DIY : मिपावर प्रदर्शित करण्यासाठी साठी फोटोंचा स्लाईड शो तयार करणे. २

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in तंत्रजगत
22 Sep 2018 - 5:08 pm

नमस्कार,

मागच्या DIY : मिपावर प्रदर्शित करण्यासाठी साठी फोटोंचा स्लाईड शो तयार करणे. १ ह्या भागात आपण ६ Landscape फोटोंचा स्लाईड शो कसा करावा ते बघितले.

आता ह्या भागात आपण ६/१२/१८ Landscape आणि portrait फोटोंचे स्लाईड शो तयार करून ते मिपावर कसे प्रदर्शित करायचे ह्याची माहिती घेऊया.

खालच्या मेनू बार वरून आपल्याला किती फोटोंचा आणि कुठल्या प्रकारचा स्लाईड शो तयार करायचं तो पर्याय निवडा. त्याखाली चौकटीत दिसणाऱ्या कोड मध्ये जिथे Photo1, Photo2 असे हिरव्या रंगात दिसतंय त्याठिकाणी (तिथले Photo1 वगैरे काढून टाकून) गुगल फोटोज, फेसबुक किंवा तुमच्या पसंतीच्या कुठल्याही संकेतस्थळावरील फोटोची लिंक पेस्ट करावी. जिथे लिंक पेस्ट करायची आहे त्या जागी माउस चा कर्सर आणल्यावर हिरव्या रंगाची चौकट दृश्य होईल जेणेकरून ओळखायला सोपे पडेल, बाकीचा कोड अन एडीटेबल असल्याने चुक होण्याची शक्यता कमीच आहे. तर आधी त्या फोटोंसाठी असलेल्या जागांवर फोटो ची लिंक पेस्ट करून घ्यावी.


स्क्रोल करत खाली येऊन सगळ्या लिंक योग्य ठिकाणी टाकल्यावर (पेस्ट केलेल्या लिंक सोडून त्याच चौकटीत इतरत्र क्लिक केल्यावर) कीबोर्ड वर ctrl + A दाबून सिलेक्ट ऑल करून ctrl + C दाबून त्या चौकटीतला सगळा कोड कॉपी करून तो खाली पूर्वपरीक्षण करण्यासाठी दिलेल्या एडिटरच्या डाव्या बाजूच्या चौकटीत पेस्ट करावा.

पूर्वपरीक्षण करा! ह्या बटणावर क्लिक करा आणि उजवीकडच्या बाजूच्या चौकटीत दिसणारा स्लाईड शो समाधान कारक असेल (इथे तो आकारात लहान दिसेल पण प्रत्यक्षात 800 px चा दिसेल.) तर डाव्या बाजूच्या चौकटीतला सगळा कोड कीबोर्ड वर ctrl + A दाबून सिलेक्ट ऑल करून ctrl + C दाबून हा सगळा कोड कॉपी करून नोटपॅड मध्ये पेस्ट करावा आणि File मेनू मधून Save As...वर क्लिक करून वरती destination folder सिलेक्ट केल्यावर खाली File name मध्ये तयार होणाऱ्या फाईल साठी आवडेल ते नाव कुठेही स्पेस न देता टाईप करा आणि त्याच्या पुढे .html (डॉट एचटीएमएल) हे एक्स्टेन्शन जोडा. (मिपावर प्रदर्शित करायचा असेल तर फाईलचे नाव तुमचे मिपा सदस्यनाव + काही अंक जोडावे अर्थात कुठेही स्पेस न देता आणि एकापेक्षा जास्त फाईल्स बनवायच्या असतील तर प्रत्येकीचं नाव वेगळं ठेवा.) त्यानंतर त्याच्याच खाली असलेल्या Save as type च्या ड्रॉपडाउन मेनू मध्ये All Files सिलेक्ट केल्यावर शेवटी Save बटणाच्या आधी असलेल्या Encoding च्या च्या ड्रॉपडाउन मेनू मध्ये UTF-8 सिलेक्ट करून मग Save बटन दाबा.

स्लाईड शो सेव्ह करण्या साठी तुम्ही जो फोल्डर तयार केला असेल त्यात info.txt नावाची एक text फाईल तयार करून ठेवा जिचा उपयोग आपल्याला स्लाईड शो धाग्यात समाविष्ट करण्यासाठी लागणारी embed code सेव्ह करून ठेवण्यासाठी होईल.

*****

आता हि तयार झालेली स्लाईड शोची HTML फाईल प्रदर्शित करण्यासाठी ती लाईव्ह सर्व्हरवर होस्ट केलेली असणे आवश्यक आहे. त्यासाठी खाली दिलेल्या चौकटीत https://myslideshow.matalli.com ह्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे.

(सदस्य नाम तुम्ही कुठलही घेऊ शकता पण लक्षात ठेवण्यासाठी सोपे म्हणून मिपावरचे सदस्यनाम घेणे सोयीस्कर.)

