ब्राह्मण्य म्हणजे काय ? चर्चा संजय सोनवणींच्या मतांची ..

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
23 Oct 2017 - 12:10 pm
गाभा: 

नमनाला घडाभर;
२०व्या शतकातील विचारमंथन आणि प्रबोधन पुस्तकांच्या दोन एक हजार निघणार्‍या प्रती, प्रत्येक प्रतीमागे अधीकतम दहा वाचक धरले आणि प्रत्येक विषयावर पाच पुस्तके धरली तरी प्रती विषय एखाद लाख प्रतीच्या पलिकडे जात नव्हते. एकाच विषयावरची पाचही पुस्तके वाचली गेली असेही कमी होत असेल. नाही म्हणायला वृत्तपत्रे आणि सभांमधून संबोधीत करणारी वक्ते मंडळी यांची पोच दहापट धरली तरी प्रती विषय दहा लाख लोकांपर्यंत एखादा विषय पोहोचू शकतो. शालेय पाठ्यपुस्तकांनी काही प्रमाणात काम केले तरी वृत्तपत्रे काय किंवा पाठ्यपुस्तके काय एखाद्या विषयाचा पाच-दहा पुस्तकातील सांगोपांग दृष्टीकोण समस्त जनते पर्यंत पोहोचवू शकतात असे होत नाही. २१ वे शतक आले तेच आंतरजालाचे नवे माध्यम घेऊन ज्यात माहिती उपलब्धता अधिक जनतेपर्यंत पोहोचवण्याचे सामार्थ्य असले तरी २०व्या शतकातील ग्रंथात बंधीस्त वैचारीक मंथन आंतरजालावर विवीध कारणाने मुक्तपणे आज तागायतही पुर्ण पणे उपलब्ध दिसत नाही मग - हि एक प्रकारे आंतरजाल हाती असूनही माहितीज्ञान पोकळी आहे, त्यामुळे ज्या विषयांचा २०व्या शतकातच निकाल लागलेला आहे असे काही विषय २१व्या शतकातही आपण मिपा आणि समाजमाध्यातून चघळताना दिसतो. पण 'आलीया भोगासी असावे सादर' अशी एक म्हण आहे. असो.

चर्चा विषयाच्या मुद्याकडे

मनुस्मृती बद्दल शरदजींच्या धागा मालिकेमुळे एक चर्चा पार पडली, मराठी आंतरजालातील तेवढीच चर्चा आणि माहिती पोकळी भरुन निघाली. त्या चर्चेतील अरविंद कोल्हटकर, गापै या सदस्यांतील चर्चेमुळे 'ब्राह्मण्य' या शब्दाकडे लक्ष गेले. ब्राह्मण्य आणि 'वर्चस्वतावादी जन्माधारित अहंकार" ह्यावर टिका होताना दोन्ही साधारणतः एकच धरले जातात, टिकेला प्रतिसाद देणारेही दोन्ही एक आहेत असे समजतात असे काही आहे का ? मराठी आंजावर शोध घेताना संजय सोनवणींचा एक लेख सापडला ज्यात त्यांनी 'ब्राह्मण्य' आणि 'वर्चस्वतावादी जन्माधारित अहंकार" यात फरक करण्याचा रोचक प्रयत्न केला आहे.

संजय सोनवणींना सरसकट नाकारणारी मंडळी आहेत -काहीजण संजय सोनवणींच्या काही राजकीय अतटस्थतेच्या मर्यादा काही आधार नोंदवण्याबाबत साशंकतांमुळे त्यांच्यावर टिका करतात पण बरेचजण असेही आहेत जे त्यांच्या वैचारीक भूमिकेतला काही ना काही भाग आपल्या सोईचा नसल्यामुळे नाकारत असावेत - प्रमाण लेखन शैलीस न अनुसरण्याची त्यांची माझ्या प्रमाणे असलेली भूमिकाही काही जणांना खटकत असावी, त्यांचे सर्वच लेखन तटस्थ असते अथवा त्यांचे सर्व संदर्भ साधार असतातच असे नसावे पण त्यातल्या त्यात एका वेगळ्या तार्कीक भूमिकेतून पहाणारे लेखक म्हणून त्यांना पहाता येते आणि प्रस्तुत विषयातील 'ब्राह्मण्य' आणि 'वर्चस्वतावादी जन्माधारित अहंकार" यात फरक करण्याचा प्रयत्नाचा लेखा जोखा या निमीत्ताने घेतला जावयास हवा असे वाटते.

कॉपीराईट समस्यांमुळे त्यांचा ब्राह्मण...ब्राह्मण्य...आणि ब्राह्मण्यवाद...एक चिकित्सा हा सबंध लेख इथे क्वोट करणे शक्य नाही पण त्याबाबत चर्चेच्या ओघात टिका टिपण्णीकरत क्वोट करणे शक्य असावे.

चर्चेसाठी त्यांचे काही मुद्दे हायलाईट करतो पण त्यांचा ब्राह्मण...ब्राह्मण्य...आणि ब्राह्मण्यवाद...एक चिकित्सा मूळातून वाचणे अधिक श्रेयस्कर असावे. त्यांची सर्वच मते मला पटलेली आहेत असे नाही त्यामुळे त्यांच्या सर्व मतांना मला या चर्चेत डिफेंड करता येईल असे नाही. आणि ते मिपावर नसावेत म्हणजे ते स्वतःही डिफेंड करतील असे नव्हे. पण त्यांच्या विचारांचा जमेल तेवढा उहापोह करण्यास हरकतही नसावी.

ब्राह्मण...ब्राह्मण्य...आणि ब्राह्मण्यवाद...एक चिकित्सा लेखक संजय सोनवणी

ब्राह्मण, ब्राह्मण्य आणि ब्राह्मण्यवाद हे आज चर्चेचे विषय झाले आहेत. या तीनही बाबी एकच आहेत म्हणुन त्या तिरस्करणीय आहेत असा आक्षेप नोंदवला जातो. ब्राह्मण्यवादाचा "संसर्ग" इतर जातीयांनाही होवु लागला आहे असेही म्हणण्यात येते. यावर ब्राह्ह्मण समाजाचा आक्षेप आहे असे दिसते. ब्राह्मण्य हा जणु काही एक रोग आहे असा अर्थ त्यातुन निघतो, त्यामुळे काही ब्राह्मणही "मी ब्राह्मण आहे पण बाह्मण्यग्रस्त नाही" असे म्हणु लागतात. खरे तर ही एक विपरीत स्थिती आहे आणि त्यावर चर्चेची निकड आहे.

अशी त्यांच्या भूमिकेची सुरवात आहे.

