विश्लेषित धर्मांतरण

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
1 Jun 2018 - 2:20 pm
गाभा: 

* लेखातील आमेरीका असे सर्व उल्लेख युनायटेड स्टेट्स ऑफ आमेरीका च्या संदर्भाने आहेत

आधूनिकोत्तर संशोधनात एकुणच विश्लेषण आणि विशेषतः संगणकीय विश्लेषण हि महत्वाची शाखा झाली आहे. आपल्यातील बहुतेकांना केंब्रीज अ‍ॅनालिटीका = ? ची अलिकडेच चर्चा झाल्याचे स्मरत असेलच. संगणकीय विश्लेषण बद्दल सर्वसाधारण शोध घेताना , योगायोगाने 'विश्लेषित धर्मांतरण' या फ्रेजचे दोन वेगवेगळे अर्थ होतील अशा दोन शोधांवर पोहोचलो.

पहिला शोध opindia नावाच्या वेबसाईट वरील ३० मे २०१८ची एक बातमी दिसतीए , बातमीच्या शीर्षकाचा अनुवाद फेसबुक आणि गुगलवरील हिंदू युजर्सना इस्लामिक जाहीराती असा काहीसा होतोय . (पुढे वाचण्यापुर्वी या बातमीत दिलेल्या जाहिराती बरोबर असतील तर त्यात प्रथमदर्शनीतरी कायद्याच्या परिघात न बसणारे काही दिसत नाही याची नोंद घ्या). माझा फेसबुकचा वापर फारच कमी आहे त्यामुळे मला स्वतःस बातमीचा दुजोरा देणे कठीण असावे. या बातमीचा स्वतंत्र आंतरजालीय वृत्त दुजोरा मिळू शकला नाही. पण गार्डीअन वृत्तपत्राची Facebook lets advertisers target users based on sensitive interests हि १६ मे २०१८ची बातमी दिसली तेव्हा हे सर्वस्वी अशक्य नसावे.

रिअ‍ॅक्ट होण्यापुर्वी जरासे थांबा'विश्लेषित धर्मांतरण' या शब्दाचा दुसरा अर्थ धर्मांतरणाचे विश्लेषण होतो. भारतीय रिस्पॉन्स अशा वेळी सर्वसाधारण पणे अक्रसताळा, घाईने निराधार अथवा व्यक्तिगत टिका (बचाव) करणारा पण अभ्यासपूर्ण आणि तर्कसुसंगतते पासून दूर असण्याची शक्यता अधिक असते का ? तेच मी प्यु रिसर्च सेंटर नावाच्या वेबसाईटवर पोहोचलो. आमेरीकेत सध्या होत असलेल्या धर्मांतरणाचे स्वरुप व्यवस्थित गोळा आणि संशोधन केलेल्या आकडेवारीवर अवलंबून होते. तर या प्यु रिपोर्टच्या निमीत्ताने आमेरीकेत होणार्‍या धर्मांतरणाची स्थिती अभ्यासूया.

२६ जाने २०१८ च्या या प्यु रिपोर्टचे नाव The share of Americans who leave Islam is offset by those who become Muslim असे आहे . त्यातील ठळक मुद्दे देतो (सविस्तर मूळ वृत्त वाचणे अधिक उत्तम )

१) जसे २२ टक्के ख्रिश्चन म्हणून मोठे झालेले जसे स्वतःचे ख्रिश्चनत्वाची ओळख देत नाहीत तसे २३ टक्के मुस्लिम म्हणून मोठे झालेले मुस्लिमत्वाची ओळख देत नाहीत .

