गलिच्छ नायतर काय?

Primary tabs

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
7 Jan 2019 - 10:23 am
गाभा: 

रडण्याच्या प्रसंगात डोळ्यात येणारी आंसवं आणि नाकातून येणारं पाणी मोकळ्या
हाताच्या तळव्याने पुसणं किंवा स्त्रीयांनी नेसलेल्या साडीच्या मोकळ्या पदराच्या
टोकानं नाक आणि डोळे पुसणं किंवा नाकाजवळून जाणार्‍या पदराने नाकातलं पाणी
पुसणं अशा प्रकारचे सीन्स टिव्हीवर पहाणं अंमळ गलिच्छ वाटतात.

त्या ऐवजी,रुमालाने किंवा टिश्यू पेपरने पुसण्याची क्रिया करणं हे संबंधीत शूट
करणार्‍यांना कळत कसं नाही?
कां स्वच्छ-अस्वच्छतेची नाहीतरी आमची बोंबाबोंबच!

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया)

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

7 Jan 2019 - 11:39 am | आनन्दा

उपहासात्मक आहे का धागा?

मार्मिक गोडसे's picture

7 Jan 2019 - 12:34 pm | मार्मिक गोडसे

पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिकेत नथ वर करून टिश्यू पेपरने नाकातील पाणी टिपत आहे असं दृश्य दाखवता येईल का?

रमेश आठवले's picture

7 Jan 2019 - 9:23 pm | रमेश आठवले

Ha Ha Ha

विचार करा , सध्या चालू असलेली पौराणिक मालिका , " विठू माउली " यात , रुक्मिणी विठ्ठलावर रागावली आहे आणि विठ्ठल तिला टिश्यू पेपर देतो आहे .. कसे वाटतेय

प्रमोद देर्देकर's picture

7 Jan 2019 - 2:02 pm | प्रमोद देर्देकर

बरं तर बरं तुम्ही हामेरीकेत असता

आणि सॅन होझे कॅलिफोर्निया अमेरिकेत येते हे लोकांना का बरं सांगत फिरता प्रत्येक लेखातून .

कपिलमुनी's picture

8 Jan 2019 - 12:20 pm | कपिलमुनी

लाल डब्बा सांडत असावे !

साडीने /पदराने नाक डोळे पुसणे वाईट. गलीच्छ वाटते?
मग जेवत असतानादेखील मोठ्याने शिंकरणे हे कोणत्या सभ्यतेत बसते हो सामंत काका? इंग्रज / जर्मन लोक ही क्रीया सर्रास करत असतात.
@पम्याकाका : ती जुनी सवय आहे. काया मिपावर परत आले तश्या त्यांच्या सवयीही परत आल्यात

टिश्यू कसे कसे आणि कुठे कुठे वापरतात यावरपण एक धागा काढा बरं..

छान ओझे , पाटणकरीया , हिंदुस्थानका

पावाच्या तुकड्यावरून मारामारी आणि मुडदे पडले जायचे युरोपात .. कोलंबस आणि वास्को द गामा दोघेही निष्णात चाचे .. तुंबळ युद्ध चालायचे आणि नको तो ताप डोक्याला झालेला .. त्यावर उपाय म्हणून राणीने समुद्राचे अर्धे भाग करून दिले .. कोलंबस फिरत फिरत अमेरिकत गेला आणि गामा इकडे आला . नंतरचा इतिहास सांगायला नको .. पाव खायची ज्यांची ऐपत नव्हती ते आता आपल्याला शिकवतायत.. आणि आपलेही तिकडे जाऊन त्या फालतू टिश्यूचे गोडवे गातायत ..
पदर कसा घेतात ? नऊवारी काय असते , हे माहित आहे का ? अहो मी तर म्हणेन साले साहेब नंतर टाय लावायला लागले , पण त्याआधी आमच्या इथे टाय हि संकल्पना रुजलेली होती .. नऊवारीला ( मागे असलेली टाय ) .. आता बोला .. हाय कि नाय , आम्ही साहेबांच्या आधी .. ह्ही ह्ही ह्ही ह्ही ,,, नाद नाय करायचा ,,

छान ओझे , पाटणकरीया , हिंदुस्थानका

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Jan 2019 - 9:43 am | अनिरुद्ध.वैद्य

पाप असते असं सांगणार्‍यांनीतरी निदान कोण कोणाला काय शिकवतंय हे बोलु नये ;)

येरागबाळा's picture

8 Jan 2019 - 5:04 pm | येरागबाळा

छान ओझे...!!! वा वा, ह्या ह्या..

नऊवारीला ( मागे असलेली टाय ) .. आता बोला .. हाय कि नाय , आम्ही साहेबांच्या आधी .. ह्ही ह्ही ह्ही ह्ही ,,, नाद नाय करायचा ,,
++११११
एकदम झकास

nanaba's picture

7 Jan 2019 - 4:05 pm | nanaba

Have u thought of how many trees would get cut if everyone starts using tissues?
Ur use and throw sanskruti has got d world where it is - that is on d edge of mass extinction.

