदद्ल़ गुणिले (१+व्याज दर)चा मुदतीएवढा घातांक
–-------

थोडक्यात बॅंकेत तुम्हाला रक्कम दुप्पट होणास १२.५ वर्ष लागतील (सरळव्याजने) आणि इथे चक्क फक्त १२ महिने लागतील कारण बॅंकेचा दर ८ % वर्षाला
आहे आणि इथे ८ % महिन्यालाच आहे.

दादा कोंडके's picture

12 Jan 2019 - 1:46 am | दादा कोंडके

महिना आठ ते दहा म्हणजे जरा जास्त्च झाले. पण अशा स्किम्स असतात.

माझ्या माहिती प्रमाणे फोरेक्स ट्रेडींग बेकायदेशीर आहे. तरी पण अशी अनेक गुंतवणुकीची साधनं आहेत. माझे एक-दोन परिचीत (काही विशिष्ठ कम्युनिटीज मध्ये) अशात गुंतवणुक करतात. बाहेरच्यांना गुंतवणुक करता येत नाही. फसवणुक झाली तर बाहेर (दिवाणी न्यायालय वगैरे) दाद मागता येत नाही. पण ताळेबंद वगैरे मिळतो. बहुदा टॅक्स भरत नसावेत, मला भरतात म्हणून सांगितलं. एका मित्राला मागच्या दहा वर्षापासून वार्षिक साधारण १९% व्याज मिळत आहे. एक सोनार जातितला मित्र वॉट्सअ‍ॅप वरून सोनं खरेदी-विक्री करतो आणि फायदा मिळवतो. त्याच्या नातेवाइकाकडं सुरवातीला दहा लाख दिले होते. वर्षातून एकदा त्याच्याकडे गेल्यावर त्यातला काही फायदा घेतो. सर्व व्यवहार रोखीत होतो. हे सगळं बेकायदेशीर असतं पण क्लोज्ड ग्रुप असल्यामुळे बाहेरच्यांना प्रवेश नसतो. हे करणार्‍या वक्तीची प्रतिमा म्हणजेच असॅट लायाबिलिटी असते. गुंतवणुक करणारे असले व्यवहार सहसा बाहेरच्या लोकांना सागत नाहीत. एखाद्या एलिट क्लब सारखं असतं. गुंतवणुक करण्यासाठी एक कोटी वगैरे अ‍ॅसेट (राहतं घर सोडून) असावे लागतात. अनेकांना संधी मिळण्यासाठी जास्तीतजास्त गुंतवणूक ठराविक रकमेपेक्षा जास्त करता येत नाही.

अशी एखादी स्किम असेल तर 'बाहेरच्यांनी' गुंतवणुक न केलेलीच बरी.

राहुल मराठे's picture

12 Jan 2019 - 10:34 pm | राहुल मराठे

Forex trading is not completely illegal in India, but it is restricted to certain currencies, which are paired against the INR as well as some of the 'cross currencies'. In India, you can trade within the brackets of USD-INR, YEN- INR, GBP- INR and EUR-INR pairs. In cross currencies, you can trade within EUR-USD, GBP-USD, and the USD- JPY pairs.

You can trade in currency through NSE.

युयुत्सु's picture

13 Jan 2019 - 3:07 pm | युयुत्सु

व्यवस्थित अभ्यास आणि स्थिर मन असले तर महिन्याला ८%-१०% शेअर्स मध्ये फार कठीण नाही , असा माझा अनुभव आहे. पण माझ्याकडे सल्ला मागायला येऊ नये.

दादा कोंडके's picture

14 Jan 2019 - 1:58 am | दादा कोंडके

स्वतःला शेअर्स बद्दल (किंवा कुठल्याही गंतवणुकीबद्दल) एव्हडा आत्मविश्वास असलेला माणूस इतर कुणाला शिकवायला जाणार नाही.

सुबोध खरे's picture

16 Jan 2019 - 10:14 am | सुबोध खरे

महिन्याला ८%-१०% शेअर्स मध्ये फार कठीण नाही , असा माझा अनुभव आहे.

या दराने दहा वर्षात आपण अगदी वॉरन बफेट नाहीतरी गेला बाजार राकेश झुनझुनवाला पेक्षा श्रीमंत व्हायला पाहिजे.