"ब्राह्मण" हा एके काळी फक्त वर्ण होता. "जो मंत्र रचतो तो ब्राह्मण" ही ऋग्वेदाची व्याख्या आहे, मग त्याचा अन्य व्यवसाय काहीही असो. उपनिषदांच्या द्रुष्टीने पाहिले तर "ज्यालाही ब्रह्माचे द्न्यान आहे तो ब्राह्मण." महाभारतात युधिष्ठीराने " ज्याच्या अंगी द्न्यान, भुतदया, शील, क्षमा इ. गुण आहेत त्याला ब्राह्मण म्हणावे." अशी ब्राह्मणाची व्याख्या केली आहे. पौराणिक व्याख्या पाहिली तर "जो ब्राह्मण मातापित्यांच्या पोटी जन्माला आला आहे, उपनयन झाले आहे, ज्याने वेदाध्ययन केले आहे, जो यद्न्यकर्म जाणतो तोच ब्राह्मण होय."

संजय सोनवणींच्या मतानुसार ब्राह्मण शब्दाच्या व्याख्येस बहुतांश (ब्राह्मण) संपूर्णपणे कोणत्याही काळी पात्र होउ शकत नाहीत. लोकसंख्येच्या ५% दराने सुद्धा १९ माणसामागे एक ब्राह्मण होतो आणि मागणी पेक्षा पुरवठा अधिक झाल्यामुळे केवळ पौरोहीत्यावर बहुसंख्य जन्माने ब्राह्मणांचा उदर निर्वाह कोणत्याही काळी शक्य नसतो, त्यांना वेगगवेगळे व्यवसाय पत्करावेच लागतात, वर्तन विषयक अटींची संख्यापण खूप मोठी आहे; ज्यातील अनेक व्यवसाय ब्राह्मणपणाच्या वेगवेगळ्या ग्रांथीक व्याख्यांनुसार त्यांना ब्राह्मण म्हणून घेण्यास तांत्रिक दृष्ट्या अपात्र ठरवत असतात . सोनवणी त्यांच्या लेखाच्या ओघात म्हणतात "...पण जर इतिहास पाहिला तर असे दिसते की ब्राह्मणांनीच या स्म्रुती धाब्यावर बसवल्या..." आणि त्याची ते काही उदाहरणेही देतात.

सोनवणी पुढे म्हणतात
....थोडक्यात वर्णाश्रमाचे स्वत: कोनतेही नियम पाळायचे नाहीत आणि वर वैदिक संस्क्रुतीचा टेंभा मिरवीत सांस्क्रुतीक वर्चस्ववाद गाजवण्याचा प्रयत्न करायचा यालाच सध्या "ब्राह्मणवाद", माझ्या मते याला वैदिकवाद म्हणतात. वैदिकवाद म्हणून त्याचा ब्राह्मण्याशी संबंध नाही, कारण वैदिक असल्याची श्रेष्टा ते मनोभावे जपत असले तरी ब्राह्मण या वैदिक संज्ञेपासून, ज्या स्म्नृतींचा ते गौरव करतात त्या स्मृत्यांपासून त्यांचे व्यावहारिक आचरण कधीच तडीपार झालेले आहे.

सोनवणी पुढे म्हणतात
....त्यामुळे "ब्राह्मण" आणि "ब्राह्मण्य" हा खरे तर कळीचा मुद्द बनण्याचे काहीएक कारण नाही. परंतु जन्माधारीत जात म्हणुन पाहिले तर ब्राह्मण हे ब्राह्मणच आहेत, परंतु त्यांचे वर्ण म्हणुन आजचे स्थान काय हाही प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. जात म्हणुन ब्राह्मण असणे आणि वर्ण म्हणुन ब्रह्मण असणे यात मुलभुत फरक आहे आणि तो फरक खुद्द ब्रह्मण समाजालाच न समजल्याने हा घोटाळा झाला आहे. ...पण ज्याअर्थी तो घोटाळा झाला आहे त्या अर्थी ब्राह्मणपक्षांची काहीतरी गफलत होते आहे. म्हणजे वैदिक वर्णाधारित अर्थानेही
आम्ही उच्च...आणि जात म्हणुनही उच्च असा काहितरी ग्रह झाला आहे.

परंतु, प्रश्न असा आहे कि ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यात भेद करता येइल काय? असा प्रश्न उपस्थीत करत ब्राह्मण्याची कड घेता येईल अशी व्याख्या देतनाचा कडक टिकाही सोनवणी पुढील प्रमाणे करताना दिसतात.

....ब्राह्मण ही जात मानली आणि केवळ एक जात म्हणुन तिच्याकडे पहायचे ठरवले तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्य वैदिक अर्थाने वेगळे आहे असे म्हणता येइल. जो धर्माचा पुरोहीत आहे, जो समाजाच्या पारलौकिक हिताची काळजी वाहतो त्या ब्राह्मणात ब्राह्मण्य आहे असे म्हनता येइल. किंवा जीही कोणी व्यक्ति समाजास द्न्यान देण्यासाठी कटीबद्ध आहे, वा संस्क्रुतीत मोलाची भर घालत आहे अशा व्यक्तींतही ब्राह्मण्य आहे असे म्हणता येइल. त्या अर्थाने ब्राह्मण्य हे आदरार्थीच घ्यावे लागेल. खरे तर आजचे बव्हंशी ब्राह्मण असे धर्मोक्त/वेदोक्त ब्राह्मण्य पाळत नाहीत आणि तरीही श्रेश्ठत्वाच्या व वैदिक वर्चस्वतावादाच्या भावना बाळगतात म्हणुन ते निंदेस पात्र झाले आहेत असे म्हणावे लागेल.

सोनवणी पुढे म्हणतात

..."ब्राह्मणवाद" हा वरील अर्थाने मान्य होवु शकत नाही. ब्राह्मणांवर होणार्या जहरी टीकेमागे मुळात ब्राह्मण आणि ब्राह्मण्य याबाबत झालेली गफलत आहे. बाह्मण्याचा अस्त घडवुन आणत फक्त जन्माधारीत ब्राह्मण असण्याचा अहंकार बाळगत ज्याही कोणी ब्राह्मण विद्वानांनी वैदिक ब्राह्मणत्व श्रेश्ठत्वाचे डंके पिटले त्यातुन निर्माण झालेली ही अवस्था आहे...

.....
त्या अर्थाने सर्वच जाती समान आहेत. पण त्या समान न मानण्याची कारणे वैदिक धर्मीय संकल्पनांत आहेत हे ब्राह्मणांनी लक्षात घेत पुढे यायला हवे. विषमतावादी सामाजिक तत्वज्ञान वैदिक धर्म देतो आणि तोच विषमतावादी विचार हिंदू समाजात घट्ट बसला आहे. त्यामुळे वैदिकत्व घेत श्रेष्त्वतावाद जपायचा कि ब्राह्मण ही अन्य जातींप्रमाणे एक हिंदू जात आहे असे समजत परस्पर जातीसन्मानाची भावना बाळगत, तसे वागत "सर्व जाती समान" या तत्वाप्रत येत सर्वच जातींचे एक दिवस विलयन होईल हे पहायला हवे.

