माझ्या स्वप्नातील भारत

हेरंब's picture
हेरंब in काथ्याकूट
26 Oct 2008 - 9:05 pm
गाभा: 

माझ्या स्वप्नातील भारत असा असावा.
१. कुठल्याही प्रकारचा जातिभेद वा धर्मभेद नसेल.
२. त्यामुळे अर्थातच कुठल्याही प्रकारच्या विशेष सवलती कोणालाही नसतील.
३. कुठलेही धार्मिक उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे केले जाणार नाहीत. कुठल्याही धर्माचे विशेष लाड होणार नाहीत.
४. लोक शांततेने रहातील, कुठल्याही प्रकारचे ध्वनिप्रदुषण नसेल.
५. सर्व समाज भ्रष्टाचारमुक्त असेल, तसे करणार्‍यास कडक शासन होईल.
६. सर्व नेते हे पारदर्शक प्रक्रियेने निवडले जातील, काम न केल्यास मतदारांना त्यांना परत बोलावता येईल.
७. सर्व क्षेत्रांत केवळ 'गुणवत्ता ' हाच निकष असेल.
८. सर्वसामान्य जनतेलाही आपली जबाबदारी पार पाडावी लागेल, नुसते सरकारवरच सर्व गोष्टींसाठी अवलंबून रहाता येणार नाही.
९. न्यायदान सेवा अत्यंत जलद, पारदर्शी व निपक्षपाती असेल.
१०. सर्वात् महत्वाचे - लोकसंख्या आत्ताच्या निम्मी असेल.

सर्व मिपा सदस्य यावर आपली मते मांडू शकतात.

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

26 Oct 2008 - 9:12 pm | सखाराम_गटणे™

मलाही असा भारत बघायला आवडेल. शेवटची अट जरा मुश्कील वाटते आहे.

पण असा भारत बघण्यासाठी काही दिवस (अदांजे ३ वर्षे) मानवी हक्के बाजुला ठेउन काही लोकांना समजवावे लागेल.

--
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

भास्कर केन्डे's picture

27 Oct 2008 - 10:08 pm | भास्कर केन्डे

१. प्रत्येक जन दैनंदिन कामासाठी शक्यतो सायकल वापरेल. लांबच्या प्रवसासाठी केवळ बसगाड्या, रेल्वे यांचा वापर करील.
२. प्रत्येक व्यक्ती दर वर्षी झांडांची कमीत कमी शंभर रोपटे लाऊन त्याचे संवर्धन करील.
३. पाण्याचा प्रत्येक थेंब लाख मोलाचा समजून त्याचा वापर केला जाईल.
४. रस्त्यांच्या दुतर्फा तसेच शेताच्या बांधांवर, डोंगरांवर तसेच अगळ्या मोकळ्या जमिनीवर उंच व हिरवी गर्द झाडी असेल.
५. प्रत्येक भारतीय दररोज किमान एक तास व्यायाम, योग व प्राणायाम करुन तंदुरुद्त राहिल. व काही व्याधी आल्याच तर जास्तीत जास्त आयुर्वेदाचा वापर करील.
६. या भूमीवर मानवांप्रमाणेच इतर पशु-पक्षी सुद्धा आनंदाने विहार करतील. त्यांच्या हत्त्या वा कत्तली मणुष्य करणार नाही.

टिप-या ओळी माझ्या इयत्ता आठवीच्या दैनंदीनीतून घेतल्या आहेत.

आपला,
(पर्यावरणवादी) भास्कर
आम्ही येथे वसतो.