लोकसभा निवडणूक विरोधीपक्ष जागावाटपाचा फार्मुला कसा असावा ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
17 Mar 2018 - 9:11 pm
गाभा: 

समजा पुढच्या लोक्सभा निवडणूकीत (२०१९) भारतातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षास एकत्रित आव्हान (निवडणूक पूर्व गठबंधन) देण्याचे ठरवले आणि सल्लागार म्हणून जागावाटपाबाबत विरोधीपक्ष नेतृत्वाने तुम्हाला फार्म्युला सुचवण्यास सांगितले तर तुम्ही कशा स्वरुपाचे फार्मुले सुचवाल ?

पर्याय पहिला
१.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश असलेले गठबंधन
१.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल

पर्याय दुसरा

समजा कॉंग्रेसेतर तिसरी आघाडी उर्वरीत पक्षांचा एका महत्वपूर्ण गट बनवण्यात यश आले

२.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश नसलेले गठबंधन
२.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल

प्रतिक्रिया

विशुमित's picture

23 Mar 2018 - 12:07 pm | विशुमित

<<<माझ्यामते तरी पुढची आदर्श निवडणूक हि काँग्रेस + सगळे विरोधी पक्ष एकत्र विरुद्ध भाजप + सगळे एनडीए घटक पक्ष अशी सरळसरळ द्वि-पक्षी निवडणूक व्हावी. म्हणजे सरकार स्थापनेचे आणि स्थिरतेचे घोळ होणार नाहीत.>>>
==>> सहमत

पगला गजोधर's picture

23 Mar 2018 - 12:30 pm | पगला गजोधर

माझ्यामते तरी पुढची आदर्श निवडणूक हि काँग्रेस + सगळे विरोधी पक्ष एकत्र विरुद्ध भाजप + सगळे एनडीए घटक पक्ष अशी सरळसरळ द्वि-पक्षी निवडणूक व्हावी. म्हणजे सरकार स्थापनेचे आणि स्थिरतेचे घोळ होणार नाहीत.

.
आजिबात सहमत नाही आपल्या मताशी (पण आदर आहे)

मत व्यक्त करणे हा लोकशाहीचा आत्मा.
लोकांना फक्त दोन चॉईस देणे हे एकप्रकारे लोकशाहीच गळा घोटाल्या सारखे वाटते.

बिटाकाका's picture

23 Mar 2018 - 12:36 pm | बिटाकाका

गल्लत होतेय, दोनच पक्ष म्हणत नाहीयेत आपण. व्दिपक्षी म्हणजे दोन विचारसरण्या या अर्थाने. मग तसे पहायला गेले तर सगळ्या युत्या आघाड्या लोकशाहीचा गळा घोटणेच म्हणावे लागेल.

पगला गजोधर's picture

23 Mar 2018 - 12:45 pm | पगला गजोधर

ओके, मला काय म्हणायचंय,
जगात "काळं" आणि "पांढरं" असे फक्त दोनच ध्रुवीकरण होणं पटत नाहीये..