तुम्ही अस कधी केलय का हो
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
तुम्ही अस कधी केलेय का हो?
तुम्ही अस कधी केले आहे का हो तुमच्या आई बाबाना घेऊन तुमचा पहीला पगार सेलीब्रेट करायला छानश्या हॉटेल मध्ये गेलाय. आता पर्यन्त कधी तरी घरातला गॅस सम्पलेला असताना नाइलाज म्हणुन तुम्ही हॉटेल मध्ये जाणारे. दोन राइसप्लेट चार जणात मागवणारे तुमचे कुटुम्ब थोडेसे बावचळलेल असते. तुमचा पहीला पगार खिशात खुळखुळत असतो. आई हळूच म्हणते मला इडली मागव. बाबा डाळ भात सांगतात बहीण व्हेनीला आइसक्रीम सांगते. हे सगळ पदार्थांचे दर बघून केलेली फरमाइश असते. इतके दिवस मन मारून ठेवायाची सवय असते. अचानक अशी बरी सुटेल ती. मग तुम्ही सर्व सूत्र आपल्या हाती घेता आईला तिच्या आवडीची बिरयानी मागवता. बाबाना स्पेशल ड्यूलक्स राइस प्लेट, बहिणीला हाक्का न्यूडल्स आणि कपेचीनो. आई बाबा बहीण अरे कशाला इतक सगळ, इतक महागाच वगैरे म्हणत असतात. पण तुम्ही ऐकत नाही. हे सर्व मागीतल्यावर तुमच्या लक्षात येत की तुम्हाला तुमच्यासाठी काही मागवायाची काही इच्छाच राहिली नाहीये. तुमच पोट सुखाने भरलय. तुम्ही आईला बिरयानी खाताना बघाताय. आईने केलेली खिचड़ी तुम्हाला आठवतेय. तुम्ही बाबाना पुरी आणि भाजी खाताना बघाताय. त्यानी ऑफीस मधून कधी काळी आणलेली कुठल्याश्या समारंभतली जिलबीची चव तुमच्या जिभेवर रेंगाळतेय. बहीण केपेचेनो पीते आहे तुम्हाला आग्रह करते आहे पण तुम्हाला तिच्याबरोबर घेतलेला उसाचा रस आठवतोय. तिने मुद्दाम करुन दिलेल्या लिम्बाच्या सरबताची चव तुमच्या जिभेवर आहे अजून. तुम्ही काही खात नाही. ऑफीस मध्ये खाऊन आल्याच खोट सांगितले आहे पण हे खोट तुम्हाला मिळणार्या आनंदापुढे अगदी माफ आहे
खरंच तूम्ही अस कधी केलेय का हो? नसेल केल तर करून बघा.अगदी असच
प्रतिक्रिया
असलं काही मला झालं नाही. मी
सुंदर, तरल लेखन.
भारी....मी मुंबईच्या ताजमध्ये
मी माझा पहिला पगार देवापुढे
पहिला पगार आई कडे दिला होता .
नसेल केल तर करून बघा.अगदी असच
बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता
छान लेखन! खरचं सारखं मन मारून