(कदाचित हा सर्वसाधारण मानवी एक्सारखेपणा असेल तर भारतात अशीच आकडेवारी असण्यास हरकत नाही , भारतात १५% च्या आसपास नास्तीक असल्याचे अलिकडे कुठेतरी वाचण्यात आले सगळी कडे सगळ्यांना नास्तिकत्व उघडपणे बोलून दाखवता येत नाही त्यामुळे खरी आकडेवारी २० -२५ टक्क्यांच्या घरात असल्यास नवल नाही - चीन सारख्या ठिकाणी अस्तीकत्व उघडपणे सहज कबूल करता येत नाही तर एकुण अशा आकडेवारींसाठी अपवाद ठेवावे लागतात)

२) पण इस्लामला जवळ पास २३ टक्के नवे कन्व्हर्शन मिळत आहे . ( तर ख्रिश्चन धर्माला केवळ ६ टक्के नवे कन्व्हर्शन मिळत आहे)

( मुस्लिमांवर कट्टरतेचे आरोप असून आणि ख्रिश्चन अ‍ॅप्रोच सर्वसाधारण अभ्यासपूर्णपणे तोंड देण्याचा असूनही अशी स्थिती दिसते आहे)

३) त्यांच्याच २०१७च्या एका रिपोर्टचा हवाला देऊन इस्लाम त्यागणार्‍यांचे वर्गीकरण दिले आहे. ईस्लाम सोडणार्‍या २४ टक्क्यातील ५५ टक्क्यानी ईस्लामिक धार्मीक ओळख थांबवली -म्हणजे दुसरा धर्म घेतल नाही , २२ टक्क्यानी ख्रिश्चन धर्म स्विकारला , २१ टक्के इतर अनेक धार्मीक अथवा पंथ अथवा तत्वज्ञानात विभागले गेले (ज्यात कोणतेही स्पिरिच्युअलीझम ज्यू बौद्ध, हिंदू असे अनेक आले)

४)
* २०१७च्याच सर्वे मध्ये ईस्लाम सोडणार्‍यांना ईस्लाम सोडण्याचे कारण विचारले असता
२५ टक्क्यांनी धार्मिक विषयक कारणे सांगितली जसे १२ % नी (२५ टक्क्यातील १२ टक्के) धर्माच्या ऑर्गनाईज्ड स्वरुपाबद्दल नापसंती दाखवलेली दिसते, ईश्वरावर विश्वास नसलेले ८ टक्के , केवळ स्वभाव धार्मिक नाही असे कारण देणारे ५ % ;

* २० % तिल ( २५ टक्क्यातील २० % ) ९% नि याच धर्मात मोठे झालो तरी या विश्वासांशी जोडले जाऊ शकलो नाही असे सांगितले , ७% इस्लामिक शिकवणीशी सहमत नसणे , इतर धर्म अथवा तत्वज्ञानास प्राधान्य १६ टक्के , १४ टक्के व्यक्तिगत जाणिवांचा विकास जसे प्रगल्भता आणि शिक्षणामुळे आलेला विवेक

*इस्लाम सोडणाऱयांपैकी २२ टक्के मूळचे इराणी होते

५) नव्याने इस्लाम स्वीकारणार्यापैकी मेजॉरिटी ख्रिश्चन होते , ५३ टक्के प्रोटेस्टंट , २० टक्के केथोलिक , १९ टक्के इस्लाम स्वीकारण्या पूर्वी कोणत्याही धर्माची ओळख सांगत नव्हते , उरलेले ८ टक्के इतर धर्मातून आलेले होते

**तुलनेस एक ओमान मधील वृत्त पाहू ( गल्फ मध्ये ओमान त्यातल्या त्यात सर्वाधिक परधर्म सहिष्णू समाजाला जातो ) नौकरी निमित्त परदेशातून ओमान मध्ये आलेल्या ३००० जणांनी (वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात ) इस्लाम स्वीकारला त्यातले अधिक लोक युरोपीय नंतर भारतीयांचा क्रमांक लागतो .

