गाभा:
कथा,कदंबरी,प्रवासवर्णन,ललित असे विविध साहित्य प्रकार हाता़ळणारे,विविधांगी लेखन करुन आपल्या प्रतिभेचा
साक्षात्कार करुन देणारे प्रख्यात शैलीदार ललित लेखक रवींद्र पिंगे याच्या निधनाने साहित्यविश्वात पोकळी निर्माण झाली आहे.
'प्राजक्ताची फांदी','मोकळ आकाश','मुंबईचं फुलपाखरु','आनंदपर्व्','आनंदाच्या दाही दिशा'देवाघरचा पाऊस' असे ३२ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.
प्रख्यात ललित लेखक रवींद्र पिंगे यांना माझी आदरांजली.
प्रतिक्रिया
18 Oct 2008 - 12:53 pm | डॉ.प्रसाद दाढे
रवि॑द्र पि॑गे या॑चे लेखन मलाही खूप आवडत असे. 'मु॑बईचे फुलपाखरू' आवडली होती.
नाव घ्यावे असे ज्येष्ठ व श्रेष्ठ लेखक आता फारच कमी उरले आहेत.. आणखी एक पान गळले.
त्या॑ना माझी आदरा॑जली
18 Oct 2008 - 5:54 pm | १.५ शहाणा
त्यांचा कोकणातील दिवस हा धडा (इ.१० वी)अजुनही आठवतो.
19 Oct 2008 - 12:15 am | पांथस्थ
असेच म्हणतो. ते वर्णन इतके अफलातुन होते कि सगळे उद्योग सोडुन कोकणाकडे धाव घ्यावी असे वाटे (आणी आजही वाटते.).
रवींन्द्र पिंगे हे तत्कालिन लेखकांपैकी माझे सर्वात प्रिय लेखक. त्यांनी ललित, प्रवास वर्णनात्मक, व्यक्तिचित्रे, साहित्य-आस्वाद ई.ई. अनेक प्रकारचे लेखन केले. त्यांची लेखनशैली रसाळ, ओघवती, नेटकी आणी प्रसन्नचित्त होती. त्यांचा कोणताही लेख वाचला तरि मन प्रसन्न होते. मी त्यांच्या लेखनाचा माझा मानसिक तणाव जाण्यासाठी अनेकदा वापर केला आहे. आणी अजुनहि करतो. त्यांना त्यांच्या राहत्या घरि जाउन भेटायची इच्छा मात्र अपुरी राहिली. असो...
रवींन्द्र पिंगे यांना विनम्र श्रद्धांजली.
(पिंगे यांच्या लेखणीचा चाहता) पांथस्थ...
(राजहंस प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले 'सर्वोत्तम पिंगे' हे पुस्तक वाचनप्रेमींनी नक्की वाचावे)
20 Oct 2008 - 10:42 am | चतुरंग
दर्जेदार लिहिणारे जे काही मराठी ललितलेखक आहेत त्यात रवींद्र पिंगे यांचे लिखाण अव्वल ठरावे.
मला स्वतःला त्यांचे लेखन अतिशय आवडते. दुर्दैवाने त्यांची कोणतीच पुस्तके मी अजून वाचलेली नाहीत ही सत्य परिस्थिती आहे आणि त्याचे मला वैषम्य वाटते.
वर्तमानपत्रातले/साप्ताहिकातले ललित वाचूनच मला त्यांची ओळख झाली आणि ती शेवटपर्यंत त्याच माध्यमातून होत राहिली.
भाषेचा एक वेगळा बाज, एक वेगळी शब्दकळा, त्यांची स्वतःची अशी एक शैली होती.
अतिशय अकृत्रिम, जड उपमा अलंकार ह्यांनी न नटलेली पण तरिही मनात एक वेगळा सुंदर ठसा उमटवणारी असे त्यांचे लिखाण मनात रेंगाळत राही.
सूक्ष्म आणि मार्मिक निरीक्षण असलेले बरेच लेखक असतात पण हा माणूस जीवनाचा वेडा आहे हे त्यांच्या लिखाणातून प्रत्ययाला येत असे आणि ते वाचकांपर्यंत सहजपणे पोचत असे.
त्यांना भेटण्याची संधी मला हवी होती पण ते आता शक्य नाही. आता त्यांच्या पुस्तकातूनच त्यांना भेटणे क्रमप्राप्त आहे.
त्यांना माझी आदरांजली.
चतुरंग