कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का?

कवट्या महांकाळ's picture
कवट्या महांकाळ in जनातलं, मनातलं
6 Oct 2017 - 4:11 pm

गाभा:
माझ्या मावसभावाच्या बाबतीत खालील घटना घडल्या आहेत , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा !

१) याने एका सेबी नोंदणीकृत कंपनीत DMAT अकाउंट उघडला होता.त्या कम्पनीने मोठ्या मोठया गोष्टी सांगून त्याला कमोडिटी ट्रेडिंग करण्यास सांगितले.काही काळानंतर त्याच्याकडून ५० हजार रुपये ऍडव्हान्स ब्रोकरेज म्हणून घेतले.आता त्याला अकाउंट बंद करायचा आहे कारण त्याचे बरेच पैसे त्यांच्या टिप्स
मुळे बुडले आहेत.पण आता ती कंपनी पैसे परत देण्यास नकार देत आहे कारण आमच्याकडे अशी काही पद्ध्धत नाही म्हणत आहे.तुम्ही जो प्लॅन घेतला होता तो नॉन रिफंडबल होता असे त्यांचे म्हणणे आहे पण आधी असे काहीच आणि कुठेच सांगितलेले नसल्यामुळे हा आता पेचात पडला आहे.त्यांच्याकडे तक्रार करून पण काही उपयोग होत नाहीये.या केस मध्ये सेबी कडे तक्रारीत करून काही फायदा होऊ शकेल का?गेलेले ब्रोकरेज वजा करून उरलेले पैसे मिळू शकतील का ?

२)याच महाशयांचा दुसरा उद्योग म्हणजे एका नॉन सेबी registered माणसाच्या "एका महिन्यात दुप्पट" या थापेला भुलून त्याला स्वतःचा लॉगिन पासवर्ड दिला DMAT चा आणि त्याने एकाच दिवसात ७० हजार चा लॉस केला! यांच्याकडे याचे document वगैरे काही नाही फक्त एका महिन्यात दुप्पट चा whatsapp मेसेज,त्यावरील यांचे chat आणि त्याची ५ हजार फी भरल्याची नेट बँकिंग ची रिसीट आहे. या बळावर सायबर complaint करू शकतो का?काही फायदा होईल का?

सर्वांचे धन्यवाद , आपल्या सल्ल्या च्या प्रतीक्षेत !

अर्थव्यवहारगुंतवणूकअनुभवसल्लामाहितीचौकशीप्रश्नोत्तरेमदत

प्रतिक्रिया

सतिश पाटील's picture

6 Oct 2017 - 5:31 pm | सतिश पाटील

धागाकर्त्याचे नाव आवडले. हे आमच्या गावाच्या तालुक्याचे ठिकाण. कवठे महांकाळ.

एका महिन्यात दुप्पट? तेही व्हाट्सएप्प वरची मेसेज वाचून गुंतवले?
पुढच्या वेळला सावध रहा एवढेच मी सांगू शकतो...

चष्मेबद्दूर's picture

6 Oct 2017 - 8:06 pm | चष्मेबद्दूर

त्यांच्या कडून काही मार्गदर्शन मिळू शकेल. पण पुढच्या वेळेस शहाणे व्हा असाच मी पण म्हणेन. नायजेरियन fraud चा पुढील episode आहे हा.

सर्वात आधी कंपनीस ई मेल करून, 'मला तुमच्याकडील खाते त्वरित बंद करायचे असून या पुढे तुमच्या टिप्सची मला आवश्यकता नाही. या पुढे तुम्हाला मी कंपनीस कोणताही आकार देणे लागत नसून माझी शिल्लक रक्कम त्वरित परत करावी' असे कळवावे. सदर इमेल सेबीच्या Grievence Redressal Portal ला फोरवर्डकरावी. तसेच मुंबई ग्राहक पंचायातीकडेही लेखी व ईमेल द्वारेही तक्रार करावी.
दुसऱ्या बाबतीत पोलिसांकडे तक्रार करणे एवढेच सुचवू शकतो.

ग्राहक पंचायत किंवा ग्राहक सेल कडे तक्रार करा. त्यांचे स्वतःचे वकील असतात आणि उत्तम मार्गदर्शन करतात असा अनुभव आहे. मुंबईत असाल तर पार्ल्याला त्यांचे ऑफिस आहे. बुधवारी तिथे संबंधित व्यक्ती असतात. mumbaigrahakpanchayat.org हि वेब साईट आहे.त्यावर तुम्हाला त्यांचे नंबर मिळतील. जर मुंबई बाहेर असाल तर फोन करून त्यांच्याकडूनच माहिती घ्या. सेबी फारसे काही करू शकेल असे वाटत नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही कारण सध्या सेबीशी संपर्क नाही. त्यामुळे नवीन काही अपडेट्स नाहीत.

नितिन थत्ते's picture

7 Oct 2017 - 1:08 pm | नितिन थत्ते

सुरुवातीला काही डॉक्युमेंट दिली असतील तर परत वाचून पहा. ०.०००५ पॉइंट आकाराच्या अक्षरात नक्की लिहिलेलं असेल.

नितिन थत्ते's picture

7 Oct 2017 - 1:08 pm | नितिन थत्ते

०.०००५ पॉइंट आकाराच्या अक्षरात "नॉन रिफंडेबल आहे" असं नक्की लिहिलेलं असेल.

प्रिपेड ब्रोकरेज प्लॅन हे नेहमीच नॉन-रीफंडेबल असतात. तुमच्या भावाचा एकुण स्वभाव बघता ( एका महिन्यात दुप्पट ला भुलणे ) त्याला आपण नक्की काय करतो आहोत हे कळले नसावे. आता आपल्या चुकांचे खापर तो दुसर्‍यांवर फोडतो आहे.
हे पैसे अक्कल्खाती गेले म्हणुन समजावे आणि या पुढे काळजीने वागावे.

कुठेहि तक्रार करुन काहीही मिळणार नाही कारण चु़क तुमच्या भावाचीच आहे.

कपिलमुनी's picture

9 Oct 2017 - 10:45 pm | कपिलमुनी

असे लोक असतात ??

कवट्या महांकाळ's picture

10 Oct 2017 - 1:10 pm | कवट्या महांकाळ

चश्मेबद्दूर,ज्ञानव,नितीन पालकर,गंबा,नितीन थत्ते आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !