फिफा वर्ल्ड कप २०१८

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in काथ्याकूट
29 May 2018 - 2:34 pm
गाभा: 

fifa

यंदाचा फिफा वर्ल्ड कप रशिया मध्ये खेळवला जाणार आहे. भारत या खेळात मागे असला तरी भारतामध्ये या खेळाचे चाहते खूप संख्येने आहेत.
यंदा निवडणूकांमुळे या वर्ल्ड कपची वातावरण निर्मिती म्हणावी तशी झाली नाही.
यंदाचा वर्ल्ड कप रशिया मध्ये १४ जून पासून सुरू होणार आहे. त्याची माहिती आणि चर्चा करण्यासाठी हा धागाप्रपंच

या वर्षी एकूण ३२ टीम भाग घेणार आहेत . ( रशिया ही यजमान टीम आहे त्यामुळे त्यांना क्वालिफाय ना खेळता सहभाग मिळतो असे विकिने सांगितले , भारताला या प्रकारे आयोजन करून सहभागी व्हावे लागेल :) )

Groups
इटली , नेदरलँड आणि चिलि या बलाढ्य टीम यंदा नसतील .
या खेळात कोणतेही भाकीत करणे अवघड आहे . यंदाच्या स्ट्राँग टीम जर्मनी , फ्रान्स आणि पोर्तुगाल आहेत
ब्राझील , पोर्तुगाल आणि अर्जेंटीना या एकाद्या दुसर्‍या खेळाडू वर अवलंबून आहेत . ते ब्लॉक झाले तर यांचा परफॉर्मन्स ढासळतो पण ते ( नेमार , रोनाल्डो , मेस्सी) चालले तर मात्र टीम जोशात येतात.

डार्क हॉर्स : पोलंड , उरुग्वे , कोस्टा रीका यांचे भाकीत करता येणे अवघड आहे ह्या टीम धक्का देत सेमि फायनल पर्यंत पोचू शकतात
प्रत्येक देशाचे खेळाडू , व्यूहरचना , गोलकीपर , प्रशिक्षक यावर प्रतिसादात अपडेट करेन आणि सर्वांनी त्यात भर घालावी !

यंदाच्या फिफा वर्ल्ड कपचा शुभंकर
mascot

प्रतिक्रिया

Ranapratap's picture

11 Jul 2018 - 12:20 am | Ranapratap

0-0 दोन्ही संघांनी गोल करण्याच्या सोप्या संधी दवडल्या, फ्रान्स चा डिफेन्स जोरदार आहे. पहिला हाफ मध्ये सुंदर खेळ पाहिला मिळाला

Ranapratap's picture

11 Jul 2018 - 12:40 am | Ranapratap

1-0 उमतीती ने हेडरवर पहिला गोल केला,

sagarpdy's picture

11 Jul 2018 - 1:30 am | sagarpdy

काटे की टक्कर.
उमटेटी चा सेट पीस वरचा गोल वगळता दोन्ही संघांनी उत्तम बचाव दाखवला. आज बेल्जीयम चा लुकाकू टच मध्ये वाटला नाही, असता तर कदाचित अजून ३० मिनिटं जागाव लागलं असतं.
फ्रांस जबरा, नक्कीच जिंकणार कप.

कुणा एकावर अवलंबून नसलेल्या संघात "गोल कुणीही करो माझ्या संघाचा गोल" यामुळे जिंकतात.

मुक्तांगण's picture

12 Jul 2018 - 9:17 am | मुक्तांगण

गेले इंग्लंड पण बाहेर गेले. फ्रान्स विरूद्ध क्रोएशिया फायनल. तिसर्‍या क्रमांकासाठी इंग्लंड आणि बेल्जियम मधे लढत.
माझे मत फ्रान्सला. तिसर्‍यासाठी इंग्लंडला नक्कीच चान्स आहे!

कपिलमुनी's picture

13 Jul 2018 - 4:22 pm | कपिलमुनी

लाडके बाहेर पडून दोडके राहिल्याने धाग्यावर यायचा फार इंटरेस्ट राहिला नाहि.

या वेळी फायनल मध्ये फ्रान्स क्रोएशिया लढत असून फ्रान्सला संधी जास्त असेल .
दडपणाचा सामना करून , चुका टाळणे ( स्वयंगोल , पेनल्टी , कॉर्नर , हेडर वाचवणे) यावर निकाल अवलंबून असेल .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2018 - 9:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रोएशियाचं आक्रमण जबरा असतांनाही
फ्रांस ४ -क्रोएशिया २,

शेवटचे २० मिनिट बघुया काय काय होतंय.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2018 - 10:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फ्रान्सचा खेळ अजिबात आवडला नाही, पण त्यांनी ४ गोल केलेत हे मान्य करावे लागले. क्रोएशिया चांगले खेळले.

धागा कर्त्याचे मन:पूर्वक आभार.

-दिलीप बिरुटे

अंदाजाप्रमाणे फ्रांस विश्वविजेता. ही टीम स्पर्धेतील सर्वात तरुण टिम्स पैकी एक, अर्थात खेळात तेवढी परिपक्वता खेळात नव्हती हे खरं. पण कोठेही ही टीम पराभूत होणं शक्य आहे असंही वाटलं नाही.
यामुळे 2 गोष्टी जाणवल्या - गुणी टीम डावपेचात अपुऱ्या पडल्या, आणि पुढच्या वेळेस फ्रांस ची हीच टीम अधिक अनुभवी असणार, आणि अजून धुमाकूळ घालणार.

फ्रांस चे दणकून अभिनंदन.
अनपेक्षित निकलांमुळे ही स्पर्धा नक्कीच लक्षात राहील - रशियाची कामगिरी विशेषकरून.

दोन गोल फ्रान्सला फुकटचे मिळाले. एक पहिलाच सेल्फ गोल झाला. दुसरा पेनल्टि किकमधला,पण ही पेनल्टि विवादास्पद होती हे निवेदकानेही सांगितले. जर का खेळाडुचा हात लागलाच असेल तर तेही दुसरे कमनशिबच. फ्रान्सचे तिसरा चौथा गोल खरे गोल होते. फ्रान्सने एक विनोदी गोल ओढवून घेतला गोलकीपरच्या दुर्लक्षाने किंवा बाळुगिरीने.

यापुढे सरावलेल्या तिशीतल्या खेळाडुंना भाव देण्यापेक्शा नवख्या विशितल्या खेळाडुंवर भरोसा ठेवणार. क्रोशियाचे खेळाडू नंतर दमलेले दिसत होते.
एकूण खेळ फारच मजेदार झाला.

कालिनीच सारखा खेळाडू गैरशिस्त वागल्याने एक स्ट्रायकर कमी झाला, बहुधा त्यामुळे क्रोएशिया बाद फेरीत आल्यापासून पूर्ण १२० मिनिटे खेळत आली - डेन्मार्क, रशिया, इंग्रज - सगळ्यांविरुद्ध सामने ताणत गेले - बरेचसे तिशीला आलेले खेळाडू , त्यामुळे फटिग नक्की होता. शिवाय क्रोएशिया कडे मुख्य टीम चांगली असली तरी बेंच स्ट्रेंथ फार नव्हती.
त्यामुळे कमनशिबी होतीच क्रोएशिया पण त्यांच्याकडे प्लॅन बी नव्हता / प्लॅन बी करणे त्यांना शक्य नव्हते.