आंदोलनाचे विधायक (?) मार्ग . .

सुक्या's picture
सुक्या in काथ्याकूट
1 Nov 2008 - 4:12 pm
गाभा: 

मागे काही दिवस मिपा वर राज ठाकरे अन त्यांचे आंदोलन या विषयावर बर्‍याच गरमागरम चर्चा झाल्या. बरेच वेगवेगळे विचार अन मते समजली. एकंदरीत सर्व बाबतीत दोन गट पडले. एक गट राजचे आंदोलन हे योग्यच आहे असे म्हणत त्याला आपला पाठींबा दिला तर काहींनी हे आंदोलन योग्य आहे परंतु पध्द्त चुकिची असे मत नोंदवीले. काहींनी हे जे होतयं ते पुर्ण चुकीचं आहे, भारतात कुणालाही कुठेही जाण्याचा पुर्ण अधिकार आहे असे वाटते. या सर्व उहापोहात पध्द्त चुकिची असेल तर हे आंदोलन मराठी माणसाने कशा तर्‍हेने करावे यावर काहीही प्रतिक्रिया आल्या नाही. राजकीय वर्तुळातही रामदास आठवले सारखे नेते 'इट का जवाब पत्थर से दो' म्हणत राडे करायचे (फुकट्चे) सल्ले देउ लागले आहेत. माझ्या मते जर राज ची पध्द्त चुकिची असेल तर खालील काही विधायक (?) मार्गाने हे आंदोलन चालवता येउ शकते. .

१. गांधीगिरी चा प्रभावी मार्ग अनुसरत बिहार मधुन येणार्‍या प्रत्येक भैय्या ला एक गुलाब द्यावा. कार्यकर्त्यांनी प्रत्येक रल्वे स्थानकांवर बिहार मधुन येणार्‍या गाडीची वाट पहावी अन उतरणार्‍या प्रत्येक भैय्याला गुलाब वाटावेत. जमलेस तर त्याचे सामान उचलण्यास मदत करावी. काही दिवसांनी त्यालाच वाइट वाटुन हे भैय्ये महाराष्ट्रात येणार नाहीत.

२. रेल्वे भरती व इतर तत्सम परीक्षा घेण्यासाठी च्या जाहीराती मराठी पेपरातही द्याव्यात व भुमीपुत्रांनाही समान संधी द्यावी अशा आशयाचे एक निवेदन रेल्वे भरती बोर्ड, रेल्वे मंत्रालय व इतर विभागातल्या उच्चपदस्थ लोकांना द्यावे. तसे निवेदन दिल्याची बातमी आज तक वर प्रसारीत करावी. (त्या निवेदनाला ते उच्चपदस्थ प्रथेप्रमाने केराची टोपली दाखवतीलच, परंतु निराश न होता पुन्हा ते निवेदन द्यावे. व तसे दिल्याची नोंद करावी)

३. मंत्रालयासमोर साखळी उपोशन सुरु करावे.

४. भुमीपुत्रांनाही समान संधी मिळण्यासाठी कोर्टात जनहित याचीका दाखल करावी. (मग तारीख पे तारीख. . तारीख पे तारीख .. निराश न होता लढा चालु ठेवावा)

५. (कुठलेही आंदोलन वाइट असते. . भारतात कुनालाही कुठेही जाण्याचा पुर्ण अधिकार आहे म्हनुन) इतर प्रांतात नोकरीसाठी जावे. -- हे आवांतर

मला पामराला अजुन काही उपाय सापडले नाही. तुम्हाला काही सापड्ताय का जरा सांगा.

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

1 Nov 2008 - 5:51 pm | विनायक प्रभू

वरणभात वा मेतकुट भात खाऊन निपचित पडावे. प्रेषित यायची वाट बघावी.