त्यांच्या लेखातील शेवटच्या परिच्छेदाशी पूर्णपणे सहमत होणे कदाचित बर्‍याच जणांना जमणार नाही . त्यांच्या लेखातील शेवटचा परिच्छेद वाचण्या पुर्वी ते हिंदू = वैदीक अशी व्याख्या करताना टाळतात आणि शैव आणि शैवेतर अशा स्वरुपाचा त्यांचा वेगळा वाद त्यांनी त्यांच्या वेगळ्या पुस्तकातून मांडत, वैदीकपुर्व शैवत्वाची कड घेतलेली दिसून येते.

"सोनवणींच्या लेखातील शेवटचा परिच्छेद

...मला ब्राह्मण चालेल- ब्राह्मण्य नको...हे म्हणण्यापेक्षा वैदिक वर्चस्वतावादी जन्माधारित अहंकार नको अथवा वैदिकवाद नको असे म्हणायला हवे. कारण ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यात ब्राह्मण्याचे जन्मदातेही ब्राह्मण ठरतात. तेही वास्तव नाही. विषमतेची मुळे वैदिक तत्वज्ञानात आहेत. म्हणून ते तत्वज्ञान हिरीरीने प्रचारत बसण्यापेक्षा त्या तत्वज्ञानाचा त्याग महत्वाचा ठरेल. ...

* संदर्भ संजय सोनवणींचा ब्राह्मण...ब्राह्मण्य...आणि ब्राह्मण्यवाद...एक चिकित्सा Thursday, October 14, 2010 लेख https://sanjaysonawani.blogspot.in/2010/10/blog-post_14.html पत्त्यावर हा धागा लेख लिहिताना म्हणजे दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ रोजी दुपारी १२ वाजता जसा दिसला.

* चर्चा सहभगा बद्दल आणि अनुषंगिका व्यतरीक्त आवांतरे आणि तथाकथित शुद्धलेखन भूमिकांची मांडणी टाळण्यासाठी आभार.

प्रतिक्रिया

'आलीया भोगासी असावे सादर'

हीच म्हण सुचली होती.

असो, जुनी दारू असल्याने हा फटाका पेट घेईल असे वाटत नाही.

हि दारू पेट घेणारी दारू नसून पोटांत जाऊन धिंगाणा घालायला मजबूर करणारी दारू आहे. अशी दारू जितकी जुनी तितुकी जास्त चढते ! ह्या धाग्यावर अक्षरशः धिंगाणा होणार आहे.

माहितगार's picture

31 Oct 2017 - 2:05 pm | माहितगार

धिंगाणापण नै फुसका पण नै , आठवडाभरात पन्नास मणजे धीरेसे दिसतय !

पगला गजोधर's picture

23 Oct 2017 - 5:08 pm | पगला गजोधर

आता नजीकच्या भविष्यात अमेरिकेचे व नाटोचे सैन्य पूर्णपणे जेव्हा जाईल, तेव्हा पुन्हा दबा धरून बसलेले तालिबानी झडप घालून लोकशाहीचा जीव तर घेणार नाहीत? पुन्हा सत्तेवर तर येणार नाहीत? फिर तालिबान आने का मतलब जमुरियत का खात्मा, फिर लिबरल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन को पीछे ढकेलना, औरत को फिर स्कूल, कॉलेज और आॅफिस से जुदा करना और घर दिवारी की चौखट में और काले बुरखे के काले समंदर में डुबा देना... हम जैसे अलग सोच रखनेवालों को ‘काफीर’ ठहराकर तब जैसे जमिला को सरे आम पत्थरसे मारा, वैसा ही कुछ आगे होने का मुझे शक लगता है...
आता पुन्हा एकदा आपण इतिहासाच्या एका नाजूक वळणावर उभे आहोत. अमेरिकन सेना पूर्णपणे या भूमीतून गेल्यानंतर लोकशाही व शांतता टिकावी म्हणून तुम्ही नेक इराद्यानं तालिबानला शांतता प्रक्रियेत सामील करून घेत आहात.. और ये बडी गलती हो सकती है. मेरे खयाल से किसी भी सूरत में तालिबानसे हात मिलाना ठीक नही. अमेरिका ‘गुड तालिबान’, ‘बॅड तालिबान’ असा जो भेद करीत आहे, तो पण चुकीचा आहे. ते आपण समजून घ्यावं. देअर इज नो गुड तालिबान. दे आर बॅड तालिबान. दे आर ब्लडेड टेररिस्ट!..

पगला गजोधर's picture

23 Oct 2017 - 5:18 pm | पगला गजोधर

गल्ली चुकली,
वरील प्रतिसाद इग्नोर करावा

माहितगार's picture

23 Oct 2017 - 5:19 pm | माहितगार

ओके

तीनचाकी सायकल चालवणाऱ्याच्या अकलेची कुवत माहित असल्याने, इग्नोर करण्यात आलेलं आहे.

माहितगार's picture

23 Oct 2017 - 5:18 pm | माहितगार

??

दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ रोजी दुपारी १२ वाजता

भाप्रवे का?

माहितगार's picture

23 Oct 2017 - 7:01 pm | माहितगार

होय अगदी , प्रश्नाबद्दल आभार

तिमा's picture

23 Oct 2017 - 7:37 pm | तिमा

या विषयावर चर्चा कुठल्या पातळीपर्यंत न्यायची हे सदस्यांवर अवलंबून आहे. फेसबुकवर सध्या ब्राह्मणांबद्दल जे लिहित आहेत त्यातून एक नवीन इतिहास रचला जात आहे. शिवाजी महाराजांना म्हणे, ब्राह्मण मंत्रिमंडळाने ठार मारले, असले शोधही तिथे लागत आहेत.

माहितगार's picture

23 Oct 2017 - 8:43 pm | माहितगार

काल्पनिक संशयवाद आणि संजय सोनवणींच्या भूमिकेत फरक असावा. दोघांना एकाच मापात मोजता येत नाही.

शुद्रत्व म्हणजे काय ?
वैश्यत्व म्हणजे काय ?
क्षत्रियत्व म्हणजे काय ?
एक चांगला शुद्र होण्यासाठी माणसाने काय केले पाहीजे.
जरी जन्माने ब्राह्मण असला तरी शुद्रतत्व प्राप्तीचे उपाय कोणते ?
म्लेच्छतत्व काय ?
गेम ऑफ थ्रोन्स या मालिकेत जसे एक काल्पनिक विश्व आहे. भिंतीच्या पलीकडे कोणते जग आहे जसे " आतल्यांना" माहीतच नाही.
तसे काहीसे म्लेच्छतत्व संदर्भात आढळते.
तर ब्राह्मण्य या नेहमीच्याच यशस्वी चर्चा विषयापेक्षा
हे विषय घेणे श्रेयस्कर
याने कदाचित नविन काही हाती लागेल
म्हणजे सरस्वतीपुजना शिवाय आईनस्टाइन जणु !

