“आॅपरेशन स्मिअर” आणि “निद्रिस्त भारत”

गब्रिएल's picture
गब्रिएल in जनातलं, मनातलं
22 Apr 2018 - 9:54 am

व्हॉसपवर एक म्येसेज फिर्तो आहे. आमाला लई इचार करनारा वाट्ला. फकस्त आप्ल्या फायद्याकडं नजर आसलेल्या बुद्दीमान लोकांला जरा तरी बुद्दी यावी या कारनाने या टिकानी द्येत हाहे.

=================================================

“आॅपरेशन स्मिअर” आणि “निद्रिस्त भारत”

©कल्पेश गजानन जोशी

देशातली आजची एकंदरीत परिस्थिती पाहता ब्रिगेडीअर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा एक सत्य भाकित वर्तविणारा लेख आठवतोय.

गेल्या वर्षी डोकलाम प्रश्नी मा. महाजन सरांचा “आॅपरेशन स्मिअर आणि भारत” हा लेख दैनिक पुढारीला वाचण्यात आला होता.

त्यात त्यांनी स्वत:च्या सैनिकी पेशाला शोभेल असे एक गुढ सत्य मांडले होते. ते गुढ यासाठीच, की ते कुणालाच माहित नव्हते. माहित झाल्यावरही त्यावर कुणी सामान्य व्यक्ती चटकन विश्वास ठेवणार नाही. परंतु त्यांचे ते गुढ आज खरे वाटु लागले आहे.

देशातील अस्थिर राजकिय सामाजिक परिस्थिती व वाढता असंतोष पाहता ब्रिगेडिअर महाजन यांनी वर्तवलेले भाकित स्पष्ट होऊ लागले आहे.

'आॅपरेशन स्मिअर आणि भारत' या आपल्या लेखात ब्रिगेडिअर हेमंत महाजन मांडतात:

“काळ बदलतोय तश्या युध्दनीती बदलत आहेत. शत्रुशी केवळ सीमेवर दोन हात न करता अन्य मार्गांनी कसे खिळखिळे करता येईल यासाठी नियोजनबद्ध डावपेच जगभरातील देश आखत अाहेत.”

"पाकिस्तानही चीनच्या मदतीने भारताला जागतिक स्तरावर बदनाम करण्याचे कारस्थान रचत आहे. या आॅपरेशनला '१९४५- आॅपरेशन स्मिअर' असे नाव देण्यात आले आहे.”

"तीन वर्षातील भारताची जगभरात उजळलेली प्रतिमा तसेच भारताचे परराष्ट्र व लष्करी धोरण पाहता भारत सरकार काश्मिरप्रश्नी काही नमते घेईल असे वाटत नाही."
"म्हणुनच पाकिस्तान व चीनसारख्या शत्रु राष्ट्रांनी भारताविरोधात इलेक्ट्राॅनिक मिडिया व सोशल मिडियाच्या माध्यमातुन आपले भाडोत्री लेखक, साहित्यीक व पत्रकार कामाला जुंपले आहेत. त्याचेच नाव 'आॅपरेशन स्मिअर'!"

या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे भारतात महिला, बालके, दलित, अल्पसंख्य तसेच धार्मिक स्थळे असुरक्षित आहेत, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत अशी सर्वदूर बोंब करणे. थोडक्यात काय तर भारत हा एक असुरक्षित व अस्थिर देश आहे अशी भारताची बदनामी करणे हेच त्या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट. या अभियानासाठी पाकिस्तान, चीन व मध्य पूर्व आशियातील वहाबी उग्रवादी संघटनांकडून तसेच आयएसआयकडून आर्थिक मदत उभी करुन युरोप व अमेरिकासारख्या देशांमध्ये भारताविरुद्ध अपप्रचार सुरु देखिल झाला आहे. आतापर्यंत २१५ कोटी डाॅलर्स यावर खर्च झाले असून २०१९ च्या निवडणुकांआधी यापेक्षा कैक पट खर्च या आॅपरेशन स्मिअरवर खर्च होईल असे भाकित यात दर्शविले आहे.”

आपणांस माहित असेलच, २०१४ ला सत्ता परिवर्तन झाले. भाजप सरकार सत्तेत आले. पण काय आश्चर्य, नवीन सरकार सिंहासनारुढ होत नाही तोच असहिष्णुतेवरुन देशभरात हलकल्लोळ माजला होता.

अनेक दिग्गज नेत्यांनी, साहित्यिकांनी आपली पदके व पुरस्काराचा त्याग केला होता. आॅपरेशन स्मिअरची ही सुरुवात होती का? भारतात असहिष्णुता वाढली आहे ह्याचा कंठशोष करुन कुणाला सांगणे होत होते?

पुढे थोड्याच दिवसांनी रोहित वेमुला प्रकरण घडले. रोहित वेमुलाची आत्महत्या नसुन मर्डर असल्याचा कांगावा केला गेला.

