मी काही प्रोफेशनल फोटोग्राफर नाही आणि मला फक्त फोटो काढणे माहित आहे जे चांगलं वाटतं ते क्लीक करतो. आणि कॅमेरा घेऊन ४ महिने झाले त्यामुळे त्यातील सर्व सेटिंग्स अजून माहित पुलाचे फोटो चालत्या बस मधून घेतले त्यामुळे व्यवस्थित वेळ नाही मिळाला .सर्व फोटो १८-५५ लेन्स ने घेतले आहेत.
प्रतिक्रिया
4 Jan 2017 - 8:32 pm | एस
छान आहेत छायाचित्रे. शुभेच्छा.
5 Jan 2017 - 9:24 am | खेडूत
छान फोटू आहेत.
सुट्टे करून टाकले आणि प्रत्येकी दोन-दोन ओळी लिहील्यास चांगले वाटेल.
5 Jan 2017 - 11:56 am | मयुरMK
पुढचे फोटो टाकताना लिहीन जरूर
5 Jan 2017 - 11:58 am | मयुरMK
धन्यवाद :) एस आणि खेडूत
5 Jan 2017 - 9:45 am | महासंग्राम
१. पहिला फोटो छानच लाईट मस्त आलाय. पण मोनोक्रोम केला असता तर अजून छान वाटलं असतं.
२. बाकड्याचा फोटो भारीच
३. कबुतराचं रिफ्लेक्शन पण सुंदर आलंय
४.रेल्वे स्टेशन कुठलं आहे, कलर मस्त आलेत या फोटोत
५. फोटो दिसत नै त्यामुळे पास.
६ या फोटोत फ्रेम अगदी टाईट झालीये, म्हातारबाबा आणि जळणारा दिवा सब्जेक्ट आहे असे गृहीत धरतो.
७.या कबुतराच्या फोटोत खाली अनावश्यक जागा सोडली आहे त्यामुळे कबुतर क्रॉप झाले आहे. बहुदा क्रॉपिंग चा इश्श्यु आहे असे गृहीत धरतो बाकी फोटो छानच आला आहे हा.
८.बिडी ओढणाऱ्या माणसाचा फोटो HDR केला आहे का स्नॅपसीड मध्ये. खूप बटबटीत वाटतो आहे. हा पण मोनोक्रोम केला असता तर अजून भारी दिसला असता. अर्थात हे माझं मत झालं.
९. खिडकीतून पाहणाऱ्या मुलीचा फोटो मस्त. एक्सप्रेशन भार आलेत.
१०. स्टेशन चा फोटो. या फोटोत कमाल लाईट आलाय. स्टेशनल जो निवांत पण असतो त्याचा फील येतोय या लाईट मुळे मस्तच.
पुफोशु.
5 Jan 2017 - 11:50 am | मयुरMK
बिडी ओढणाऱ्या माणसाचा फोटो hdr केला आहे कलर हाय जाणवतात एकदम पुढील वेळी मोनोक्रोम वापरून पाहीन.ते स्टेशन बेळगाव च आहे . धन्यवाद माहितीसाठी
5 Jan 2017 - 12:00 pm | विशुमित
फोटोग्राफीतलं मला बिलकुल काही कळत नाही पण पहिल्यांदा पाहिले तेव्हा बिडी ओढणाऱ्या माणसाचा फोटो मला सगळ्यात जास्त आवडला होता.
मंदार भाऊंनी सोप्या भाषेत छान समजावलं आहे. धन्यवाद..!!
5 Jan 2017 - 3:14 pm | महासंग्राम
बाकी पहिल्या फोटोत
हम नहीं थे तो क्या कमी थी यहाँ
हम न होंगे तो क्या कमी होगी
असे भाव दिसतायेत म्हातारीच्या चेहऱयावर.
5 Jan 2017 - 4:09 pm | मराठी कथालेखक
म्हतारी ? मला तरी एक तरूण दिसतो आहे फोटोत.
5 Jan 2017 - 4:12 pm | मयुरMK
हो तो मुलगा आहे म्हातारी नव्हे
5 Jan 2017 - 4:24 pm | महासंग्राम
नै ओ मला तो प्रतिसाद बिडी ओढणाऱ्या म्हाताऱ्याबदल होता ऑटो करेक्ट ने म्हातारी झालीये त्याची :)
5 Jan 2017 - 4:10 pm | मयुरMK
म्हातारी नाही ती मुलगा आहे :)
5 Jan 2017 - 10:19 am | तुषार काळभोर
१, २, ६, ८. १० एकदम छान आहेत.
५ दिसत नाहिये.
सगळ्या फोटोंमध्ये एक संधिप्रकाश टाईप टोन जाणवतोय. काही विशेष कारण?
5 Jan 2017 - 11:53 am | मयुरMK
सगळे फोटो मी थोडं अंडरएक्सपोज शूट करतो आणि बाकी ऍक्टिव्ह दि लाईटनिंग वैगरे करतो लाईट इफेक्टस वापरतो.धन्यवाद
5 Jan 2017 - 10:46 am | पियुशा
आप्लयाला फो टु तल काय बी कळत नाय दोल्याना झ्याक वाटले फो टु :)
5 Jan 2017 - 11:55 am | मयुरMK
धन्यवाद :) बगणाऱ्याला छान वाटावा फोटो एवढच असत फोटोग्राफी मध्ये .
5 Jan 2017 - 2:10 pm | पाटीलभाऊ
असेच फोटो काढत राहा...आणि टंकवत राहा...!
5 Jan 2017 - 2:48 pm | मराठी कथालेखक
रेल्वे रुळ , बिडी ओढणारा मनुष्य, डोक्यावर ताट घेतलेला पुजारी (?) , आणि ट्रेनच्या खिडकीतून बाहेर बघणारी मुलगी हे फोटोज आवडलेत.
5 Jan 2017 - 4:32 pm | भुमन्यु
पोस्ट प्रोसेसिंग साठी कुठल सॉफ्टवेअर वापरलं?
5 Jan 2017 - 6:05 pm | सूड
बर्यापैकी बरे आहेत फोटो, लिहीत पण जा. म्हणजे त्या फोटोंना पूरक होईल.
5 Jan 2017 - 8:51 pm | मयुरMK
धन्यवाद सर्वाना पुढच्या वेळी फोटोबद्दल दोन ओली जरूर लिहीन ,पिक्स आर्ट वर एडिट केलं आहे