शेळीपालन (गोट फार्मिंग)

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in काथ्याकूट
20 Oct 2016 - 11:24 am
गाभा: 

इथे कोणी शेळीपालन ह्या व्यवसायात आहे का? किंवा कोणाच्या परिचयातील व्यक्तींचा गोट फार्म आहे का? मी त्या व्यवसायात पदार्पण करत आहे त्यासाठी प्रत्यक्ष अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे म्हणतोय. तसेच कोणी ह्या व्यवसायात असतील तर त्यांच्याकडून खरेदी देखील करता येईल.

प्रतिक्रिया

दिलीप सावंत's picture

20 Oct 2016 - 11:55 am | दिलीप सावंत

शेळी पालन हा एक खूप चांगला यवसाय आहे. शेळ्या आणि बोकड यांचे एक वेगळे अर्थशास्त्र तर आहेच, पण त्याचे जीवशास्त्रही विचारात घेणे आवश्यक आहे. बर्‍याच शेतकर्‍यांना आपल्याजवळची शेळी कोणत्या जातीची आहे हे माहीत नसते.

पण आमच्या गावाकं लय शेरडा हायेत.... ज्यो पोऱ्या साळत जात न्हाय त्यो शेरडाकं जातोय. लय शिंपल अंडस्ट्यांडींग आस्तय बगा बाप - लेकात आमच्या गावाकं! ;)

Sandy

संदीप डांगे's picture

20 Oct 2016 - 1:10 pm | संदीप डांगे

शासकीय मार्गदर्शन व मदत मिळते, ती शोधावी.

गोटफार्म वाल्यांची माहिती देतो लवकरच!

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Oct 2016 - 3:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

माझ्या माहितीनुसार पुण्याला वारजे इथे, मंगेशकर हॉस्पिटल जवळ बाएफ रिसर्च फौंडेशनचे प्रशिक्षण केंद्र आहे जिथे शेळीपालन करण्याचे प्रशिक्षण उपलब्ध आहे.

शेळीपालन, व्यवसाय उत्तम असून ह्यात लक्षात ठेवण्यालायक मुद्दे (अगदी मूलभूत) खालील प्रमाणे
१. शेळीची प्रजाती आपण जिथे पालन करू इच्छित त्यानुसारच ठरवावी, महाराष्ट्रात उस्मानाबादी शेळी (काळी) उत्तम असते, पण शेळी पासून दुग्धोत्पादन घ्यायचे असल्यास जमनापारी शेळी उत्तम असेल, पण त्या शेळीला खास व्यवस्था (वातावरण नियंत्रण वगैरे) कराव्या लागतील

२. काहीही झाले तरी शेळीचं खांड जिथे ठेवाल ती जागा कटाक्षाने कोरडीच राखली गेली पाहिजे, बांबूचे मूत्र झिरपणारे फ्लोरिंग ह्या करता उत्तम असेल, त्या शिवाय ठराविक काळाने स्वच्छता अन लेंडी सफाई करण्याची सोय असावी

३. शेळ्या खेळकर असतात त्यामुळे त्यांच्यासाठी थोडी का होईना बागडायला जागा ठेवावी, बंदिस्त शेळीपालन मी तरी प्रेफर करणार नाही.

प्रभाकर पेठकर's picture

20 Oct 2016 - 1:17 pm | प्रभाकर पेठकर

टिव्हीवर झी मराठीवर 'सुवर्ण कोकण' नांवाचा कार्यक्रम लागतो. त्यांच्या अशा विषयांवर कार्यशाळा असतात. तिथे मार्गदर्शन नक्कीच मिळू शकेल. लाभ घ्यावा.

नाखु's picture

20 Oct 2016 - 2:10 pm | नाखु

स्वतः जाऊन या भेट द्या या ठिकाणी आणि मग ठरवा.

नव्या व्यवसायाला शुभेच्छा...

शहरी चाकरमानी नाखु बिनशेतीवाला