गुगल ईज व्हेरीफाईंग द फोन ?

Primary tabs

शब्दानुज's picture
शब्दानुज in काथ्याकूट
9 Jan 2019 - 9:16 am
गाभा: 

काल माझ्या फोनमद्दे एक मेसेज येत होता जो असा होता
(T2Sh9NwRth7I) Google is verifying the phone# of this device as part of setup. Learn more: https://goo.gl/LHCS9W

यात दिलेली बेबसाईट ही ऑफिशियल वाटत आहे. आणि ज्या नंबरवरून हा मेसेज आला आहे तो आहे
५६१६११७९

इथपर्यंत ठीक.

पण नंतर यासारखा मेसेस काही दहा आकडी मोबाईल नंबरला आपोआप पाठवला जात आहे.
मोबाईलमधुन हे मेसेस परस्पर पाठवले जात आहेत.

आता त्या सिममद्दे पैसेच नसल्याने तो मेसेज पाठवला न जाता फेल म्हणून येत आहे.

मात्र त्याच फोनमधील दुस-या सिमद्बारे एक मेसेज पाठवला गेला आहे.

एखाद्या नंबरला ब्लॉक केले की दुस-या नंबरला मेसेज पाठवला जात आहे. ट्र्कॉलरवर हे नंबर स्पॅम म्हणून दाखवत आहेत.

यानंतर सगळा फोन फॉरमॅट केला आणि ऍप्स उडवले तरी पुन्हा तोच प्रकार चालू आहे.

त्यांच्या मेसेजमधल्या दुव्यावर जाऊन हow other may contact u मद्दे Dont use my mobile number असे सेंटीग ठेवले आणि गुगल सव्हिसेसला मेसेजला अॅक्सेस होता तो बंद केला. नंतर मेसेज आलेले नाहीत.

यात माझ्या मेलवर कुठलेही नवीन डिव्हाईस ऍड झालेले दाखवत नाही.

मग तो मेसेज १० आकडी मोबाईल नंबरवर परस्पर पाठवण्याचा प्रकार नेमका काय आहे ?
कुठली नविन सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे ?

ज्या नंबवर मेसेस पाठवले गेले ते नंबर
+917527059808
+918828898053
+917527059807

प्रतिक्रिया

कंजूस's picture

9 Jan 2019 - 10:24 am | कंजूस

ट्रुकालर काढणे.
कान्टॅक्ट सिंकही ओफ करणे

सोन्या बागलाणकर's picture

10 Jan 2019 - 3:09 am | सोन्या बागलाणकर

ट्रू कॉलर का काढायला सांगताय कळले नाही?

ट्रम्प's picture

9 Jan 2019 - 5:42 pm | ट्रम्प

भक्त प्रल्हाद च्या संकेतजालावर न फिरकने , कारण आकषर्ण दाखवून जाल्यात ओढतात . आपण टच केले की व्हायरस मोबाइल घुसतो आणि सेल्फ कमांड स्टार्ट करतो . काही नं ला आपोआप कॉल व मेसेज जायला सुरवात होते .

शब्दानुज's picture

9 Jan 2019 - 6:46 pm | शब्दानुज

नाही हो ट्रम्मसाहेब. कुठल्याहि वेबसाईटवर मोबाईल नंबर दिलेला नाही

आणि मला मेसेज येत ही होते आणि जात ही होते. मेसेज ५६१६७९ या नंबवरुन एकदाच आला आणि जाताना मात्र तीन वेगवेगळ्या १० आकडि मोबाईल नंबवर गेला. का कोण जाणे पण हे मेसेज सेंड होताना फेल म्हणून दाखवत आहे. दुस-य एका सिमवरुन मात्र एकदा मेसेज सेंड झालेला आहे.

आलेल्या मेसेजद्दे जी लिंक आहे (ही वरच्या लेखात दिलेली आहे) ती https पासुन चालू होत आहे म्हणून उघडून बघतली. ती सरळ गुगल सपोर्ट ला नेत आहे.
ती अॉफिशियल वेबवच वाटत आहे. (नक्की ठाऊक नाही) गुगलचा अॉफिशियल लोगो आहे.

तिथे खालील मजकूर आहे
when you set up a Google Account, you can let Google know your phone's number. If you do, we'll verify that the number is yours.

For your security, we'll re-verify from time to time to make sure that your phone's number is still yours. When we re-verify, you might get text messages from Google or see outgoing texts to Google. The message could say something like, "Google is verifying the phone number of this device."

You can change how and whether your phone's number gets verified.
ही ती वेब

यातला मुद्दा हा कि गुगल मेसेज सेंडही करू शकतो आपल्या मोबाईलमधून. पण शंका ही आहे की तो मेसेज १० आकडी मोबाईला गुगलने का पाठवला?

यानंतर त्यांनी बेववर काही सेंटींग्स सांगितली आहेत ज्यात
how other may contact you मधुन Dont use my number असे सिलेक्ट केले आणि मेसेज बंद झाले.

प्रकरण काय हे जाणून घेण्यासाठी सरळ प्ले स्टोअरमधून गुगलला फोन लावला. तो पठ्या म्हणला की गुगल असे मेसेज कधि पाठवू शकते पण तुमच्या फोनमधून मेसेज पाठवला जाऊ शकत नाही.