भाजप व विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना यात गोवण्यात आले. या प्रकरणापासुन देशात दलित असुरक्षित असल्याचा ढोल बडवण्यास सुरुवात झाली.

नंतर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. आतंकवादी अफजलगुरुच्या जयंत्या मयंत्या वामपंथी संघटनांकडून साजरी होऊ लागल्या होत्या. या देशद्रोही कृत्यास विरोध केल्यावर सर्व डाव्या वामपंथी संघटनांनी (काँग्रेससहित) 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे' अश्या फुशारक्या मारल्या. सर्व काही नियोजनबद्ध घडल्यासारखं वाटावं असे हे एक एक प्रकरणं आता विचार करायला भाग पाडत आहे.

जेएनयू प्रकरण शांत होते न होते तोच कश्मिरमध्ये हिंसाचार उफाळला. कारण काय तर मोस्ट वाँटेड आतंकवादी बुरहान वानी याचा भारतीय सैनिकांनी खात्मा केला होता.

बुरहान वानीच्या अंतयात्रेस लाखोच्या संख्येने त्याचे भक्त एकवटले होते व देशविरोधी घोषणा देत होते. या घटनेनंतर कित्येक दिवस कश्मिर खोरे धुमसत राहिले. भारतीय सैनिकांवर व पोलीसांवर दगडफेक होऊ लागली. काही पोलीस व सैनिकांना निर्घृणपणे मारले गेले. याला प्रत्युत्तर म्हणुन आतंकवाद्यांविरोधात नरमाईची भूमिका सोडून भारतीय सैन्याने उग्र रुप धारण केले. शेकडो आतंकवाद्यांना यमसदनी धाडले. याचे दु:ख झाले की काय म्हणुन विरोधी पक्षांसकट तथाकथित लोकशाहीवादी व मानवतावादी लेखक, साहित्यिक व पत्रकारांनी 'मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे' म्हणुन आवई उठवली.

भारतीय सैनिकांना व पोलीसांना एकटे गाठून दगडांनी ठेचून मारले जात होते, त्याचे दु:खाश्रू न ढाळता पॅलेट गनचा वापर करुन दगडफेक्यांना बंदूकितील छर्र्यांमुळे इजा होत आहे, याचे अधिक दु:ख या मंडळींना झाले.

आॅपरेशन संपले नव्हते. आव्हानेही संपली नव्हती.

आतंकवाद आणि नक्षलवादाच्या मुसक्या आवळल्या जात होत्या म्हणुन की काय चीन-पाकिस्तान अस्वस्थ झाले. म्हणुनच भारताला डिवचण्यासाठी गिलगीट-बाल्टीस्तानमधून ओबोर अंतर्गत रेशीम मार्ग तयार करण्यास चीनने सुरुवात केली. एवढेच काय तर डोकलाम वरही कब्जा करण्याचा प्रयत्न चीनद्वारा केला गेला. त्यातुनच डोकलाम विवाद उद्भवला. हा संवेदनशिल विवाद उभा ठाकला असताना चीन युद्धाची भाषा करत होता. चीनचे राष्ट्राध्यक्ष उघड उघड धमकी देत होते. युद्धाला कधी तोंड फुटेल सांगता येत नव्हते. एवढी गंभीर परिस्थिती उद्भवली होती.

भारताचे लष्कर प्रमुख सैन्याची हिंमत वाढवित होते. भारत सगळी आव्हाने पेलण्यास सक्षम असल्याचे सांगत होते. पण त्याचवेळी काही पत्रकार व लेखक चीन किती बलाढ्य व पराक्रमी व भारतापेक्षा शक्तीशाली आहे याचे कौतुक करत होते व भारतीय सैन्याला व युद्धसामुग्रीला कुचकामी ठरवुन भारताचेच खच्चीकरण करत होते. यालाच म्हणतात 'आॅपरेशन स्मिअर'!

पण आम्ही भारतीय नागरीक याला राजकिय खेळ समजुन बसलो आहोत. पण ब्लू व्हेलसारख्या या खेळात अंतत: नाश तर आपलाच नाही ना? याचा विचार करणे गरजेचे झाले आहे.

देशात जे काही घडते आहे ते सामान्य राजकारण नव्हे. राजकारण सत्तेसाठी असु शकते. पण सत्तेवर बसणारा व त्याला बसवणारा (रिमोट कंट्रोल) कोण हेही ठाऊक असावयास हवे. रिमोट कंट्रोल कोणत्या देशातून चालवले जात आहे हेही माहित असावे. कारण सत्तेसाठी राजकारण, राजकारणासाठी पक्ष, पक्षासाठी विचार, विचारासाठी संघटना व संघटनांचा 'जगावर राज्य' करणे हा हेतु असतो.

म्हणुनच कुणी अख्खं जग इस्लाममय करण्याचा विडा उचलतो, तर कुणी ख्रिश्चनमय करण्याचा.

कुणी सेक्युलरिजमचा प्रचार करतो तर कुणी कम्युनिजमसाठी लाल क्रांत्या करतो.