**संदर्भ http://timesofoman.com/article/135453/Oman/26-expat-women-convert-to-Isl...

६) प्यू रिपोर्ट कडे पुन्हा येऊ इस्लाम स्वीकारण्याची जी कारणे दिली गेली त्यात

* २५ % नि (म्हणजे २५ %चे २५ % ) स्वतः:च्य आधीच्या धर्मापेक्षा इस्लामचे विश्वास आणि शिकवणूक आवडता असल्याचे सांगितले
* २१ टक्क्यांनी इस्लामिक साहित्याचा अभ्यासले ते आवडले म्हणून इस्लाम स्वीकारल्याचे सांगितले
* १० टक्के इस्लामिक समुदायाचा भाग म्हणून ओळख मिळावी म्हणून
* ९ टक्के विवाहांमुळे अथवा नात्यातील कुणी मुस्लिम झाले आहे म्हणून
* ९ टक्के एखाद्या मित्राने अथवा एखाद्या पब्लिक प्रिचर (उदा झाकीर नाईक हे लक्षात येण्यासाठी उदाहरण दिले त्या रिपोर्ट मध्ये कुणाचीही नावे नाहीत )

लक्षात घ्या कि अमेरिकेच्या शासकीय जनगणनेत धार्मिक जनगणनेचा समावेश होता नसल्यामुळे अधिकृत आकडे मिळत नाहीत . प्यू सारख्या सर्वेक्षण संस्थानची आकडेवारी हाच मार्ग शिल्लक राहातो प्यूच्या दुसर्या रिपोर्टमधील अंदाजानुसार २०१७ मध्ये अमेरिकेच्या लोकसंख्येच्या अदमासे १.१ टक्के (म्हणजे ३४ लाखाच्य आसपास ) मुस्लिम होते . लोकसंख्या वृद्धिदर आणि स्थलांतर यामुळे साधारणतः: सध्या वर्षाकाठी एखादा लाखाने अमेरिकेतील मुस्लिम जनसंख्या वाढते आहे . मुस्लिमांची अमेरिकेच्या २ टक्के लोकसंख्या दुप्पट होण्यास २०५० साल उजाडू शकते .

उपरोक्त प्यू विश्लेषणात मुस्लिम बनणाऱयांची रंगभेदानुसार वर्गीकरण दिसत नाही पण किमान इस्लाम स्वीकारल्या जाण्याच्या कारणात रंगभेदाचे कारण प्रथमदर्शनाची तरी दिसत नाही . आणि स्त्री पुरुष असे वर्गीकरणही दिसत नाही .

आता उपरोक्त प्यू विश्लेषणातून जाणवणारी गोष्ट हि कि इस्लामची सर्वसाधारण प्रतिमा नकारात्मक रंगवलं जाऊनही त्यांना ख्रिश्चन ते इस्लाम असा धर्मपरिवर्तनाच्या प्रमाण ब बऱ्या पैकी आहे ., पण अमेरिकेची बहुसंख्य लोकसंख्या ख्रिश्चन आहे असेही असू शकते .आणि अमेरिकेच्या लोकसंख्ये प्रोटेस्टंट अधिक आहेत आणि केथोलिक कमी तेच पर्सेंटेज धर्मान्तरात रिफ्लेक्ट होता असण्याची शक्यता असू शकते .

विवाहामुळे होणारी धर्मान्तरे तशी कमी दिसतात पण याचे कारण पुन्हा एकदा मुस्लिमांची तेथील लोकसंख्या कमी असणे असू शकेल . पब्लिक स्पेकिंग प्रिचर चा प्रत्यक्ष प्रभाव तरी कमी दिसतो पण जाहिरात पब्लिक प्रिचिंग आणि अगदी टिकेमुळेही एखादा धर्म काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाण्याची प्रवृत्ती बळावू शकते .

आपण भारतीय आहोत तेव्हा हे अनुषंगिक अवांतर : अमेरिकेसारख्या देशात काय होऊ शकते याचा यामुळे अंदाजा येण्यास मदत होईल असे वाटते .
भारतातील परिस्थितीत फरक नक्कीच असू शकतो .