कारण दरमहा १० % चक्रवाढ व्याजाने १ लाख रुपयाचे-- ९ अब्ज २७ कोटी २६ लाख ६७० रुपये होतात.

https://www.thecalculatorsite.com/finance/calculators/compoundinterestca...

उगाच काहींच्या काही.

विजुभाऊ's picture

14 Jan 2019 - 10:43 am | विजुभाऊ

हा परतावा महिना साअधारणतः ८ टक्के आहे.
या गुंतवणूकीला कायदेशीर आधार नाही.
ते ग्रुहस्थ रोज कोणत्या उलाढाली केल्या याचे अकाउम्ट डीटेल्स देतात . सॉफ्टवेअर तुम्हाला मेल करते.'तसेच यात दिवसभरात किती एकूण रकमेचे व्यवहार करायचे याचे लिमीट सेट केले जाते.
साधारणतः ५०० यू एस डी किंवा त्या पटीत करता येते.
जोखीम नक्कीच आहे. तसेच इनकम टॅक्स मधे हे इन्कम अतीरीक्त होते लपवता येत नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Jan 2019 - 10:26 am | प्रकाश घाटपांडे

रिलॅक्स असतात म्हणज त्यांना या व्यवसायात आनंद मिळतो असा घ्यायचा का? यात रिस्क असते हे उघड आहे. पण ती रिस्क मॅनेज करुन ती रिलॅक्स राहतात असे असेल तर असु शकते. त्यांच्या पिंडाचा तो भाग असेल.

युयुत्सु's picture

16 Jan 2019 - 10:58 am | युयुत्सु

उगाच काहींच्या काही.

मला इथे फक्त "समग्र ग्रंथ वाचल्या वाचून... " या समर्थवचनाची प्रकर्षाने आठवण होत आहे.

युयुत्सु's picture

16 Jan 2019 - 11:03 am | युयुत्सु

मी जास्त काही लिहू इच्छित नाही कारण इथे दिशाभूल करणारे "विद्वान" खूप आहेत. कालच मी युनायटेड ब्रुअरिज मध्ये १०% नफा १ महिन्यात मिळवला.

सुबोध खरे's picture

16 Jan 2019 - 11:36 am | सुबोध खरे

वर लोकांनी दर महिना आणि दर वर्षी मिळणार परतावा यात गल्लत झाली आहे असे लिहिल्यावरही आपण जर दर महिना लिहीत आहात तर मी फक्त आपल्याला गणिती हिशेब दाखवला आहे. मी काही विद्वान, अभियंता किंवा गणितज्ञ नाही तर एक साधा डॉक्टर आहे आणि १९८२ साली १२ झाल्यावर माझा गणिताच्या शिक्षणाशी संबंध नाही. तेंव्हा गणिताबद्दल दिशाभूल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
परंतु आपण दिलेल्या १०% महिना दराने चक्रवाढ व्याजाने रक्कम किती होते ते साध्या सूत्रात टाकून पाहिली जे सूत्र जालावर उपलब्ध आहे. एवढी प्रचंड रक्कम मिळवली तर आपण राकेश झुनझुनवाला यांच्यापेक्षा श्रीमंत होणार हे साधं सरळ आहे.
ते तसं नसेल तर का नाही हे सांगून आम्हा पामरांना उपकृत करावे हि विनंती.

युयुत्सु's picture

16 Jan 2019 - 11:46 am | युयुत्सु

ते तसं नसेल तर का नाही हे सांगून आम्हा पामरांना उपकृत करावे हि विनंती.

आपण योग्य तो नम्रपणा दाखवाणार असाल तर पुण्यात आलात की मला समक्ष भेटा

सुबोध खरे's picture

16 Jan 2019 - 11:52 am | सुबोध खरे

आपण आपले सूत्र इथेच लिहिले तर मलाच नव्हे तर बाकी सर्व मिपाकरांना पण फायदा होईल तेंव्हा इथेच लिहा हि विनंती.

माझं पुण्याला येणं केंव्हा होणार देवास ठाऊक.

युयुत्सु's picture

16 Jan 2019 - 11:58 am | युयुत्सु

आपले सूत्र

= व्यवस्थित अभ्यास आणि स्थिर मन

सुबोध खरे's picture

16 Jan 2019 - 12:07 pm | सुबोध खरे

कृपया जरा सविस्तर सांगता काय?