माहितगार's picture

23 Oct 2017 - 9:17 pm | माहितगार

ब्राह्मण्य या विषयावर बाकी वीस लाख चर्चा झाल्या असतील पण त्यातील 'ब्राह्मण्य' शब्दाच्या व्याख्येत गफलत होत असण्याची शक्यता संजय सोनवणी निदर्शनास आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जो पर्यंत कुणि त्यांचे मुद्द्यांचा उहापोह करत नाही ते चर्चेस रास्त ठरतात. आणि चर्चा नाही होत नाही तो पर्यंत तार्कीक उणीव असलेले मुद्दे सुद्धा बरोबर गृहीत धरले जाऊ शकतात.

काही आधारभूत ग्रंथ वाचलेले असणे लेखकास अभिप्रेत आहे का?
मनुस्मृती किंवा इतर ग्रंथ भारतात कुठे आहेत?
भक्तियार्गी संतकवींनी हा मुद्दा घेतला होता का हे जाणून घेण्यास आवडेल. भगवद्गीता काय म्हणते? बुद्धाने याचे विवेचन केले होते का? काही चांगला प्रतिवाद झाला तर पुढेही संदर्भासाठी उपयुक्त ठरेल.

माहितगार's picture

23 Oct 2017 - 9:28 pm | माहितगार

संस्कृतच एकुण भांडार खूप मोठ आहे. सर्व एकाच व्यक्तीने वाचले असणे अशी अपेक्षा करता येत नाही पण एखादा दावा पडताळण्यासाठी संबंधीत मजकुरावर गूगल सर्च देऊन तेवढ माहित करून घेण पुरेस असाव अस माझ व्यक्तिगत मत आहे. तसे जाणकारांनी सोनवणींनी दिलेले संदर्भ पडताळणे केव्हाही उत्तम असे वाटते.

ग्रंथांत लिहिलेलंच अंतिम आणि त्याचा प्रतिवाद करायची शक्ती पुराणकाळी ( एक सोडून ) कुणाची नव्हती. बुद्धाने त्या सर्व मतांचा प्रतिवाद न करता निराळीच चौकट उभारली. त्यात्या चौकटीत तीती मतं अंतिम धरल्यास वादाला स्थान उरत नाही. परंतू चौकटीतलं तत्त्वज्ञान बाहेरच्या नियमांचे निरिक्षणांचे खंडन/पुष्टिकरण करू पाहाते तेव्हा लंगडे पडते तरीही आतले लोक आमचं बरोबर हाच हेका ओरडा चालू ठेवतील तर चालू दे. कपिलमुनींचा सांख्ययोग एक अनुमान-निरिक्षणांवर वाच्यता करतो म्हणतात. पन्नासच्यावर महत्त्वाच्या तत्त्वज्ञानांपैकी ते एक आहे.

श्रेष्ठताच मोजायची झाल्यास इथे शाब्दिक कसरतीची पट्टी असते तर विश्वामध्ये जडत्व हेच बल असते.

माहितगार's picture

24 Oct 2017 - 12:24 pm | माहितगार

ग्रंथांत लिहिलेलंच अंतिम आणि त्याचा प्रतिवाद करायची शक्ती पुराणकाळी ( एक सोडून ) कुणाची नव्हती.

वस्तुतः ग्रंथात लिहिलेले अंतिम + शास्त्रात रूढी बलीष्ठ हे दोन्ही सोयीने वापरले जात होते. (नाहीतर ग्रंथानुसार सोनवणी म्हणतात तसे स्मृती ग्रंथांचे आधार स्विकारलेतर बोटावर मोजण्या एवढेच ब्राह्मण आणि उर्वरीत सर्वच शुद्र असे चित्र दिसले असते.) तीन्ही उच्चवर्णीयांच उच्चवर्णीयत्व इतक सहज हरवल जाण्यासारख केल होत की त्यातून सुटका करुन घेण्यासाठी ठरावीक पद्धतीचे दान मिळवणारे यज्ञ, राजअभिषेक अभिषेक व्रत मागे लावले जात आणि अंधश्रद्धेच्या भोवतीचाही समाज अंधश्रद्ध असेल तर असा सोईस्कर पणा खपवणे सोपे होते.

याला दोन उपाय योजले जात होते एक शास्त्रार्थ , इथे तर्कशास्र प्रमाण होते पण शास्त्रार्थ करण्याचे अधिकार मर्यादीत करणे, आणि नेमक्या अशा वेळेस ग्रंथ प्रामाण्या लादणे म्हणजे जी गोष्ट तर्कात बसवता येत नाही ती एकतर ग्रंथ प्रामाण्यात बसवायची त्यातही बसली नाहीतर रुढी बलीष्ठ शिवाय शिल्लक राहीलेले अंधश्रद्ध बागूलबुवा उभाकरून शास्त्रार्थाचे होता होईतो पाय कापायचे पण हितसंबंध होता होईतो जोपासयचे असा सगळा खेळ चालू राहीला.

दुसरा उपाय मिथकांच्या आपापसातील स्पर्धेत दुसरे वरचढ मिथक जोडणे -प्रत्येक देवतेचे अनुयायी आपली देवताच श्रेष्ठ असल्याचे मिथक रंगवणार यात पुराणकारांचा भर होता पण त्याच वेळी इतर विचार समांतर विचार प्रणालींना होता होईतो अनुल्लेखाने मारणे, ज्यू आणि ग्रीक किती आधी आले त्या आधी झतुराष्ट्रही स्पर्धेत होताच पण समांतर स्पर्धक तत्वज्ञान चर्चेस घेण्यापेक्षा अनुल्लेखाने मारण्याकडे कल दिसतो. बेसिकली प्रतिवाद केलाच नाहीतर त्यासाठी शक्ती लागण्याचा प्रश्नही शिल्लक रहात नाही.

एक उत्तम शुद्रत्व साध्य करण्यासाठी माझ्यामते
१- सर्वप्रथम पुरुष असणे आवश्यक आहे कारण स्त्री ही मुळात शुद्रच असते तिला ते वरदान प्रत्यक्ष ईश्वरानेच बहाल केलेले आहे.
म्हणजे वर्णानुरुप तिचे शुद्रत्व उजळते वा मंदावते इतकाच काय तो फरक.
२- शुद्र का सबसे बडा अलंकार उसका विनय होता है. जिस शुद्र मे विनय नही वह शुद्र शुद्र ही नही.
३- शुद्राने शरीरावर लक्ष केंद्रीत करावे मेंदुवर नाही. आता हे थोडे पॅरॉडॉक्सीकली असे करता येइल की मेंदु हा ही शरीराचाच भाग आहे मग मेदुत्तोन्नती का साधु नये.
तर त्याला फिलॉसॉफीकली असे उत्तर आहे की जरी मेंदु शरीराचा अवयव असला तरी तो शुद्रतत्वाच्या विकसनास घातक आहे.
क्रमश:

माहितगार's picture

23 Oct 2017 - 9:30 pm | माहितगार

मारवाजी यात सोनवणींच समर्थन आहे की प्रतिवाद ?