इराणच्या इतिहासातील (आणि काही प्रमाणात पाकिस्तानच्या) इस्लामीकरणात इस्लामला फेव्हरेबल प्रॉपर्टी आणि टेक्सेशन लॉ आणणे हे एक महत्वाचे कारण होते असे वाचल्याचे आठवते . युद्धात हरलेल्या अथवा कोणताही गुन्हा केलेल्या परधर्मीय व्यक्तीस इस्लाम कबूल केल्यास माफ करण्याचे आमिष होतेच . धर्मान्तर केल्यास वाळीत टाकण्याची प्रथा भारतातील नव्या धर्मान्तराच्या प्रमाणास कमी ठेवत राहिली तरी धर्मान्तरिता झालेल्यांना वापस येण्याचा मार्ग बंद होणे किंवा त्यावर मोठ्या अटी लादल्या जाणे चुकीचे होते . अनावश्यक प्रमाणातील आहार शुचिता म्हणजे चुकीने फसवणुकीने मांसाहार झाला तरी धर्म बाह्य करण्याचे प्रकार विचित्र होते . जन्माधारित जातीय विषमतेचे धर्मान्तरास कारण होणे अजूनही हिंदू परंपरावाद्याना नीटशी समजत नाहीत पूर्वी किती अवघड गेले असेल . एकदा अद्वैततत्व स्वीकारल्या नंतर अनेक देवता आणि मूर्तींची पूजा का केली जाते ह्याचे नीटसे यशस्वी तात्त्विक समर्थन बहुतेक हिंदूंना जमत नाही. त्या शिवाय हजार वर्षांच्या आसपास सोबत होऊनही इस्लाम आणि अरेबिकचा (ख्रिश्चन) धर्माचा सुद्धा अभ्यासकरून इस्लाम पेक्षा (आणि ख्रिशनं धर्मापेक्षा ) आपला हिंदू तत्वज्ञान आणि संस्कृती अधिक काय देते हे मुद्देवार पुढे ठेवण्यास (आणि मुद्देवार टीका करण्यातही ) हिंदू धर्मीय सातत्याने कमी पडत आले आहेत . त्या शिवाय जो काही तौलनिक अभ्यास झाला त्यात सुन्नी पंथापेक्षा शिया आणि सुफी पंथाचा विचार अधिक केला गेला त्यात सुन्नी विचार आणि तद्नुषंगाने आपल्या मुद्यांची मांडणी नेहमी सुटत गेली आहे . अनेकेश्वर आणि मूर्ती पूजा नसलेले भारतीय संस्कृतीतील सांस्कृतिक आणि पंथीय पर्याय उपलब्ध असूनही आकर्षकपणे पुढे ठेवण्यात हिंदू कमी पडले एवढेच नाही तर इतर अनेक विचारांना योग्य बदल करून आपल्याच धर्माचे वेगवेगळे पंथ म्हणून सामावून घेणेही शक्य होते तोही मार्ग अद्यापही का कोण जाणे चोखाळला गेला नाही. वास्तूत: हिंदू तत्वज्ञान सर्वाधिक उदार असूनही संकुचित प्रवृत्ती हिंदू तत्वज्ञानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नास्तिकतेसही सामावून घेण्याची क्षमता असून त्यांचा उपयोग इतर तत्वज्ञानाशी तात्त्विक दोन हात करण्यासाठी वापरण्याऐवजी आपल्याशी जवळीक असलेल्यानाच दूर लोटण्याचे शेखचिल्ली पाऊल सातत्याने उचलत राहतात हेही दुर्दैवी आहे .

असो धागा लेखाचा मुख्य विषय 'विश्लेषित धर्मांतरण' आहे .

* अनुवादात किंवा तथ्यात त्रुटी असेल तर चुभूदेघे . चर्चा सहभागासाठी अनेक आभार .

संदर्भ

* http://www.pewresearch.org/fact-tank/2018/01/26/the-share-of-americans-w...

* http://www.pewresearch.org/fact-tank/2018/01/03/new-estimates-show-u-s-m...

* http://timesofoman.com/article/135453/Oman/26-expat-women-convert-to-Isl...