कृपया जरा सविस्तर सांगता काय?

आर्थिक सल्ले देण्यासाठी आवश्यक असलेला सेबीचा परवाना माझ्यकडे नसल्यामुळे माझ्याकडे सल्ला मागू नये, ही विनंति.

ज्यांना खरोखर शिकायची आच आहे त्यांच्यासाठी तूनळीवर भरपूर साहित्य उपलब्ध आहे. ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांनी वरूण मल्होत्राच्या सेमिनारचे व्हिडीओ अवश्य पहावेत. मग आत्मविश्वास वाढला तर थोडे पैसे खर्च करून आणखी आवश्यक ते शिक्षण घ्यायची तयारी ठेवावी.

मी आणखी पुढे जाउन सांगेन की महिन्यालाच काय आठवड्याला ८-१०%पण मिळु शकतात. पण अशा संधी तूलनेने कमी मिळतात. आणखी एक महत्त्वाचे - तुम्ही तेव्हढेचे पैसे गुंतवा जे बुडाले तर तुम्हाला जराही मानसिक त्रास होणार नाही. समजा ही रक्कम १०००० असेल तर वर्ष अखेरीस १८ ते २० हजार मिळणे शक्य आहे.

शेवटचे - टॅक्स अजिबात बुडवु नका. स्वत: श्रीमंत व्हा अणि देशाला पण करा!

वरूण मल्होत्राच्या सेमिनारचे व्हिडीओ हे शेअर मार्केटसंबंधीत आहेत.
आणि धागा हा फॉरेक्स ट्रेडींगचा आहे.

युयुत्सु's picture

17 Jan 2019 - 8:54 am | युयुत्सु

हा धागा फॉरेक्स ट्रेडींगशी संबंधित आहे, हे मला व्यवस्थित कळते. पण महिना ८-१०% परतावा देणारा पर्याय असू शकतो, हे या ठिकाणी सांगणे आवश्यक आहे, असे मला तरी वाटते.

मार्कस ऑरेलियस's picture

16 Jan 2019 - 2:00 pm | मार्कस ऑरेलियस

५) महिनाअखेरीस साधारणतः आठ ते दहा टक्के परतवा मिळतो.

हे अचाट विधान आहे ! फायनान्स मध्ये काम करनारा म्हणुन मी सांगु शकतो कि ८-१०% परतावा मिळत असेल तर मी आज जॉब सोडुन हे करायला लागेन.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यात तुम्ही मीन सांगितले आहे , सँडर्ड डेव्हिअशन नाही ! मी पैजेवर सांगु शकतो कि सँडर्ड डेव्हीअशन अफाट असणार ! जसे येत असणार तसे जातही असणार !

https://en.wikipedia.org/wiki/Efficient-market_hypothesis मार्केट ला कन्सिस्टंटली बीट करणे शक्य नाही ! अनलेस की तुमचे फंडामेन्टल अ‍ॅनालिसिस खतरनाक आहे !
हां आता जर तुम्ही अंतर्राष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती प्रेडिक्ट करु शकत असाल किंव्वा ट्रंप तात्यांच्या मनात चायना ट्रेड वॉर विषयी काय आहे हे प्रेडिक्ट करु शकत असाल , किंव्वा भारताचा चायनाचा अमेरिकेचा जीडीपी, इम्पोर्ट एक्स्पोर्ट प्रेडिक्ट करु शकत असाल आणि फॉरेक्स चे रेट्स आणि ह्या मॅक्रोईकॉनॉमिक फॅक्टर्स मधील कार्यकारण भाव प्रेडिक्ट करु शकत असाल तर मात्र शक्य आहे ! हे एकट्याने करायचे काम नव्हे, ह्या साठी मोठ्ठी टीम पाहिजे , खुप खुप प्रचंड मॉडेल्स बिल्ड केली पाहिजेत . मी काम करत होतो त्या बॅन्केचीच २५०० च्या वर मॉडेल्स होती !!