लढाया व युद्धांचे एकमेव कारण संपत्ती, पैसा, साम्राज्यविस्तार किंवा सत्ता एवढेच नसते. ब-याच युद्धांमागे हीच कारणे दिसतात, पण वैचारिक कारणे कधीही स्पष्ट केली जात नाही.

विषम विचारी असणे हेसुद्धा शत्रुत्व निर्माण होण्याचे एक कारण आहे. यातुनच निर्माण होतात संघर्ष व अराजकता. तेव्हा सत्तेमागचे वैचारिक दृष्टीकोनही समजुन घेणे महत्वाचे ठरते. एकदा का ते लक्षात आले की

• आपल्या देशात मानवाधिकाराचे उल्लंघन होतेय म्हणुन आक्रोश करणारे,
• अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन होते म्हणुन दंगा करणारे,
• दलित- मुस्लीम असुरक्षित आहे असे म्हणणारे,
• अफजल गुरुसारख्या आतंकवाद्याला आपला आयडाॅल मानणारे,
• भारत की बर्बादी तक जंग चलेगी म्हणणारे,
• नक्षलवाद्यांना व आतंकवाद्यांना मदत करणारे कोण आहेत व त्यांचा खरा चेहरा कोणता हे उघड होईल.
• २०१४ पासुन आजतोवर देशात कधी नव्हे इतके आंदोलनं व मोर्चे निघाले व निघताहेत.
• २०० वर्षात कधी नव्हे ते भीमा कोरेगांव प्रकरण आत्ताच कसे काय घडले? आता तर भीमा कोरेगाव प्रकरणामागे नक्षली भेजा असल्याचे समोर येत आहे.
• डोकलाम विवाद पुन्हा गरम होणे,
• बिहारमध्ये अचानक जातीय दंगली उसळणे,
• बंगालमध्ये रामनवमीच्या दिवशी हिंदूवर हल्ले होणे,
• अॅट्रोसीटी कायद्यात अंशत: बदल काय झाला देशात हिंसाचार उफाळणे तसेच,
• कश्मीर खो-यात १३ आतंकवादी मारले गेल्यानंतर लगेच दगडफेक सुरु होणे आपणांस काय सुचित करत आहे?
• नोटाबंदीमुळे कश्मिरमधल्या फुटिरतावाद्यांना व आतंकवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद काही काळ ठप्प झाली होती. दगडफेक करणा-या युवकांना कोण पैसे पुरवतो हे सर्वश्रुत झालेच आहे.

तेव्हा २०१९ मधल्या निवडणुका पाहता भारत सरकारला शक्य तितके बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल व मोदी सरकारच्या हाती देश असुरक्षित असल्याचा कांगावा लवकरच केला जाईल असे वाटते.

भारतातील काही वैचारिक गट असे आहेत, ज्यांचे पाठिराखे (किंवा रिमोट कंट्रोल) इतर देशातही आहेत.

भारतातला मुसलमान दुखावला गेला की अरब राष्ट्रे (इस्लामिक राष्ट्रे) धाऊन येतात.

भारतातल्या ख्रिश्चनांवर अत्याचार झाले की युरोपीयन देश मदतीला येतात.

भारतात वामपंथीयांवर अन्याय झाला की चीन पुढे सरसावतो. हे पाठिराखे त्यांचे म्हणणे युनायटेड नेशन्ससमोर मांडतातच शिवाय भारतातही लुडबूड करु लागतात.
नक्षलवाद व दहशतवाद या दोन विषवल्लींना तेच खतपाणी घालतात. खास याचसाठी तर त्यांनी ती पेरली आहेत.

भारताची प्रबळ परराष्ट्रनीती व मोदी सरकारने वाढवलेली मित्र राष्ट्रे यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा व प्रतिभा उंचावली आहे.

नाहीतर युनायटेड नेशन्सला भारतात लुडबुड करण्यास संधी मिळवुन द्यावी हाच त्यांचा कावा असणार.

परंतु सततच्या अपयशामुळेच पाकिस्तान व चीनला आता आॅपरेशन स्मिअरसारखे छुपे युद्ध करावे लागत आहे. याचा सामना प्रत्येक भारतीयाला करावा लागतोय. पण देशात घडणारी प्रत्येक घटना हे राजकारण आहे असे म्हणुन डोळेझाक करणे हे भारताच्या व भारतीयांच्या भवितव्याविषयी घोडचूक ठरेल.

“त्यासाठी आपल्या विवेकबुद्धीने घडणा-या घडामोडींचे अवलोकन करणे आवश्यक आहे.”

© कल्पेश गजानन जोशी
kavesh37. blogspot. com

=============================

आज बुद्दी गहाण ठ्यवली तर उद्या गुलामी करावी लागतेय ह्ये इतिहास सांगतोय, आसं बुद्दीमान लोकच म्हंत्यात बगा !

राजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

मोस्पीच्या साइटवरून घ्या.