मिपावर नियमितपणे जिल्बी पाडण्यासाठी तुम्ही काय करता ?????

चामुंडराय's picture
चामुंडराय in काथ्याकूट
15 Aug 2017 - 7:20 am
गाभा: 

बराच कालावधी मिपा वर वाचक होतो. आता सदस्यत्व मिळाले तेव्हा थोडेफार लिखाण करावे वाटते आहे परंतु नक्की कोणत्या विषयांवर लिहावे ते काही आकळेना. मिपा वरील एकंदरीत लिखाण बघता माझ्या लक्षात आले कि येथे आपापल्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आहेत. त्यांच्या समोर अस्मादिक म्हणजे सूर्या पुढे काजवा. मी ना कोणत्या विषयातला तज्ञ्, ना मला एखाद्या विषयातील गती. बरे माझ्या अनुभवांविषयी लिहावे तर माझे अनुभव विश्व् देखील माझ्या सारखे सामान्यच त्यामुळे ती हि शक्यता नाही. मी काही ट्रेकर नाही कि हौशी पर्यटक देखील नाही त्यामुळे पर्यटन विषय बाद. हां, दररोज घर ते ऑफिस आणि परत एव्हढेच काय ते पर्यटन. माझ्या कडे त्या MTB, ATB आणि कसल्या कसल्या भारी भारी सायकली नाहीत. घरात व्यायामासाठी सायकल आहे परंतु त्या बद्दल काय लिहिणार आणि कसले निसर्ग सौंदर्याचे फोटो टाकणार?

मिपावर मोठे मोठे नामचीन बल्लवाचार्य आहेत ( नामचीन या बम्बैय्या मराठी शब्दाचा अर्थ काय कोणास ठाऊक परंतु संदर्भावरून, त्यात चीन असला तरी, त्याचा अर्थ प्रसिद्ध, चांगला असा असावा असे वाटते). माझा त्या बाबतीतला अनुभव फक्त दोन पाकृंचा. एकदा भात करायला गेलो तेव्हा भाताची खीर हा एन्ड प्रॉडक्ट कुकर मधून बाहेर आला. पाण्याचे प्रमाण जास्त झाले अशी माझ्या ज्ञानात भर घातली गेली. आता कुकर म्हणजे हवा बंद प्रकार, त्याच्या आत किती पाणी शिल्लक आहे हे काही कळेना. हे म्हणजे अगदी आंधळी कोशिंबीरच की, तेव्हा ठरवले उघड्या पातेल्यात भात करावा आणि आधीचा अनुभव होता म्हणून पाणी जरा कमीच टाकले. अनुभवातून शिकायला नको का? परंतु पुन्हा एकदा काहीतरी गडबड झाली. यावेळेस एका बाजूने करपलेला काळा तर दुसऱ्याबाजूने पांढरा शुभ्र असा जाड थालीपिठासदृश्य प्रकार हाती लागला तेव्हा पासून कानाला खडा त्यामुळे पाकृ बद्दल हि लिहिण्यासारखे काही नाही.

एखादा लेख लिहावा, एखाद्या गहण विषयावर चर्चा सुरु करावी म्हटलं तर तेव्हडे पांडित्य नाही. आता हळूहळू मिपा पंडितांबरोबर पंडित मैत्री होईल, कट्टा संचार होईल, झालंच तर मिपाकरांचे पर्यटन विषयक लेख वाचून पॅसिव्ह देशाटन देखील होईल तेव्हा कोठे कदाचित चातुर्य आले तर लिहिणहि परंतु आत्ता काय? कलादालनात काही लिहावे तर एकही कला हाताशी नाही. पूर्वी अजाणत्या वयात एका "कला" बद्दल विंट्रेस्ट निर्माण झाला होता खरा पण त्यानंतरच्या गोष्टींच्या आठवणी देखील नकोश्या आहेत त्यामुळे तीही शक्यता नाही.

क्रीडा, सिनेमा, नाटक या गोष्टींचा संबंध फक्त टीव्ही वर बघण्या पुरता, त्यामुळे कितीशी ज्ञानात भर पडणार आणि मी काय माझे पांडित्य दाखवणार? मी काही रसिक कनसर (उच्चार बरोबर आहे का?) नाही सिनेमा, नाटकांवर लिहायला. तंत्रज्ञानाबद्दल बद्दल लिहावे तर घिसाडी असलो तरी फार काही ज्ञान नाही की इतराना ज्ञानामृत पाजावे आणि तांत्रिक गोष्टींमध्ये कोणाला रस असणार.

नाही म्हणायला "न दिसे रवी" म्हणत एक दोन कवितेवर विडंबने केली खरी परंतु "न वाचे कोणी" आणि त्यामुळे ट्यार्पी च्या नावाने बोंबाबोंबच आहे हे लगेच लक्षात आले. चुकलंय? काय चुकलंय? आजकाल स्वयंपाक घरातून रवी हद्दपार झाली आहे त्यामुळे "न दिसे रवी" च बरोबर आहे.

वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यावर ठरवले कि आधी लिखाणासाठी वेगवेगळे विषय शोधून ठेवू आणि मग एकएका विषयावर जिल्बी पडू. हाकानाका.
मग लिस्ट करायला घेतली.

मी खूप स्ट्रीट स्मार्ट आहे, माझे डोके जरा जास्तच चालते, मी काय करावे???????
एकट्याने करण्यायोग्य ड्रिंकिंग साठी बार्स सूचवा!!!!!
टाईमलाईन---- माचो ते नाच्या होण्याची!
विनयचाही विनया कडून विनयभंग होतो???????
पुरुष सदैव बायकांच्या बरोबर असण्याचा प्रयत्न का करतात???????
अंगभर साडी ......महिलांचे हे काय चालू आहे?????????
भारतातील उष्ण हवामानासाठी योग्य अशी धोतर नेसाण्याची प्रथा पुरुषांनी पुन्हा चालू करावी का????
काय करावे!!! तिला मातें म्हणावे की नको?????
अरेंज्ड मॅरेज! हे पुरुषाचे खच्चीकरण नाही काय!!!!
लग्नाचा उद्देश काय!!!! केटरर्स, कार्यालये, प्रिंटिंग प्रेसचे उत्पन्न? की आणखी काय??????
भजन व कीर्तनाचा विळखा कसा सोडवावा??????
सदाचाराची लागलेली चटक कशी सोडवावी?????
कैदी संग्रहालयांवर (jail) बंदी घालावी काय? ???
पिवळे लोक अक्युपंक्चर साठी सुया का बाळगतात????
स्मार्ट शहरांचे तण का माजवले जात आहे????
"मुक्त रहदारी व्यवस्था" स्विकारल्यास अपघात थांबतील काय ?????
लांब केस ठेवावेत कि सरळ डोके उडवून टाकावे???
तुम्ही आहात का सुपरटेक्स्टर????????
Why are there genuine ID's rather than trolls ???????
महाराष्ट्रात चोरलेल्या इंधनाचे रॉकेट, आपण ते कसे उडवू शकतो??????
डू-आयडी कडून मिपा वर होणारे ट्रोलिंग, कंपूबाजी - उपाय काय ????
तुमच्या जवळपास आहे का कुणी "बायकोचामाठ"???
न्हाव्याकडे जायच्या आधी तुम्ही वाढलेल्या केसांचा पोनी बांधता का????
माझ्या अतिशय सुंदर आणि अतिनाजूक शरीराचे काय करावे???
टिक-टिक आणि पिपाण्यावरील बंदीने गणेशोत्सवाची मजा हरवली असे आपल्याला वाटते का?
पूर्व नियोजित वेळेप्रमाणे आगाऊ आरक्षण रद्द केल्यास रेल्वे जोरात पळेल काय?????
रोजचं जगणं 'थ्रीलिंग' व्हावं यासाठी तुम्ही मिपा वर जिल्ब्यां पाडता का?????
इत्यादी ....
इत्यादी ....

माझ्या समजुती प्रमाणे आणि आकलनाप्रमाणे मी हि यादी केली आहे. मिपाकरांनी या यादी मध्ये भर घालावी म्हणजे मला आणि इतर प्रतिभावंत मिपाकर लेखकू मंडळींना लिहिण्याची प्रेर्ना (म्हणजे प्रोत्साहन बर्का) मिळेल.

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

15 Aug 2017 - 8:11 am | ज्योति अळवणी

अगोदर ही यादी लिहून पूर्ण करा. मग पुढचे विषय बघू

Ranapratap's picture

15 Aug 2017 - 8:23 am | Ranapratap

लिहिता येत नाही म्हणता आणि चांगलेच शालजोडीतले हणता कि राव, बाकी लिखाण मस्त, पु ले शु

लिहीत जा, चांगलं लिहीताय.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

15 Aug 2017 - 11:22 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

छान लिहीलय!! असचं लिहीत जा.पुलेशु.

हतोळकरांचा प्रसाद's picture

15 Aug 2017 - 11:44 am | हतोळकरांचा प्रसाद

अतिशय उत्तम लिखाण! अशा जिलब्या रोज खायला देखील आवडतील!

माम्लेदारचा पन्खा's picture

15 Aug 2017 - 12:46 pm | माम्लेदारचा पन्खा

तो जेव्हा असा तुमच्या लिखाणातून डोकावेल ना तेव्हा तुमची नक्की दखल घेतली जाईल !

लिहित रहा !