मी स्वतः चायना इम्पोर्ट इक्स्पोर्ट प्रेडिक्ट करायचा प्रयत्न केलेला, एरर करेक्शन मॉडेल्स, वेक्टर ऑटो रिग्रेशन वगैरे , पण आर स्क्वेयर कधीही ३०% च्या वर गेला नाही :(

असो . तर तात्पर्य काय तर ट्रेडिंग करुन श्रीमंत होते वाटते तेवढे सोप्पे नाही . सामान्य माणसाने ट्रेडिंग च्या भानगडीत पडुच नये, करायचे असेल तर इन्वेस्टमेन्ट करावे तेही लाँगटर्म १०- २० वर्षाचे होरायझॉन डोळ्यासमोर ठेवुन !!

मार्कस ऑरेलियस's picture

16 Jan 2019 - 2:10 pm | मार्कस ऑरेलियस

बेन्छमार्क म्हणुन एक सांगायचेच राहिले की -

महिन्याला ८% रिटर्न ह्या हिशोबाने वर्षाला तब्बल २५०% रिटर्न होतो . 1.08^12= 2.51.

जगातल्या सर्वात यशस्वी अशा रिनेस्सान्स टेकॉनॉजीच च्या हेजफंडाचा १९९४-२०१४ च्या अ‍ॅन्युअल रिटर्न ७१% आहे ! आणि हे रिनेसान्स आउटलायर आहे , एक्सेप्शनल केस आहे ! सर्वसामान्य हेजफंडांचा रिटर्न १०-१५% टक्क्यांच्यावर जात नसणार ! २०% म्हणजे डोक्यावरुन पाणी !!

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2019 - 5:07 pm | टवाळ कार्टा

तुम्ही शेअर मार्केट गुंतवणूक संबंधित ट्रेनिंग देता का?

तुम्ही शेअर मार्केट गुंतवणूक संबंधित ट्रेनिंग देता का?

नाही!

मार्कस ऑरेलियस's picture

16 Jan 2019 - 5:28 pm | मार्कस ऑरेलियस

बेस्ट !

नक्की वाचण्यात येईल !
आपल्याला शक्य असल्यास ह्या पुस्तकाची थोडक्यात समरी/ सारांश सांगणारा एखादा लेख लिहाल का ? ( ही नम्र विनंती.)

थॉर माणूस's picture

16 Jan 2019 - 11:45 pm | थॉर माणूस

फॉरेक्स ट्रेडींगमधे दरमहा ८-१०% परतावा ते ही दरमहा (वर म्हटल्याप्रमाणे हे सरासरीच आहे) अशक्य आहे? नाही
फॉरेक्स ट्रेडींगमधे नफा कमावणे सहज शक्य आहे? आजीबात नाही.

फॉरेक्समधे ट्रेडींग करणार्यांपैकी जवळपास ९०% लोक पैसे गमावतात. ट्रेडींगच्या पहिल्या २-३ वर्षात तर हमखास. पुरेसा अनुभव आणि अभ्यास गाठीशी असलेले ट्रेडर्स वार्षिक १०-१५% किंवा अधीक सुद्धा कमावतात. अगदी दुर्मीळ असले तरी काही ट्रेडर्स दरमहा ८-१०% पर्यंत कमावतात, अर्थात ते बर्‍याचदा गमावतातही. पण काही मोजकी उदाहरणे घेऊन दरमहा ८-१०% परतावा मिळतोच असे गृहीत धरणे म्हणजे वॉरेन बफेट चे उदाहरण घेऊन शेअर्समधे गुंतवणारे अब्जाधीश बनतातच असा दावा करण्यासारखे आहे.

असेही यातली गुंतवणूक ही ग्रे एरीयामधे येत असल्याने ते महाशय पैसे बुडाले तरी तुम्हाला सांगणार नाहीत किंवा तक्रारही करणार नाहीत.

मुळात हा धागा आणि मग त्या खालील प्रतिसाद वाचून भंजाळलो राव.

०.१ % व्याज खाणारा चामुंडराय

युयुत्सु's picture

17 Jan 2019 - 8:53 am | युयुत्सु

हा धागा फॉरेक्स ट्रेडींगशी संबंधित आहे, हे मला व्यवस्थित कळते. पण महिना ८-१०% परतावा देणारा पर्याय असू शकतो, हे या ठिकाणी सांगणे आवश्यक आहे, असे मला तरी वाटते.

