टीक टॉक

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
12 Nov 2018 - 1:14 pm
गाभा: 

TikTok हे गेल्या दोन वर्षापासून सुरु झालेले स्मार्ट फोन बेस्ड चायनीज सोशल मिडीया अ‍ॅप आहे. यात (उडत्या चालीच्या लोकप्रीय) गाण्यांच्या चालींवर / संभाषणांवर स्वतःच्या ओठांच्या हालचाली मिळवून अल्प स्व-अभिनय संपादीत करुन वितरीत करण्याची सोय असावी. हि सादरीकरणे विनोदी धर्तीवर करुन फॉरवर्ड करण्याचा ट्रेंड अ‍ॅडोलसंट तरुण पिढीत वाढत चाललेला असावा. थोड्या अधिक प्रशिक्षण आणि परिश्रमाने सोशल मिडियासाठीचे कला सादरीकरण साधन म्हणून येत्या काळात अधिक विकसित होऊ शकेल असे वाटते.

या माध्यमाची व्यंग सादरीकरणाची क्षमता ही सॉलीड आहे , या माध्यमापासून पासून युवा पिढीला थांबवणे अशक्य नसले तरी पुरेसे कठीण असेल. सेंसॉरशिपची धज्जीया उडवण्याची या माध्यमाची या माध्यमाची क्षमता सॉलीड असेल. या माधमाची सुरवात करणारा चीन देश यावर सेंसॉरशीप कशी राबवतोय याची कल्पना नाही. सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येच्या इंडोनेशिया देशाने मात्र सेंसॉरशीपची प्रक्रीया पारपाडली. पण कितीही सेंसॉरशीप प्रयत्न केले तरीही किती नियंत्रण राहू शकेल या बाबत तुर्तास शंका वाटते.

अशात "सुनो मेरी शबाना " या गाण्याच्या एक टीक टॉक कुठल्याशा महाविद्यालयीन निकाबधारी मुस्लिम युवतीने गंधधारी हिंदू मुला सोबत केले -तसे ते गाणे तसे ग्रेट नाही पण टीक टॉक अभिनयासाठी तरुणाईत पुरेसे लोकप्रीय झालेले दिसते- त्यावरुन मागच्या महिना दिड महिन्यात चहाच्या पेल्यातले वादळ या टीकटॉक आणि युट्यूबर समुहात होऊन गेलेले दिसते. या टीक्टॉक मधील मुलगी हिंदू आणि मुलगा मुस्लिम असता आणि हिंदू कर्मठांनी लव जिहादचा विषय चघळला असता तर मुख्य माध्यमांनी एव्हाना त्याची हिंदू असहिष्णूता म्हणून दखल घेऊन कोण गदारोळ केला असता. पण तेच या सदर टीक टॉक मध्ये युवती मुस्लीम आहे, मुलगा हिंदू आहे, सहज गंमत म्हणून केलेल्या अभिनयावरुन मुस्लिम कर्मठांनी त्या मुस्लिम मुलीवर टिकेची झोड उठवून अभिनयापलिकडे काही नाही असे स्पष्टीकरण देण्याची वेळ त्यामुलीवर आणली आणि तिचे स्पष्टीकरण त्या कर्मठांना स्विकार्य नसल्याच्या युट्यूबही आलेल्या दिसतात. अभिनयापलिकडे जाऊन खरोखर मुस्लिम मुलीस हिंदू मुलाशी संवाद ते तिला हव्या त्या स्वरुपाचे रिलेशन्स स्थापित करण्याचे स्वातंत्र्य भारतीय राज्य घटना देते याचे स्मरण यावेळी मुख्य माध्यमे या कर्मठांना का देत नाहीत ? त्या मुस्लिम मुलीच्या पाठीशी तथाकथित पुरोगामी पाठीशी का दिसत नाहीत ?

संदर्भ :

* TikTok इंग्रजी विकिपीडिया लेख

* "सुनो मेरी शबाना" मुस्लिम मुलगी - हिंदू मुलगा अभिनयाचा युट्यूब

* त्या मुस्लिम मुलीस स्प्ष्टीकरण देण्याची आलेली वेळ युट्यूब

* टीक टॉक ने वाट लावल्यावर मोहम्मद बीन कासीम जैसे कैसे पैदा होंगे ? (सेकंद ३४वा) म्हणून चिंतीत कुणा मौलाचा युट्यूब

मुलीचा विरोध करणारे जसे काही कर्मठ युट्यूब आणि टिका आल्याचे दिसते , तसे मुठभर का होईना पाठींबाही दिसतो आहे पण राज्यघटनेत उपलब्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संबंधाने एकुण स्थिती मुस्लिम मुलींसाठी पुरेशी आश्वासक नसल्याचेच चित्र असावे. असे या निमीत्ताने नमुद करावेसे वाटते.

हि जाहीरात, जाहिरात आहे अद्याप वस्तुस्थिती नाही. वस्तुस्थिती असती तर जाहिरातीची जरुरी भासली नसती.

वर एका खुपलेल्या विषयाची चर्चा केली असली तरी या नव्या विकसीत होणार्‍या सोशल मिडियाची अनुषंगिक इतर चर्चाही या निमीत्ताने करण्यास हरकत नसावी असे वाटते.

प्रतिक्रिया

या टीक्टॉक मधील मुलगी हिंदू आणि मुलगा मुस्लिम असता आणि हिंदू कर्मठांनी लव जिहादचा विषय चघळला असता तर मुख्य माध्यमांनी एव्हाना त्याची हिंदू असहिष्णूता म्हणून दखल घेऊन कोण गदारोळ केला असता.
>>
काश सचमुच ऐसा होता!
बाकी चालू द्या.