हे पण छळ-कपट वाले कॉल

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
9 Feb 2017 - 5:39 pm
गाभा: 

अलीकडे http://www.jobishh.com/ किंवा http://www.clickjobs.com/ सारख्या काही ठिकाणांहून अचानक बरेच कॉल्स येताहेत ...

थोडक्यात सांगायचे तर तुम्ही काही पैसे ६ ते ९ हजार भरा आणि ते तुमच्यासाठी इंटरव्ह्यू (निश्चित नंबर किंवा कालावधी नाही) अरेंज करतील
त्यांच्याशी जेव्हा रोकडी बातचीत करावी आणि जर का रिफँड साठी तुमच्या अटी शर्ती काय आहेत असे विचारले तर अत्यन्त गोलमाल उत्तरे देतात ...

योगायोग म्हणजे हे सगळे कॉल्स दिल्ली हुन येताहेत आणि बराच अक्सेंट मारून बोल्ट असले तरी इंग्रजीचा दर्जा बघता अत्यन्त संशयास्पद व्यवहार वाटतो आहे ...

बहुतांश वेळा वे विल गेट बँक म्हणून कॉल्स संपले परंतु कुणी तरी ह्याला बळी पडू शकतो म्हणून हा धागा ...

कुणाला असे काही अनुभव आलेत का ??

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

9 Feb 2017 - 7:08 pm | सिरुसेरि

बरेचदा अनोळखी लोकं भेटुन "आपण अमुक तमुक Well known college मध्ये M.B.A. करत असुन M.B.A. चा project म्हणुन अमुक तमुक N.G.O. ला donation द्या " असे सांगत असतात . त्यांच्याकडे असलेले कसले तरी जुनाट आयकार्डही दाखवतात . हे पण छळ-कपट वाले लोक असावेत .

बाप्पू's picture

9 Feb 2017 - 11:16 pm | बाप्पू

Sorry for replying in English.
I got a call from one number few days back. They have set up one website and if some one is looking for job change, he/she can get desired jobs easily with their website.
All we need to do is, submit 3000 Rs to them and they will give a username and password to access their website. This username and password is valid for 6 months. Once we login into their website, we will get access of many job openings which are not posted on job sites like naukri, monstor etc.
We just need to choose the job which we like. Once we select the job they will forward our resume to concerned person and also provide a reference and we can get the job easily.

When I was communicating with them, I can easily understand that they were not professionals.
Please be aware.

Below are their numbers-

+91-7289842310
+91-7611946410
+91-9311424698

अनन्त्_यात्री's picture

10 Feb 2017 - 10:06 am | अनन्त्_यात्री

" छळ-कपट वाले" ही काय भानगड आहे? सरळ "फसवे" कॉल म्हणा ना !

लई भारी's picture

10 Feb 2017 - 2:35 pm | लई भारी

मी थोड्या उपहासाने तो शब्द वापरला होता.
इन्शुरन्स च्या जाहिरातीत वगैरे कुठेतरी हा शब्द ऐकला आहे.
माझ्या मते 'फ्रॉड' च अगदी रद्दी भाषांतर आहे हे. कदाचित हिंदीचं आक्रमण असेल.

अनिरुद्ध.वैद्य's picture

11 Feb 2017 - 11:37 am | अनिरुद्ध.वैद्य

आधी, जॉब लाउन द्या, नंतर ३००० ऐवजी ६००० घ्या!

मैं credit card cell से बोल रहा हू.
बंम्बई से. आपका card block हूवा है.

मी म्हणालो साले चु..... बंम्बई नाही मुंबई. पुढे आमच्यात बाराखडीची देवाण घेवाण झाली.

आणि फोन कट झाला.