नोंदणी झाल्यावर त्या संकेतस्थळावर Login करा आणि खाली असलेल्या Upload File ह्या बटणावर क्लिक करा. समोर दिसणाऱ्या अपलोड फॉर्म मधील 'Browse...' वर क्लिक करून जी html फाईल होस्ट करायची आहे ती निवडा आणि Upload ह्या बणावर क्लिक करा.
फाईल यशस्वीरीत्या अपलोड झाल्यावर खालील प्रमाणे संदेश स्क्रीनवर दिसेल.

xyz.html is Uploaded Successfully.

Copy the below code to embed this file.

<iframe src="https://myslideshow.matalli.com/uploads/xyz.html" style="height:720px;width:100%;border:none;"></iframe>

तो स्क्रीनवर दिसणारा iframe चा कोड कॉपी करून (आधी आपल्या रेकॉर्ड साठी info.txt ह्या फाईल मध्ये सेव्ह करून मग) मिपावरच्या आपल्या धाग्यात जिथे तो दर्शवायचा आहे त्या ठिकाणी पेस्ट करा. धाग्याचे पूर्वपरीक्षण करा, तुमचा स्वनिर्मित 'स्लाईड शो' त्याठिकाणी दिसेल.
वरील सर्व प्रक्रिया इथल्या इथेच करणे शक्य आहे, तसेच अजून काही फाईल्स अपलोड करायच्या असल्यास वरील चौकटीच्या वरती लाल अक्षरांत दिसणाऱ्या My Slideshow ह्या लिंक वर क्लिक करावी.
६ फोटोंचा स्लाईड शो करण्याचे प्रात्यक्षिक खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये बघता येईल.

टीप: सदर फाईल होस्टिंग सेवा मोफत असल्याने तिथे अपलोड केलेल्या फाईल्सची माहिती साठवण्यात येत नसल्याने, आपण अपलोड केलेल्या फाईल्सची नावे आपल्या रेकॉर्ड मध्ये असणे महत्वाचे. एकवेळ embed code विसरलात तरी हरकत नाही पण अपलोड केलेल्या फाईलचे नाव माहिती असणे आवश्यक.

आपल्या घरच्या बाप्पाच्या फोटोंचे स्लाईड शो तयार करून, कलादालन मध्ये ते प्रदर्शित करून ह्या तंत्राचा श्रीगणेशा करूया!

टर्मीनेटर

माहिती आवडली !

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

23 Sep 2018 - 10:58 am | प्रसाद_१९८२

अतिशय उपयुक्त माहिती.
--
धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Sep 2018 - 11:15 am | डॉ सुहास म्हात्रे

उपयुक्त माहिती. वाखू साठवली आहे. यथोचित ठिकाणी उपयोग करण्यात येईलच !

यशोधरा's picture

23 Sep 2018 - 11:20 am | यशोधरा

छान. वाखू साठवली.

प्रसाद_१९८२, डॉ सुहास म्हात्रे आणि याशोधराजी आपले मनपूर्वक आभार _/\_

सुधीर कांदळकर's picture

25 Sep 2018 - 7:05 am | सुधीर कांदळकर

मस्त. धन्यवाद.

प्रचेतस's picture

25 Sep 2018 - 9:02 am | प्रचेतस

अत्यंत उपयुक्त.

धन्यवाद सुधीर कांदळकर आणि प्रचेतसजी _/\_

गुगल ब्लागस्पॅाट / वर्डप्रेस चालेल का?

हो... custom html insert ची सोय असलेला कुठलाही Platform चालेल.

दुर्गविहारी's picture

27 Sep 2018 - 11:24 am | दुर्गविहारी

अतिशय उपयोगी पडणारी माहिती. माझ्या आगामी काही धाग्यासाठी मला हि मदत पाहिजे होती, यासाठी तुम्हाला व्य.नि. करणारच होतो, पण तुम्ही धागा काढून हि उपयोगी माहिती सगळ्यांना उपलब्ध करुन दिलीत यासाठी धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

27 Sep 2018 - 2:46 pm | टर्मीनेटर

धन्यवाद दुर्गविहारीजी. _/\_

प्रसाद_१९८२'s picture

27 Sep 2018 - 1:20 pm | प्रसाद_१९८२

स्लाईड शोचा एक प्रयत्न.
---

---
सर्व फोटो नेट वरुन घेतले आहेत.

अरे वाह, छान झालाय बाप्पाच्या फोटोंचा स्लाईड शो. फक्त एक फोटो दिसत नाहीये.
एक सूचना द्यावीशी वाटतेय, शक्यतो सगळे फोटो सारख्या रिझोल्युशन चे वापरावे, म्हणजे फ्रेम चा आकार बदलणार नाही.
धन्यवाद.

टर्मिनेटर साहेब, आपल्या धाग्याचे मार्गदर्शन घेउन स्लाईड शो तयार करायचा प्रयत्न केला, पण जमले नाही. शक्य झाल्यास या संपुर्ण प्रक्रियेचा व्हिडीओ बनवून इथे टाकु शकता काय?

टर्मीनेटर's picture

4 Oct 2018 - 4:42 pm | टर्मीनेटर

दुर्गविहारीजी संपुर्ण प्रक्रियेचा व्हिडीओ धाग्यात समाविष्ट केला आहे.