मग त्याला मेसेजची लींक देऊन वाचा म्हणालो. ते वाचून त्याचे मत बदलले आणि म्हणाला की हो ,सेंड होऊ शकते पण प्रायवेट नंबवर का जात आहेत ते गुगल करत नाही असे अर्धवट उत्तर दिले.
आणि जे सेंटिंग्स मी करुन ठेवले होते तेच पुन्हा तिथून वाचून सांगितले.

मोबाईल रिसेट मारून सुरवातीलाच बघितला होता. अॅप उडवले होते. व्हायरस तिथे जायला पाहिजे होता ना मग. तरीहि मेसेज सेंड होण्याचा प्रयत्न करतच होते. ते त्या सेंटिंगनंतरच बंद झाले.

हा प्रश्न गुगल केला असता असा प्रकार काहि मोबाईलसोबत झाला असल्याचे दिसले पण त्याचे उत्तर काही दिसले नाहि.

Nitin Palkar's picture

9 Jan 2019 - 7:45 pm | Nitin Palkar

हायला ही कायतरी नवीनच भांजगड दिसतेय...... आमा अडाणी लोकांनी इस्मार्ट फोन वापरनं बंद करावं की काय....

फोन चोरीला गेल्यावर दोन तीन नंबरना ओटो कॅाल होण्याचे फीचर काही फोन्समध्ये असते ते सुरू झालं का पाहा. तुमचा फोन नवा आहे का रिफर्बिश प्रकारचा आहे तपासा.

शब्दानुज's picture

9 Jan 2019 - 9:00 pm | शब्दानुज

नाहि

ती शक्यता मला लागू होत नाही कारण माझा फोन जुनाच आहे. आपण जे म्हणत आहात त्यासाठी आपल्याला काहि नंबर आधिच द्यावे लागतात आणि त्याच नंबरला मेसेज जातो. माझ्या बाबतीत ते नंबर अनोळखी आहेत (हेच नंबर आधी ट्रकॉलर स्पॅम म्हणून दाखवत होते )

मला आलेल्या मेसेजमद्धे गुगलचा स्पष्ट उल्लेख आहे.
मुळात गुगलच्या सिस्टिमचा हा दोष आहे की कोणी गुगलचे नाव वापरत आहे हेही संदिग्ध आहे.

गामा पैलवान's picture

9 Jan 2019 - 10:23 pm | गामा पैलवान

शब्दानुज,

येणारा संदेश कुठलासा व्हायरस / बग जागवून इतरत्र संदेश ढकलायला बघतो आहे. असा आपला माझा अंदाज. बहुतेक ओ एस अपडेट करावी लागेल.

आ.न.,
-गा.पै.

सोन्या बागलाणकर's picture

10 Jan 2019 - 3:14 am | सोन्या बागलाणकर

माझ्या मते हे स्पॅम कॉल्स /sms चा प्रकार दिसतोय.
truecaller मध्ये नंबर्स ब्लॉक करा

आंतरजालावर शोधल्यावर तुम्ही दिलेले नंबर्स स्पॅम म्हणून लोकांनी रिपोर्ट केले आहेत आणि ते google verification scam या सदरात दाखवत आहेत.
तुमच्या फोन मध्ये external मेमरी कार्ड आहे का? ते format केले होते का? जर ते format केलं नसेल तर वायरस तिथून परत format केलेल्या फोन मध्ये येण्याची शक्यता आहे.

कंजूस's picture

10 Jan 2019 - 5:44 am | कंजूस

हा त्रास सुरू झाल्या अगोदरच्या आठ दिवसांत नवीन कोणती अॅप्स घेतली, साइट उघडल्या याचा शोध घेतल्यास संशयास्पद गोष्ट सापडेल. हे बहुतेक नव्वद टक्के उपयोगी पडते. अगदी दुसऱ्या कुणाकडून ब्लुटुथने फाइल्स घेणे, संगणकाला जोडणे हेसुद्धा विचारात घ्या. त्यात काही नवीन प्रथमच केले असेल तर पाहा.
कुठेतरी कोणत्या वायरसला ( परमिशन मिळाली की तो वायरस गणला जात नाही.) शिरकाव मिळाला आहे. ती परमिशन शोधून काढून टाकावी लागेल. फॅारमॅट किंवा अॅन्टिवाइरस यांचा उपयोग होणार नाही.
ट्रुकालर हे नवीनच घेतले असेल तर संशय येतो अन्यथा तेही तुमच्या कान्टॅक्ट लिस्टशी खेळतेच.

लई भारी's picture

10 Jan 2019 - 10:31 am | लई भारी

मेसेज मध्ये काय आहे त्यावरून थोडा अंदाज येऊ शकतो.
मी जुने मेसेजेस बघितले आता. गूगल verfification साठी फक्त कोड आलेला आहे, आउटगोइंग मेसेज दिसत नाही, गूगल संदर्भात.
आता आपण म्हणताय तसे मेसेज मला PayZapp, GooglePay या wallet साठी दिसत आहेत आणि त्यांच्या पहिल्या ओळीत त्या app च नाव दिसतंय. हे UPI साठी
तुमचा नंबर ब्यांकेसोबत चेक करण्यासाठी पाठवतात.

आपल्या माहितीप्रमाणे हा वेगळा प्रकार आहे पण एकदा मेसेज बघा(आणि त्याचा सारांश इकडे पण डकवा)

गूगल साठी नाही पण एक साधारण नियम पाळता येतो तो म्हणजे app install होताना SMS access ची permission नाकारणे.
पण आजकाल बरेच app एवढे डांबरट झालेत कि सगळ्या permission दिल्या शिवाय चालूच होत नाहीत च्यामारी!