अनामिका's picture

1 Nov 2008 - 6:37 pm | अनामिका

वरणभात वा मेतकुट भात खाऊन निपचित पडावे. प्रेषित यायची वाट बघावी.
अत्यंत योग्य प्रतिसाद'
प्रत्येकाला भगतसिंग हा शेजारच्याच घरात जन्माला यायला हवा असतो.
विधायकमार्गाने,गांधीगीरीने प्रश्न सोडवण्याचे दिवस केंव्हाच इतिहासजमा झालेत.
ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत समजावणे हेच योग्य.................
छत्रपतींच्या काळात गांधी नव्हते हे त्यांचे भाग्यच म्हणायचे नाहितर अवघा देश धर्मांतरीत झाला असता.
राजच्या आंदोलनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याच्या नावाचा आणि मनसेच्या नावाचा वापर करुन कुणि स्वतःचे इप्सित साध्य करुन घेत नसेल कशावरुन..............?
कुणाच्याही मृत्युला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कारणीभुत होवु नये इतकच मला वाटत,
"अनामिका"
अनुदिनी-
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/

सुक्या's picture

2 Nov 2008 - 3:05 pm | सुक्या

विधायकमार्गाने,गांधीगीरीने प्रश्न सोडवण्याचे दिवस केंव्हाच इतिहासजमा झालेत. ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत समजावणे हेच योग्य

सहमत आहे.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

१.५ शहाणा's picture

1 Nov 2008 - 7:43 pm | १.५ शहाणा

बिरबलाची खिचडी टाकुन वाट पाहा

मयुरेशवैद्य's picture

1 Nov 2008 - 11:06 pm | मयुरेशवैद्य

१) भैय्ये इ़तके नालायक आहेत कि ते सर्व गुलाब गोळा करून त्यांच्या गावी नेऊन विकतील !
२) निवेदन, पत्र वगैरे देऊन झालीत. हा काही आजचा विषय नाही. गेली अनेक वर्ष हेच चालू (लालु) आहे !
३) मनसे राजकीय पक्ष आहे, NGO नाही.
४) घरात कुत्री घुसलीत, तर , कुत्री हकलायचीत की आपणच घर सोडायचं ??

असो !

नेटकिडा's picture

2 Nov 2008 - 12:06 am | नेटकिडा

भैय्ये इ़तके नालायक आहेत कि ते सर्व गुलाब गोळा करून त्यांच्या गावी नेऊन विकतील !
=)) =)) =))
जरा दुरुस्ती ... भैय्ये इ़तके नालायक आहेत कि ते सर्व गुलाब गोळा करून तुम्हालाच विकतील !

शितल's picture

2 Nov 2008 - 2:13 am | शितल

>>>>>.जरा दुरुस्ती ... भैय्ये इ़तके नालायक आहेत कि ते सर्व गुलाब गोळा करून तुम्हालाच विकतील
=)) =)) =)) =)) =))

चन्द्रशेखर गोखले's picture

1 Nov 2008 - 11:39 pm | चन्द्रशेखर गोखले

राज ठाकरे यांचे आदोलन चुकीच्या दिशेने का गेले याचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यांनी माडलेल्या भुमिकेमध्ये त्तथ्य आहे,
म्हणुनच या आदोलनाला एवढा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. वेळोवेळी या मुद्द्यावर आवाज उठवून सुद्धा सरकार ढिम्म राहील.
सरकारची ही उदासिनता लोकांची माथी भडकायला कारणीभूत आहे. एवढा गदारोळ झाला, पण रेल्वे बोर्डाने एक पत्रकार
परिषद घेउन आकडेवारीनीशी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली पाहिजे होती की या या मराठी व्रुत्तपत्रांतुन या परिक्षेबाबत
जहिरात देण्यात आल्या होत्या. इतक्या मराठी उमेदवारांचे अर्ज आले होते पैकी एवढ्या उमेदवारांना परिक्षेसाठी बोलावले होते.
पण तस काही घडल्याच ऐकीवात नाही. आदोलनाने हिंसक वळण घेतल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. महात्माजींना
सुद्धा याकरणामुळे आंदोलने मागे घ्यावे लागली होते. हिंदी च्यानल्सनी आगीत तेल ओतण्याचे काम करुन महाराष्ट्राला आणि मराठीमाणसाला बदनाम करण्याचे काम अगदी चो़ख केले आणि करत आहेत. राजसाहेबांनी केलेल्या विधानांचा वेळोवेळी विपर्यास केलागेला अगदी जाणिवपुर्वक हे काम त्यानी केले. हा प्रश्ण त्यांच्या पोटावर पाय आणणारा आहे.
विधायक काम आता एवढेच करावे की कार्यकर्त्यानी स्वता: अश्या परीक्षांच्या जाहिरातींवर जातीने लक्ष ठेवून. त्याची माहीती महाराष्ट्रभरातील आपल्या शाखा शाखा मधुन द्यावी. मराठी मुला/मुलींना अश्या परीक्षाच्या तयारी साठी मार्गदर्शनपर शिक्षण वर्ग घ्यावेत. आपल्या नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा, त्यांचे मोठे मोठे होर्डींग्स लावण्यापेक्षा हे बरे नाहीका...!

सुक्या's picture

2 Nov 2008 - 3:11 pm | सुक्या

राजसाहेबांनी केलेल्या विधानांचा वेळोवेळी विपर्यास केलागेला अगदी जाणिवपुर्वक हे काम त्यानी केले.

सहमत. राजच्या विधानांचा जाणिवपुर्वक विपर्यास करुन या लढ्याला द्वेष, दहशतवाद , गुंडागर्दी असे रुप दिले गेले. सर्व त्या बिनडोक हिंदी मिडीयाचं काम. आज तक सारखं भिकार चॅनल त्यात खुप आघाडीवर आहे.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

अनामिका's picture

2 Nov 2008 - 12:20 am | अनामिका

आपल्या नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा, त्यांचे मोठे मोठे होर्डींग्स लावण्यापेक्षा हे बरे नाहीका...!
अगदी योग्य .
अवांतर-मध्यंतरी भारतात असताना ठाण्यात जितेंद्र आव्हाड याचा जन्मदिवस साजरा झाला.तेंव्हा एके ठिकाणी लावलेल्या होर्डिंग मधे त्यांचा उल्लेख लोकमान्य असा केला होता.टरटरा फाडावे असे वाटले होते ते होर्डिंग.
जीहुजुरी करण्यात देखिल काही तारतम्य बाळगतील की नाहि हे चमचे.जितेंद्र आव्हाड आणि लोकमान्य म्हणजे बोलणेच खुंटले.
निवडणुकीत उभे राहिले तर जिंकुन येऊ अशी शाश्वती नसलेल्या व्यक्तीला लोकमान्य ही उपाधी देणे हा लोकमान्यांचा अपमान आहे.
विषयांतर झाल्याबद्दल क्षमस्व!

"अनामिका"
अनुदिनी-
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

2 Nov 2008 - 9:01 am | विसोबा खेचर

हम्म! ही गांधीगिरी बरी आहे! :)

आपला,
मोहनदास अभ्यंकर.

झकासराव's picture

2 Nov 2008 - 9:18 am | झकासराव

काही दिवसांनी त्यालाच वाइट वाटुन हे भैय्ये महाराष्ट्रात येणार नाहीत>>>>>>>>>>.
=)) =)) =))
दिवास्वप्न आहे हे तरी.
आजतक असो वा कोणतही न्युज चॅनेल त्यांचा मेन धंदा काड्या लावणे हाच झालाय असच वाटत.
त्याना सनसनाटी खबर देताना आपण देशातच कशी फुट पाडतो आहे हेच कळत नाही.
राज ठाकरे याना अटक झाल्यावर आणि सुटका झाल्यावर बर्‍याच चॅनेल वर उधळालेली मुक्ताफळे मी पाहिली आहेत.
बिहारात राहण्यार्‍या सामान्य माणसाला काय घंटा माहित असणार राज ठाकरे कोण ते.
त्याना जे चित्र मेडियाने उभ केल तेच खर वाटणार. हे नक्कीच धोकादायक आहे.
टरटरा फाडावे असे वाटले होते ते होर्डिंग>>>> अगदि अगदि.
एका राजकारणी साहेबाना पुणे आणि पिम्परि चिन्चवड येथील त्यांच्या पक्षाचे काहि लोक "जाणता राजा" म्हणतात.
हे प्रथम वाचुन राग येण्याऐवजी प्रचंड हसु फुटले होते. मग कीव आली. आणि मग राग आला.