गामा पैलवान's picture

23 Oct 2017 - 9:52 pm | गामा पैलवान

मारवा,

माणसाचा वर्ण त्याच्या कलावरून ठरतो. तुम्हाला शूद्रच व्हायचं असेल तर अक्कल गहाण टाकायला शिकलंच पाहिजे. उगीच प्याराडॉक्स वगैरेच्या भानगडीत पडू नका. लक्षात ठेवा तुमचा कल अक्कल गहाण ठेवण्याकडे आहे.

आ.न.,
-गा.पै.

गापै, मारवांनी बहुधा विषयांतर केले वाटून मी त्यांचे वाचायचे टाळले. आपण म्हणता तसे 'अक्कल गहाण ठेवणे' टाळायचे असेल तर ग्रंथ प्रामाण्य, रुढी प्रामाण्ये ते अनेक प्रकारच्या पूजा जसे की व्यक्ती पूजा नाकारून बुद्धी प्रामाण्य स्विकारावे लागते. आणि आपण तसे करण्यास तयार असाल तर मी माझ्यादृष्टीने सप्तर्षी संबोधून वंदन करण्यास केव्हाही राजी असेन ! :) ह. घ्या.

गामा पैलवान's picture

23 Oct 2017 - 9:57 pm | गामा पैलवान

माहितगार,

संजय सोनवणींचा लेख वाचला. पटणारा आहे. फक्त एकंच विधान पटलं नाही :

ब्राह्मण जातीचे (वर्णाचे नव्हे...वर्ण बदलता येतो...जात नव्हे...) पुरातन वर्चस्व पुन्हा अबाधित ठेवण्याचे हे कारस्थान आहे

हे न पटण्याचं कारण म्हणजे भारतात पूर्वी ब्राह्मण जातीचं वर्चस्व कधीच नव्हतं. ब्राह्मण जातीचं वर्चस्व हा पेशवेकालीन म्हणून अतिशय अर्वाचीन असा प्रकार आहे.

आ.न.,
-गा.पै.

जेम्स वांड's picture

26 Oct 2017 - 10:51 am | जेम्स वांड

पुष्यमित्र शुंग? पहिले ब्राह्मण राजकुल?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Oct 2017 - 6:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

काही जणं ब्राह्मण्याचा टेंभा मिरवतात, काही जणं चेपुवर वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजती दातं ती अमुची अमुक अमुक जात वगैरे स्टेटस टाकुन रस्त्यावरनं समोरुन कुत्रं चाललं असलं तर गल्ली बदलुन जातात. काही जणं निळ्या झेंड्याखाली एकत्रं येउन बाबासाहेबांचे मुळं अतिशय चांगले असणारे हेतु पायदळी तुडवतात.

थोडक्यात काय रिकाम** स्वाभिमान मिरवणं हा एकुणचं मनुष्यस्वभाव आहे आणि स्वभावास औषधं नसतं. मग तो ब्राह्मणं असो वा इतरजातीय. बाकी अश्या स्वभावामुळेचं थर्डग्रेडी, अमुकतमुक स्वाभिमान संघटना वगैरेंचे फावतं एवढं लक्षात आलं तरी बास झालं.

बाकी कोण सोनवणी?

स्वधर्म's picture

24 Oct 2017 - 12:44 pm | स्वधर्म

१००% सहमत.

काही जणं चेपुवर वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजती दातं ती अमुची अमुक अमुक जात वगैरे स्टेटस टाकुन रस्त्यावरनं समोरुन कुत्रं चाललं असलं तर गल्ली बदलुन जातात.

बाय द वे, कुत्र्याच्या समोरून जाऊ शकणे आणि हिंमत यांचा कोरिलेशन कोइफिशिएंट १००% आहे का? नै म्हटलं ब्रिटिशांची फौज बनवून लढणारे एकमात्र "युद्ध करू शकलेले" स्वातंत्र्यवीर सुभाष चंद्र बोस हे कुत्र्यापेक्षा सौम्य अशा मांजरीला प्रचंड घाबरत - अगदी आझाद हिंद सेनेच्या गणवेशात.
===================
इथे जे अमुक अमुक म्हणजे काय ते लिहायची तुमची हिंमत झाली नाही (म्हणजे तुम्ही गल्ली बदलून लिहिलं आहे. प्राथमिक अंदाज माझा.) त्या लोकांचं ऐतिहासिक शौर्यपर योगदान अपार आहे. त्यांची "ती" ओळख अमान्य करणारे, पुसून टाकणारे, अनावश्यक म्हणणारे, तिची खिल्लि उडवणारे तुम्ही किती रास्त? मराठा जातीचा अभिमान प्रकट करण्यात काय चूक आहे?
===========================
मूळात अस्मितांची चिकित्सा करणार्‍या लेखांमधे ज्यांना अस्मिता हीच संकल्पना अमान्य आहे त्यांनी गल्ली चूकवू नये.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Oct 2017 - 6:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

खिक्क. प्रतिसाद नं समजल्याची लक्षणं. अभ्यास वाढवा.

आहे ना कोरिलेशन. अश्या चेपु पोस्टं वाचल्यावर नित्यनेमाने मनात येणारा विचार (इर्रेलेवंट ऑफ हिज ऑर हर कास्ट) म्हणजे, "अरे भो***, आधी कुत्र्यासमोरुन नीट जायला शिक मग वाघाच्या जवळ जायचा विचार कर". बाकी मला स्वतःला कोणाच्याही जातीचा उल्लेखं केलेला आवडत नाही त्यामुळे अमुक तमुक लिहिलेलं आहे. मी स्वतः कोकणस्थं ब्राह्मण असल्याने मला काही शष्पं फरक पडत नाही.

बाकी जो हिंमतीबिंमतीचा प्रश्णं विचारताय तो पण तुमच्या प्रतिसादाएवढाचं गंडलेला आहे. माझे शेकड्याने मित्रं-मैत्रिणी मराठा किंवा इतर समाजामधे (ब्रोबर लिहिलं ना? नैतर णंतर बोंब माराल) आहेत. आणि कुठल्या एका ब्राह्मणद्वेष्ट्या मराठ्यामुळे किंवा अन्य जातीयामुळे मी बाकीच्या चांगल्या लोकांना का दुखावु?

बाकी शौर्यं आणि पाठीत खंजीर खुपसणारी सगळी उदाहरणं सगळ्याचं जातीत आहेत. त्याबद्दल काय सांगाल?

बाकी ब्राह्मण्याला जज करणारे सोनवणी कोण? नै म्हणजे मंबाजी ब्रिगेडसारखं एकतर्फी लिहिलयं म्हणुन विचारतो.

