गाभा:
नमस्कार, मिसळपाव.कॉम च्या रचनेत येत्या काही दिवसांत बदल होत आहे. त्यामुळे काही सुविधा काही काळासाठी उपलब्ध नसतील. सदस्य आणि वाचकांस अडचण येऊ नये याची काळजी घेत आहोत. मिपा लवकरच आपल्या समोर अधिकाधिक सोईस्कर आणि नवीन ठेवणीत यावं असा प्रयत्न आहे.
छान! फक्त एक विनंती आहे, जरा असलेल्या मजकुरातून हवा असलेला मजकूर शोधण्याची सुविधा देता आली तर पहा.
असल्यास मला शोधूनही सापडलेली नाही.
प्रतिक्रिया
28 Dec 2016 - 4:25 pm | प्रकाश घाटपांडे
मायबोली सारखी ही सुविधा हवी. सदस्य व मजकूर दोन्ही सर्च करता आले पाहिजेत.
28 Dec 2016 - 4:36 pm | कैवल्यसिंह
हो आणि सर्व मजकुरासोबत सर्व लेख पन शोधता यायला पाहिजे... शोध हा पर्याय मिपा वर असायला पाहीजे. म्हणजे शोधायचे काम एकदम सोप्पे होईल व वेळही भरपुर वाचेल..
28 Dec 2016 - 4:48 pm | साधा मुलगा
मिपा च्या अँप वर "शोध" नावाची लिंक आहे ज्यात गुगल सर्च प्रमाणे सर्च करता येते आणि लेख आणि लेखक, तसेच लेखातील मजकूरही शोधता येतो, हीच सुविधा website वर मिळाली तर चांगले होईल.
28 Dec 2016 - 5:57 pm | कैवल्यसिंह
मला मिपा एंड्राॉ़यड अॅपची लिंक देता का.... किंवा कसे डाऊनलोड करायचे ते सांगा..
28 Dec 2016 - 6:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
Play store मध्ये MisalPav अशी विचारणा करा.
28 Dec 2016 - 6:14 pm | साधा मुलगा
आणि आपल्या मिपाचे लोगो असलेले अँप बघा