................
बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय.
http://picasaweb.google.co.in/zakasrao

वेताळ's picture

2 Nov 2008 - 9:42 am | वेताळ

हे मी पण बघितले आहे पोस्टर. साहेब आणि ज्याने लावले त्याला फाट्यावर जोड्याने मारले पाहिजे.
वेताळ

वेताळ's picture

2 Nov 2008 - 9:45 am | वेताळ

हा माणुस आकाशाकडे बघुन काहीही बरळत असतो.तो काय बरळतो आणि कोणत्या भाषेत बरळतो हा एक अभ्यासाचा विषय आहे.त्याला पाहिले की मला रामसे बंधुच्या चित्रपटांची प्रकर्षाने आठवन होते.
वेताळ

ऋषिकेश's picture

2 Nov 2008 - 10:29 am | ऋषिकेश

अजून काहि उपायः
१. पाटण्यामधे सार्वजनिक गणेशोत्सव चालू करावा.. पुजेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेथे जातील. नरेंद्र मोदी, राज ठाकरे यांना विषेश अतिथी म्हणून बोलवावे.या पुजेच्यानिमित्ताने बिहार सरकारच्या अकार्यक्षमतेवर टिका करावी. लालूंचा चारा घोटाळा, रबडींचे शिक्षण, दरवर्षी येणारे पूर यावर गणेशपूजनाच्या कारणाने बोलावे.

२. महाराष्ट्र सरकारनेच छ्टपुजेचे आयोजन करावे. लालुंना बोलवावे. व पुजा सांगायला मराठी भटजी बोलवावा. संपूर्ण पूजा मराठीतून सांगितली जावी. भाषणे केवळ मराठी नेत्यांनी मराठीतून करावी. लालु केवळ हिरवा बावटा दाखवेल :)

कसे वाटले उपाय?

-(गांधीवीर) ऋषिकेश

सुक्या's picture

2 Nov 2008 - 2:41 pm | सुक्या

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

खरं तर माझा हा काथ्याकुट चा प्रयत्न थोडा उपहसात्मक होता. कुनीतरी मराठी माणसासाठी काहीतरी करतयं म्हणुन त्याला पाठींबा न देता, त्या आंदोलना मागची भुमीका समजाउन न घेता पद्धतशीरपणे त्याची परप्रांतीयांचा द्वेष, गुंडागर्दी, दहशतवाद अशी संभावना केली गेली. मराठी माणसाच्या भावनेची कदर न करता त्यांना केवळ उपदेशाचे आणि वैश्विक तत्त्वज्ञानाचे डोस पाजले गेले. गेली काही वर्षे परप्रांतीयांना इथे घुसवुन त्याचा पुरेपुर राजकीय फायदा घेत इथल्या भुमीपुत्रालाच सार्‍या बाबतीत वंचीत ठेवले गेले, प्रत्येक ठीकाणी डावलले गेले.

इतके होउनही मराठी माणसाने आपल्या न्याय्य हक्कासाठी हे आंदोलन सनद्शीर मर्गाने केले पाहीजे किवा ते करुच नये अशीच अपेक्षा केली जात आहे. सनद्शीर मार्गाचे अनुकरण करुन आपल्या मागण्या मान्य करण्याचे प्रयत्न किती यशस्वी झाले हा एक संशोधनाचा विषय होइल. कदाचीत भुतकाळात या मार्गाने काही बाबी साध्य झाल्या असतील परंतु आताच्या परीस्थीतीत तरी त्याने काही साध्य होइल असे वाटत नाही. राडा जसे प्रत्येक गोष्टीचे समाधान नाही तसेच प्रत्येक प्रश्न हा सनद्शीर मार्गानेच सोडवता येतो असेही नाही. ताकदीचा वापर काही ठीकाणी अपरीहार्य असतो. पंजाब आनी काश्मीर येथला आतंकवाद हे उदाहरण म्हणुन घेता येइल. पंजाबात आपरेशन ब्लु स्टार झाले, भरुन न येनारी हानी झाली परंतु आज पंजाब शांत आहे. सनद्शीर मार्गाचा वापर काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी अजुनही होतो आहे. जिवीताची, मालमत्तेची हानी होतेच आहे अन प्रश्न अजुनही तसाच आहे.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

विनायक प्रभू's picture

2 Nov 2008 - 3:11 pm | विनायक प्रभू

तुमच्या उपहासाच्या जोडीला आम्हा सर्वांचा उपहास ह्या नजरेने प्रतिक्रियाकडे बघावे अशी नम्र विनंती.