सोनवणी पूर्वी मंबाजी ब्रिगेड वाल्यांच्या विचारवंत मुखवट्याचा एक भाग होते, पण नंतर ते मराठा आरक्षणासाठी ओबीसी मधल्या जागेवर डल्ला मारण्याची तयारी सुरू झाल्यावर त्यांनी मंबाजी ब्रिगेडची साथ सोडली असे ऐकून आहे.

प्रतिसाद नं समजल्याची लक्षणं

न समजणं वेगळं नि मतांतर असणं वेगळं.

अश्या चेपु पोस्टं वाचल्यावर नित्यनेमाने मनात येणारा विचार

विज्ञानामधलं व कळत नसताना आईन्स्टाईनचा प्रचंड अभिमान असणारे चेपूवर फार पाहिलेत. राजकारणातलं काही कळत नसताना तेच. अर्थकारणातही तेच. पण असा भोकार काढणं अनुचित असावं. अस्मिता, अभिमान संकुचित असणं गैर नाही. गैर अस्मिता , गैर अभिमान असणं गैर आहे.

मला स्वतःला कोणाच्याही जातीचा उल्लेखं केलेला आवडत नाही

ते का म्हणे?

मी स्वतः कोकणस्थं ब्राह्मण असल्याने मला काही शष्पं फरक पडत नाही.

मी अटलांटिकमधला मासा असल्यानं मला शष्प फरक पडत नाही या वाक्यात नि वरच्या वाक्यात काय फरक आहे?

माझे शेकड्याने मित्रं-मैत्रिणी मराठा किंवा इतर समाजामधे (ब्रोबर लिहिलं ना? नैतर णंतर बोंब माराल) आहेत. आणि कुठल्या एका ब्राह्मणद्वेष्ट्या मराठ्यामुळे किंवा अन्य जातीयामुळे मी बाकीच्या चांगल्या लोकांना का दुखावु?

या वर्तनासाठी मला आपला आदर आहे. मी तर म्हणेन कि समजा ब्राह्मणद्वेष सर्वच मराठे वा सर्वच ब्राह्मणेतर करू लागले तरी आपण त्याला गैरसमज मानून सलोखा निर्माण करावा. म्हणजे माझं असं म्हणणं आहे ज्या कोणत्या स्थानी कायमचे चांगले संबंध शक्य आहेत तिथे ते लोक सध्याला जरी आपला द्वेष करत असले तरी आपण त्यांचेशी चांगलं वागावं. किमान ब्राह्मणांची पूर्वपुण्याई इतरांपेक्षा थोडी कमी असल्याने त्यांच्याकरिता हे जास्त आवश्यक आहे असा मतप्रवाह असताना तरी.

बाकी शौर्यं आणि पाठीत खंजीर खुपसणारी सगळी उदाहरणं सगळ्याचं जातीत आहेत. त्याबद्दल काय सांगाल?

आपल्या जवळच्यांमधे त्यातल्या त्यात मराठ्यांत जास्त शौर्य आहे असं माझं मत आहे. मराठे नसते तर भारत कदाचित इंडोनेशिया झाला असता, पण कदाचित पाकिस्तानही झाला असता (तसा थोडा भारत झालाचै म्हणा). रिस्क होतीच.

बाकी ब्राह्मण्याला जज करणारे सोनवणी कोण? नै म्हणजे मंबाजी ब्रिगेडसारखं एकतर्फी लिहिलयं म्हणुन विचारतो.

आवड आपली आपली. तुम्हाला चेपु लोकांना जज करायला आवडतं. मला अजुन कोणाला. असेल सोनवणींचा चॉइस.
----------------------
सोनवणींनी हेतूपुरःस्सर (चुकलं वाटतं स्पेलिंग) वाईट लिहिलं आहे असं का वाटतं? त्यांनी चुक, अपूर्ण, इ इ लिहिलं असेल, पण असं नाही.
=======================================
तुमच्या किबोर्डवर एक्स्ट्रा अनुस्वार टाईप होत आहेत.

शब्दबम्बाळ's picture

31 Oct 2017 - 12:19 am | शब्दबम्बाळ

काही जणं चेपुवर वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजती दातं ती अमुची अमुक अमुक जात वगैरे स्टेटस टाकुन रस्त्यावरनं समोरुन कुत्रं चाललं असलं तर गल्ली बदलुन जातात.

"अरे भो***, आधी कुत्र्यासमोरुन नीट जायला शिक मग वाघाच्या जवळ जायचा विचार कर".

फडणवीसांनी कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीत व्यासपीठावरून ते वाक्य उच्चारले होते आणि टाळ्यांचा गजर झाला होता.

बाकी उठ सूट बाकीच्यांना अभ्यास वाढवा सांगणारे देखील सगळीकडेच असतात... चालू द्यात!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Oct 2017 - 7:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझे शेकड्याने मित्रं-मैत्रिणी मराठा किंवा इतर समाजामधे (ब्रोबर लिहिलं ना? नैतर णंतर बोंब माराल) आहेत. आणि कुठल्या एका ब्राह्मणद्वेष्ट्या मराठ्यामुळे किंवा अन्य जातीयामुळे मी बाकीच्या चांगल्या लोकांना का दुखावु?

हे सोयीस्करपणे वाचायला विसरलात काय? मग तर आता अभ्यास वाढवाच.

मला असे वाटते की पूर्वकाळाकडे पाहिले तर वैदिकवाद म्हणण्याऐवजी पुराणवाद म्हणणे जास्त योग्य होईल. मग शैव-शैवेतर हा मुद्दाही असंबंधित होईल.
शरद