Refuse -> reduce -> reuse -> recycle is d mantra (in given order)

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jan 2019 - 4:13 pm | ज्ञानोबाचे पैजार

पार्श्वभाग स्वच्छ करण्यासाठीही टिशुचा वापर करणे कितपत गलिच्छ आहे याबद्दलही लेखक मजकुरांचे विचार वाचायला आवडतील.
पैजारबुवा,

हा प्रकार खुपच गलिच्च्छ आहे.

त्यात आणि काही ठिकाणी कमोडच्या शेजारी उघडी बकेट ठेवतात. ते तर अजून गलिच्छ वाटते.

गामा पैलवान's picture

7 Jan 2019 - 5:04 pm | गामा पैलवान

विचक्षण प्रतिभावंत प्रतिसादकांनो,

सामंतकाकांनी रुमालसुद्धा चालेलसं सूचित केलंय ना?

आ.न.,
-गा.पै.

याबरोबर अजुन एक प्रकार खटकतो तो म्हणजे टिव्हीवर जे पाककलेचे कार्यक्रम चालतात त्यात अँकर किंवा कलाकार मस्त पैकी मोकळे केस सोडून खाद्य पदार्थ बनवत असतात. कित्येकवेळा ते केसात हात फिरवून परत त्याच हाताने खाद्यपदार्थ बनवायला सुरवात करतात. जे किळसवाणे वाटते.
खरं तर केस मोकळे न सोडता व्यवस्थीत बांधून त्यावर टोपी घालावी अशी अपेक्षा आहे.

आता, "तुम्ही घरी असं करता का?" असं विचारु नका. केस मोकळे तर नक्कीच सोडत नाहीत जेवण बनवताना...

चौथा कोनाडा's picture

7 Jan 2019 - 6:16 pm | चौथा कोनाडा

गंभीर क्रांतीकारक विचार !

सामंतसाहेब, याला माझा फुल्ल पाठिंबा

\ आपण पन तिश्शु पेपरच्या धन्द्य़ात घुसाव काय \

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jan 2019 - 6:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

काही पाश्च्यात्य पाककृती कार्यक्रमांत शेफ, पदार्थ ढवळायची पळी तोंडाला लाऊन, पदार्थाची चव बघतो, हे तर अत्यंत (ईईईक) गलिच्छ वाटते. लेखक सॅन होजे येथिल रेस्तराँमध्ये जाताना, तेथिल शेफला ही सवय नाही, याची खात्री करून घेतो का, असा प्रश्न पडलाय.

अर्धवटराव's picture

7 Jan 2019 - 6:35 pm | अर्धवटराव

:)

नाखु's picture

7 Jan 2019 - 10:57 pm | नाखु

जर वारंवार कागदवापरप्रेमी असेल तर जमाखातर की जमे(ल)तर खा.

दृष्टी आड सृष्टी यावर ही विश्वास ठेवणार्या जगातील नाखु

फन मौजे मिपास्थान

तेजस आठवले's picture

7 Jan 2019 - 7:25 pm | तेजस आठवले

"अहो मी इकडे एक चार ओळी काय खरडून जातो तिकडे भारतात तुम्ही रिकामटेकडे लोक चर्चा करत बसता."

- ठाण्यातल्या सामंत ब्रदर्सचे लोणी कढवायला आणणारा पण पुअर पीपल हंग्री पीपल वाली कंट्री सोडून आम्रविकेत भरपूर टिश्यू एकेकाळी वापरणारा माखनचोर.

कृपया हलकेच घेणे.

सौन्दर्य's picture

8 Jan 2019 - 2:29 am | सौन्दर्य

मी ह्युस्टनला असतो. इथे शाळेत मुलांना शिंक आली तर हाताचा कोपरा मुडपून त्यावर शिंकायला शिकवतात, किंवा शर्ट वरच्या बाजूने थोडा उघडा करून आत शिंकायला शिकवात. हे सर्व बघायला सुद्धा कसेसेच होते. त्यापेक्षा एखाद्या टिश्यू पेपरचा किंवा कागदी रुमालाचा वापर करायला का शिकवत नाहीत कोण जाणे.

मी भारतात आणि येथे आल्यावर सुद्धा खिशात नेहेमी कापडी रुमाल बाळगतो ज्याचा अनेक प्रकारे उपयोग होतो.

जब्बरा चाललंय गलिच्छ प्रकरण ,, सामंतबुवांची कमाल हाय बाबा ,, एक धागा , सिर्फ एक धागा आदमीको टिश्यू बना देता हय ...

छान ओझे , पाटणकरीया , हिंदुस्थानका

१००१ व्या पोस्ट बद्धल अभिनंदन !
बादवे... तुमच्या तिकडच्या अमेरिकेची दुर्गा-हिलरी(आज्जी) [ असं तुम्हीच म्हणाले आहात ] एकडे आमच्या अंबुच्या लग्नात ढुमका लगावुन गेली आहे; हे कळलेच असेल आपणाला ! =))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेनू तू ले जा किते दूर मेरे हानियाँ... :- Heartless - Badshah ft. Aastha Gill | Gurickk G Maan |