* http://www.opindia.com/2018/05/hindu-users-targeted-with-islamic-ads-on-...
google/

* आणखी एक लेख

* https://www.theguardian.com/technology/2018/may/16/facebook-lets-adverti...
based-on-sensitive-interests

* आमेरीकन स्टॅटीस्टीक साठी इण्ग्रजी विकि लेख सन्दर्भा साठी वापरला नाही पण ज्यांना अभ्यासायचा आहे त्यान्च्यासाठी दुवा

प्रतिक्रिया

manguu@mail.com's picture

1 Jun 2018 - 5:20 pm | manguu@mail.com

छान लेख

मंदार कात्रे's picture

2 Jun 2018 - 7:55 am | मंदार कात्रे

डोके थंड ठेवून हिंदूनी यावर विचार करण्याची खूप आवश्यकता आहे .

फेसबुक कडून येणार्‍या परधर्माच्या जाहिराती संदर्भात निषेध नोंदवण्याची सोय कुठे उपलब्ध आहे काय?

माहितगार's picture

2 Jun 2018 - 8:15 am | माहितगार

फेसबुक ची अद्ययावत आणि सखोल माहिती असणारे कुणि असेल तर मार्गदर्शन करु शकेल. संवेदनशील माहिती व्यक्तीच्या कंसेंट शिवाय वाप्परण्यावर भारता पेक्षा युरोपातून दबाव देणे कदाचित सोपे असावे . आमेरीकी आणि युके मधील हिंदू अ‍ॅसोसिएशन्सना प्रयत्न करुन पहाता यावा असे वाटते.

फेसबुक वरुन एक वेळ खाती बंद करता येतील पण गूगलचे काय करणार ?

पण गूगल आणि फेसबूक ऐकत नसेल तर काऊंटर अ‍ॅडव्हर्टाईजमेंट्स देण्या शिवाय पर्याय रहात नाही.

माहितगार's picture

2 Jun 2018 - 8:18 am | माहितगार

सदस्य खाती मोठ्या प्रमाणावर बंद झाली तर दबाव येऊ शकावा.

मंदार कात्रे's picture

2 Jun 2018 - 8:22 am | मंदार कात्रे

गूगल आणि फेसबूक ऐकत नसेल तर काऊंटर अ‍ॅडव्हर्टाईजमेंट्स देण्या शिवाय पर्याय रहात नाही.

नक्कीच!

माहितगार's picture

2 Jun 2018 - 8:49 am | माहितगार

जग्गी वासूदेव आणि नाईक युट्यूब प्रवचन तुलना बद्दल लेख लिहिणार होतो पण या धाग्याला प्रतिसाद नसल्यामुळे थांबलो होतो आता तोही लेख लिहिण्यास हरकत नसावी असे वाटते. बघतो जमले तर आजच टाकतो.

manguu@mail.com's picture

2 Jun 2018 - 8:51 am | manguu@mail.com

काउंटर एड म्हणजे नेमके काय अन कुठे छापणार ?

manguu@mail.com's picture

2 Jun 2018 - 8:51 am | manguu@mail.com

काउंटर एड म्हणजे नेमके काय अन कुठे छापणार ?

manguu@mail.com's picture

2 Jun 2018 - 8:53 am | manguu@mail.com

फेसबुक गुगल लांब राहिले, मायबोलीवरही अशा एड यायच्या , एडमीन बोलले की कोणती एड यावी हे ते ठरवू शकत नाहीत

माहितगार's picture

3 Jun 2018 - 2:53 pm | माहितगार

ह्यापण गूगलवरुनच आलेल्या असतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2018 - 1:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान लेख !

अनेकेश्वर आणि मूर्ती पूजा नसलेले भारतीय संस्कृतीतील सांस्कृतिक आणि पंथीय पर्याय उपलब्ध असूनही आकर्षकपणे पुढे ठेवण्यात हिंदू कमी पडले एवढेच नाही तर इतर अनेक विचारांना योग्य बदल करून आपल्याच धर्माचे वेगवेगळे पंथ म्हणून सामावून घेणेही शक्य होते तोही मार्ग अद्यापही का कोण जाणे चोखाळला गेला नाही.

