अतृप्त आत्मा -१

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
15 Nov 2018 - 2:18 pm

काल रात्री अचानकच आम्हाला आम्ही निवर्तल्याचं समजलं .म्हणजे आम्ही झोपलेलोच होतो आणी आजुबाजुला थोडी कुजबुज ऐकु आली.हळुहळु कुजबुजीचं रुपांतर मुसमुसण्यात आणी नंतर गदारोळ आणी गोंगाटात झाले.त्यामुळे झोप चाळावली.डोळे उघडले तर आम्ही सिलींगला आणि द्रोण कॕमेरातुन दिसतं तसं दृष्य दिसायला लागलं. आम्ही अंथरुणातच अर्धी लुंगी वर गेलेल्या आणी भोकं पडलेल्या गंजीफ्रॉकात उताणे पडलेलो.आणी भोवती आमचे हवे नको ते सर्व नातेवाईक ,सगे संबंधी,मित्रमंडळी ,आमच्या उधार्या थकलेले बरेचसे वाणगट,गवळी ,न्हावी सगळे हजर.

ओढुन ओढुन आणलेली सुतकी तोंड .काहींच्या मनातला आनंद न दिसताही जाणवत होता.

च्यायला ! या मंदा मावशीला दिड हजार दिलेले बुडाले या कल्पनेने आम्ही व्यथीत झालो.आणी ती त्या सुटकेचा आनंद लपवत आमच्या कुटुंबाचा आणी पर्यायाने जन्माला आलेल्या कबिल्याचं सांत्वन करत बळंच डोळे पुसत होती.आणी बाकी घेणेकरी बाहेर एकमेकांपेक्षा जास्तच दुःखी असल्याचा आव आणत होते.
एकंदर परिस्थिती खुपच कंटाळवाणी होती.म्हणजे आम्ही मेलोय हे आम्हाला दिसत होतं पण त्या सगळ्यांना समजत नव्हतं की आम्ही हे बघतोय.

आणी अचानक डोक्यात एक किडा वळवळला . इंटरेस्टींग वाटायला लागलं एकंदरीत सगळं.

आम्ही भुत झालो होतो .

क्रमशः..

नाट्यप्रकटन

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

11 Dec 2018 - 1:43 pm | दुर्गविहारी

आज वाचायला सुरुवात केली. पण भाग छोटा टाकलाय.