वारे निवडणुकी पुर्वीचे १९९०-२०००-२०१७

बरखा's picture
बरखा in काथ्याकूट
31 Dec 2016 - 1:25 pm
गाभा: 

दशक १९९० - स्थळ- पुणे -वातावरण- निवडणुकी पुर्विचे
माझ्या आठवणी नुसार, निवडणुका जवळ आल्या की वेग-वेगळे पक्ष आपला प्रचार करण्यास तयार व्हायचे.नेते लोक प्रत्येक घराला भेट द्यायचे. आपुलकीनी मत मागायचे. त्या वेळी फार मोठ्या ईमारती न्हवत्या. चाळिवजा घरे जास्त होती, त्यात वावर करण्याचा रस्ता मातीचा. मुख्य सडका फक्त डांबरी होत्या. निवड्णुका आल्या की नवीन डांबरी रस्ता करणे, चाळित मातीच्या रस्त्यावर फरश्या टाकणे, नळ कोन्ढाळी करुन देणे अश्या वेग-वेगळ्या कामांना वेग यायचा.
त्या वेळेस बोटावर मोजण्या ईतकेच पक्ष होते. प्रभागही आताच्या मानाने लहान होते. कुणी कितीही कार्य केल तरी कोण निवडुन येणार याच्या अंदाज असायचा. निवड्णुक तारखेच्या दोन-चार दिवस आधी काही रिक्षा सगळ्या गल्ली-बोळातून फिरायच्या. नेहमी फटर फटर आवाज करणारी रिक्षा त्या दिवशी मात्र अगदी हळु चालायची, तिच्या दोन्हि बाजुल कर्णा लवलेला असायचा. मागे पक्ष नेत्याचा फोटो आणि पक्षाचा चिन्हाचा फलक असायचा, आरश्याच्या बाजुला पक्ष चिन्हाचे झेंडे असायचे. आत रिक्षा चालक आणी मागे पक्षाचा एक माणुस. त्याच्या जवळ एक माईक. अस त्या रिक्षेच स्वरुप असायच. मग तो पक्षाचा माणुस त्या माईक वरुन पक्षाच कार्य, पक्ष नेत्याच नाव आणि पक्षाच चिन्ह असं अनुक्रमे सतत बड्बडत राहायचा. मधुनच कसलस न कळ्णार संगीत वाजायच. त्याची चाल मत्र ओळखिची वाटायची.
आम्ही मजा म्हणुन त्या रिक्षेच्या मागे मागे फिरायचो. घरी आल्यावर त्या माणसाची नाक्कल करत तसच ओरडत फिरायचो. आमचे वडिल तेव्हा अस करु नका म्हणुन ओरडायचे , पण त्यांच आम्ही ऐकायचो नाही. पण जेव्हा नुवड्णुकीचा दिवस यायचा त्या दिवशी मात्र आम्ही सगळे चुप असायचो. कारण अस ओरड्णारयाला पोलिस पकडुन नेतात अस सांगितल जायच. त्या वेळी काही पोलिस गाड्या आजुबाजुला फिरायच्या आणि त्या रिक्षा पण एक दिवस आधी पासुन फिरायच्या बंद व्हायच्या. आम्हाला हे खरच वाटायच. मग आम्ही चुप बसायचो.

दशक २००० - स्थळ- पुणे -वातावरण- निवडणुकी पुर्विचे

आता शहर बरच प्रगत झाल होत. काही ठिकाणी चाळिच्या जागी दुमजली घरे उभी राहीली होती. नळ कोंढाळी जाउन प्रत्येकाला घरात नळ मिळाले होते. निवड्णुकीचे प्रचार करण्याची पध्धत थोडी बदलली होती. रिक्षाची जागा जीप गाड्यांनी घेतली होती. नेते लोक घरो घरी न जाता मोठी सभा घ्यायचे. त्यातच आपली ओळख करुन द्यायचे. चौका चौकात हळदी कुंकवाचे कार्यक्रम नेत्याच्या बायको कडुन व्हायचे. पक्ष वाढु लागले होते. तश्या जनतेच्या सोयी सुविधांकडे लक्ष कमी होउ लगले होते. आपुलकीने मतं मागणारे नेते दमदाटी करुन आम्हालच मत द्या अस बिनधास्त जोर करु लागले. नक्की कोणता पक्ष निवडुन येणार हे कळणे अवघड झाले. हे स्वरुप बराच काळ असेच राहीले.

साल २०१६ - स्थळ- पुणे -वातावरण- निवडणुकी पुर्विचे
आता अनेक पक्ष निर्माण झाले आहेत. प्रचार करण्यची पद्धत खुपच बदलली आहे. जागो जागी मोठाले फ्लेक्स त्यावर नेत्या सोबत ईतर कर्यकर्त्यांचे फोटो. काहीही घडले की शुभेच्छाचे वर्षाव करणारे फलक. ते एकदा लावले की फाटे पर्यन्त उतरवले जात नाहीत. चौका चौकात वेग वेगळे कर्यक्रम,आयोजीत केले जातत मोठ्या आवाजातील डी जे वर वाजणारी गाणि चालु असतात. खेळ पैठणीच, बाल जत्रा, संगीत सभा, लकी ड्रो- त्यात मोठाली गिफ्ट्स. अशा प्रकारचे वातवर सध्या मी बघते आहे. आता हे नेते सभेत फार बोलतहि नाहीत. घरो घरी यांनी केलेल्या कार्याची पत्रक पोहचतात. त्या कार्यावर प्रत्येक जण हक्क बजाबतो. सगळिच काम अर्धवट पार पाडलेली असतात ती पत्रक फक्त रद्दी वाढवायच काम करतात. काही ठरावीक नावे सोडली तर आपल्या प्रभागात अजुन कोण उमेदवार उभे आहेत हे त्या निवडणुकीच्या मशीनवरची यादी वाचल्यावर कळते. यांना कधी आपण पाहीलेले नसते. यांचे कर्यक्रम पण आपल्या भागात झाले आहेत असे आठवत नाही.
हे सर्व बघुन फार दुख्ख होत. नुसते असे मोठाले कर्यक्रम करुन खरचं मतं मिळवता येतात का ? केवळ या कार्यक्रमावर भाळुन आपण आपल मत बदलाव क? हे सर्व कळत असुन देखिल कधी कधी आपल्याला नको असलेला उमेदवार निवडावा लगतो, कारण सुजाण असा नेता आपल्या प्रभागात उभाच राहीलेला नसतो. त्या मुळे नाईलाजाने आपण मशिनवर नको असलेले बटण दाबतो....... आणि बघु पुढ्च्या वेळी असं म्हणुन वाट बघत बसतो........

(खुप दिवसांनी लेखन केले आहे. कही चुकले असल्यास मिपाकारांनि साभाळुन घ्यावे.)