arunjoshi123's picture

24 Oct 2017 - 12:48 pm | arunjoshi123

संजय सोनवणी-
जेव्हा एखादा व्यक्ति या विषयावर लिहितो तेव्हा तो स्वतः ब्राह्मण आहे कि नाही हे प्रथम पाहायची मानसिकता आहे. सोनवणी स्वतः ब्राह्मण आहेत का नाहीत हे पाहून त्यांना ब्रह्मप्रेम, ब्रह्मद्वेष आहे कि नाही हे ठरवणं टाळावं. अशा प्रकारे लेख वाचावा.
---------------------------------------
मूळात ब्राह्मण इथे बाहेरून आले नि ते जेते होते म्हटलं तर प्राचीन काळातल्या आणि मध्ययुगातल्या जागतिक जेत्यांच्या तुलनेत त्यांनी केलेले सामाजिक अन्याय नगण्य मानता येतील.
ब्राह्मण इथे बाहेरून आले नि ते जेते नव्हते म्हटलं तर त्यांनी लोकांना इतके मूर्ख कसे बनवले याचं नवल वाटतं. तलवारीच्या धाकावर नव्हे तर फक्त मूर्ख बनवून हजारो वर्षे अन्याय करत राहणारे ब्राह्मण प्रच्चंड बुद्धिमान मानावे लागतील.
ब्राह्मण इथे बाहेरून आले नाहीत नि ते जेते होते म्हटलं तरी त्यांनी समाजात स्वतःसाठी एक विचित्र रोल का निवडला असावा? सत्ता, संपत्ती यांची प्रमुख सूत्र इतरांकडे का दिली? सत्ता क्षत्रियांना नि पैसा वैश्यांना!
ब्राह्मण इथे बाहेरून आले नाहीत नि ते जेते नव्हते म्हटलं (जे खरं आहे, फक्त एक इथिओपिया ते भारत प्रवास सोडून) तर इथल्याच शंभरातल्या रँडम पाच लोकांनी बाकीच्या ९५ लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे ठरवले कसे आणि बाकीच्यांनी स्वीकारले का? ब्राह्मणांसारखे अन्याय करावेसे वाटणारे लोक प्रत्येकच खंडात प्रत्येक टोळीत असणार ना?
शिवाय स्वतःच्याच देखिल स्त्रीयांवर अन्याय करण्याची त्यांची मानसिकता विचित्र, विक्षिप्त, मूर्खपणाची तसेच विकृत देखील मानता येईल.
ठरवून एकत्रित रित्या देशभर अशा अन्यायांच्या स्किम्स चालू करणारे ब्राह्मण पुरुष २०व्या आणि २१ व्या शतकात का हारले (हरले असतील तर...)? त्यांची सिक्रेट ऑर्गॅनायझेशन कशी नामशेष झाली?
सोनवणींचे लिखाण मुद्देसूद आहे, पण त्यांनी अन्यायाला सुरुवात का कशी झाली हे सांगितलंच नाही. ही त्यातली एक मोठी त्रुटी आहे.
--------------------------------------------
समाजात अन्याय होतात नि त्यांत पॅटर्न्स असतात. पण त्याचा अर्थ असा होत नाही कि मला वाटणार्‍या कोणत्याही य समूहाने क्ष समूहावर अन्याय केला आहे. सोनवणींचं ब्राह्मणांवरचं संशोधन म्हणजे "इसविसन ६५०० मधे लोकांनी १९४७ च्या घटनाकारांनी भारतीयांवर अन्याय करण्यासाठी निर्माण केलेल्या व्यवस्थेवरचे भाष्य" आहे. कारण भारतीय लोकशाहीमधे अन्याय हे होतच आहेत, त्याचं खापर व्यवस्थाकारांच्या माथी फोडायचंच पण पुढे इतकं पुढे जायचं कि घटनाकारच नीच होते, त्यांचा उद्देशच अन्याय करणे हा होता. मानव हा प्राणीच असा आहे कि त्यात एक न टाळता येणारी कुप्रवृत्ती आहे. तिचं खापर समाजाच्या नेतृत्त्वावर फोडता येत नाही.
--------------------------------------------
समाजाला द्वेष्ट्यांच्या द्वेषाची सवय असते. मात्र विचारी लोकांनी कोणत्याही लोकसमूहाला अनंतकालीन अन्यायी म्हणू नये. ते झोंबतं. इतिहासाने नोंद घ्यावी असा अन्याय व्यक्तिप्रेरित, क्षणिक, नीच पातळीचा, इ इ इतकाच असतो. इथे मात्र सोनवणी सद्प्रवृत्त ब्राह्मणाला दुखवून जातात.

आनन्दा's picture

24 Oct 2017 - 3:36 pm | आनन्दा

सहमत.

sagarpdy's picture

25 Oct 2017 - 10:20 am | sagarpdy

+1

योग्य लिहिलय.

आनन्दा's picture

24 Oct 2017 - 7:57 pm | आनन्दा

सोनावणींना बहुतेक ब्राह्मण्याची नेमकी व्याख्या माहीत नसावी. किंवा परिवर्तनवादी चळवळीत वेगळीच व्याख्या असेल.

माझ्या आकलनात आलेली ब्राह्मण्याची व्याख्या अशी आहे -
१. आपण ब्राह्मण आहोत याची जाणीव ठेवणे (अभिमान, दुरभिमान वगैरे नाही)
२. ब्राह्मण म्हणून आपली जी काही कर्तव्ये आहेत ती पार पाडणे, उदा. संध्या, मांसाहार टाळणे वगैरे
३. ब्राह्मण म्हणून जन्माला आल्यानंतर जो वारसा परंपरेने मिळतो, तो जपण्याचा प्रयत्न करणे, आणि ब्राह्मण या शब्दाचा जो मूळ अर्थ आहे, ब्रह्म जाणणारा, त्याकडे वाटचाल चालू ठेवणे.

प्रस्तुत लेखातली ब्रह्मण्याची व्यख्याच मुळात गंडलेली असलेल्यामुळे पुढचे वचून काही उपयोग नाही.
त्यांना ब्रह्मण्य म्हणजे जातीशी संबंधित काहीतरी वाटते, पण कर्मठ ब्राह्मणांमध्ये एखाद्याने मांसाशन केले तर तो भ्रष्ट झाला असे मानले जाते.

आसो, सोइस्कर निष्कर्ष काढून मग त्याच्याबाजूला अनाकलनीय शब्दांचे आणि संदर्भांचे बंगले बांधण्यात सोनवणींचा हात कोणी धरू शकणार नाही.

ब्राह्मण्य आणि ब्राह्मण म्हणून असणारा जातीचा अभिमान या वेगळ्या गोष्टी आहेत. जातीचा अभिमान माझ्यामते ब्राह्मणांपेक्षा इतर जातींना सांप्रत काली अधिक आहे असे मला वाटते, इतकेच नमूद करू इच्छितो.

सोमनाथ खांदवे's picture

24 Oct 2017 - 10:20 pm | सोमनाथ खांदवे

पॉइंट 2 वर थोड़स ऑब्जेक्शन हाये साहेब . आमच्या कंपनी मदी 3 वुच्चपदस्त ब्राह्मण माझे मित्र हायेत अन ते तिघ ही सोमवार , शनवार, यकादस सुदा सोडत नाय , कदि ही लेग पीस वडायला तयार. बाकी त्यांच्या बुद्धिच कवतुक कराव त्येवढ कमीच हाये .

मी ब्राह्मणांच्या बुद्धीबद्दल बोलत नाहीये, तर पारंपरिक ब्राह्मण्याच्या व्याख्येबद्दल बोलतोय.
कर्मठ ब्राह्मण मांसाहार मद्यपान करणाऱ्या मुलाला आजही आपली मुलगी देत नाहीत. तिने प्रेमविवाह केला तर गोष्ट वेगळी. आणि त्याच्या मागचे कारण मुलगा आता ब्राह्मण उरलेला नाही, अश्याच प्रकारचे असते.

मी प्रत्यक्ष पाहिलेली उदाहरणे सांगतोय. माझ्या 2 मैत्रिणी 5 वर्ष मुलगा शोधत होत्या, एकाच अट, मांसाहार करणारा नको.

