वाल्मिकी रामायणावरील पहिल्या चित्राकृती कोणत्या ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
2 Apr 2018 - 2:01 pm
गाभा: 

माझ्या काही जिज्ञासा.

१) रामायणावर आधारीत सर्वात जुनी ज्ञात (सर्वप्रकारातील) चित्रे, शिल्पाकृती कोणत्या हे शोधण्यासाठी गूगल शोधले तर मला त्याचे चटकन उत्तर मिळाले नाही.

२) रामायणावरील पटचित्रे कुठेकुठे उपलब्ध आहेत आणि त्यातली सर्वात जुनी कोणती असतील असाही प्रश्न पडला

३) त्यातच ऋग्वेद आणि रामायणात चित्र हा शब्द मुख्यत्वे सुंदर / आकर्षक आणि इतर अर्थानी विशेषण स्वरुपात येतो असले दिसले. मग आकृती अथवा पेंटींग या अर्थाने 'चित्र' शब्द कोणत्या संस्कृत ग्रंथात कोणत्या श्लोकात सर्वप्रथम येतो असाही प्रश्न पडला तसेच आकृती अथवा पेंटींग साठी इतर समानार्थी शब्दांपैकी पहिले उल्लेख कोणते हेही जाणून घेण्यास आवडेल.

४) वाल्मिकी रामायणाच्या बालकांडात 'नाना चित्र कथाः च अन्याः विश्वामित्र सहायेन' चित्र हा शब्द विशेषणम्हणून येतो आहे का चित्रासोबत कथा या अर्थाने येतो आहे

५) महाभारतात 'चित्र' शब्द येत असावा पण समहाऊ माझ्या गूगल शोधात हा शब्दाचे काही खास शोध हाती लागले नाही. 'चित्र' हा शब्द रामायणात बर्‍यापैकी येतो पण महाभारतात कमी का की माझा शब्दशोध चुकीचा जात आहे ?