कवठेगुलंद ते शिवपुरी अक्कलकोट पदयात्रा.

Primary tabs

खुशि's picture
खुशि in भटकंती
9 Jul 2018 - 7:24 pm

।। कवठगुलंद चे गुरुतुल्य नाना ॥
नाना - किर्तनकलाशेखर,किर्तनाचार्य,किर्तनचुडामणी,किर्तनकौस्तुभ,किर्तनभूषण, किर्तनगानकौस्तुभ,किर्तन कलासागरअशा महाराष्ट,मध्यप्रदेश सरकारने दिलेल्या पदव्यांनी विभूषित रेडिओस्टार ह.भ.प.श्री.नारायण श्रीपाद काणे या गुरुतुल्य ऐंशीवर्षांच्या तरूण उत्साही व्यक्तिमत्वाची ओळख,परिचय आणि सहवास या कवठेगुलंद ते शिवपुरी अक्कलकोट पदयात्रेत मला मिळाला ही मैया आणि मोरयाची क्रृपा.नर्मदे हर.
नानांच्या घराण्यात पांच पिढ्यांची किर्तन परंपरा आहे भीमसेन जोशीजीं सारख्या गोड पहाडी आवाजाची ईश्वरी देणगी नानांना लाभली आहे. अक्कलकोट शिवपुरीच्या परम सद्गुरु गजाननमहाराज यांचा क्रॄपाशिर्वाद आणि दिक्षा नानांना प्राप्त झालेली आहे.धर्म,पर्यावरण,जीवन यांच्यासंरक्षणासाठी ज्याच्याशिवाय पर्याय नाही असे अग्निहोत्र करण्याची व त्याचा प्रसार करण्याची परमसद्गुरुनी दिलेली जबाबदारी कर्तव्यनिष्ठेने पार पाडण्याचे काम नाना निरंतर गेल्या पन्नास वर्षां पासून करत आहेत. अग्निहोत्राचा प्रसार करणे यासाठी किर्तनाच्या माध्यमातुन ते अखिल भारतवर्षात भ्रमण करतअसतात आणि या त्यांच्या कर्तव्यात त्यांची साथ करत आहेत त्यांच्या पत्नी सौ. सुमति नारायण काणे,म्हणजे सर्वांच्या माई.
परम सद्गुरु गजाननमहाराजां बरोबरच चारीपिठांचे शंकराचार्य,प.पू श्रीधरस्वामी,प.पू. नानामहाराज तराणेकर,प.पू.भक्तराजमहाराज,प.पू. गुळवणीमहाराज,स्वामी स्वरुपानंद यांचेही आशिर्वाद नानांना मिळाले आहेत व या सर्वांसमोर किर्तनसेवा सादर करण्याचे भाग्यही लाभले आहे. परम सद्गुरु गजाननमहाराजांनी सरसंघचालक गोळवलकर गुरुजींना अग्निहोत्र दिले होते तर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना नानांनी अग्निहोत्र दिले आहे.
गेली पंचेचाळीस वर्ष जेष्ठ वद्य दशमीला ही कवठेगुलंद ते शिवपुरी अक्कलकोट पदयात्रा सुरु आहे.परमसद्गुरु गजानन महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून ही पदयात्रा पंधरा दिवसात अक्कलकोटला पोहोचते.उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी मी गेले असताना तिथे माझी परिक्रमाभगिनी अनुपमा देवधर हिने मला या पदयात्रेबद्दल सांगितले,आणि पदयात्रा,भटकंती ही माझी आवड असल्यामुळे मी गेल्यावर्षी प्रथम या वारीला गेले आणि यंदाही ८/६/२०१८ ते २२/६/२०१८अशी ही वारी मैया,मोरया आणि सद्गुरक्रृपेने सुफल संपुर्ण झाली.
क्रमशः

प्रतिक्रिया

Ram ram's picture

13 Jul 2018 - 5:27 pm | Ram ram

छान

कविता१९७८'s picture

14 Jul 2018 - 2:36 pm | कविता१९७८

मस्त