घोटाळा

Primary tabs

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
5 Jan 2019 - 11:57 am

मी आणि माझ्या पत्नीने काहीतरी मोठा घोटाळा केला आहे असा आरोप करण्यात आला. आरोप करणाऱ्याने आम्हाला फेस टू फेस येण्याचे चॅलेंज दिले. आमच्यात झालेला संवाद खालीलप्रमाणे..

प्रश्न १. तुमचे आडनाव जोशी का आहे?
माझे उत्तर : कारण माझ्या वडिलांचे आडनाव जोशी आहे.

तो: माझा प्रश्न नीट ऐका. तुमचे आडनाव जोशी का आहे?
उत्तर: कारण माझ्या वडिलांचे आडनाव जोशी आहे. आणि मी त्यांच्यापोटी जन्म घेतला.

तो : "तुम्ही प्रश्नाचे उत्तर देत नाही आहात. काहीतरी लपवण्याचा डाव दिसतोय. मी असा सोडणार नाही तुम्हाला."

"बरं"

आता तो माझ्या पत्नीकडे वळला.

प्रश्न: साल २०१३ चे कागदपत्रं माझ्या हातात आहेत. त्यावर तुमचे आडनाव वेगळे आहे. २०१४ नंतर मात्र तुम्ही
जोशी आडनाव का लावत आहात?

पत्नीचे उत्तर: कारण २०१३ साली माझे लग्न व्हायचे होते. २०१४ साली माझे लग्न झाले. तेंव्हापासून माझ्या पतीचे जोशी हे आडनाव मी लावते.

तो: माझा प्रश्न नीट ऐका. साल २०१३ चे कागदपत्रं माझ्या हातात आहेत. त्यावर तुमचे आडनाव वेगळे आहे. २०१४ नंतर मात्र तुम्ही जोशी आडनाव का लावत आहात?

पत्नी: ह्याचेच उत्तर दिले आहे मी वरती.

तो: मुळात तुमच्या पतीच्या आडनावाविषयी संदिग्धता असताना तुम्ही त्यांचे आडनाव कसे वापरू शकता. तुम्ही काहीतरी लपवत आहात. तुम्ही खोटारडे आहात. तुम्ही आडनाव चोर आहात. आता पुढचा प्रश्न तुम्हा दोघानांही विचारतो. त्याचे तरी उत्तर द्या.

आम्ही दोघेही: विचारा..

तो: २०१४ साली तुमच्या घरात तुम्ही दोघेच जणं राहायचा. वर्ष दोन वर्षात असे काय घडले की आता तुंमच्या घरात तिघे राहतात?

मी : कारण २०१५ साली आम्हाला मुलगी झाली म्हणून.

तो: जिथे तुमच्या आडनावाचा पत्ता नाही. अश्यावेळी काहीही कारण नसताना दोनाचे तीन होतात. तुम्हाला नक्कीच काहीतरी लपवायचे आहे. तुम्ही चोर आहात हे सिद्ध झाले आहे.

वरील संभाषणाचा सद्यस्थितीशी काहीही संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा.

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

5 Jan 2019 - 12:08 pm | आनन्दा

ठ्ठो!

प्रकाश घाटपांडे's picture

5 Jan 2019 - 12:32 pm | प्रकाश घाटपांडे

ती- ज्याअर्थी तुम्ही नवर्‍याचे आड्नाव लावता त्याअर्थी तुम्ही पुरुषप्रधान संस्क्रुतीचे समर्थन करता?

सुबोध खरे's picture

5 Jan 2019 - 12:34 pm | सुबोध खरे

खुसखुशीत )) = ((

यश राज's picture

5 Jan 2019 - 12:41 pm | यश राज

मस्तच

प्रसाद_१९८२'s picture

5 Jan 2019 - 1:01 pm | प्रसाद_१९८२

मस्त !

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jan 2019 - 1:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

बबन ताम्बे's picture

5 Jan 2019 - 2:11 pm | बबन ताम्बे

मिश्किल रूपक. मस्त !!

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jan 2019 - 2:28 pm | ज्ञानोबाचे पैजार

वरील संभाषणाचा सद्यस्थितीशी काहीही संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा.

एवढा भिषण योगायोग कसा बरे होउ शकतो?

पैजारबुवा,

कुरकुररीत आणि चटपटीत छोटेखानी लेखन

आनन्दा's picture

5 Jan 2019 - 6:22 pm | आनन्दा

राजा भिकारी!!

जानु's picture

5 Jan 2019 - 7:28 pm | जानु

मस्त

चिनार's picture

7 Jan 2019 - 9:51 am | चिनार

धन्यवाद !