इतर धर्मांनी, विशेषतः अब्राहमिक (इस्लाम व ख्रिश्चियानिटी) धर्मांनी, साम-दाम-दंड-भेद वापरून इतरांना आपल्या धर्मात ओढण्याच्या प्रक्रियेचे जे संस्थात्मक व्यवस्थापन केले आहे त्याला तोंड देण्यासाठी हिंदू धर्मात काहीच नाही... अगदी विस्कळीत असलेली व्यवस्थाही नाही... फारतर विचित्र, अविचारी आणि अस्थायी असलेली "घरवापसी" नावाची 'नि जर्क' रिअ‍ॅक्शन आहे... जिचे धर्माशी कमी आणि '१५ मिनिटांच्या टिव्ही-प्रसिद्धीशी' जास्त घट्ट नाते आहे.

जे लोक अखंड भारत किंवा अखंड विश्व हिंदू बनण्याची वाट बघत आहेत, त्यांच्याकडून दुसर्‍यांना आपल्या धर्मात सामावून घेणे तर सोडाच, पण क्षुल्लक कारणावरून हिंदूंना धर्मभ्रष्ट जाहीर करून सतत अलगद दुसर्‍या धर्मांच्या जाळ्यांत ढकलले गेले आहे ! या कृतीला धर्मकारण म्हणणे हा बुद्धीचा अपमान आहे !

हिंदूधर्मात अनेक पंथ / उपपंथ / जातीभेद असणे हे एक कारण आहेच; पण, त्यांच्यात रोटीबेटी व्यवहाराला तीव्र विरोध असणे हे हिंदू धर्माला सर्वात जास्त मारक ठरलेले आहे. कोणी हिंदू धर्मात येत आहे असे म्हणाला तर, त्याला कोणत्या पंथ / उपपंथ / जातीभेदात सामावून घेणार आहात ? याचे उत्तर हिंदू धर्ममार्तंड देवू शकतात काय ???!!!

मंदार कात्रे's picture

2 Jun 2018 - 1:59 pm | मंदार कात्रे

इतर धर्मांनी, विशेषतः अब्राहमिक (इस्लाम व ख्रिश्चियानिटी) धर्मांनी, साम-दाम-दंड-भेद वापरून इतरांना आपल्या धर्मात ओढण्याच्या प्रक्रियेचे जे संस्थात्मक व्यवस्थापन केले आहे त्याला तोंड देण्यासाठी हिंदू धर्मात काहीच नाही...

यासंदर्भात खरोखर काहीतरी करण्याची इच्छा आहे . निदान सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून तरी अशी एखादी चळवळ स्थापावी अशी मनीषा कित्येक वर्षांपासून आहे ! कोणी मिपाकर पुढे आल्यास स्वागत !

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2018 - 3:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

माझ्या वरच्या प्रतिसादातील परिच्छेद २ व ३ मधील समस्यांचे अगोदर निराकरण केल्याशिवाय (तुम्ही मतप्रदर्शन केलेल्या) परिच्छेद १ मधिल समस्येवर परिणामकारक उपाय व्यवहारात आणणे शक्य नाही.

धर्मग्रंथातील अथवा स्मृती ग्रंथातील काही श्लोक यांचे संकलन करून धर्मांतर करून सनातन धर्मात येणाऱ्या लोकांची व्यवस्था कशी लावावी यासंबंधी मार्गदर्शनपर छोटा ग्रंथ लिहावा म्हणजे तो सर्वमान्य होईल मी कुठलीही शंका त्या बाबतीत कोणीही घेऊ शकणार नाही

अहिंदू लोकांचे धर्मांतरण करण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एककेंद्रित नव्हे तर विकेंद्रित व्यवस्था असावी असे वाटते

गामा पैलवान's picture

2 Jun 2018 - 3:11 pm | गामा पैलवान

डॉक्टर सुहास म्हात्रे,

कोणी हिंदू धर्मात येत आहे असे म्हणाला तर, त्याला कोणत्या पंथ / उपपंथ / जातीभेदात सामावून घेणार आहात ? याचे उत्तर हिंदू धर्ममार्तंड देवू शकतात काय ???!!!