विजुभाऊ's picture

17 Jan 2019 - 10:39 am | विजुभाऊ

त्यानी व्यवहार दाखवले. साधारणतः ५०० ते १००० यू एस डी इतकेच व्यवहार रोजचे करायचे ही मर्यादा राखत महिन्या अखेर ८ ते दहा टक्के परतावा मिळतोय. किमान गेलेल वर्षभर तरी.
काही वेळा तोटा ही झाला आहे. पण एकुण सरासरी परतावा तोच आहे.
मोठी रीस्क घ्यायची नाही हे त्या मित्राचे तत्व

सर्वसाक्षी's picture

17 Jan 2019 - 2:32 pm | सर्वसाक्षी

साधारण पाच वर्षांपूर्वी मला आर्थिक सल्लागाराने एका फॉरेक्स डिलरचा मार्ग सुचवला होता. अगदी ह्याच टर्म वर. महिना दहा टक्के परतावा, अगदी लेखी इन्वेस्ट्मेंट अ‍ॅग्रिमेंट. पण हेही सांगितले होते की, लहान रक्कम गुंतवा. दहा महिने तरलं तरी मुद्दल परत. अशी कंपनी किती चालेल सांगता येत नाही.

त्याक्षणी हिंमत झाली नाही, सहा महिन्यांनी एक लाखाचा प्रयोग करायचा असे ठरवून त्या डिलरचा पत्ता विचारायला सल्लागाराकडे गेलो तर ती कंपनी नुकतीच बुडाली असे समजले

सुबोध खरे's picture

19 Jan 2019 - 8:17 pm | सुबोध खरे

10% दरमहा नफा असे वर्षानुवर्षे कमावणे अशक्य आहे. मग यावर तुम्ही कितीही वितंडवाद घाला नाही तर अभ्यास करा.
मी साधे गणित दिलेले आहे ते खोटे कसे ते दाखवून द्या.

युयुत्सु's picture

19 Jan 2019 - 9:28 pm | युयुत्सु

मला हसावं की रडावं ते कळत नाही. अर्थव्यवस्थेला जोपर्यंत गती आहे, तोपर्यंतच हे शक्य आहे. ही गती कमी झाली की परतावा कमी होतो. तेव्हा १०% या आकड्याला चिकटून बसणे कधीही शहाणपणाचे ठरणार नाही. अनेकांनी सध्या दीर्घकालीन संकेत उत्साहवर्धक दिलेले आहेत. जोपर्यंत तवा तापला आहे तोपर्यंत आपल्या पोळ्या भाजायच्या आहेत.

उद्या अणुयुद्ध झाले तर हा दर शून्यावर येईल (एरवी युद्धे अर्थव्यवस्थेला चालना देतात, असे वाचल्याचे स्मरते).

सुबोध खरे's picture

21 Jan 2019 - 8:52 am | सुबोध खरे

"१०% या आकड्याला चिकटून बसणे" हे आपण केले आहे.

गोल गोल बोलू नका

स्पष्ट मी सांगितलेल्या गणितात

चूक

काय आहे ते दाखवा.

हे असं "upto ५०% off" वाला सेल सारखं नको.

तीन महिने १० % मिळाले आणि चौथ्या महिन्यात ४० % गेले असे असंख्य माणसांच्या बाबतीत घडते.

वर्षानुवर्षे महिना १० % परतावा अशक्य आहे
असे मी स्पष्ट शब्दात सांगितले आहे त्याचा गुळमुळीत नव्हे तर स्पष्ट प्रतिवाद करून दाखवा.

युयुत्सु's picture

21 Jan 2019 - 7:18 am | युयुत्सु

मी "कोरा"वर या प्रश्नाचा शोध घेतला तेव्हा बर्‍याच तज्ञांचे उत्तर "अशक्य नाही, पण अवघड आहे" असे आहे.

सुबोध खरे's picture

21 Jan 2019 - 8:54 am | सुबोध खरे

परत गोल गोल भाषा

अशक्य म्हणजे शून्य टक्के. ते तसे नाही हे शेम्बडे पोर पण सांगेल

बाकी ०. ०००१ टक्का जरी शक्य असले तरी ते अवघड मध्ये येते अशक्य मध्ये नाही. हेही कुणीही सांगेल.