भित्रा ससा's picture

15 Aug 2017 - 1:35 pm | भित्रा ससा

मला आवडले बुवा

दुर्गविहारी's picture

15 Aug 2017 - 2:56 pm | दुर्गविहारी

"चामुंडराय करवियले" जिलेबी नेमकी १५ ऑगस्टलाच आली कि.
तुम्ही दिलेले विषय आधीच एका आय. डि. च्या हिटलिस्टवर आहेत तेव्हा तुम्हाला या विषयावर लिहायला संधी नाही.
बाकी मस्त लिहीताय. पु.ले. शु.

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

15 Aug 2017 - 5:14 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

आता या तुपात तळुन झाल्यावर पाकात चांगल्या मुरवा व येउ द्यात मिपाकरांसाठी वारंवार.

कंजूस's picture

15 Aug 2017 - 6:10 pm | कंजूस

शेवटी काय ठरलं?

मराठी कथालेखक's picture

15 Aug 2017 - 6:52 pm | मराठी कथालेखक

तुम्ही लिहिण्यासाठी चार्ज्ड झाला आहात तर !! मग आता कढईत टर्बो ऑईल ओतून पाडा फिलॉसॉफीच्या जिलब्या...

पैसा's picture

15 Aug 2017 - 7:40 pm | पैसा

:)

गुल्लू दादा's picture

15 Aug 2017 - 7:44 pm | गुल्लू दादा

छान लिहिलंय चामुंडराया...!

हृषीकेश पालोदकर's picture

15 Aug 2017 - 9:01 pm | हृषीकेश पालोदकर

तुम्हाला जसं काय लिहावं कळत नाही तसंच मला काय प्रतिसाद द्यावा ते समजत नाहीये.
तरीही नेटकी मांडणी आणि विषय घोळवून चांगला लांबवण्याची कला यावरून कविता सोडून कुठल्याही विषयात उडी मारायला हरकत नाही.

प्रमोद देर्देकर's picture

16 Aug 2017 - 5:51 am | प्रमोद देर्देकर

तुमचे अगदी चांगदेवा सारखे झाले आहे. तुम्ही काहीच लिहू नका.
इथे एक . द्या कारण त्याला पण खूप रतीसाद आपलं ते हे प्रतिसाद येतात मिपाकर.
जरा खोदकाम करा.
बाकी कट्टा संचार शब्द आवडल्या गेल्या आहे.

अजया's picture

16 Aug 2017 - 7:35 am | अजया

:)

दीपक११७७'s picture

16 Aug 2017 - 1:15 pm | दीपक११७७

?????

चामुंडराय = टर्बोचार्जड फिलॉसॉफर

पूर्वी अजाणत्या वयात एका "कला" बद्दल विंट्रेस्ट निर्माण झाला होता खरा पण त्यानंतरच्या गोष्टींच्या आठवणी देखील नकोश्या आहेत त्यामुळे तीही शक्यता नाही.

अच्छा!
हे ज्यु. ब्रह्मे आहेत तर..

सस्नेह's picture

16 Aug 2017 - 2:50 pm | सस्नेह

ओके.

चामुंडराय's picture

18 Aug 2017 - 7:04 am | चामुंडराय

ज्योति अलवनि -
मी यथाशक्ती यादी केली आहेच कि. आता सुजाण मिपाकर्रांनी यादीत भर घालणे अपेक्षित आहे.

Ranapratap, सूड, टर्बोचार्जड फिलॉसॉफर, हतोळकरांचा प्रसाद, भित्रा ससा, योगेश लक्ष्मण बोरोले, गुल्लू दादा -
प्रोत्साहन दिल्या बद्दल आभार्स.

माम्लेदारचा पन्खा -
मिपा च्या भाषेत सांगायचं झालं तर प्रयत्न "केल्या" जाईल.

दुर्गविहारी -
जिल्बी १५ ऑगस्टला आली खरी पण तो केवळ एक योगायोग.

कंजूस -
ते तुम्ही ठरवायचं आहे हो.

पैसा -
_/\_

प्रमोद देर्देकर -
जल्ला काय बी कल्ला नाय.
. दिल्याने रति साद घालते का? जरी इस्कटून टेलमी दर्दकर भाऊ. सिम्स समथिंग विण्ट्रेस्टिंग !!

दीपक११७७ -
हा माझा प्रथमावतार आहे हो. अजून अकरा शे सत्याहत्तर अवतार येणे बाकी आहे.

सौरा -
हे हे... मी आणि ज्यु. ब्रह्मे? कुठे ज्यु. ब्रम्हेची सकाळप्रसिद्ध लुना आणि कुठे माझी साधी व्यायामाची सायकल.
काहीही हां सौरा

स्नेहांकिता -
तुमचा प्रतिसाद Okay आहे बर्का.

जव्हेरगंज's picture

18 Aug 2017 - 9:16 am | जव्हेरगंज

चांगलंय!!!

चामुंडराय's picture

21 Aug 2017 - 7:45 am | चामुंडराय

.