मी स्वयंघोषित हिंदू धर्ममार्तंड आहे. माझ्या मतीने या प्रश्नांची उत्तरं देतो.

'एको सत् विप्रा: बहुधा वदन्ति' वर विश्वास असलेला कोणीही हिंदू होऊ शकतो. त्याला 'हिंदू धर्मात यायची' गरज नाही. तुमचा एक उपरोक्त प्रश्न बघूया : 'कोणत्या जातिभेदात सामावून घेणार आहात?' हा प्रश्न मुळातून गंडलेला आहे. नवहिंदूस कोणतीही जात लावायची गरज नाही. आणि भेद लावायची तर नाहीच नाही. वीर सावरकरांच्या पतितपावन मंदिरात जात विचारली जात नाही. त्यातूनही कोणाला हवीच असेल तर खुशाल जन्मजात लावावी.

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2018 - 4:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचे उत्तर तात्विक चर्चा म्हणून ठीक आहे. सद्य व्यवहारात त्याचा किती उपयोग आहे / होतो आहे ?!

अपवादाने मुद्दा सिद्ध होत नाही.

आजची परिस्थिती अशी आहे की, जातींच्या उतरंडीला हात लावण्याची धमक भल्याभल्यांमध्ये नाही. परधर्मातून हिंदू धर्मात आलेल्या सर्वसामान्य (इथे कोणी असामान्य किंवा अपवादात्मक प्रसिद्ध व्यक्ती अपेक्षित नाही) नवहिंदू व्यक्तिशी तुमच्या आजूबाजूच्या लोकांपैकी किती लोक सहजपणे रोटीबेटी व्यवहार करायला तयार होतील याची प्राथमिक पाहणी केलीत तरी, मी काय म्हणतो आहे ते ध्यानात येईल. तथाकथित धर्ममार्तंडांपैकी कितीजण इतर आपल्या मुलांची लग्ने इतर (विशेषतः खालच्या समजल्या जाणार्‍या) जातीत करू द्यायला तयार आहेत ? त्यांत भर म्हणून, प्रत्येक जातीअंतर्गत असलेल्या उतरंडही काही कमी नाहीत.

संपूर्ण हिंदू समाज ढवळून (किमान बराचसा) एकजीव करण्याचे एखादे क्रांतिकारी अभियान यशस्वी होत नाही तोपर्यंत. "नवहिंदूस कोणतीही जात लावायची गरज नाही. आणि भेद लावायची तर नाहीच नाही." हे केवळ "हवेतले पुस्तकी वचनच" असेल. ते कितीही आदर्श असले तरी त्याने सद्य वस्तूस्थितीत काहीही फरक पडत नाही. कारण जोपर्यंत इतर हिंदू जातपात बाळगतात, तोपर्यंत ते मूळ हिंदूला आणि नवहिंदूलाही त्याची जात अभावितपणे विचारणारच. (अ) तथाकथित धर्ममार्तंड आणि (आ) जातीभेदामुळे ज्यांचे सामाजिक-आर्थिक-राजकिय हितसंबंध जपले जातात अश्या प्रत्येक जातीमधील बलिष्ठ-वरिष्ठ व्यक्ती, यांचाच हिंदूसमाज एकजीव करण्याच्या अभियानाला कडाडून विरोध असेल, हे सांगायला फार ज्ञानी असण्याची गरज नाही.

वीर सावरकरांच्या पतितपावन मंदिरात जात विचारली जात नाही.