अनिकेत कवठेकर's picture

24 Oct 2017 - 9:06 pm | अनिकेत कवठेकर

हे आता खूप नेहमीचेच झालंय. खरंच संस्कृत पुस्तके वाचा, स्वतः अर्थ लक्षात घ्या, दुसर्या कुणाची ऐकीव मते रेटू नका. एवढे कष्ट व पेशन्स नसेल तर मतांना लोकांनी गंभीर पणे घेतले नाही तर चिडू नका. .पण संस्कृत वाचनातून नक्कीच काहीतरी हाती लागेल..असं होण्यासाठी तुम्ही ब्राह्मण असायची अट नाही..असो..

माहितगार's picture

25 Oct 2017 - 10:52 am | माहितगार

याच न्यायाने कर्मठेतरांची बाजू काय आहे तेही समजून घ्यावयास नको का ? मला दिसणारे आक्षेप मुख्यत्वे सामाजिक विषमतेचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष समर्थनाबद्दलचे असावेत. हा धागा काढून विषय चर्चेस घेण्याचे कारणच मनुस्मृतीतील विषमतेचे प्रत्यक्ष वा आडमार्गाने समर्थन मिपावर या क्षणीही चालू दिसते.

आपण संस्कृत कुणिही वाचले तर चालते म्हणताय पण आपल्या वरच्याच दुसरे एक मिपाकर कर्मठपणा अजून टिकून आहे म्हणतात संगती कशी लावायची ?

अनिकेत कवठेकर's picture

25 Oct 2017 - 11:56 am | अनिकेत कवठेकर

प्रत्येक कर्मठाला by birth or by design or by inheritance संस्कृत येत नाही..इच्छा असेल व बुद्धी असेल शिवाय आई वडीलांच्या कडे शिक्षण वारसा असेल तर ते जमू शकते..उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी..दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्..स्वतः अभ्यास करून मूळ ग्रंथावर भाष्य लिहा..ती खरी परंपरा आहे..असं लिहिल्यावर कुणाची हिंमत आहे जात विचारायची? पण तेथे पाहिजे जातीचे..इथे जात म्हणजे गुणवत्ता, कष्ट, सद्हेतु व सद्गुरू कृपा..

अनिकेत कवठेकर's picture

25 Oct 2017 - 11:56 am | अनिकेत कवठेकर

प्रत्येक कर्मठाला by birth or by design or by inheritance संस्कृत येत नाही..इच्छा असेल व बुद्धी असेल शिवाय आई वडीलांच्या कडे शिक्षण वारसा असेल तर ते जमू शकते..उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी..दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्..स्वतः अभ्यास करून मूळ ग्रंथावर भाष्य लिहा..ती खरी परंपरा आहे..असं लिहिल्यावर कुणाची हिंमत आहे जात विचारायची? पण तेथे पाहिजे जातीचे..इथे जात म्हणजे गुणवत्ता, कष्ट, सद्हेतु व सद्गुरू कृपा..

पुन्हा एकदा, तुम्ही कर्मठपणा य शब्दाचा सोयिस्कर अर्थ घेत आहात. कर्मठपणा याचा अर्थ काळाप्रमाणे बदलतो. आज अनेक "कर्मठ" ब्राह्मण जातीभेद न पाळणारे आहेत. पण ते वैयक्तिक आयुष्यात कर्मठ असतातच. अनेक भागवत सांप्रदायी देखील कर्मठ असतात.
कर्मठ म्हणजे दैववशात आपल्याला जे कर्म वाट्याला आले आहे त्या कर्मावर ठाम असलेले लोक. पूर्वी असे लोक सोवळे ओवळे पाळत म्हणून तसे रूप प्रचलित झाले. आज तसा विचार केलात तर केवळ रोज नित्योपासना करणारे देखील कर्मठ ठरतात..

आणि कर्मठपणाचा विचार केलात तर खरे तर हल्ली कर्मठ ब्राह्मण विवाहसंबंधात मांसाहार करणार्‍या ब्राह्मणापेक्षा मांसाहार न करणारी आंतरजातीय व्यक्ती एक वेळ अधिक पसंत करतात असे पाहिलेले आहे.

मी कुठलीही बाजू घेतली नाही. द्न्यान कोण मिळवू शकतो अशा बद्दल मी बोललो. असो. कर्मठ चा अर्थ process oriented असा पण घेऊ शकतो. पण हा आटापिटा द्न्यान घेण्यासाठी असेल तर कर्मठ पणा चांगला..म्हणून हेतू बद्दल बोललो. दुसर्या ला झिडकारून टाकायचे साधन म्हणून वापरला तर वाईट..

ते माहीतगार साहेबांसाठी होतं

कपिलमुनी's picture

25 Oct 2017 - 1:36 pm | कपिलमुनी

मला माझे ब्राह्मण्य , ब्राह्मण जात सोडून ओबीसी किंवा बौद्ध , गेला बाजार मराठा व्हायचे आहे .
समाज आणि सरकार मला स्वीकारेल का ? ९६ कुळी लोक सोयरीक करतील का ?

अगोदर जात बदलू न देणार्‍या ब्राह्मणांत आणि आज जात बदलू न देणार्‍या सरकारमधे काय फरक आहे?
=============
याचं उत्तर ब्राह्मण म्हणजे काय याचं सरकारी उत्तर प्राप्त करण्यासाठी कामाला येऊ शकतं.

प्रकाश घाटपांडे's picture

26 Oct 2017 - 9:48 am | प्रकाश घाटपांडे

आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे ही शब्दरचना तर मी कित्येक वर्षे ऐकतो आहे. यात ब्राह्मण्य म्हणजे काय तर अज्ञानाचा फायदा घेउन केलेले शोषण, समाजात जेजे काही विषमता पसरवणारे आहे ते म्हणजे ब्राह्मण्य. अन्यायाचे जे समर्थन करते ते ब्राह्मण्य.जे जे सकल कुटील ते ब्राह्मण्य. असा तो ब्राह्मण्याचा अर्थ अभिप्रेत आहे. सहवेदनेचा विचार तुम्ही मांडलात की त्याला ब्राह्मणी कावा म्हणतात. ही मांडणी विद्रोही चळवळींच्या दृष्टीकोनातून आहे
ब्राह्मणी ब्राह्मण ब्राह्मण्य वगैरे वगैरे यावरील चर्चा पहायची असेल तर http://www.aisiakshare.com/node/5776 इथे पहा

चौकटराजा's picture

26 Oct 2017 - 7:54 pm | चौकटराजा

भारतीय राज्य घटनेतच जात हे वास्तव एच टू ओ म्हण्जे पाणी या सारखे स्वीकारणे हे अब्राह्मण्य आहे. म्हणजे माझी ब्राह्म्हण्याची व्ख्याख्या स्पष्ट होईल.