असे "मनापासूनच नव्हे तर केवळ वरकरणीही मानणार्‍या-करणार्‍या एकूण सर्व व्यक्तींचा" संपूर्ण हिंदू समाजातला टक्का किती ? (आपण, सद्य व्यवहारात प्रचलित / शक्य असलेल्या लक्षात घेण्यायोग्य (significant) गोष्टींबद्दल चर्चा करत आहोत.) अशा लोकांपैकी किती लोक, नवहिंदू व्यक्तिशी सहजपणे रोटीबेटी व्यवहार करायला तयार होतील, याची प्राथमिक चाचपणी केली तरी, मी काय म्हणतो आहे ते ध्यानात येईल.

त्यातूनही कोणाला हवीच असेल तर खुशाल जन्मजात लावावी.

म्हणजे काय ? जन्मापासून कॅथॉलिक खिश्चन असलेली एखादी व्यक्ती हिंदू झाली तर तिची "कॅथॉलिक हिंदू" अशी जात असेल का ?!

गामा पैलवान's picture

2 Jun 2018 - 7:47 pm | गामा पैलवान

डॉक्टर सुहास म्हात्रे,

जमेल तसं शंकानिरसन करतो.

१.

जन्मापासून कॅथॉलिक खिश्चन असलेली एखादी व्यक्ती हिंदू झाली तर तिची "कॅथॉलिक हिंदू" अशी जात असेल का ?!

हवी असेल तर लावा की बिनधास्त.

२.

असे "मनापासूनच नव्हे तर केवळ वरकरणीही मानणार्‍या-करणार्‍या एकूण सर्व व्यक्तींचा" संपूर्ण हिंदू समाजातला टक्का किती ?

कितीही कमी वा जास्त असला तरी काय फरक पडतो?

३.

कारण जोपर्यंत इतर हिंदू जातपात बाळगतात, तोपर्यंत ते मूळ हिंदूला आणि नवहिंदूलाही त्याची जात अभावितपणे विचारणारच.

जातपात तर भारतातले मुस्लिम व ख्रिश्चनही पाळतात. त्यांना पडतात का कधी असले प्रश्न? या प्रश्नांचा फारसा बाऊ करू नये.

४.

नवहिंदू व्यक्तिशी तुमच्या आजूबाजूच्या लोकांपैकी किती लोक सहजपणे रोटीबेटी व्यवहार करायला तयार होतील ....

नाही झाले तर नवहिंदूंचा म्हणून एक समूह उत्पन्न होईलंच की. त्यांना आपसांत बेटीव्यवहार करता येतील. रोटीव्यवहार समान पंगतीने निकालात काढता येतील. किंबहुना रोटीव्यवहार निदान शहरांतून तरी सामायिक झाला आहे.

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2018 - 8:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

"हे सगळे केल्याने, या लेखात व चर्चेत असलेल्या मूळ समस्येचे 'आता तर नाहीच' पण 'भविष्यात कधितरी' निराकरण होईल का ?" असा विचार करून पहा, इतकेच सांगू इच्छितो व चर्चा पुरी करतो.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Jun 2018 - 5:26 pm | प्रकाश घाटपांडे

+1

माहितगार's picture

3 Jun 2018 - 2:52 pm | माहितगार

डॉ. सुहास म्हात्रे आणि topi दोघांच्याही आशंकां बद्दल प्रतिसाद लौकर देण्याचा प्रयास करेन

> "एकदा अद्वैततत्व स्वीकारल्या नंतर अनेक देवता आणि मूर्तींची पूजा का केली जाते ह्याचे नीटसे यशस्वी तात्त्विक समर्थन बहुतेक हिंदूंना जमत नाही."

हे म्हणजे एकदा सर्वांनी कपडे वापरायचे ठरवल्यावर लुंगी, पायजमा, धोतर, बर्म्युडा, लेंगा, जीन्स, पँट असे अनेक तर्‍हेचे कपडे का वापरले जातात असे विचारण्यासारखे नाही का? याचे उत्तर एकच, ज्याला पाहीजे त्या स्वरुपाचे / प्रकारचे कपडे वापरण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास असणे.

या विषयावर एक स्वतंत्र चर्चा धागा सुद्धा आहे. चर्चा सहभागासाठी आभार.